जानेवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

राष्ट्रनिमार्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जानेवारी महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in January) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in January
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in January

Timeline of Dr BR Ambedkar in January

वेगवेगळ्या वर्षांतील जानेवारी महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. जानेवारी महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in January – बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो — साऊथ ब्युरो कमिशनपुढे साक्ष, भीमा कोरेगावच्या जयस्तंभास भेट, अखिल भारतीय दलित फेडरेशनची स्थापना, उस्मानिया विद्यापीठाकडून डिलीट ही मानद पदवी प्रदान, रानडेंच्या 101 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध ‘रानडे, गांधी आणि जिना’ भाषण, मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित, दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थिती, भारतीय संविधानाची अंमलबजावणी, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार… इत्यादी.

 

जानेवारीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 जानेवारी 

  • भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ स्मृतिदिन – 1818 (शौर्य दिन)
  • 1927 : भीमा कोरेगाव येथे स्मृतिसभा झाली होती आणि त्यात बाबासाहेब सहभागी होते.
  • 1938 : अस्पृश्यांची सभा झाली.
  • 1979 : मंडल आयोग नेमले.

 

2 जानेवारी

  • महर्षी शिंदे स्मृतिदिन
  • 1943 : अखिल भारतीय दलित फेडरेशनची स्थापना झाली. याची प्रांतिक शाखा नागपूर येथे स्थापन केली.

 

3 जानेवारी

  • सावित्रीबाई फुले जयंती
  • 1908 : रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.
  • 1940 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कराड येथे मानपत्र देण्यात आले.

 

4 जानेवारी

  • जागतिक ब्रेल दिवस (World Braille Day)
  • 1938 : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूर महानगरपालिकेचे मानपत्र देण्यात आले.
  • 1954 : ‘महात्मा फुले’ बोलपट मुहूर्त समारंभास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

 

5 जानेवारी

  • डॉ. भदंत आनंद कौसल्यायन जयंती 

 

 

6 जानेवारी

  • जागतिक युद्धातील अनाथांचा दिवस
  • बाबू हरदास एलएन जयंती
  • 1929 : महार वतन बिलाच्या पाठिंबासाठी वतनदार महारांची सभा मु. गोवले येथे भरली.

 

7 जानेवारी

  • जागतिक संसद दिन 
  • रामचंद्र गुड्डू कांबळे स्मृतिदिन

 

8 जानेवारी

  • बौद्ध धर्म ध्वज दिन
  • 1934 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनहून मुंबईला आगमन झाले.

 

9 जानेवारी

  • प्रवासी भारतीय दिवस 
  • 1929 : मौजे अर्नाळा (तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती) येथे विहिरीवर पाणी भरण्याचा कार्यक्रम झाला.

 

10 जानेवारी 

  • जागतिक हिंदी दिवस 
  • 1938 : शेतकऱ्यांच्या मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1946 : ब्रिटिश लोकसभेच्या शिष्टमंडळाशी डॉक्टर आंबेडकरांची दिल्ली येथे चर्चा झाली.

 

 

11 जानेवारी

  • राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस 
  • 1936 : डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाच्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1950 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, मुंबई परळ येथे एक मोठी सभा झाली, ज्यामध्ये बाबासाहेबांचे भाषण झाले. Ambedkar in January

 

12 जानेवारी

  • राष्ट्रीय युवक दिवस (विवेकानंद जयंती)
  • 1936 : पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य युवक परिषद भरली.
  • 1936 : शिखांच्या भजन कार्यक्रमास डॉक्टर आंबेडकर उपस्थित राहिले.
  • 1953 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उस्मानिया विद्यापीठाकडून डि.लीट. ची मानद पदवी प्रदान करण्यात आली.

 

 

13 जानेवारी

  • 1936 : पुणे येथे धर्मांतर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी परिषद भरली.

 

14 जानेवारी

  • नामविस्तार दिन (1994)
  • माजी सैनिक दिवस 
  • 1937 : विलायतेतून डॉक्टर आंबेडकर मुंबईला परत आले.
  • 1946 : सोलापूर नगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी, ‘मी माझ्या कार्याची मुहूर्तमेढ ही सोलापूरमधूनच रोवली,’ असं बाबासाहेबांनी सांगितले होते.
  • 1951 : वरळी येथील बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1994 : औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ‘ असा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.

 

15 जानेवारी

  • भारतीय लष्कर दिवस 
  • 1913 : डॉ आंबेडकर बडोदा संस्थानातील अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात नोकरीवर रुजू झाले.
  • 1949 : मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण करण्यात आली.

 

Timeline of Dr Ambedkar in January 

16 जानेवारी

  • राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन
  • 1936 : वाशिम येथे सी.पी. व मातंग परिषद भरली.

 

17 जानेवारी

  • 1934 : चांदूर बाजार येथे अमरावती जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन झाले.

 

18 जानेवारी

  • 1943 : न्यायमूर्ती म.गो. रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. पुढे हे भाषण ‘रानडे, गांधी आणि जिना’ नावाने पुस्तक रुपाने प्रकाशित झाले.

 

19 जानेवारी

  • 1931 : पहिल्या गोलमेज परिषदेचे समारोपाचे अधिवेशन झाले.
  • 1950 : हिंदू कोड बिलास पाठिंबा देण्यासाठी अस्पृश्यांची मुंबई येथे सभा झाली.
  • 2024 : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस‘ या 206 फुट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

 

20 जानेवारी

  • 1929 : रत्नागिरी जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या नियोजनासाठी मुंबई येथे भाऊच्या धक्क्यावर जाहीर सभा झाली.

 

21 जानेवारी

  • 1931 : पहिली गोलमेज परिषद समाप्त झाली.
  • 1940 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत आशाप्रमोद साप्ताहिकात प्रसिद्ध झाली.

 

22 जानेवारी

  • 1939 : बाबू हरदास स्मृति कार्यक्रम कृष्णा नदीतिरी झाला.

 

23 जानेवारी

  • पराक्रम दिन (सुभाष चंद्र बोस जयंती)
  • 1913 : भीमराव आंबेडकर बडोदा संस्थानात नोकरीवर रूजू झाले. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार त्यांनी ही नोकरी स्वीकारली होती.
  • 1933 : समता सैनिक दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथे स्वागत झाले.

 

24 जानेवारी

  • आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
  • 1939 : स्वतंत्र मजूर पक्षाची सोलापूर येथे सभा झाली.
    1942 : नागपूर येथे महात्मा गांधींना काळी निशाने दाखवून आपला निषेध दर्शवला.

 

25 जानेवारी

  • राष्ट्रीय मतदार दिवस
  • राष्ट्रीय पर्यटन दिवस 
  • मानवेंद्र रॉय स्मृतिदिन
  • 1938 : अहमदनगर येथे शेतकरी व कामगार यांच्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण झाले. Ambedkar in January

 

26 जानेवारी

  • गणराज्य दिन/ प्रजासत्ताक दिन
  • आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन
  • 1944 : मजूरमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कानपूर येथे सभा झाली.
  • 1950 : भारतीय राज्यघटना अमलात आली.

 

27 जानेवारी

  • आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन
  • 1919 : साऊथ ब्युरो कमिशन पुढे डॉ. आंबेडकरांची साक्ष झाली. हा बाबासाहेबांचा सामाजिक राजकीय जीवनातील पहिला टप्पा मानला जातो.

 

 

28 जानेवारी

  • डेटा गोपनीयता दिन
  • 1912 : विद्यार्थी भीमराव आंबेडकरांनी शाहू महाराजांना पत्र पाठवले.

 

29 जानेवारी

  • पाकिस्तानचे आंबेडकर – जोगेंद्रनाथ मंडल जयंती
  • 1932 : दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन झाले व 114 संस्थांतर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले.
  • 1939 : पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

30 जानेवारी

  • जागतिक कुष्ठरोग दिन (जानेवारीचा शेवटचा रविवार)
  • 1944 : एन. शिवराज यांचे अध्यक्षतेखाली कानपूर येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे अधिवेशन झाले.
  • महात्मा गांधी स्मृतिदिन – 1948 (हुतात्मा दिन)

 

31 जानेवारी

  • जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन
  • 1920 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

 

जानेवारीमध्ये घडलेल्या अन्य घटना 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण जानेवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in January) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *