ऑगस्ट महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण जीवनपट किंवा दिनविशेष (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in August) या लेखामध्ये समाविष्ट आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती महत्वाची आहे.

Timeline of Dr. Babasaheb Ambedkar in August
ऑगस्ट मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट – Timeline of Dr Babasaheb Ambedkar in August

Timeline of Dr Ambedkar in August

वेगवेगळ्या वर्षांतील ऑगस्ट महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप साऱ्या ऐतिहासिक घटना घडल्या. ऑगस्ट महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in August : बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा देखील समावेश या लेखामध्ये करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबींमध्ये शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना, महात्मा गांधींशी पहिली ऐतिहासिक भेट, भारताच्या कायदेमंत्रीपदी नियुक्ती, मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड, हिंदू कोड बिल संसदेसमोर मांडणे, परराष्ट्र धोरणावरील राज्यसभेमध्ये विचार मांडणे यासारख्या प्रमुख घडामोडी समाविष्ट होतात.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in August

 

ऑगस्टमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 ऑगस्ट

  • 1918 : राजर्षी शाहू महाराजांनी गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी बंद करणारे आज्ञापत्रक काढले.
  • 1937 : बाबासाहेब आंबेडकर धुळ्यामध्ये होते.
  • अण्णा भाऊ साठे जयंती (1920)

 

2 ऑगस्ट

  • 1937 : 31 जुलै ते 2 ऑगस्ट या तीन दिवसीय धुळे दौऱ्यावर बाबासाहेब आंबेडकर होते.
  • 1942 : भावी राज्यघटनेत हरिजन आदी जातीचा दर्जा कायम राहील वगैरे पाच प्रश्नांवर महात्मा गांधींनी हरिजन पत्रकात दिलेली उत्तरे दैनिक महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली.

 

3 ऑगस्ट

  • 1928 : मुंबई प्रांतीय समितीवर सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली.
  • 1928 : मुंबई विधिमंडळात महार वतन बिलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
  • 1947 : ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव 15 जुलै 1947 रोजी स्वीकृत केल्यानंतर 3 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती.

 

4 ऑगस्ट

  • 1923 : सी. के. बोले यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असणारा ठराव मुंबई विधिमंडळात मांडला. 4 ऑगस्ट 1923 रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात “सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी” असा ठराव मंजूर करून घेतला.
  • 1927 : सार्वजनिक पानवट्यावर अस्पृश्यांना बंदी करणारा ठराव महाड मुन्सिपालिटीने मंजूर केला.

 

5 ऑगस्ट

  • 1928 : सायमन कमिशनवर (प्रांतिक समिती) काम करण्यासाठी मुंबई विधिमंडळाने बाबासाहेबांना नियुक्त केले.
  • 1938 :  परळी येथील हिंदू पुढाऱ्यांच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1947 : मुंबई मुन्सिपल कामगारांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2001 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती रुपयांची थैली देण्यात आली
  • 1956 : सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत चर्चा करताना बाबासाहेबांनी आपल्या भविष्यातील लक्षांवर प्रकाश टाकला. बौद्ध संस्कृतीला पुनर्जीवित करणे आणि बौद्धमय भारत बनवणे ह्या त्यातील प्रमुख बाबी होत्या.

 

 

6 ऑगस्ट

  • शांतता पुरस्कार दिन
  • 1920 : पंढरपूर येथे संत पेठ महारवाड्यात बहिष्कृत वर्गाची सभा झाली.
  • 1947 : मुंबईतील वकिलांच्या संस्थेने स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला.

 

7 ऑगस्ट

  • 1937 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न झाली. या सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  • 1942 : मजूर मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते चौथ्या मजूर परिषदेचे नवी दिल्ली येथे उद्घाटन झाले. महायुद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री या नात्याने ‘चौथी मजूर परिषद’ दिल्लीत बोलावली होती. (7-8 ऑगस्ट)

 

8 ऑगस्ट

  • 1930 : कामठी (नागपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद झाली. मागासवर्गीयांच्या या सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.
  • 1942 : महायुद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘चौथी मजूर परिषद’ दिल्लीत बोलावली होती. (7-8 ऑगस्ट)

 

9 ऑगस्ट

  • 1930 : कामठी (नागपूर) येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाच्या परिषद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भविष्याची योजना आणि रणनीती यावर त्यांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले. अस्पृश्यांसाठी देशातील विधिमंडळांमध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व व सार्वजनिक सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य आरक्षण असावे या मागण्या सभेत करण्यात आल्या.
  • 1942 : दिल्ली येथे महाराष्ट्र समाज, बृहन्महाराष्ट्र मंडळ आदी संस्थांतर्फे महाराष्ट्र क्लबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला.
  • 1952 : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलेली ऐतिहासिक ‘बुद्ध वंदना’ राजगृह येथे ध्वनिमुद्रित करण्यात आली. राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान आहे.
  •  1953 :  गड्डी गूडम, औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये “वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही”, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.
  • 1956 : औरंगाबाद येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कमिटी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

10 ऑगस्ट

  • 1930 : अखिल भारतीय दलित काँग्रेस महिलांचे स्वतंत्र अधिवेशन झाले.
  • 1950 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना औरंगाबादहून पत्र लिहून ‘हिंदू कोड बिल’ 16 ऑगस्टपूर्वी लोकसभेत पटलावर ठेवण्याची विनंती केली.

 

 

11 ऑगस्ट

  • 1946 : पुणे सत्याग्रहात कारावास भोगून आलेल्या स्त्रियांच्या सत्कारासाठी बीडीडी चाळ 15, मुंबई येथे सभा झाली.
  • 2012 : सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही18 या दूरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीन व रिलायन्स मोबाईलद्वारे आयोजित द ग्रेटेस्ट इंडियन या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ अर्थात ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून घोषित केले गेले.

 

12 ऑगस्ट

  • 1948 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्बांधणी केलेले ‘हिंदू कोड बिल’ कायदे मंडळासमोर सादर केले.

 

13 ऑगस्ट

  • 1931 : सक्तीचे मोफत शिक्षण घेण्याबाबत मध्य प्रांत कौन्सिलमध्ये ठराव झाला.
  • 1923 : सार्वजनिक विहिरी वापरण्याचा हक्क असावा असा ठराव नंदागवळी यांनी कौन्सिलमध्ये मांडला.

 

14 ऑगस्ट

  • 1931 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली भेट मनीभुवन, मुंबई येथे झाली. या भेटीमध्ये ‘मला मायभूमी नाही’ असे बाबासाहेबांनी गांधींना सांगितले. 14 ऑगस्ट 1931 रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना बोलावले होते. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीमध्ये ‘मला मायभूमी नाही’ असे बाबासाहेबांनी गांधींना सांगितले, तसेच महात्मा गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना ‘खरा देशभक्त‘ सुद्धा म्हटले. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.

 

15 ऑगस्ट

  • स्वातंत्र्य दिन
  • 1928 : समाज समता संघ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी 15 ऑगस्ट 1928 रोजी झाला.
  • 1931 : दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले.
  • 1936 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली आणि जाहीर सभा झाली. बाबासाहेबांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पक्षाचा जाहीरनामा, ध्येय व धोरणे जाहीर केली.
  • वामनदादा कर्डक जयंती

 

Timeline of Dr Ambedkar in August

16 ऑगस्ट

  • 1941 : दिंडोरी नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली.

 

17 ऑगस्ट

  • 1932 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनून भारतात पोहोचले. 24 मे 1932 रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. 26 मे रोजी बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून 1932 मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते 17 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईस परत आले.
  • 1932 : जातीय निवाडा जाहीर. पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 17 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या अस्पृश्यांसाठी ‘स्वतंत्र मतदार संघा’च्या राजकीय हक्काच्या मागणीला यश मिळाले होते.
  • 1937 : मंत्र्यांच्या पगारासंबंधीच्या बिलावर मुंबई असेंबलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात ‘शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
  • 1955 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने आरक्षित जागा समाप्त करण्याचा प्रस्ताव पारित केला. या सोबतच स्वतंत्र वसाहत आणि शेतीयुक्त जमीन आरक्षित करण्याची मागणी केली.

 

18 ऑगस्ट

  • 1938 : अस्पृश्य सत्याग्रह कमिटीतर्फे पतित पावनदास यांचे अध्यक्षतेखाली गांधी आश्रमावर सत्याग्रह या विषयावर जाहीर सभा झाली.
  • 1945 : सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन

 

19 ऑगस्ट

  • 1935 : पतीत पावनदास यांचे अध्यक्षतेखाली मध्य प्रांत वऱ्हाड क्लासेस फेडरेशन नागपूर येथे सभा झाली.

 

20 ऑगस्ट

  • 1860 : कृष्णाजी अर्जुन केळुसकर जयंती
  • 1917 : भारत मंत्री मॉन्टेग्यू यांची पार्लमेंट मध्ये सक्तीच्या शिक्षणाची घोषणा झाली.
  • 1947 : संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती. Timeline of Dr Ambedkar in August

 

21 ऑगस्ट

  • 1917 : शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून बाबासाहेबांना लंडनहून भारतात परतावे लागले.
  • 1936 : इटालियन भिक्खू लोकनाथ यांनी कोलंबो, श्रीलंका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून बौद्ध धर्म स्वीकारण्याचे निवेदन केले.
  • 1941 : हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी भंडारी हॉल, दादर येथे परिषद पार पडली.

 

22 ऑगस्ट

  • 1920 : बारके महार पंच कमिटीची दुसरी सभा पाच पावली, नागपूर येथे विश्रामजी सवाईतुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
  • 1936 : स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

 

23 ऑगस्ट

  • 1942 : दिल्ली येथे दलित वर्ग हितकारणी मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला.
  • 1945 : कलकत्ता येथे बंगाल व बिहार सरकारच्या प्रतिनिधीं समोर दामोदर खोरे योजनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा झाली.

 

24 ऑगस्ट

  • 1940 : महात्मा गांधी व काँग्रेस पक्ष यांनी भारतीय राजकारणाचा कसा विचका केला याची विश्लेषण करणारी लेखमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनता पत्रकात प्रसिद्ध केली.

 

25 ऑगस्ट

  • 1944 : कोलकाता येथील अनेक संस्था तर्फे बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला, त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. “अस्पृश्यांपुढे आताच किंवा कधीच नाही” हा प्रश्न असून अस्पृश्यांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
  • 1946 : पुणे येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन कार्यकारणीची बैठक झाली. (25-26 ऑगस्ट) त्यामध्ये राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

 

26 ऑगस्ट

  • 1940 : मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांसमोर पोयबावडी, परळ येथे ‘वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन’ याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1944 : वर्गीकृत जातीच्या अनेक संस्थांतर्फे कलकत्ता येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला.
  • 1946 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाची पुणे येथे बैठक झाली. त्यामध्ये राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. (25-26 ऑगस्ट)
  • 1954 : राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर खासदार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी कडाडून टीका केली.

 

27 ऑगस्ट

  • 1950 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी संदेश दिला.
  • 1955 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली.

 

28 ऑगस्ट

  • 1936 : संत नामी सुधारक समाज संस्थेतर्फे नागपूर येथे समाजसुधारणा व शिक्षण या विषयावर सभा झाली.
  • 1937 : धर्मांतरासंबंधी बांद्रा, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. (Timeline of Dr Ambedkar in August)

 

29 ऑगस्ट

  • 1931 : दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर लंडनला पोहोचले.
  • 1947 : मसुदा समितीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती स्थापन केली. या समितीवर बाबासाहेबांची सदस्य म्हणून निवड केली गेली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती.

 

30 ऑगस्ट

  • 1947 : भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी भारताचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली. आदल्या दिवशी मसुदा समिती स्थापन झाली होती आणि त्यामध्ये बाबासाहेबांची नियुक्ती सदस्य म्हणून झाली होती.
  • 1947 : मसुदा समितीची पहिली बैठक झाली. डॉ आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने 30 ऑगस्ट 1947 पासून 141 दिवस कामकाज करून 315 अनुच्छेद आणि आठ परिशिष्ट असलेला राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. मसुदा समितीचे अनेक सदस्य दीर्घकाळ सातत्याने अनुपस्थित राहत असत त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याचे सर्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर पडली आणि प्रकृती साथ देत नसताना देखील त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला.

 

31 ऑगस्ट

  • 1917 : शिष्यवृत्तीच्या अटीनुसार डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांना बडोदे सरकारची नोकरी करणे भाग पडले. मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात प्रोबेशनल म्हणून त्यांनी नोकरी केली, आणि त्यांना दरमहा पगार १५० रुपये मिळे. तेथे त्यांना अवहेलना व जातीयवादाचे चटके प्रचंड प्रमाणात सहन करावे लागले. राहण्यासाठी जागा मिळण्यात यश न आल्याने त्यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.
  • 1955 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई राज्य कनिष्ठ गावकामगार असोसिएशन स्थापन केली.

 

ऑगस्ट मध्ये झालेल्या अन्य गोष्टी 

  • 1923 : प्रोफेसर कॅनन यांच्या सूचनेनुसार डॉ. भीमराव आंबेडकरांनी ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा प्रबंध सुधारून ‘डी.एस्सी.’ पदवीसाठी पुन्हा सादर केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr. Babasaheb Ambedkar in August) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारी ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी बाब समाविष्ट करायची राहून गेली असेल तर कृपया आम्हाला ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *