सिनेअभिनेते नाना पाटेकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला ‘आदर्श’ मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी म्हणजे सर्व समाजांसाठी काम केलंय, यामुळेच ते नाना पाटेकर यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. – Nana Patekar on Dr Ambedkar
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रसिद्ध सिनेअभिनेते पद्मश्री नाना पाटेकर आपले प्रेरणास्थान मानतात. नाना पाटेकर एकदा ‘गेस्ट लेक्चर सिरीज’ (GLS) नावाच्या कार्यक्रमात गेले असता तेथे त्यांना तुम्ही कोणाला प्रेरणास्थान मानता या विषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर‘ हे उत्तर दिले. यावेळी नाना पाटेकर बाबासाहेबांद्दल नेमके काय म्हणाले होते ते आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.
70 वर्षीय नाना पाटेकर हे एक दिग्गज भारतीय अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्माता आहेत. ते एक मराठी व्यक्ती असून मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ते कमालीचे लोकप्रिय आहेत. ते एक सामाजिक व्यक्ती असून नेहमी समाजासाठी विविध कार्य करताना दिसतात मकरंद अनासपुरे यांचेसह त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ ची सुरुवात देखील केली होती आणि त्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करतात.
Nana Patekar on Dr Ambedkar
3 नोहेंबर 2017 रोजी, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, मुंबई द्वारे आयोजित ‘गेस्ट लेक्चर सिरीज’ (Guest lecture series) कार्यक्रमामध्ये अभिनेते नाना पाटेकर आले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांना एका व्यक्ती द्वारे असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “नाना, आमच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी आहात, पण तुमच्यासाठी ‘प्रेरणादायी‘ कोण आहेत?”
त्यावर नाना पाटेकर लगेच उत्तरले – “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम सुटा-बुटामध्ये आहेत. आयुष्यभर त्यांनी सर्वांसाठी कार्य केले. त्यांनी केवळ दलितांसाठी काम केलेले नाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हा गैरसमज आहे की ते केवळ दलितांचे नेते आहेत. त्यांनी सगळ्या समाजांसाठी कार्य केलेले आहे. आपलं सगळं आयुष्य बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी दिलंय.”
नाना पाटेकर यांचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते त्यांना आदर्श का मानतात याचेही त्यांनी उत्तर दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी म्हणजे सर्व समाजांसाठी काम केलंय, यामुळे नाना पाटेकर यांनी त्यांना आपले प्रेरणास्थान मानले, आपला आदर्श मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘विश्वरत्न’ असले तरी ते एक मराठी माणूस होते. त्यांनी समाजकार्यांच्या माध्यमातून देशभरात सुधारणा आणल्या आणि त्याच्यापासून जगातील अनेकांनी प्रेरणा घेतली.
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत असलेल्या बाबासाहेबांना नाना पाटेकर आपले प्रेरणास्थान मानतात, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण नाना पाटेकर सुद्धा एक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आहेत, आणि ते सुद्धा समाजसेवेचे कार्य करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी कार्य केलेले नाही तर सर्वांसाठी केले आहे. तसेच ते केवळ दलितांचे नाही तर आपल्या सर्वांचे आहेत.
नाना पाटेकर हे स्वतः अनुसूचित जातीची (दलित समाजातील) व्यक्ती नाहीत, ना ते धर्माने बौद्ध आहेत. ते आस्तिक आहेत की नास्तिक आहेत याचीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचे राहणीमान साधे आहे आणि समाजसेवेची कार्य मोठे आहे. नाना पाटेकर खेरीज सिनेसृष्टीमध्ये इतरही अनेक व्यक्तिमत्वे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान म्हणतात, त्यामध्ये आमिर खान, नागराज मंजुळे, रिचा चड्डा, पा. रंजीत, उषा जाधव, आदर्श शिंदे, आनंद शिंदे, गगन मलिक, सिद्धार्थ जाधव, भाऊ कदम यासारख्या अनेक उल्लेखनीय व्यक्तींचा समावेश होतो.
Nana Patekar on Dr Ambedkar
संदर्भ
- वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, द्वारे आयोजित ‘गेस्ट लेक्चर सिरीज’ कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर बाबासाहेबांबद्दल बोलताना (वीडियो वेळ – 1:33:25 ते 1:34:00)
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार
- भगतसिंग विषयी डॉ. आंबेडकरांचे विचार | Dr. Ambedkar on Bhagat Singh
- हिंदी विकिपीडिया पर भारत के टॉप 20 सबसे लोकप्रिय लोग (2016-2020)
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी – Buddhist Celebrities in India
- अन्य लेख वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |