डिसेंबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डिसेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट किंवा दिनविशेष या लेखामध्ये दिलेला आहे. वेगवेगळ्या वर्षांतील डिसेंबर महिन्यात बाबासाहेबांशी संबंधित असंख्य ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in December
डिसेंबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट – Timeline of Dr Babasaheb Ambedkar in December

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डिसेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट किंवा दिनविशेष या लेखामध्ये दिलेला आहे. वेगवेगळ्या वर्षांतील डिसेंबर महिन्यात बाबासाहेबांशी संबंधित असंख्य ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे. डॉ. आंबेडकरांचा हा जीवनपट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. 6 december ambedkar in marathi

बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश या लेखामध्ये आहे.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) देखील डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय मी मराठी विकिपीडियावर सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनपट लेख बनवलेला आहे. मात्र धम्मभारत वरील आजच्या या लेखामध्ये, मी प्रत्येक महिन्याचा स्वतंत्र जीवनपट बनवून त्यामध्ये अधिकाधिक व उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. 6 december ambedkar in marathi

 

डिसेंबर : बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी व जीवनपट | 6 december ambedkar in marathi

 

1 डिसेंबर

  • जागतिक एड्स निर्मूलन दिन
  • 1931 – दुसरी गोलमेज परिषद समाप्त झाली.
  • 1943 – ‘टेक्निकल ट्रेनिंग सेंटर’च्या पुनर्बांधणी संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत आगमन झाले.
  • 1948 – सागर येथे ‘महार रेजिमेंट सेंटर’ची स्थापना झाली.
  • 1951 – जहांगीर हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
  • 1956 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत मथुरा रोड येथे भरलेल्या बुद्धिस्ट आर्ट्स गॅलरीला भेट दिली. या प्रदर्शनातील त्यांनी बुद्ध मूर्तींचे निरीक्षण केले.

 

2 डिसेंबर

  • जागतिक संगणक साक्षरता दिन
  • राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
  • 1956 – अशोक विहारामध्ये दलाई लामांच्या सन्मानार्थ झालेल्या समारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. बुद्धगया येथे होणाऱ्या 2500 व्या बुद्ध महापरिनिर्वाण समारंभात भाग घेण्यासाठी आलेल्या दलाई लामांच्या सन्मानार्थ आयोजित, दिल्लीतील समारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. दलाई लामा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘बोधिसत्व’ असा गौरव केला.

 

3 डिसेंबर

  • जागतिक अपंग दिन
  • 1933 – यवतमाळ तालुका अस्पृश्य परिषद कोरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
  • 1954 – म्यानमार येथील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते, या परिषदेमध्ये त्यांचे भाषण झाले.

 

4 डिसेंबर

  • भारतीय नौसेना दिन
  • 1930 – प्रांत विषयक उपसमितीची मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1954 – ब्रह्मदेश, रंगून येथे झालेल्या तिसऱ्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. या बौद्ध परिषदेच्या प्रतिनिधींसमोर भाषणात, “मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करून ठेवले आहेत” असे उद्गार बाबासाहेब आंबेडकरांनी काढले.
  • 1954 – “कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्त्वांविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहणार नाही,” असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्यानमार मधील जागतिक बौद्ध धर्माच्या तिसऱ्या परिषदेत काढले होते.
  • 1956 – भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्य सभेत उपस्थित एस.एम. जोशी व आचार्य अत्रे यांनी रिपब्लिकन पक्षात येण्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्र.

 

5 डिसेंबर

  • जागतिक मृदा दिन
  • संत रोहिदास पुण्यतिथी
  • 1943 – परळ, मुंबई येथे मडकेबुवा यांचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य सत्कार झाला.
  • 1956 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जैन प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. जैन प्रतिनिधींसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म आणि जैन धर्म यावर चर्चा केली. बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी
  • 1956 – ‘द बुद्ध अँड हिज धम्म’ ग्रंथाचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले. या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवून बाबासाहेबांनी काही दुरुस्त्या दूर केल्या.

 

6 डिसेंबर

  • महापरिनिर्वाण दिन
  • 1945 – मुंबईच्या सचिवालयात विभागीय कामगार आयुक्त यांच्या परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केले. (6-7 डिसेंबर)
  • 1956 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 26 अलीपुर रोड, दिल्ली या निवासस्थानी रात्री झोपेतच महापरिनिर्वाण (निधन) झाले.
  • 1964 – कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह झाला.
  • बामसेफ स्थापना (1978) 6 december ambedkar in marathi

 

7 डिसेंबर

  • सैनिक ध्वज दिन
  • 1940 – मुंबई येथे इमारत फंडाची जाहीर सभा झाली.
  • 1945 – मुंबईच्या सचिवालयात विभागीय कामगार आयुक्त यांच्या परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केले. (6-7 डिसेंबर)
  • 1956 – डॉ. बाबासाहेबांचा पार्थिव देह दिल्लीहून खास विमानाने मुंबईत आणून ‘राजगृह’ या मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवला. सायंकाळी ‘चैत्यभूमी’ येथे त्यांच्यावर बौद्धधम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • 1956 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधी प्रसंगी मुंबई येथे 25,00,000 अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली गेली.

 

8 डिसेंबर

  • 1928 – ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निर्मल येथे जिल्ह्यातील अस्पृश्यांची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
  • 1933 – ओरुला वर्णाश्रम स्वराज्य संघाचे मंत्री श्री जोशी यांनी मंदिर प्रवेश बिलाला विरोध करणारे पत्रक प्रसिद्ध केले.
  • 1935 – फोरासरोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतरावरील पहिले भाषण झाले.
  • 1945 – मनमाड येथे भरलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या परिषदेतील भाषणात येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, “आता सर्व राखीव जागा जिंकल्या शिवाय तरणोपाय नाही.”

 

9 डिसेंबर

  • 1933 – लंडन होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनतेसाठी पत्र आले.
  • 1943 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बिहारमधील धनबाद येथील भूलन बरारी कोळसा खाणीची ४०० फूट खाली उतरून प्रत्यक्ष पाहणी केली. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
  • 1945 – अकोला येथे वऱ्हाड प्रांतिक शेड्युल कास्ट फेडरेशन च्या पहिल्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले, त्यामध्ये त्यांनी निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
  • 1946 – भारतीय संविधान सभेची (घटना समितीची) पहिली बैठक संपन्न झाली. पंडित नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या ‘घटनेची उद्दिष्टे’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना बाबासाहेबांनी राष्ट्रीय एकात्मतेवर भर देऊन विद्वत्तापूर्ण भाषण केले. संपूर्ण संविधान सभा त्यांच्या भाषणाने स्तंभित झाली होती.
  • 1948 – घटना समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली.
  • 1950 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात उभारण्यात आला. हा पुतळा अर्धाकृती आहे. (सविस्तरपणे बघा)

 

10 डिसेंबर

  • मानवी हक्क दिन
  • 1882 – शेतकऱ्यांची स्थिती या विषयावर महात्मा ज्योतिराव फुले यांचे व्याख्यान झाले होते.
  • 1938 – कामगार युनियन स्वतंत्र मजूर पक्षाला जोडण्याचा ठराव नागपूर येथे मंजूर करण्यात आला.
  • 1943 – बिहारमधील राणीगंज कोळसा खाणींना भेट देऊन मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदींची तसेच मजुरांच्या वसाहतींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहणी केली.

 

11 डिसेंबर

  • 1930 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रणखांबे यांना लंडनहून पाठवलेल्या पत्रात ‘इंग्रजीचे महत्त्व’ नमूद केले.
  • 1955 – भारतीय रिपब्लिकन पक्ष घटना मसुदा संबंधी नाशिक येथे कार्यकारी समितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

 

12 डिसेंबर

 

13 डिसेंबर

  • 1923 – वनी तालुका बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन कवडासी येथे संपन्न झाले.
  • 1945 – नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडणूक प्रचाराचे भाषण झाले.

 

14 डिसेंबर

  • 1910 – शि.जा. कांबळे यांनी भारत मंत्री अर्ल ऑफ क्यू यांच्याकडे अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी केली होती.
  • 1927 – श्री. जी.व्ही. वैद्य यांचा अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी घेण्यास तात्पुरता मनाई हुकुम करण्यात आला.

 

15 डिसेंबर

  • 1925 – ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स’ कमिशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वपूर्ण साक्ष. भारताच्या चलन पद्धतीत योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स’ कमिशन सर एडमंड यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते.
  • 1935 – वाणी तालुक्यातील मदर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये पतित-पावन दास हे अध्यक्ष होते.
  • 1952 – मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

 

बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी

 

16 डिसेंबर

  • 1939 – अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे कनिष्ठ वतनदार परिषद संपन्न झाली.
  • 1956 – मुंबईमध्ये सामुदायिक धम्मदीक्षा चा कार्यक्रम ठरला होता. मात्र यापुर्वीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने हा कार्यक्रम दिनांक 7 रोजीच दादासाहेब गायकवाड यांनी घडविला.

 

17 डिसेंबर

  • निवृत्त हक्क दिन
  • 1946 – राज्यसभेमध्ये राज्यघटने संबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले भाषण झाले.

 

18 डिसेंबर

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन
  • 1918 – लंडन विद्यापीठाच्या सिनेटकडून थेट एम.एससी. च्या पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली.
  • 1947 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले.
  • 1948 – शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या मेळाव्यामध्ये मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

 

19 डिसेंबर

  • गोवा मुक्ती दिन
  • 1934 – ब्रिटिश लोकसभेत भारतीय राज्यघटनेचे विधेयक मांडण्यात आले.
  • 1949 – पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हिंदू कोड बिल संमत करण्याच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. हिंदू कोड बिल हे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत सादर केले होते.

 

20 डिसेंबर

  • संत गाडगेबाबा स्मृतिदिन (1956)
  • 1996 – भीमाबाई सपकाळ (बाबासाहेब आंबेडकरांच्या आई) यांचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी बालक भीमराव (भिवा) अवघे पाच वर्षांचे होते.
  • 1941 – या दिवसापासून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर सप्रेम जयभीम लिहू लागले.

 

21 डिसेंबर

  • 1955 – औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. यावेळी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मराठवाडा हेच उचित राहील असे बाबासाहेबांनी सांगितले. बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी

 

22 डिसेंबर

  • राष्ट्रीय गणित दिन (रामानुजन जयंती (1887))
  • 1936 – चांदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली.
  • 1939 – मुस्लिम मुक्तीदिन सोहळ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले.
  •  1948 – शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने मुंबईतील आर.एम श.भट हायस्कूलच्या पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांना चहा पाणी देण्याचा कार्यक्रम झाला होता.
  • 1951 – वरळी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मावर भाषण झाले.
  • 1952 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुणे येथे ‘लोकशाहीसाठी आवश्यक अटी’ या विषयावर भाषण – पुणे जिल्हा विधी – वाचनालयाच्या नव्या विभागाचे उद्घाटन प्रसंगी लोकशाही यशस्वी रीतीने चालवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, यावर बाबासाहेबांचे भाषण झाले.

 

23 डिसेंबर

  • जागतिक कृषी दिन
  • 1945 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा निवडणूक प्रचार दौरा केला. (23 ते 27 डिसेंबर)
  • 1952 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुणे जिल्हा विधी ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.
  • 1955 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘थॉटस ऑन लींगविस्टीक स्टेट्स’ या प्रबंधाचे पुस्तकरुपाने प्रकाशन झाले.

 

24 डिसेंबर

  • राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन
  • 1934 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वेरूळ येथील लेण्यास भेट दिली.
  • 1945 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा निवडणूक प्रचार दौरा केला. (23 ते 27 डिसेंबर)
  • 1951 – शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन व समाजवादी पक्षातर्फे मुंबईतील चौपाटीवर निवडणूक प्रचार सभेत बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते. प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
  • 1952 – कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. यावेळी “ज्ञान हा मानवी आयुष्याचा पाया आहे,” हा प्रसिद्ध विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला.
  • पेरियार रामास्वामी नायकर स्मृतिदिन

 

25 डिसेंबर

  • राष्ट्रीय सुशासन दिन
  • मनुस्मृति दहन दिन
  • 1927 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दलित समाजाची परिषद भरवली, या परिषदेमध्ये मनुस्मृतीची होळी करण्यात आली. भाषणात डॉ. आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की, ”तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.
  • 1939 – “सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे”, बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांच्या जन्मदिनी बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील विधान, बेळगाव.
  • 1945 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा निवडणूक प्रचार दौरा केला. (23 ते 27 डिसेंबर)
  • 1952 – “स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे,” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ज्यावेळी त्यांना कोल्हापूर येथील महिला संघटनांच्या वतीने मानपत्र मिळाले होते.
  • 1953 – निपाणी (बेळगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा संदेश त्यांनी अनुयायांना दिला.
  • 1954 – पुणे जिल्ह्यातील देहूरोड विहारामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. बुद्ध मूर्तीच्या स्थापनेखेरीज या बुद्धविहाराचे उद्घाटन सुद्धा बाबासाहेबांनी केले होते. आपल्या भाषणामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 

26 डिसेंबर

  • 1927 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रह बद्दल चर्चा झाली.
  • 1937 – खेड रत्नागिरी येथे चर्मकार परिषद संपन्न झाली.
  • 1945 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा निवडणूक प्रचार दौरा केला. (23 ते 27 डिसेंबर)
  • 1950 – “महिलांची सामाजिक प्रगती घडून आणणे हेच हिंदू कोड बिलाचे उद्दिष्ट होते”, शेड्युल कास्ट फेडरेशन बेळगाव, कर्नाटक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले.

 

27 डिसेंबर

  • 1927 – महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह स्थगित झाला, तसेच महाड येथे महिलांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण झाले.
  • 1939 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू सलीमन यांचे निधन झाले.
  • 1945 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा निवडणूक प्रचार दौरा केला. (23 ते 27 डिसेंबर)
  • पंजाबराव देशमुख जयंती

 

28 डिसेंबर

  • 1941 – अहमदाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी

 

29 डिसेंबर

  • 1927 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत रायगडावर मुक्काम केला.
  • 1934 – दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन भोर संस्थान येथे संपन्न झाले.
  • 1955 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स’  हा ग्रंथ प्रकाशित झाला.
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतीदिन

 

30 डिसेंबर

  • 1937 – पंढरपूर येथे अस्पृश्य समाजाची परिषद झाली.
  • 1937 – “अस्पृश्य समाजात एकी नाही याचे कारण जातिभेद हेच आहे”, सोलापूर दौऱ्यावरील जाहीर सभेत (कुर्डूवाडी, सोलापुर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
  • 1938 – मक्रानपुर (चाळीसगाव) येथे औरंगाबाद जिल्हा दलित परिषदेचे पहिले अधिवेशन संपन्न झाले.
  • 1944 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कानपूर येथे ‘समता सैनिक दला’च्या दुसऱ्या अधिवेशनात सहभाग घेतला होता.

 

31 डिसेंबर

  • 1921 – बेळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली.
  • 1931 – चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे तिसरे अधिवेशन संपन्न झाले.
  • 1937 – पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषद संपन्न झाली, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, तसेच पंढरपूर नगर परिषदेतर्फे त्यांचा सत्कार झाला.

 

डिसेंबर मधील अन्य घटना

  • डिसेंबर 1926 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पी जी सोळंकी यांची मुंबई सरकारकडून ‘सरकार नियुक्त सदस्य’ म्हणून मुंबई प्रांत विधानपरिषदेवर नेमणूक झाली. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते 1936 पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) होते. हे बाबासाहेबांनी भूषवलेले पहिले राजकीय पद होते. 
  • डिसेंबर 1941 – ‘इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफीक रिलेशन्स’ या संस्थेच्या आठव्या परिषदेत ‘अनटचेबल्स अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ हा शोधनिबंध बाबासाहेबांनी कॅनडामध्ये सादर केला. हात शोधनिबंध पुढे ‘मिस्टर गांधी अंड एमन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स’ या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यात आला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील बाबासाहेब आंबेडकर इतिहास मराठी (babasaheb ambedkar information in Marathi) माहिती पाहिली. तुम्हाला ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन विषयक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय🙏🙏

 

हे ही वाचलंत का?

 

 


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *