डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 25 शैक्षणिक विचार | Dr Ambedkar quotes on education

उच्च विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाबद्दल अनेक अनमोल विचार प्रकट केले आहेत. बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार आपण या लेखात जाणून घेणार आहोत. – Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

 इस लेख को हिंदी में पढ़ें 

Dr Babasaheb Ambedkar thoughts in Marathi

उच्च विद्याविभूषित, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे जागतिक विचारवंत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. हा लेख ‘शिक्षण आणि आंबेडकर’ या विषयावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला दिले आणि शिक्षणामुळेच मनुष्य उत्कर्ष करू शकतो असे त्यांनी प्रतिपादित केले. – Dr Babasaheb Ambedkar quotes on education in Marathi

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या काही महत्त्वाच्या शैक्षणिक बाबीसुद्धा आपल्याला माहिती असायला हव्यात –

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत उच्चशिक्षित आणि त्यांच्या काळातील ‘सर्वात शिक्षित व्यक्ती’ होते. (the most educated person)- बाबासाहेबांनी भारत, अमेरिका, लंडन येथून शिक्षण केले, आणि अनेक उच्च अति उच्च पदव्या ग्रहण केल्या.

– बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. Dr Babasaheb Ambedkar quotes on education in Marathi

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा प्रचंड नाद होता, ते दररोज अठरा-अठरा तास अभ्यास करत.

– त्यांची शैक्षणिक योग्यता, विद्वत्ता आणि प्रतिभा एवढी व्यापक आणि भव्य आहे की त्यांना ‘जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती’ तसेच ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून ओळखले जाते.

– बाबासाहेब हे अस्पृश्य, महिला यांच्यासोबत सर्वच भारतीयांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहिले.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार – Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi 

#1 शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#2 आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मनमाड, ९ डिसेंबर १९४५)

 

#3 तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोलकत्ता, २४ ऑगस्ट १९४४)

Ambedkar thoughts on education in Marathi
dr babasaheb ambedkar images with quotes in marathi 

#4  शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नागपुर, २९ जुलै १९४२)

 

#5  कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मनमाड, १६ जानेवारी १९४९)

Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

 

#6 मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोल्हापूर, २४ डिसेंबर १९५२)

 

#7  आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुंबई, ३ जून १९५३)

dr babasaheb ambedkar thoughts in marathi

#8  मुला-मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुंबई, १३ जुलै १९४१)

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण

#9   माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू ‘बुद्ध‘ होत. माझे दुसरे गुरु ‘कबीर‘ आणि तिसरे गुरु म्हणजे ‘ज्योतिबा फुले‘ होत… माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. पहिले दैवत ‘विद्या’, दुसरे दैवत ‘स्वाभिमान’, आणि तिसरे दैवत म्हणजे ‘शील’ होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुंबई, २८ ऑक्टोबर १९५४)

 

#10  प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, सर्वांगिक राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे…. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (महाबळेश्वर, ६ मे १९२९)

dr babasaheb ambedkar thoughts in marathi

 

#11  या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. (लक्षात ठेवा), जे झगडतात तेच पुढे येतात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुंबई, फेब्रुवारी १९३३)

 

#12  स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त रहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नागपूर, २० जुलै १९४२)

 

#13  विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान व खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत, तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्याकरिता केला पाहिजे; तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (महाड, २ मे १९५४)

Ambedkar thoughts on education in Marathi
Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

Dr Babasaheb Ambedkar thoughts on education in Marathi

#14   स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#15  पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#16  ग्रंथ हेच गुरू. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dr babasaheb ambedkar images with quotes in marathi

 

#17  वाचाल तर वाचाल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#18  मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#19  माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar thoughts on education in Marathi
Dr Babasaheb Ambedkar thoughts  in Marathi

#20  शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#21  शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

babasaheb ambedkar quotes in marathi

 

#22 लोकांना नैतिक आणि सामाजिक बनवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#23  शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#24  तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#25  मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

#26  प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dr babasaheb ambedkar thoughts in marathi

 

 

हे ही वाचलंत का?

 

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published.