डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य

ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब हे असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले उच्च विद्यासंपन्न मनुष्य होते. त्यांचे सामाजिक सुधारणेसह शैक्षणिक क्षेत्रातही योगदान सुद्धा आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य जाणून घेणार आहोत.

 यह लेख हिंदी में पढ़ें 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे शैक्षणिक विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द सुद्धा अतिशय भव्य व प्रेरक आहे. त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम, संपादित केलेल्या अत्युच्च शैक्षणिक पदव्या आणि त्यातून त्यांनी कमावलेली असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता या गोष्टी आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य आणि योगदान जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे त्यांनी लिहिलेले आहे.

प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता.

त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून डॉ. आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य

शैक्षणिक जागृती

हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव डॉ. आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी बाबासाहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला.

 

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली.

या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे 4 जानेवारी, 1925 रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. डॉ. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. 40000/–चे अनुदान मिळवून दिले.

या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.

 

दलित शिक्षणसंस्थेची स्थापना

14 जून 1928 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते.

माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले.

त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने 8 ऑक्टोबर, 1928 रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5 वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. 9000/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले.

जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.

 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.

सध्या देशभरात या संस्थेची 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य आणि योगदान वंचित-शोषितच नव्हे तर सर्व समाजातील लोकांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हितावह ठरले आहे.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *