हैदराबाद आणि विजयवाडा येथील बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्यांची तुलनात्मक माहिती

हैदराबाद येथील बाबासाहेबांचा पुतळा आणि विजयवाडा येथील बाबासाहेबांचा पुतळा या दोन्हींची उंची 125 फूट आहे. या लेखात आपण या दोन भव्य पुतळ्यांबद्दल तुलनात्मक माहिती आणि खास गोष्टी जाणून घेणार आहोत. येत्या 19 जानेवारी 2024 ला आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे बाबासाहेबांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हैदराबाद विजयवाडा आंबेडकर पुतळा

 यह लेख हिंदी में पढ़े 

statues of Babasaheb in Hyderabad and Vijayawada
statues of Babasaheb in Hyderabad and Vijayawada

Comparative information of grand statues of Babasaheb in Hyderabad and Vijayawada

हैदराबादचा आंबेडकर पुतळा विरुद्ध विजयवाडाचा आंबेडकर पुतळा

हैदराबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. विजयवाडा हे आंध्र प्रदेश राज्यातील दुसरे मोठे शहर आहे.

हैदराबाद आणि विजयवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. या दोन्ही पुतळ्यांची उंची 125 फूट आहे. हैदराबादमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण 14 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले, तर विजयवाडा येथील पुतळ्याचे अनावरण 19 जानेवारी 2024 रोजी झाले आहे.

दोन्ही पुतळ्यांमध्ये चबुतऱ्याची उंची, पुतळ्याची रचना, बांधकामात वापरलेली सामग्री, खर्च, जमिनीचे क्षेत्रफळ यासह अनेक गोष्टींमध्ये तफावत आहेत. या दोन्हींचा समावेश भारतातील 5 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये होतो आणि भारतातील 10 सर्वात उंच पुतळ्यांपैकी दोन पुतळे असलेली एकमेव ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 

 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन्ही तेलुगू भाषिक राज्ये आहेत. दुसरीकडे, मुंबई-महाराष्ट्रातही बाबासाहेबांच्या 450 फूट उंच पुतळ्याचे बांधकाम 50 टक्क्यांहून अधिक (डिसेंबर 2023 पर्यंत) पूर्ण झाले आहे.

 

बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे विक्रम

बाबासाहेबांच्या दोन पुतळ्यांमधील साम्य आणि फरक जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांनी केलेले काही विक्रम पाहू.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा तेलंगणातील विजयवाडा येथील आहे. हैदराबादचा पुतळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. (हा विक्रम 2026 मध्ये मोडला जाईल, जेव्हा मुंबईतील बाबासाहेबांचा 450 फूट उंचीचा “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी” तयार होईल.)
  • विजयवाडा येथील बाबासाहेबांचा पुतळा हा भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा आहे तर हैदराबादमधील आंबेडकरांचा पुतळा हा पाचवा सर्वात उंच पुतळा आहे. (भारतातील दुसरा सर्वात उंच पुतळा महादेवाचा “स्टॅच्यू ऑफ बिलीफ” आहे तर तिसरा सर्वात उंच पुतळा हा रामानुजनाचार्य यांचा “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी” आहे. हे दोन्ही पुतळे बसलेल्या अवस्थेत आहेत.)
  • भारतातील सर्वात उंच उभ्या अवस्थेतील पुतळ्यांमध्ये विजयवाडा येथील बाबासाहेबांचा पुतळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादचा बाबासाहेबांचा पुतळा तिसऱ्या क्रमांकावर आहे. (वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पहिल्या क्रमांकावर आहे.)

 

(टीप :स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी” हे नाव तीन पुतळ्यांना दिले आहे — 1) हैदराबाद येथील रामानुजनाचार्यांचा पुतळा, 2) मुंबईतील बाबासाहेबांचा निर्माणाधीन पुतळा, आणि 3) अमेरिकेतील बाबासाहेबांचा पुतळा.)

 

हेही पाहा : भारतातील 10 सर्वात उंच पुतळे

 

पुतळ्यांच्या संरचनेमधील साम्य

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यांमध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य किंवा साधर्म्य आढळते, सारखेपणा दिसतो.

  • सर्वात मोठे साम्य म्हणजे या दोन्ही पुतळ्यांची उंची सारखीच आहे – 125 फूट. (तथापि, दोन्हींच्या चबुतऱ्याच्या उंचीत मोठा फरक आहे.)
  • हैदराबाद आणि विजयवाडा येथील दोन्ही पुतळे हे तेलगू भूमीवर उभे आहेत. (तेलंगणात 76% आणि आंध्र प्रदेशात 89% तेलगू भाषिक लोक आहेत.)
  • 2016 मध्ये हे दोन्ही पुतळे उभारणीची घोषणा झाली आणि 2023 मध्ये हे दोन्ही पुतळे उभे राहिले. (मात्र, दोन्ही पुतळ्यांचे पायाभरणी वर्ष आणि अनावरण वर्ष वेगवेगळे आहेत.)
  • दोन्ही पुतळ्यांमध्ये बाबासाहेबांचा पेहराव सारखाच आहे. दोन्ही पुतळ्यांमध्ये त्यांना सूट, बूट आणि टाय कोट घातलेले, उजवा हात उंचावलेले आणि डाव्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
  • संग्रहालय, स्मारक, सभागृह व उद्यान या गोष्टी दोन्ही पुतळ्यांच्या स्मारकांमध्ये बघायला मिळतात.
Comparative information of grand statues of Babasaheb in Hyderabad and Vijayawada
तुलनात्मक गोष्टी : हैदराबाद आंबेडकर पुतळा विरुद्ध विजयवाडा आंबेडकर पुतळा

पुतळ्यांच्या संरचनेमधील फरक

आता आपण या पुतळ्यांच्या संरचनेमधील फरकांवर नजर टाकूया. बाबासाहेबांचे हे दोन्ही पुतळे वरवर पाहिले तर हे सारखेच दिसतात, पण जर तुम्ही नीट पाहिलत तर तुम्हाला दोन्हीमध्ये काही फरक दिसतील, वेगळेपणही लक्षात येईल.

  • हैदराबाद येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा उंचावलेला उजवा हात मध्यभागी थोडा वाकलेला आहे. पण विजयवाडा येथील वर केलेला हात अगदी सरळ आहे, त्यात वाक दिसत नाही.
  • हैदराबाद मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या डाव्या हातात घड्याळ आहे, जे विजयवाडा येथील पुतळ्यात दिसत नाही.
  • पुतळ्यांच्या पोशाखातही थोडासा फरक आढळून येतो. हैदराबाद येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या कोटाला तीन बटणे तर विजयवाडा येथील पुतळ्याच्या कोटाला दोन बटणे आहेत.
  • विजयवाडा आणि हैदराबाद येथील बाबासाहेबांच्या दोन्ही पुतळ्यांच्या गळ्यांत टाय बांधलेली आहे. पण हैदराबादच्या पुतळ्याच्या गळ्यातील टायला तिरप्या रेषा आहेत, तर विजयवाडा येथील पुतळ्याची टाय पूर्णपणे प्लेन दिसत आहे.
  • भारतीय राज्यघटनेची प्रत बाबासाहेबांच्या दोन्ही पुतळ्यांच्या हातात आहे पण त्यांच्यात देखील फरक आहे. हैदराबाद येथील संविधानाच्या प्रतीच्या मुखपृष्ठावरील काही भाग उंचावलेले आहेत, तर विजयवाडा येथील राज्यघटनेचे मुखपृष्ठ सपाट दिसते.
  • पुतळ्यांच्या हातांप्रमाणेच पायांमध्ये देखील फरक आहे. हैदराबादमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा उजवा पाय सरळ आहे, तर विजयवाडा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाय थोडासा समोर सरकलेला आहे.

 

बाबासाहेबांच्या पुतळ्यांची तुलनात्मक माहिती

या दोन्ही पुतळ्यांच्या एकूण बांधकामाबद्दलच्या काही खास बाबी जाणून घेऊया.

 

  • प्रथमतः 2016 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दोन्ही पुतळे बसवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पुतळ्यांची उंची 125 फूट निर्धारित करण्यात आली होती.
  • हैदराबादमधील पुतळ्याचे अधिकृत नाव डॉ. बी.आर. आंबेडकरांचा 125 फुट उंच पुतळा आहे, तर विजयवाडा येथील पुतळ्याचे अधिकृत नाव आहे – “स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस” अर्थात “सामाजिक न्यायाचा पुतळा”, जो डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतीवनम मध्ये बनवला आहे.

 

  • हैदराबादमधील बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा हा 50 फूट उंच संसद भावनाकृती गोलाकार व्यासपीठावर (चबुतऱ्यावर) उभा आहे. अशा प्रकारे या पुतळ्याची एकूण उंची 175 फूट आहे.
  • विजयवाडा येथील बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा हा 81 फूट उंच चौकोनी व्यासपीठावर उभा आहे. हा पुतळा व्यासपीठासह एकूण 206 फूट उंच आहे. हैदराबादमधील पुतळ्यापेक्षा तो 31 फूट उंच आहे.

 

  • हैदराबादमधील डॉ. आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक एकूण 11.5 एकर जागेवर बांधण्यात आले आहे. तर विजयवाडा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतीवनम हे 18.81 एकर जागेवर बांधले गेले आहे. म्हणजेच विजयवाड्यातील पुतळ्याचे क्षेत्रफळ हैदराबादपेक्षा 7.3 एकर अधिक आहे.
  • हैदराबादमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बनवण्यासाठी 791 टन स्टील आणि 9 टन ब्रास (पितळ) वापरण्यात आले आहे. दुसरीकडे, विजयवाडा येथील पुतळा हा 400 टन स्टील आणि 212 टन ब्रासचा बनला आहे.

 

  • हैदराबादमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची एकूण किंमत 146.5 कोटी रुपये होती, तर विजयवाडा येथील आंबेडकर पुतळा 404.35 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले.
  • हैदराबादचा पुतळा पूर्ण होण्यासाठी सहा ते सात वर्षे लागली, तर विजयवाडा पुतळा केवळ साडेतीन वर्षांत पूर्ण झाला.

 

  • 14 एप्रिल 2016 रोजी हैदराबाद येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. याचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आणि पुढील सात वर्षांनी 14 एप्रिल 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण/ लोकार्पण करण्यात आले. (या पुतळ्याची पायाभरणी आणि अनावरण तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले.)
  • याच दरम्यान, विजयवाडा येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची पायाभरणी 26 जुलै 2020 रोजी करण्यात आली आणि पुढच्या साडेतीन वर्षांत त्याचे बांधकाम पूर्ण झाले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. (या पुतळ्याची पायाभरणी आणि अनावरणही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते झाले.)

हैदराबाद विजयवाडा आंबेडकर पुतळा

  • हैदराबाद मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उत्तम दर्जाचे फोटो बघण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा.
  • विजयवाडा मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उत्तम दर्जाचे फोटो बघण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा.

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *