डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे कट्टर समर्थक होते आणि त्यांनी भारतातील दलित चळवळीचा चेहरा बनून अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम केले. – अस्पृश्यता निवारण चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील एक अग्रगण्य समाजसुधारक होते. त्यांनी अस्पृश्य, शोषित, मागास आणि स्त्रियांसाठी विपूल कार्य केलेले आहे तसेच त्यांच्या अधिकारांसाठी प्रदीर्घ लढा सुद्धा दिलेला आहे. जातीभेद आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष अतिशय व्यापक होता.
अस्पृश्यता निर्मूलनासाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान
अस्पृश्यता निवारण हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, असे समजून तत्कालीन समाजात अस्पृश्यांच्या वाट्याला कोणते जीवन असते, त्यांना काय सामाजिक दर्जा आणि स्थान असते, याचे संपूर्ण भान व व्यवहारिक ज्ञान डॉ. आंबेडकर यांना मिळालेले होते.
Dr Ambedkar’s contribution to the abolition of untouchability
बाबासाहेबांनी असे सांगितले आहे की, “दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला.” स्वातंत्र्याचे आणि समतेचे हक्क हे भीक मागुन मिळत नाही तर ते स्वतःच्या सामर्थ्याने मिळवायचे असतात असे बाबासाहेबांचे मत होते. तसेच “आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो, तर तो ज्याचा त्याने करायचा असतो” असे विचार बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या मनावर बिंबवले आणि त्यांना स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी कृतीशील बनवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करून आम्हालाही माणसासारखे जगण्याचा हक्क आहे, असे जाहीरपणे सांगत प्रतिकात्मक कृती केली. यामुळे 20 मार्च 1927 हा दिवस मानवतेचा आणि समतेचा संदेश देणारा एक सोनेरी दिवस ठरला. अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणांहून पिण्याचे पाणी घेण्यास प्रतिबंध केला जात होता, त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुद्धा त्यांचा प्रवेश वर्जित वा निषिद्ध मानला गेला होता.
इतरांप्रमाणे आम्हालाही माणूस म्हणून आणि समतेचा हक्क म्हणून त्यांनी मंदिर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1930 ते 1935 या कालावधीमध्ये नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू होता. मात्र या कालावधीमध्ये काळाराम मंदिराचे दरवाजे दलितांसाठी खुले झाले नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की जातीयता आणि अस्पृश्यता भारतीय लोकांच्या मनात किती खोलवर रुजलेली होती ते! ही मंदिर चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती, आणि यामुळे बाबासाहेबांची प्रतिमा एक मानवतावादी नेते म्हणून समोर आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर दलितोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. काळाराम मंदिर सत्याग्रहापूर्वी 1927 मध्ये त्यांनी महाडचा सत्याग्रह केला होता. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून हिंदू समाजाच्या पुनर्रचनेला उपयुक्त ठरेल अशा नव्या स्मृतीची त्यांनी मागणी केली. जीर्णस्मृतीचे दहन ही खूप मोठी घटना होती.
दलितांना कायदेमंडळात स्थान मिळावे तसेच त्यांना आर्थिक व शैक्षणिक सवलती मिळाव्यात यासाठी बाबासाहेबांनी सायमन कमिशनकडे पाठवला होता. विधिमंडळात महार वतन बिल मंजूर करून घेण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.
1930 मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला रवाना झाले होते, तेव्हा त्यांनी शेतकरी, कामगार, मागासलेला आणि बहिष्कृत समाज यांच्या हक्कांसाठी अविशांत प्रयत्न केले होते. 1931 दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी केली, आणि वेगळ्या मतदार संघाचे महत्त्व परिषदेतील सदस्यांना यशस्वीपणे पटवून दिले.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ब्रिटिश सरकारने 1932 झाली जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचे घोषित केले. मात्र अस्पृश्यांना वेगळे मतदार संघ देण्यास महात्मा गांधींचा प्रखर विरोध होता. त्यामुळे त्यांनी या जातीय निवड या विरोधात प्राणांतिक उपोषण सुरू केले.
यावेळी बाबासाहेबांनी आपली ताठर भूमिका सोडून नाईलाजास्तव अस्पृश्यांच्या हितासाठी असलेल्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली. गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन संयुक्त मतदार संघात 148 जागा अस्पृश्य वर्गाला देण्याचे मान्य केले गेले. या प्रसंगाने अस्पृश्य वर्गाला डॉ. बाबासाहेब हेच आपले नेते असल्याचे कळले व त्यांनी गांधींना आपले नेते म्हणून अमान्य केले. – अस्पृश्यता निवारण चळवळ
हे ही वाचलंत का?
- राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |