ह्या आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनलेल्या टीव्ही मालिका

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक टीव्ही मालिका बनल्या आहेत. त्यांच्यावर पहिली टीव्ही मालिका 1992 मध्ये बनवण्यात आली होती आणि सध्याच्या काळातही एक प्रसिद्ध हिंदी मालिका चालत आहे. – TV serials about Dr Ambedkar

  यह लेख हिंदी में पढ़े  

TV serials about Dr Ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आदरपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांना अनेकदा छोट्या पडद्यावर जिवंत केले गेले आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ आंबेडकर यांच्यावर अनेक टीव्ही सीरियल बनल्या आहेत. या लेखात, आपण बाबासाहेबांशी संबंधित 6 टीव्ही सिरियलबद्दल जाणून घेऊ. ज्यापैकी काही मालिका प्रामुख्याने बाबासाहेबांवर आधारित आहेत आणि काही मालिकांमध्ये त्यांची भूमिका साकारण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकरांवरील पहिली टीव्ही मालिका 1992-93 मध्ये बनवण्यात आली होती, जीचे नाव होते – “डॉ. आंबेडकर”. सध्याच्या काळातही त्यांची एक प्रसिद्ध मालिका चालत आहे – महानायक डॉ. बी.आर. आंबेडकर. त्यांच्या पहिली आणि शेवटची अशा दोन्ही मालिका हिंदी भाषेत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनवलेल्या टीव्ही मालिका

डॉ. आंबेडकर (1992-93)

TV serials about Dr Ambedkar

डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) ही 1992-93 मध्ये बनवलेली आणि डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी हिंदी मालिका आहे. यात अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. डॉ आंबेडकरांच्या जीवनावर बनवलेली ही पहिली टीव्ही मालिका आहे. Dr BR Ambedkar serial tv

ही मालिका 1992-93 मध्ये भारत सरकारचे ‘माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आणि दूरदर्शन’ यांनी तयार केली होती. 2015 मध्ये, ही मलिका स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर नावाने दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आली आहे. TV serials about Dr Ambedkar

 

प्रधानमंत्री (2013-14)

TV serials about Dr Ambedkar

प्रधानमंत्री (Pradhanmantri) ही 2013 – 2014 या दरम्यान बनवण्यात आलेली एक राजकीय टीव्ही मालिका आहे. ही मालिकेला एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवर अभिनेते व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी होस्ट केले होते. चित्रपट अभिनेते सुरेंद्र पाल यांनी या मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. हे तेच सुरेंद्र पाल आहेत ज्यांनी “शक्तिमान” मालिकेमध्ये ‘तमराज किलविश’ यांची प्रसिद्ध भूमिका केली होती. “हिंदू कोड बिल” या एपिसोडमध्ये बाबासाहेबांची भूमिका उल्लेखनीय आहे. pradhanmantri web series

या मालिकेचा उद्देश दर्शकांसमोर भारतीय इतिहासातील न पाहिलेल्या तथ्यांना समोर आणणे हा होता. या मालिकेमध्ये 1947 पासून ते आज पर्यंतचा भारतीय इतिहास चितारलेला आहे. ही मालिका पुनीत शर्मा यांनी दिग्दर्शीत केली होती. गेल्या 65 वर्षांमधील 13 पंतप्रधानांच्या कार्यकाळ यामध्ये घडलेल्या घटनांचा प्रसंग या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. TV serials about Dr Ambedkar

 

संविधान (2014)

TV serials about Dr Ambedkar

संविधान: द मेकिंग ऑफ द कोन्स्टीट्युशन ऑफ इंडिया (Samvidhaan: The Making of the Constitution of India) ही राज्यसभा टीव्हीवर 2014 मध्ये बनवलेली एक इंग्रजी-हिंदी दूरदर्शन मालिका आहे, ज्यात अभिनेता सचिन खेडेकर यांनी संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर आधारित ही दहा भागांची दूरदर्शन लघु मालिका आहे. राज्यसभा टीव्हीवर 2 मार्च 2014 रोजी या शोचा प्रीमियर झाला, आणि प्रत्येक रविवारी सकाळी एक भाग प्रसारित केला जात असे. आता, राज्यसभा टीव्हीच्या वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर ही मालिका पाहता येईल.

शमा झैदी आणि अतुल तिवारी या मालिकेचे लेखक आहेत. झैदी म्हणाले की स्क्रिप्ट लिहायला त्यांना सहा महिने लागले. वाद-विवाद, समितीच्या बैठका, पत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या चरित्रांमधून साहित्य मिळाले. या मालिकेत भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांची अनेक प्रसिद्ध भाषणे आहेत. स्वरा भास्करने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि वर्णन केले आहे. TV serials about Dr Ambedkar

ही मालिका फिल्मसिटी, मुंबई येथे चित्रीत करण्यात आली आणि हे भारतीय संविधानाच्या मसुद्याच्या आधी झालेल्या वादविवादांना पुन्हा समोर आणते. दयाल निहलानी हे मालिकेचे सहयोगी दिग्दर्शक आहेत. सीरियलसाठी, संविधान सभेच्या काळातील संसदेच्या सेंट्रल हॉलची प्रतिकृती बसवण्यात आली होती. 24 सप्टेंबर 2013 रोजी संविधानाचे पहिले स्वरूप याचे अनावरण करण्यात आले. मालिकेचा पहिला लुक 20 फेब्रुवारी 2014 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 15व्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी संसद भवन, नवी दिल्ली येथे अधिकृतपणे लाँच केला. यास शंतनू मोईत्राने संगीत दिले आहे. Samvidhan series

 

गर्जा महाराष्ट्र (2018-19)

TV serials about Dr Ambedkar

गर्जा महाराष्ट्र (Garja Maharashtra) गर्जा महाराष्ट्र ही एक मराठी मालिका आहे, जी सोनी मराठी वर 2018-19 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. या सिरीयलमध्ये 26 भागांचा समावेश होता, ज्यात 26 महान महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्वांची चरित्रे होती. या 26 मध्ये एक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता आणि त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता प्रशांत चौडप्पा यांनी साकारलेली आहे. ही मालिका 25 ऑगस्ट 2018 ते 16 फेब्रुवारी 2019 दरम्यान दर शुक्रवारी सोनी मराठी टेलिव्हिजनवर प्रसारित झाली.

अभिनेता जितेंद्र जोशी हे मालिकेचे सुत्रसंचालक होते. या 26 महान महाराष्ट्रीयांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला आकारच दिला नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. या महाराष्ट्रीय लोकांनी आपल्या राष्ट्राला आकार देण्यासाठी केलेल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदानाचा इतिहास या मालिकेद्वारे कालक्रमानुसार सादर केला आहे. ambedkar tv serial

या महाराष्ट्रीय लोकांमध्ये संत, समाज सुधारक, राजकारणी, शासक इत्यादींचा समावेश होता. या मालिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित 15वा भाग 1 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झाला. ऑक्टोबर 2021 नुसार, बाबासाहेबांचा हा भाग YouTube वर 6,79,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला (views) गेला आहे. तर इतर 25 भागांपैकी कोणालाही 50 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले नाहीत. TV serials about Dr Ambedkar

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा (2019-20)

TV serials about Dr Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा (Dr. Babasaheb Ambedkar – Mahamanvachi Gauravgatha) ही एक 2019-2020 मध्ये स्टार प्रवाहवर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन गणेश रासने यांनी केले. TV serials about Dr Ambedkar

बालकलाकार अमृत गायकवाड याने भीमराव आंबेडकरांची बालपणीची भूमिका साकारली आहे तर अभिनेता संकेत कोरलेकर तरुणपणीच्या  भूमिकेत आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित या मालिकेचा टीझर 15 फेब्रुवारी 2019 रोजी रिलीज झाला, आणि बुद्ध जयंतीनिमित्त 18 मे 2019 रोजी मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली गेली. mahamanvachi gauravgatha

बाबासाहेबांचे लहानपणापासून महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण चरित्र या मालिकेद्वारे चित्रित केले आहे. डॉ.आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदा अशा विविध क्षेत्रातील कामांचा आढावा सिरियलमध्ये घेण्यात आला आहे. ही मालिका इतिहासकार आणि चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” (खंड 1 – 12) या चरित्रावर आधारित आहे, तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमधील 800 हून अधिक पुस्तके अभ्यासली गेली आहेत. “भीमराया … माझा भीमराया” हे मालिकेचे शीर्षक गीत आहे, व ते गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी संगीतबद्ध केले आहे, तर आदर्श शिंदे यांनी गायले आहेत.

 

एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर (2019- )

TV serials about Dr Ambedkar

एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर (Ek Mahanayak – Dr BR Ambedkar) ही अँड टिव्ही दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या एसओबीओ फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे. 7 नोव्हेंबर 2019 रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरांची सुरू करण्याची घोषणा झी अँड टीव्हीने केली होती. 17 डिसेंबर 2019 पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. Ek Mahanayak – Dr BR Ambedkar 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जावड़े हे मुख्य भूमिका साकारतील. ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. 4 जुलै 2020 पासून ही मालिका झी कन्नड या चॅनेलवर सुद्धा कन्नड भाषेत प्रसारित होत आहे.

 

आंबेडकर – द लेजंड

आंबेडकर – द लेजंड (Ambedkar – The Legend) ही संजीव जयस्वाल यांनी दिग्दर्शित केलेली हिंदी भाषेतील आगामी वेबसीरिज आहे, जी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बाबा प्ले ॲप वर दिसणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. यामध्ये बाबासाहेबांचे अनेक अस्पर्शित आणि दुर्लक्षित पैलू दाखवले जाणार आहेत, जे आपण आधी बाबासाहेबांच्या चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये कधीही पाहिलेले नसतील. (अधिक माहिती येथे वाचा)


हे ही वाचलंत का?


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *