भगतसिंग विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार | Dr Ambedkar on Bhagat Singh

एप्रिल 1931 रोजीच्या संपादकीय मध्ये शहीद भगतसिंग यांच्यावर लिहिले होते व आपले विचार मांडले होते. ब्रिटिश शासनाने भगतसिंग यांना दिलेल्या फाशीची बाबासाहेबांनी निंदा केली होती आणि त्याला कायदेशीरदृष्ट्या अन्यायपूर्ण सुद्धा म्हटले होते. या लेखामध्ये आपण बाबासाहेबांनी भगतसिंग यांच्या बद्दल व्यक्त केलेले विचार आपण जाणून घेऊया . – Dr. Ambedkar on Bhagat Singh

Dr. Babasaheb Ambedkar on Bhagat Singh
Dr. Ambedkar on Bhagat Singh

Dr Ambedkar on Bhagat Singh

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शहीद भगतसिंग यांच्याबद्दल विचार प्रकट केलेले आहेत. ज्यावेळी भगतसिंग यांना ब्रिटिश शासनाने फाशी दिली होती, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या ‘जनता’ पाक्षिकात एक संपादकीय लेख लिहिला होता. ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारच्या कृतीची निंदा केली आणि भगतसिंगला दिलेल्या फाशीला कायदेशीरदृष्ट्या सुद्धा अन्यायपूर्ण ठरवले होते. ब्रिटनने आपल्या देशातील (युनायटेड किंग्डम) अंतर्गत राजकारणासाठी आणि आपल्या (ब्रिटिश) लोकांना खूष करण्यासाठी या तीन तरुणांना फासावर चढवले, असा आरोप बाबासाहेब आंबेडकरांनी लावला होता.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीदतेच्या वेळी त्याकाळातील प्रसिद्ध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या नियतकालिकामध्ये काय लिहिले, हे जाणून घेणे त्यांच्या विचारप्रक्रियेला समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. 23 मार्च 1931 रोजी वयाच्या तेविसाव्या वर्षी भगतसिंग (28 सप्टेंबर 1907 – 23 मार्च 1931) यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. त्यांच्यासोबत सुखदेव आणि राजगुरु यांनाही फाशी देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वर्तमानपत्रात या फाशीबद्दल आपले मत मांडले होते.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मराठी वृत्तपत्र ‘जनता’ मध्ये 13 एप्रिल 1931 रोजी या तीन तरुणांच्या शहीदतेवर ‘तीन बळी’ (तीन बलिदान) शीर्षकाखाली संपादकीय लिहिले. ‘जनता’ हे डॉ. आंबेडकरांच्या संपादनाखाली प्रकाशित होणारे एक मराठी पाक्षिक होते. हा संपादकीय लेख या तथ्याची साक्ष देतो की, देश आणि समाजासाठी जगणाऱ्या आणि मरणाऱ्या भगतसिंग सारख्या लोकांबद्दल डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोन काय होता.

13 एप्रिल 1931 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘जनता’ या आपल्या पाक्षिकातील संपादकीयात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेली फाशीची शिक्षा ‘बलिदान’ म्हणून अधोरेखित केली आणि त्यांच्या संपादकीयला ‘तीन बळी’ अर्थात ‘तीन बलिदान’ हे शीर्षक दिले. संपूर्ण संपादकीयचा निष्कर्ष असा आहे की ही तीन व्यक्तिमत्त्वे ब्रिटनच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की हा ‘न्याय’ नव्हता.

बाबासाहेब लिहितात – ‘जर सरकारचा निष्कर्ष असा आहे की या घटनेपासून’ इंग्रजी सरकार पूर्णपणे न्याय्यप्रीय आहे किंवा न्यायपालिकेच्या आदेशांचे पालन करते ‘, असा समज लोकांमध्ये मजबूत होईल आणि लोक त्याला पाठिंबा देतील, तर तो सरकारचा मूर्खपणा आहे. कारण ब्रिटीश न्यायदेवतेची ख्याती अधिक स्पष्ट आणि पारदर्शक व्हावी या हेतूने हे बळी देण्यात आले, या गोष्टीवर कोणालाही विश्वास नाही आहे. या समजुतीच्या आधारावर सरकार सुद्धा स्वतःचे समाधान करू शकत नाही. मग न्यायाच्या बुरख्याखाली बाकीचे कसे समाधान व्यक्त करू शकतील? हे बलिदान न्यायदेवतेची भक्ती म्हणून केले गेले नाही, तर विलायतेच्या रूढीवादी / राजकीय पुराणमतवादी / पक्ष आणि जनमताच्या भीतीमुळे हे कृत्य सरकारने केले आहे. आणि ही गोष्ट सरकारसह जगाला सुद्धा माहित आहे.

Dr. Ambedkar on Bhagat Singh

बाबासाहेबांनी लिहिलेला ‘जनता’ पाक्षिकाचा 13 एप्रिल 1931 रोजीचा संपादकीय लेख

 

भगतसिंगच्या धाडसाला सलाम

संपादकीयच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या तिघांना कोणत्या आरोपाखाली फाशी दिली होती याचा उल्लेख केला आहे. मग या तिघांच्या शौर्याची चर्चा करताना ते म्हणतात की, फाशीऐवजी बंदुकीच्या गोळीने मारण्याची भगतसिंग यांची शेवटची इच्छाही पूर्ण झाली नाही. ते पुढे लिहितात – या तिघांपैकी कोणीही ‘आमचे प्राण वाचवा’ अशा दयेचे आवाहन केले नव्हते. होय, फाशी देण्याऐवजी आम्हाला गोळ्या घालायला हव्यात, अशी इच्छा भगतसिंग यांनी व्यक्त केली होती, अशा बातम्या नक्कीच आल्या आहेत. पण त्यांच्या या शेवटच्या इच्छेचाही आदर केला गेला नाही.

या संपादकीयात तपशीलवार डॉ. आंबेडकरांनी भगतसिंगच्या फाशीच्या संदर्भात भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या खुल्या आणि गुप्त राजकारणावर चर्चा केली आणि त्यात ते महात्मा गांधी आणि त्यावेळचे व्हाईसराय लॉर्ड इर्विन यांच्या भूमिकेविषयी सुद्धा विचार करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, गांधी आणि इरविन भगतसिंगच्या फाशीला जन्मठेपेमध्ये बदलण्याच्या बाजूने होते. इरविनकडून गांधींनी हे वचन सुद्धा घेतले होते. पण ब्रिटनचे अंतर्गत राजकारण आणि ब्रिटनच्या लोकांना खुश करण्यासाठी या तिघांना फाशी देण्यात आली.

ते त्यांच्या संपादकीयच्या शेवटी लिहितात की, साहस हाच आहे की जनमत विचारात न घेता, गांधी-इर्विन कराराचे काय होईल याची चिंता न करता, विलायतेच्या पुराणमतवाद्यांच्या क्रोधापासून स्वतःला वाचवण्यासाठी भगतसिंग इत्यादींना बळी चढवले गेले. ही गोष्ट आता लपून राहणार नाही, ही वस्तुस्थिती सरकारने खरोखर मानली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भगतसिंगच्या फाशीवरील संपादकीय हे त्यांच्या सखोल संवेदनशीलतेचे आणि व्यापक मानवतेला सामावून घेणाऱ्या विचारसरणीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Dr. Ambedkar on Bhagat Singh


संदर्भ व अधिक माहिती

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ पर मराठी, हिंदी और अंग्रेजी में लेख लिखे जाते हैं :


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

6 thoughts on “भगतसिंग विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार | Dr Ambedkar on Bhagat Singh

  1. नक्कीच ही एक प्रेरणादायी माहिती ठरेल. बऱ्याच लोकांना बाबासाहेबांचे मनोगत भगत सिंग यांच्याबद्दल काय होते हे ऐकायचे होते, माहितीसाठी धन्यवाद.

  2. Jai Bhim Sir, Every word in the article written by Dr. Babasaheb Ambedkar is heart touching. I got good information through your efforts.

  3. या माहितीचा वापर आम्ही आमच्या YOUTUBE video साठी करु शकतो ❓❓❓

    1. करू शकता, मात्र व्हिडिओ मध्ये धम्म भारत ब्लॉगचा उल्लेख करावा व सदर लेख लिंक मध्ये discription box जोडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *