लंडन टाईम्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर लंडन टाईम्स या सुप्रसिद्ध इंग्लिश दैनिकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. – लंडन टाईम्सची आंबेडकरांना श्रद्धांजली

The London Times tribute on BR Ambedkar's death
The London Times tribute to BR Ambedkar’s death

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले, तेव्हा भारतासह जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्या. युनायटेड किंग्डमच्या जगप्रसिद्ध लंडन टाइम्स या दैनिकाने आपल्या 8 डिसेंबरच्या अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. लंडन टाईम्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानिमित्त संपादकीय लिहिताना भारतातील सामाजिक-राजकीय इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल असे जाहीर केले आहे. महापरिनिर्वाण प्रसंगीचा हा जनसमुदाय त्यांच्या अजरामरपणाची ग्वाही देत आहे.

The London Times Tribute to Dr BR Ambedkar

मूळ इंग्रजीत असलेल्या या बातमीचे मराठी भाषांतर खालीलप्रमाणे :

भारतात ‘अस्पृश्य’ समजल्या गेलेल्या समाजाचे कैवारी, डॉ. आंबेडकर यांचे त्यांच्या राहत्या घरी दिल्लीत निधन झाले. त्यांचे वय 63 वर्षांचे होते. भारतातील सामाजिक राजकीय घटनांच्या कोणत्याही इतिहासात आबेडकरांचे नाव अजराअमर झाल्याशिवाय राहणार नाही. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी आंबेडकरांना आपल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री म्हणून घेतले, आणि 1951 मध्ये आंबेडकरांनी मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हिंदू धर्माच्या जातिव्यवस्थेमुळे आंबेडकरांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. कधी कधी त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली, तरीदेखील डॉ. आंबेडकरांनी बहुमानाचा व नेतृत्वाचा मार्ग बरोबर निवडला. ते शरीराने तसेच बुद्धीने फार मोठे होते. ते मजबूत होते. चष्मा वापरत असत. निश्चय व धैर्य ह्या गोष्टी जणू त्यांच्या चेहर्‍यावर झळकत असे. त्यांनी तिन्ही खंडांमध्ये अध्ययन करून ज्ञान मिळविले होते. परंतु, आपल्या पंडित्याचा तोरा त्यांनी आपल्या वर्तनांत अगर भाषणांत प्रकट केला नाही. त्यांना मखलाशी माहित नव्हती, अमेरिकेतील न्यूयार्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र यांचा दीर्घ अभ्यास केला. इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये देखील त्यांनी संशोधन कार्य केले, त्यांचा अभ्यास “इंडिया ऑफिस मध्ये चालत असे. ते सिगरेट ओडीत नसत; व अतिशय काटकसरीने लंडन शहरात रहात असत. बडोद्याच्या महाराजांनी त्यांना एक प्रतिष्ठेची नौकरी दिली. परंतु त्यांना हिंदु समाज व्यवस्थेमुळे रहावयास घर मिळाले नाही. पुढे सिडनहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि अर्थशास्त्र व कायदा या विषयांचे ते मुंबई युनिव्हर्सिटीचे पेपर परीक्षक बनले.

या दरम्यानच्या काळात ते मोझेस प्रमाणे आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्याची तयारी करीत होते. ब्राह्मणी धर्माखाली आंबेडकरांच्या समाजातील लोकांना, अछूत, अस्पृश्य, बहिष्कृत असे लेखण्यात आले होते. त्यात गांधींनी “हरिजन” या नावाची आणखी एक भर घातली. आंबेडकरांनी एका सप्ताहिकाची स्थापना केली. आणि अस्पृश्यांचे कल्याण कांग्रेस करू शकत नाही व करणार नाही, असा दावा त्यांनी मांडला. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या नावाचा राजकीय पक्ष स्थापला.

राऊंड टेबल कॉन्फरसच्या तिन्ही अधिवेशनास, डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर असणे अपरिहार्यच होते. तेथे त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली ती मंजूरही झाली. पण शेवटी गांधींना सदर मागणी नामंजूर करून घेण्यासाठी प्राणांतिक उपोषण करावे लागले व आंबेडकरांना दडपणाखाली येऊन मंजूर मागणीत उलट फेरफार मान्य करावा लागला.

आंबेडकरांची बुद्धी व लेखणी कामात सतत व्यग्र असे. “कांग्रेस व गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले?” नावाचा ग्रंथ आंबेडकरांनी लिहिला. त्यांनी पाकिस्तानावर ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे “रूपयाचा प्रश्न”, भारतीय भांडवलाची वाढ व विकास अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. भारताची राज्यघटना देखील त्यांच्याच लेखनीने तयार झाली. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अंगिकारलेली कामे चालविली होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा अविष्कार म्हणजे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा केलेला स्वीकार होय. गेल्या महिन्यात ते काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषदेसही गेले होते.

– लंडन टाईम्स, ता. 8-12-1956

 

(टीप: बाबासाहेब आंबेडकर यांचे वयाच्या 65व्या वर्षी निधन झाले होते.)


बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेले इतर लेख


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.

🔸 WhatsApp
🔸 Telegram
🔸 Facebook
🔸 E-mail [email protected]


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *