नोव्हेंबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नोव्हेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November) या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November

वेगवेगळ्या वर्षांतील नोव्हेंबर महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. नोव्हेंबर महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in November – बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये — पहिल्या इयत्तेत प्रवेश, कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन मध्ये प्रवेश, सिडेनहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक, ‘जनता’ची सुरुवात, महात्मा गांधींशी तिसरी भेट, अस्पृश्यता निर्मूलनासाठीचे कलम स्वीकृत, भारतीय राज्यघटनेची स्वीकृती, डॉ. आंबेडकरांचा ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून गौरव, नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषद सहभाग, ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर प्रसिद्ध भाषण, बोधगया आणि सारनाथला भेटी, … यासारख्या गोष्टी समाविष्ट होतात.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November 

 

नोव्हेंबर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

1 नोव्हेंबर

 • 1943 : तिसरी महार बटालियन नौशेरा (वायव्य सरहद्द प्रांत) येथे उभारली गेली.

 

2 नोव्हेंबर

 • 1927 : अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली करा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली.

 

3 नोव्हेंबर

 • 1934 : मुंबई असेंबली निवडणुकीत बॅरिस्टर अभयंकरांना दलित फेडरेशनचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी डॉ. आंबेडकरांची नागपूर येथे जाहीर सभा झाली.

 

4 नोव्हेंबर

 • 1931 : दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा खलिता सादर करण्यात आला.
 • 1932 : मुंबईतील वालपाखाडी येथील तिसऱ्या गोलमेज परिषदेला जातानाच्या निरोप समारंभामध्ये “ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करेल” असे प्रतिपादन बाबासाहेबांनी केले.
 • 1932 : गुजराती मेंधवाल समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.
 • 1948 : राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 315 कलमे व 8 परिशिष्टे असलेला राज्यघटनेचा पहिला मसुदा संविधान सभेला सादर केला.
 • 1949 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकार कायदा (दुरुस्ती) बिल संविधान सभेत मांडले.

 

5 नोव्हेंबर

 • संत रोहिदास पुण्यतिथी
 • 1927 : नायगाव डेव्हलपमेंट चाळीच्या भव्य मैदानावर शिक्षणाच्या विषयावर बहिष्कृत वर्गाची सभा झाली.
 • 1936 : स्वतंत्र मजूर पक्षाची नागपूर येथे मध्य प्रांत वऱ्हाड प्रांतिक शाखा स्थापन झाली.
 • 1946 : लंडन येथे कंजर्वेटिव्ह इंडिया कमिटी समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

 

6 नोव्हेंबर

 • 1937 : मैसूर येथे सातारा जिल्हा अस्पृश्य समाजाची परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये “बहुजन समाजावर अन्याय होणार नाही, असे कायदे करून घेतले पाहिजेत” असे प्रतिपादन बाबासाहेबांनी केले.
 • 1938 : मुंबई कामगार मैदानावर कामगारांच्या सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. या कामगार मेळाव्यामध्ये “मालक-मजूर तंटा निवारण कायदा मजुरांच्या माना कापणारा” असल्याचे बाबासाहेबांनी म्हटले.
 • 1954 : अनुसूचित जातीच्या समस्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यसभेत भाषण झाले.

 

7 नोव्हेंबर

 • विद्यार्थी दिन महाराष्ट्र
 • 1900 : सातारा येथील ‘सरकारी सातारा हायस्कूल’ (सध्याचे नाव प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये इंग्रजी पहिल्या वर्गात बालक भीमरावांनी प्रवेश घेतला. या शाळेतील ब्राह्मण शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी भीमरावांचे आंबडवे (आंबवडे, आंबावडे नव्हे) गावावरून पडलेले ‘आंबडवेकर’ (आंबावडेकर नव्हे) हे नाव बदलून आपले स्वतःचे ‘आंबेडकर’ हे आडनाव दिले व शाळेच्या दप्तरात तशी नोंद करून टाकली. या शाळेच्या दप्तरात ‘भिवा रामजी आंबेडकर’ अशी त्यांच्या नावाची नोंद आहे. (1904 नोव्हेंबर मध्ये ते इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले.)
 • 1932 : तिसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे लंडनला प्रयाण झाले.
 • 1937 : पुणे जिल्ह्यातील दौंड येथील स्वतंत्र मजूर पक्षाच्या शाखा उभारणीच्या जाहीर सभेमध्ये “मनुष्य अजूनही भाकरीसाठी स्वाभिमानशून्य होणार काय?” असा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला.
 • 1938 : ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ व ‘गिरणी कामगार युनियन’ यांचा एक दिवसाचा संप झाला. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘कामगार नेते’ म्हणून प्रस्थापित झाले.
 • 1939 : मुंबई येथील गिरणी कामगारांच्या सर्वपक्षीय सत्याग्रह झाला, त्यामध्ये बाबासाहेबांचा सहभाग होता.
 • 1951 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटना येथे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची भेट घेऊन निवडणूक युतीबद्दल चर्चा केली.

 

8 नोव्हेंबर

 • 1936 : अस्पृश्य समाजातील सर्व साधुसंतांचा बाबासाहेबांच्या धर्मांतरास पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे जाहीर सभा झाली.
 • 1937 : वऱ्हाड वतनदार कामगार महार संघाची बडनेरा येथे परिषद झाली.
 • 1942 : कामगार मैदान, परळ येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने आयोजित केलेल्या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार चळवळ टीका करून अस्पृश्यांनी त्यात भाग घेऊ नये, असे आवाहन केले.
 • 1943 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय विधिमंडळात ‘इंडियन ट्रेड युनियन’ या कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक मांडले. या विधेयकानुसार मजूर संघटनांना मान्यता देण्याची सक्ती करण्यात आली.

 

9 नोव्हेंबर

 • 1929 : मातंग हितकारक मंडळाची सभा झाली, तसेच पार्वती मंदिर प्रवेशासाठी मोहीम सुरू झाली.
 • 1941 : साहित्य चर्चा मंडळाची नागपूर येथे स्थापना झाली
 • 1942 : मजूर मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई आकाशवाणीवरून पहिले भाषण झाले.

 

10 नोव्हेंबर

 • 1918 : मुंबईतील सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक झाली. या कॉलेजमध्ये बाबासाहेबांची हंगामी प्राध्यापक म्हणून दरमहा 450 रुपये पगारावर एका वर्षासाठी नेमणूक झाली होती.
 • 1931 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सच्या सभागृहात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांचे महत्त्व स्पष्ट केले.

 

11 नोव्हेंबर

 • 1916 : कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी (बॅरिस्टर पदवी) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन येथील ग्रेज इन या शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला.
 • 1917 : सर नारायण चंदावरकर यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची मुंबई सभा झाली. भीमरावांनी उच्च शिक्षण घेतल्याबद्दल अभिनंदनचा ठराव संमत झाला, मात्र भीमराव या सभेला अनुपस्थित होते.
 • 1932 : नाशिकच्या पवित्र कुंडात स्नान करण्याचा अस्पृश्यांना हक्क आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
 • 1979 : पुणे येथे दलित रंगभूमीची स्थापना करण्यात आली.

 

12 नोव्हेंबर

 • 1918 : मुंबईच्या सिडेनहम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुजू झाले.
 • 1927 : अमरावती येथे अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी बाबासाहेबांचा दौरा झाला.
 • 1930 : ब्रिटिश बादशहा पंचम जॉर्ज यांच्या हस्ते लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन झाले.
 • 1945 : नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या प्रचंड सभेत बाबासाहेबांनी काँग्रेसला प्रश्न केला की, “देशाला मिळणारे स्वातंत्र्य या देशात राहणाऱ्या सर्व जनतेचे की विशिष्ट अशा ब्राम्हण, मारवाडी आणि गुजरात्यांचे?”
 • बाळाराम आंबेडकर पुण्यतिथी

 

13 नोव्हेंबर

 • 1927 : अमरावती येथे अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले.
 • 1929 : पार्वती मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू झाला.
 • 1931 : महात्मा गांधींनी दलितांच्या चळवळीला विरोध करणारे विधान केले.
 • 1942 : मुंबई आकाशवाणीवर ‘भारतीय मजूर आणि दुसरे महायुद्ध’ या विषयावर बाबासाहेबांचे भाषण झाले.

 

14 नोव्हेंबर

 • बाल दिन – जवाहरलाल नेहरू जयंती (1989)
 • 1937 : बहिष्कृत आदि द्रविड समाज मद्रास विभागातर्फे माटुंगा, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार झाला, याप्रसंगी त्यांचे भाषण देखील झाले.
 • 1954 : हैदराबाद येथे दलित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले.

 

15 नोव्हेंबर

 • 1929 : बहिष्कृत भारताचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.
 • 1929 : ‘भारताची समाज रचना’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
 • 1956 : चौथी जागतिक बौद्ध परिषद काठमांडू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

 

16 नोव्हेंबर

 • राष्ट्रीय पत्रकार दिन
 • 1940 : मुंबई येथे इमारत फंडासाठी बोलवलेल्या सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
 • 1952 : महात्मा फुले यांच्या गौरवार्थ विश्रामबाग वाड्यामध्ये सरकारने सभा बोलावली होती.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November 

 

17 नोव्हेंबर

 • 1932 : तिसऱ्या गोलमेज परिषदेची पहिली बैठक संपन्न झाली.
 • 1933 : तुमसर येथे चोखामेळा नाईट स्कूलमध्ये ए बी मापवटकर यांचे अध्यक्षेखाली अस्पृश्य मंडळांची सभा झाली.
 • 1949 : संविधान सभेमध्ये राज्यघटनेच्या तिसऱ्या वाचनास सुरुवात झाली. संविधान सभेने मान्य केल्याप्रमाणे राज्यघटना संमत करावी, असा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला.

 

18 नोव्हेंबर

 • 1917 : सरव्हेंट ऑफ इंडिया सोसायटीच्या हॉलमध्ये अस्पृश्यांची दुसरी सभा संपन्न झाली.
 • बाबासाहेबांचे चरित्रकार चां.भ. खैरमोडे पुण्यतिथी

 

19 नोव्हेंबर

 • आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
 • राष्ट्रीय एकात्मता दिन
 • इंदिरा गांधी जयंती
 • नागरिक दिन
 • 1938 : आंबेडकर विजय समाजाचे जनरल सेक्रेटरी यशवंत मोतीराम नेताळे यांनी बाबासाहेबांचा संदेश सांगण्यासाठी जाहीर सभा बोलावली.
 • 1948 : घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
 • 1949 : दिल्ली येथे अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये “आपला भविष्यकाळ उज्वल आहे” यावर भाषण केले.

 

20 नोव्हेंबर

 • 1930 : पहिल्या गोलमेज परिषदेच्या पहिल्या सत्रात अत्यंत प्रभावी, मुद्देसूत आणि परिणामकारक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. आपल्या या भाषणामध्ये त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दयनीय स्थिती कथन केली आणि भारतीय अस्पृश्यांचे दुःख प्रथमच जगाच्या वेशीवर आले.
 • 1948 : अस्पृश्यतेसंबंधी असलेले घटनेचे अकरावे कलम स्वीकृत करण्यात आले. (नंतर ते कलम 17 वे झाले)
 • 1956 : काठमांडू (नेपाळ) येथील जागतिक बौद्ध परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर प्रसिद्ध भाषण झाले.

 

21 नोव्हेंबर

 • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लुंबिनीला (नेपाळ) भेट दिली, जेथे बुद्धांचा जन्म झाला होता.
 • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाटण्याहून बोधगयास गेले. बुद्धगया येथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते.

 

22 नोव्हेंबर

 • 1930 : हिंदुस्थानच्या भावी राज्यघटनेसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी लंडन येथे गोलमेज परिषद भरली.
 • 1948 : राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये स्पष्टीकरण दिले.

 

23 नोव्हेंबर

 • 1940 : जनता पत्राचा प्रसार करण्यासाठी केसरी यादी ‘जनता’मध्ये जाहीर करण्यात आली.
 • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धगया येथील महाबोधी मंदिरात बुद्ध वंदना म्हटली.
 • 1956 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सारनाथला भेट दिली आणि तेथे अस्पृश्यांच्या सभेमध्ये भाषण देखील केले.

 

24 नोव्हेंबर

 • 1920 : सासवड येथे महार लोकांची सभा झाली.
 • 1930 : ‘जनता’चा पहिला अंक प्रकाशित झाला. ‘बहिष्कृत भारत’ या पत्राचे नामकरण ‘जनता’ असे करण्यात येऊन देवराव विष्णू नाईक यांच्या संपादनात्वाखाली पहिला अंक मुंबईतून प्रकाशित झाला.
 • 1956 : सारनाथ येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात जावे”.

 

25 नोव्हेंबर

 • गुरु नानक जयंती
 • 1931 : लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची तिसरी भेट झाली.
 • 1949 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील वादविवादाला सविस्तर उत्तर दिले.
 • 1951 : शिवाजी पार्क येथे बाबासाहेबांची सभा झाली.
 • 1956 : काशी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. हे त्यांचे अखेरचे जाहीर भाषण होय.‌ या प्रसंगी ते म्हणाले की “बौद्ध धर्म हा महासागरासारखा अथांग आहे. ज्यात भेदाभेद नाही. तो मानवधर्म आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा.”

 

 

26 नोव्हेंबर

 • 1949 : घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून घटना निर्मितीच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करण्यात आला.
 • 1951 : सर कासवजी जहांगीर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रसाराचे भाषण झाले.
 • 1951 : बाबासाहेबांनी संसदेत सादर केलेले हिंदू कोड बिल फेटाळले गेले.
 • 1956 : महाबोधी सोसायटी आयोजित सभेला सारनाथ येथील मूलगंध कुटी विहाराच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

 

27 नोव्हेंबर

 • 1927 : सोलापूर येथील सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये ‘अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया’ या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले.
 • 1927 : महात्मा फुले यांचा महाराष्ट्रात सावंत्सारिक उत्सव साजरा करण्यात आला.
 • 1944 : बाबासाहेबांचे मुंबईहून पुण्यात आगमन झाले. पुण्यात गीता, वेद आणि बौद्ध धर्म यावर विवेचन झाले.
 • 1945 : दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातवी भारतीय कामगार परिषद संपन्न झाली.

 

28 नोव्हेंबर

 • महात्मा फुले स्मृतिदिन
 • 1948 : हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, अशी पंतप्रधान नेहरूंनी घोषणा केली.

 

29 नोव्हेंबर

 • 1945 : साबरमती नदीच्या काठावर अहमदाबाद येथे बुद्धनगर मंडपामध्ये मुंबई प्रांत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे पहिले अधिवेशन झाले.
 • 1948 : भारतीय संविधान सभेने अस्पृश्यता निवारणाचे महत्त्वपूर्ण काम कलम 11 वे संमत केले. (हे 11 वे कलम नंतर कलम 17 वे झाले.)

 

30 नोव्हेंबर

 • 1919 : अकोला जिल्ह्यातील अकोट मुक्कामी वतनदार महारांची सभा झाली.
 • 1943 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे टोकीवाडा येथे पूर्व गोदावरी जिल्हा बोर्डाच्या सभेत भाषण झाले. “सध्याच्या परिस्थितीत अल्पसंख्याकांना संरक्षणाची आवश्यकता आहे. हे बहुमतवाल्या पक्षाने ध्यानात ठेवले तर जातीय प्रश्न चुटकीसरसा सुटेल,” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले.
 • 1945 : अहमदाबाद नगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले.
 • 1956 : कुशीनगर येथील पुज्य भंते चंद्रमणींच्या आश्रमात डॉक्टर आंबेडकरांना गुरूंनी एक छत्री, मोर पिसांचा पंख आणि माळ भेट दिली. हीच शेवटची गुरु-शिष्यांची भेट होती.

 

नोव्हेंबर मध्ये झालेल्या अन्य गोष्टी 

 • 1904 : बाल भीमराव इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • 1912 : भीमरावांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. साठी प्रवेश घेतला. त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय घेतले होते.
 • 1923 : ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा प्रबंध स्वीकारून लंडन विद्यापीठाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ‘डी.एस्सी.’ ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली.

 

सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in November) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी बाब समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *