तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण 14 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले. हा जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तो भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा ठरला आहे. – Dr Ambedkar statue in Hyderabad in Marathi

125 feet tall Dr Ambedkar statue in Hyderabad
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक उभारले गेले असून, त्यामध्ये हा डॉ. आंबेडकरांचा 125 फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. 2017 मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा 125 फूट उंच पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता.
बाबासाहेबांचा भव्य पुतळा बनवण्याची योजना 2017 पासून सुरू होती. या भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनावरण 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी करण्यात आले. Ambedkar statue in Telangana
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी 14 एप्रिल 2023 रोजी या विशाल पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते.
या भव्य पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सुमारे 50 हजार लोक उपस्थित होते. बौद्ध रीतीरिवाजांनुसार हा सोहळा पार पडला. यावेळी बौद्ध भिक्खुंनी मंत्रोच्चार केला. तेलंगणाच्या नव्या सचिवालयाशेजारी हा पुतळा उभारण्यात आला आहे.
या पुतळ्याचा चौथरा एक 50 फूट उंच गोलाकार इमारत आहे, जी भारतीय संसदेची प्रतिकृती आहे. या स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील क्षणचित्रे, पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध आहे.
- हे सुद्धा वाचा
- ‘या’ देशांमध्ये आहेत डॉ. आंबेडकरांचे पुतळे
- डॉ. आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे
- दिल्लीतील 10 डॉ. आंबेडकर पुतळे
हे डॉ. आंबेडकर स्मारक हैदराबाद शहरात असलेल्या एनटीआर गार्डनमध्ये 11.4 एकर जागेवर उभारले गेले आहे. हे स्मारक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. या स्मारकात उद्यान, भव्य पुतळा, पुतळ्याची पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत.
डॉ बीआर आंबेडकर स्मारक हुसेन सागर तलावाजवळ आहे. हुसेन सागर तलावामध्ये जगातील सर्वात उंच अखंड दगडी बुद्ध मूर्ती आहे, जी 18 मीटर (58 फूट) उंचीवर आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तींचे भव्य पुतळे एकाच ठिकाणी स्थानापन्न आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये

बाबासाहेबांचा 125 फूट (38 मीटर) उंच पुतळा हा 50 फूट उंच पायाभूत इमारतीवर बसवला गेला आहे. ही पायाभूत इमारत आपल्या भारतीय संसद भवनाची प्रतिकृती आहे.
पायाभूत इमारतीसह (चौथरा) डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची एकूण उंची 175 फूट (53.34 मीटर) आहे. तसेच हा पुतळा 45.5 फूट रुंद आहे.
हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये चौथा आणि जगातील 90 सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे.
जर आपण चबुतरा किंवा पायाभूत इमारतीसह पुतळ्यांच्या एकूण उंचीबद्दल विचार केला, तर हा बाबासाहेबांचा पुतळा भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा ठरतो आणि जगातील 40 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.
11.4 एकर जागेवर पसरलेले हे भव्य आंबेडकर स्मारक असेल, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना असतील.
पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या हातात संविधान दाखवण्यात आले आहे. या संविधानाच्या रचनेत मूळ संविधानाची (मूळ पुस्तक) प्रतही ठेवण्यात आली आहे. म्हणजेच या पुतळ्यात बाबासाहेब मूळ संविधानाची प्रत हातात घेऊन उभे आहेत.
या पुतळ्यासाठी 791 टन स्टेनलेस स्टील आणि 9 टन ब्रॉन्ज़ वापरण्यात आला आहे. संपूर्ण पुतळ्याला लागणारा खर्च सुमारे 146.5 कोटी रुपये आहे. Ambedkar statue cost In Telangana
हैदराबाद मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे फोटो बघण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा.
- हे सुद्धा वाचा
- व्हिएतनाममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 10 पुतळे
- थायलंड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
- मॉरिशस मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
राजस्थान, जयपूर येथील डॉ. आंबेडकर मेमोरिअल वेल्फेअर सोसायटीमध्ये सुद्धा डॉ. आंबेडकरांचा एक उंच पुतळा बसवण्यात आला आहे, पण त्याची उंची माहीती कळू शकली नाही. सध्या हा पुतळा बाबासाहेबांचा दुसरा सर्वात उंच पुतळा आहे. (पहा फोटो)
2019 मध्ये, तेलंगणा सरकारने यापूर्वीच बोरबंदा (Borabanda) येथील सेंटर फॉर दलित स्टडीजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 27 फूट 6 इंच उंचीचा पुतळा बसवला आहे. हैदराबादचा आंबेडकर पुतळा आणि जयपुर मधील आंबेडकर पुतळा या दोघांनंतर बोरबंदा येथील बाबासाहेबांचा पुतळा तिसरा सर्वात उंच पुतळा आहे.
हे आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन सर्वात उंच व भव्य पुतळे, ज्यापैकी 2 निर्माणाधीन आहेत
पुतळा | स्थान | उंची | अनावरण | ||
---|---|---|---|---|---|
डॉ. बी. आर. आंंबेडकर स्मारक |
हैदराबाद, तेलंगाना
|
125 फूट + 50 फूट चबुतरा | 14 एप्रिल 2023 | ||
डॉ. बी. आर. आंंबेडकर स्मृतिवनम |
विजयवाडा, आंध्र प्रदेश
|
125 फूट + 80 फूट चबुतरा | जुलै 2023 | ||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा) |
मुंबई, महाराष्ट्र
|
350 फूट + 100 फूट चबुतरा | 14 एप्रिल 2026 | ||
आंध्र प्रदेशातही 205 फूट उंच आंबेडकरांचा पुतळा
आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात ‘डॉ. बी.आर आंबेडकर स्मारक उभारले जात आहे. या स्मारकातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
हा पुतळा 80 फूट उंचीच्या पायाभूत इमारतीवर उभा राहणार आहे. म्हणजेच पायाभूत इमारतीसह या पुतळ्याची एकूण उंची 205 फूट असणार आहे. एकूण उंचीच्या बाबतीत विजयवाडा मधील आंबेडकर पुतळा हा हैदराबादच्या आंबेडकर पुतळ्यापेक्षा (175 फूट) 30 फूट अधिक उंच असेल.
विजयवाड्यातील डॉ बीआर आंबेडकर स्मारकाचे काम सुद्धा जोरात सुरू आहे आणि 2023 च्या डिसेंबर महिन्यात किंवा 2024 च्या एप्रिल महिन्यात पूर्ण होईल.
बाबासाहेबांचे 125 फूट उंचीचे दोन पुतळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन तेलुगू भाषिक राज्यांमध्ये एकाच वर्षात बसवणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे
मुंबईतील 450 फूट उंच डॉ. आंबेडकरांचा पुतळा
350 फुट उंचीचा बाबासाहेबांचा भव्य पुतळा (Statue of Equality) मुंबईत उभारला जात आहे. चबुतरा किंवा पायाभूत इमारतीसह या पुतळ्याची एकूण उंची 450 फूट असेल. ह्या स्मारकाचे काम संथ गतीने होत असून यातील भव्य मूर्ती पुढील वर्षी 14 एप्रिल 2024 रोजी तयार होईल असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे, मात्र याचे अपूर्ण काम बघता हा पुतळा 2026 मध्ये पूर्ण होईल असे दिसते.
मुंबईतील स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असेल.
14 एप्रिल 2022 रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोपाळमध्ये बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी पुतळ्याच्या उंचीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पुतळा उभारण्याचा निर्णय झालाच तर तो 100 फुटांपेक्षा अधिक उंच असण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकप्रियता आणि त्यांचे महत्त्व भारतातील सर्व राज्यांमध्ये खूप वाढले आहे.
सारांश
या लेखात हैद्राबाद येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याची (Dr Ambedkar statue in Hyderabad) माहिती देण्यात आली आहे. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कोमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे विचारू शकता. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- Wikipedia : 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
Nice Information about Ambedkar statue.