गौतम बुद्धांबद्दल स्वामी विवेकानंदांचे विचार | Swami Vivekananda quotes on Buddha

स्वामी विवेकानंद यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल अनेक विचार मांडलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपली मते व्यक्त केलेली आहेत. स्वामी विवेकानंद यांच्यावर भगवान बुद्धांचा मोठा प्रभाव होता, हे आपणास त्यांचे बुद्धांवरील विचार पाहिल्यावर लक्षात येईल. – swami vivekananda quotes on buddha

swami vivekananda quotes on buddha
swami vivekananda on buddha

Swami Vivekananda quotes on Buddha

स्वामी विवेकानंद हे एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलगामी विचार व्यक्त केले आहेत.

बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे स्वतंत्र विचारसरणी असलेले दोन भिन्न धर्म आहेत. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते तर स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे सर्वात मोठे उपासक होते. स्वामी विवेकानंद हे हिंदू असल्यामुळे त्यांचे बौद्ध तत्त्वज्ञानाविषयी अस्वीकार्य मत देखील असू शकते. तथापि येथे केवळ त्यांचे बुद्ध आणि बौद्धधम्माविषयीची सकारात्मक मते घेतलेली आहेत.

बौद्धधर्माचे थोर उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की, “भारताने निर्माण केलेला आतापर्यंतचा सर्वात महान मनुष्य म्हणजे भगवान बुद्ध होय. तर अलीकडच्या शतकांमध्ये भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा पुरुष गांधी नसून स्वामी विवेकानंद होते.” बाबासाहेब बुद्धांना सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणतात तर विवेकानंदांना अलीकडच्या काळातील सर्वश्रेष्ठ भारतीय संबोधतात.

येथे, स्वामी विवेकानंद यांनी तथागत बुद्धांबद्दल विचार मांडलेले आहेत, ते त्यांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण’ या पुस्तकातून संकलित करण्यात आलेले आहेत. swami vivekananda on buddhism

 

 

स्वामी विवेकानंदांचे भगवान बुद्धांबद्दल विचार

Quote #1

बौद्धांच्या एका धर्मग्रंथात ‘बुद्ध’ नामक अवस्थेचा अर्थ ‘अनंत आकाशासारखे अनंत ज्ञान’ असा सांगितला आहे.

 

Quote #2

“बुद्धांच्या हृदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.”

 

Quote #3

भगवान बुद्ध माझे इष्टदैवत आहेत, माझे परमेश्वर आहेत. त्यांनी ईश्वरवादाचा उपदेश केला नाही – ते स्वतःच ईश्वर होते, असा माझा दृढ विश्वास आहे.

 

 

Quote #4

“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चा जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”

 

Quote #5

बुद्ध हे जगातील एक अद्वितीय व अत्यंत धीट असे नीतिमत्तेचे प्रचारक होते. ते सर्वश्रेष्ठ कर्मयोगी होते.

 

Quote #6

सर्व अर्थहीन गुंतागुंतीचा बुद्धांनी छेद केला आणि प्रचंड शक्तिशाली सत्याची शिकवण दिली.

 

Quote #7

तडजोड करणे बुद्धांना पसंत नव्हते. बुद्धांनी एक क्षणभर तडजोडीची वृत्ती दाखवली असती तर उभ्या आशिया खंडात त्यांच्या जीवनकालातच ईश्वर समजून लोकांनी त्यांची पुजाअर्चा सुरू केली असती.

 

Quote #8

“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.”

 

Quote #9

खरोखरच बुद्धांसारखा नेहमी समजूतदारपणे वागणारा मनुष्य कधीच जन्माला आला नाही.  swami vivekananda quotes on buddha

 

Quote #10

“बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, “कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय” जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्रीची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.”

 

Quote #11

“बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता… इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहूत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.”

 

Quote #12

“भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.”

swami vivekananda on buddha

 

Quote #13

बुद्धांनी वेद, जातीभेद, पुरोहित वर्ग, रुढी वगैरे कशाही पुढे कधी मान तुकवली नाही. जेथवर तर्कविचार करता येणे शक्य आहे, तेथवर त्यांनी अगदी निर्भयपणे तर्कविचार केला.

 

Quote #14

“मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपाननिर्षधाचा पुरस्कार केला आहे.”

 

Quote #15

“जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला साहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वत: संबंधी ते म्हणत, “बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल.” ”

 

Quote #16

“भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वैगरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वत:चे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्राचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्राच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.”

 

Quote #17

“बुद्धांचा हजारावा अंश जरी माझ्यात असता तरी मी स्वत:ला धन्य समजलो असतो.”

 

Quote #18

बुद्ध धर्मजगतातील वॉशिंग्टन होते.

 

Quote #19

“बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व मानसे समान आहे, याला काही अपवाद नाही.”

 

Quote #20

“बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरूषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे. ही त्यांची शिकवण होती.”

 

Quote #21

बुद्धांचा धर्म द्रुतगतीने पसरला याचे कारण त्यांच्या विशाल हृदयातून वाहणारे उत्कट व विलक्षण प्रेम.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *