डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचे विचार

स्वातंत्र्य आणि समतेचे थोर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही तत्त्वांबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. स्वातंत्र्य आणि समता याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व्यापक होते.

 इस लेख को हिन्दी में पढे 

Dr Babasaheb Ambedkar's thoughts on Liberty and equality
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र व समतेबद्दलची मते

Dr Babasaheb Ambedkar’s thoughts on Liberty and equality

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांचा पुरस्कार केला. मानवासाठी ही दोन्ही तत्त्वे अत्यंत आवश्यक आहेत आणि समाजामध्ये ही तत्त्वे प्रस्थापित करणे अतिशय आवश्यक आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. चला तर जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचे विचार –

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्याबद्दल विचार

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे, मात्र त्यांना केवळ राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत नव्हते, तर त्यांना सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा अपेक्षित होते. त्यांचा स्वातंत्र्याबद्दलचा दृष्टिकोन व्यापक होता.

समान संधी आणि अधिकार यांपासून अनेक वर्ष वंचित ठेवलेल्या बहिष्कृत अस्पृश्य समाजाला जोपर्यंत गुलामगिरीतून मुक्त केले जात नाही, त्यांच्या दास्यत्वाचे जोखड फेकून देण्यात जोपर्यंत प्रस्थापित शासनाला यश मिळत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य हे मूठभर लोकांच्या हिताचे रक्षण करेल, परंतु अशा स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही असे बाबासाहेबांचे मत होते.

शतकानुशतके समान संधी आणि अधिकार यांपासून वंचित ठेवलेल्या मोठ्या वर्गाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यास ते त्यांच्या फायद्याचे ठरणार नाही, ते राष्ट्रीय प्रवाहाशी समरस होऊ शकणार नाहीत, असा बाबासाहेबांना वाटत होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ते होते, तथापि त्यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य असा फरक केला होता. परकीय देशाच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला म्हणजे की राजकीय स्वातंत्र्य मिळते, पण तरीही स्वतंत्र भारत देशाची जनता पारतंत्र्यात असते.

कारण राजकीय गुलामगिरी संपुष्टात आली की परकीय राज्यकर्ते निघून जातात, ते गेल्यानंतरही त्या देशातील जनतेची गुलामगिरी कायम राहते, त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही, असा विचार बाबासाहेबांनी मांडला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतेबद्दल विचार

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक तत्त्वज्ञान तीन शब्द गुंफले जाते – स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बाबासाहेबांना समतेचे सर्वात मोठे पुरस्कर्ते मानले जाते. त्यांनी आजीवन समतेसाठी कठोर संघर्ष केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील 450 फूट निर्माणाधीन पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी अर्थात समतेचा पुतळा म्हणतात तसेच त्यांच्या जयंतीला आंतरराष्ट्रीय समता दिवस म्हणून साजरी करण्याची मागणी सुरु आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, लोकशाही यशस्वी करण्यासाठी वैधानिक आणि प्रशासकीय संस्था प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाहीच्या विकासाकरता कायदा आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी समान असल्या पाहिजे. कायद्याचे अधिराज्य हे तत्त्व मान्य करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना समतेची वागणूक दिली पाहिजे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वांना समानतेची वागणूक मिळाली, तरच सर्वांना समान न्याय मिळेल व स्वातंत्र्य व बंधुत्व यांची जोपासना होईल. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणाची हमी मिळविण्यासाठी लोकमतवर आधारित अशा शक्तिशाली शासनाच्या आवश्यकतेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक समता पाहिजे होती, त्यांना गणिती समता किंवा कृत्रिम समता मान्य नव्हती. प्रत्येक व्यक्तीची गरज आणि त्या व्यक्तीची क्षमता यामध्ये निसर्गनिर्मित भिन्नता आढळते.

समतेच्या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ब्रिटिश तत्त्वज्ञ हे हेरॉर्ड लास्की यांच्याशी मिळते जुळते आहेत. बाबासाहेबांचे असे मत होते की समाजातील सर्वांना समान संधी आणि मागासलेल्या घटकांना संरक्षण मिळाले पाहिजे.

वंश, धर्म, जात, सामाजिक स्थान अशा कारणांवरून भेदभाव करण्याने समाजवादी व्यवस्थेशी प्रतारणा होईल, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *