आज आपण भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे जाणून घेऊया. यापैकी दोन उभे आहेत तर एक निर्माणाधीन आहे. हे भव्यदिव्य आणि विशाल पुतळे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंचीच्या पुतळ्यांच्या यादीत समाविष्ट होतील. – आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे
हैदराबाद, विजयवाडा आणि मुंबईमध्ये असतील डॉ. आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगभरातून लक्षावधी पुतळे आणि स्मारके उभारण्यात आलेली आहेत. भारतात सर्वात जास्त पुतळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. हे पुतळे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि त्यांना त्यांचे विशेष महत्त्व सुद्धा आहे. तीन वेगवेगळ्या भारतीय राज्यांमध्ये बाबासाहेबांचे हे विशाल पुतळे आहेत, ज्यापैकी दोघांचे काम पूर्ण झाले आहे तर एकाचे काम अजून चालू आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आतापर्यंतचे सर्वात उंच पुतळे आहेत. काम चालु असलेला पुतळा जेव्हा 2026 मध्ये बनेल, तेव्हा तो जगातील पहिल्या 5 सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यांमध्ये स्थान प्राप्त करेल.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये क्रमशः 175 फूट आणि 206 फूट उंच असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये 450 फूट उंच असा बाबासाहेबांचा पुतळा उभारला जात आहे. बाबासाहेबांचे हे पुतळे मराठी आणि तेलुगू लोकांच्या भूमीवर उभे आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ही दोन्ही तेलुगू भाषिक राज्ये आहेत तर महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हैदराबाद
मुख्य लेख : हैदराबाद येथील बाबासाहेबांचा भव्य पुतळा
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा 50 उंच चबुतऱ्यावर उभारण्यात आला आहे. अशाप्रकारे या पुतळ्याची एकूण उंची 175 फूट आहे. हा आजरोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा सर्वात उंच पुतळा आहे. 2017 मध्ये तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता.
हे स्मारक एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी (14 एप्रिल 2023) या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
हैदराबाद शहरातील हुसेन सागर तलावाजवळ 11.4 एकर जागेवर भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा कांस्य पुतळा बसवण्यात आला आहे. या 11.4 एकरच्या उद्यानात पुतळ्यासह एक संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स रूम आणि इतर सुविधा आहेत.
125 फूट उंच पुतळा हा 45.5 फूट रुंद आहे. तसेच 50 फुटांच्या उंचीच्या चौथर्यावर तो बसवण्यात आला आहे. हुसेन सागर तलावात आधीच 18 मीटर उंच (किंवा 58 फूट) जगातील सर्वात उंच अखंड बुद्ध मूर्ती आहे. सम्यक संबुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही महामानव या एकाच ठिकाणी मिळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 791 टन स्टेनलेस स्टील आणि 9 टन पीतळ वापरण्यात आला, तसेच संपूर्ण पुतळ्यासाठी 146.5 कोटी रुपये खर्च आला आहे.
NTR गार्डन येथील 125 फूट पुतळ्याव्यतिरिक्त, तेलंगणा सरकारने बोरबंदा येथील दलित अभ्यास केंद्रात 27 फूट उंचीचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा आधीच स्थापित केला आहे.
2. सामाजिक न्यायाचा पुतळा, आंध्र प्रदेश
आंध्रप्रदेश मधील विजयवाडा शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वराज्य मैदानामध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतीवनम अर्थात डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आहे. या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट (38 मीटर) उंचीचा भव्य ‘सामाजिक न्यायाचा पुतळा’ उभारण्यात आला आहे.
हा पुतळा भारतातील पहिल्या 10 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये चौथ्या स्थानावर आहे, तर जगातील सर्वाधिक उंचीच्या पहिल्या 40 पुतळ्यांमध्ये याचे स्थान आहे.
9 जुलै 2020 रोजी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याची पायाभरणी केली होती. 19 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी ह्या जगातील सर्वात उंच भीम पुतळ्याचे अनावरण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ह्या पुतळ्याची निर्मिती करण्याचे ठरविण्यात आले, त्यामुळे या पुतळ्याची उंची सुद्धा 125 फूट इतकी ठेवण्यात आली आहे. आता, विजयवाडा शहरातील मध्यवर्ती स्वराज मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ‘पीडब्ल्यूडी मैदान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मैदानाचे ‘डॉ. बी.आर. आंबेडकर स्वराज्य मैदान’ असे नामकरण केले. – आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे
मुख्य लेख : विजयवाडा येथील बाबासाहेबांचा भव्य पुतळा
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी हे मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे. येथे 137.3 मीटर (450 फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल. हा पुतळा 45 मजली इमारती इतका उंच असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा सर्वात मोठा असेल. (biggest ambedkar statue in india) मुंबई आणि हैदराबाद मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा पाया संसद भवनाची प्रतिकृती आहे. तसेच हे दोन्ही पुतळे जलाशयाच्या काठावर वसलेले आहेत.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला “स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी” अर्थात “समतेचा पुतळा” म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांचे समाधीस्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ साडे 12 एकर असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे 783 कोटी रूपये इतका येण्याचा अंदाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या स्मारकाचे मुख्य आकर्षण असेल. या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची 137.3 मीटर (450 फुट) एवढी असेल. त्यात 30 मीटरचा (100 फुट) चौथरा आणि त्यावर 106 मीटरचा म्हणजेच 350 फुटांचा पुतळा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा कांस्य धातूचा असेल. या पुतळ्याचा पाया किंवा आधार भवन हे भारतीय संसदेची प्रतिकृती असेल.
दिल्लीच्या गाझियाबादमध्ये ह्या पुतळ्याचे निर्माण कार्य सुरू आहे. पुतळ्याला 150 – 175 टन ब्राँझ धातू लागणार आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा समुद्राचे खारे पाणी आणि समुद्री किनारी वाहणाऱ्या अतिवेगवान वारा देखील सहन करण्यास सक्षम असेल.
ऑगस्ट 2022 मध्ये, स्मारकाचे 70% काम पूर्ण झाले आहे.
जगातील तिसरा सर्वात उंच पुतळा
जर पायथ्यासह पुतळ्यांची एकूण उंची विचारात घेतली तर, मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जगातील सर्वाधिक उंचीचा तिसऱ्या क्रमांकाचा पुतळा असेल. परंतु केवळ पुतळ्याची उंची विचारात घेतली तर बाबासाहेबांचा पुतळा हा जगातला चौथा सर्वात उंच पुतळा ठरेल.
जगातील टॉप 5 सर्वात उंच पुतळे खालीलप्रमाणे : (पायथ्यासह एकूण उंची)
#
पुतळा
स्थान
उंची
1
पटेलांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'
भारत
240 मीटर (787 फूट)
2
बुद्धांचा 'स्प्रिंग टेंपल बुद्ध'
चीन
208 मीटर (682 फूट)
3
डॉ. आंबेडकरांचा 'स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी'
भारत
137.3 मीटर (450 फूट)
4
बुद्धांचा 'लायक्यून सेक्क्य'
म्यानमार
129.2 मीटर (424 फूट)
5
महादेवाचा 'स्टॅच्यू ऑफ बिलीफ'
भारत
107 मीटर (351 फूट)
इंदू मिल येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 25 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे, जो 450 फुटांच्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. या स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट आणि स्तूप, संग्रहालय, तसेच प्रदर्शने भरवण्यासाठी दालन असेल.
स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच आंबेडकरानुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक चैत्यभूमीला जोडले जात आहे.
स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने 25,000 चौरस फुट स्तूप असेल. दगडाचे 24 आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार अशोक चक्रासारखा असेल तसेच 39,622 चौरस फुट जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे.
स्मारक परिसरात 500 वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी “मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” (एमएमआरडीए) कडे सोपवण्यात आली आहे.
पुतळ्याभोवती सहा मीटर लांबीचा चक्राकार मार्ग असेल. तसेच चौथऱ्यावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सोय असेल. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक सभा घेण्यासाठी एक हजार लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल. विपश्यनेसाठी येणाऱ्या लोकांसाठी ध्यानधारणा केंद्र असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एक ग्रंथालय असेल. त्यात बाबासाहेबांबद्दलची माहिती पुस्तके, त्यांचे साहित्य, जीवनचरित्र, माहितीपट, लेख, तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानावर संशोधन करण्याची सोय असेल. या केंद्रात व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्यासाठी 400 लोकांची क्षमता असलेले सभागृह असेल.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अनधिकृतपणे ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ अर्थात ‘समतेचा पुतळा’ म्हटले जाते. बाबासाहेबांच्या पुतळ्यास ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ (Statue of Equality) हे नाव बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहे, राज्य शासनाने तसा उल्लेख कोठेही केलेला नाही. महाराष्ट्र शासनाने या स्मारकाचा अधिकृतपणे उल्लेख ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक’ (Dr. Babasaheb Ambedkar grand memorial) असा केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ या नावास सुद्धा अधिकृतपणे मान्यता द्यायला हवी.
ही बाब सुद्धा लक्षात घ्यायला हवी की, हैदराबाद मधील रामानुजन यांच्या पुतळ्याचे नाव सुद्धा स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी ठेवण्यात आलेले आहे.
स्टॅच्यू ऑफ नॉलेज
13 एप्रिल 2022 ला लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ 72 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
भोपाळ
14 एप्रिल 2022 रोजी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी घोषणा केली आहे की राजधानी भोपाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा बसवला जाईल. त्यांनी पुतळ्याची उंची सांगितली नसली तरी ती 100 फुटांपेक्षा जास्त उंच असण्याची शक्यता आहे.
टॉप 10 : भारतातील सर्वात उंच पुतळे
भारतातील पहिल्या दहा सर्वाधिक उंचीचा पुतळ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तीनही पुतळ्यांचा समावेश होईल. 125 फूट (38 मीटर) उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा भारतातील 9व्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा ठरेल.
FAQs :
प्रश्न 1 – जगातील सर्वात उंच मूर्ती कोणत्या देशात आहे?
उत्तर – जगातील सर्वात उंच मूर्ती भारत देशात आहे.
प्रश्न 2 – जगातील सर्वात उंच पुतळा कोणता? (Tallest statue in the world)
उत्तर – सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी (597 फूट/ 182 मीटर)
प्रश्न 3 – जगातील सर्वात मोठा पुतळा कोणता? (Biggest statue in the world)
उत्तर – जगातील सर्वात मोठा पुतळा चीनमधील भगवान बुद्धांचा आहे. पूर्व चीनमधील जिआंग्शी प्रांतातील यियांग काउंटीमध्ये जगातील सर्वात मोठी मूर्ती – झोपलेल्या स्थितीतील विशाल बुद्ध मूर्ती आहे, जी तब्बल 416 मीटर (1,365 फूट) लांब आणि 68 मीटर उंच आहे. (63वे तथ्य बघावे)
प्रश्न 4 – जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत?
उत्तर – जगात सर्वात जास्त पुतळे गौतम बुद्धांचे आहेत.
प्रश्न 5 – भारतात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत?
उत्तर – भारतात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.
प्रश्न 6 – भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता?
उत्तर – भारतातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आहे. त्याची उंची 597 फूट (182 मीटर) आहे.
प्रश्न 7 – महाराष्ट्रात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत ?
उत्तर – महाराष्ट्रात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.
सारांश
मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण तीन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे’ (The 3 Tallest Statues of Dr. B.R. Ambedkar) यांची माहिती बघितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची (Statues of Dr. Ambedkar) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्थान – नाना पाटेकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवलेले 15+ चित्रपट
- धम्म भारत वरील मराठी लेख
- प्रसिद्ध बौद्ध धर्मीय सेलिब्रिटी (एक्टर अणि सिंगर)
- बौद्ध धर्माशी संबंधित रंजक आणि महत्त्वपूर्ण माहिती
- ‘हे’ आहेत 20व्या शतकातील 5 सर्वश्रेष्ठ बौद्ध
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी (अभिनेते आणि गायक)
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- जगातील ‘या’ 10 देशांत आहे सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या
- 1 कोटी की 10 कोटी? भारतात बौद्ध लोकसंख्या नेमकी किती?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |