डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विचार

समता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि जागतिक विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रभावित केले आहे.

Nobel laureates views on Dr Ambedkar

  यह लेख हिंदी में पढ़े  

Nobel laureates views on Dr. B. R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित झालेल्यांमध्ये केवळ शोषित, पीडित लोकच नाही तर जगप्रसिद्ध व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा देखील समावेश आहे.

हे नोबेल पारितोषिक विजेते आपल्या विचारांमधून बाबासाहेबांच्या कार्याचा, संघर्षाचा आणि विचारांचा गौरव करतात, आणि त्यांची कथने डॉ. आंबेडकरांच्या वैश्विक मान्यतेची साक्ष देतात.

दुसरीकडे जातिव्यवस्थेवर विपुल लेखन करणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या कोणत्याही लेखनात डॉ. आंबेडकरांचा उल्लेखही केला नाही. टागोर (1861-1941) हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आणि अजोड आहे, त्यासोबत त्यांचे भारताच्या अर्थकारणातही भक्कम योगदान आहे. त्यामुळे बाबासाहेबांना सुद्धा शांततेच्या किंवा अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करायला हवे होते.

या लेखामध्ये नोबेल पुरस्कार विजेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय विचार मांडले आहेत, हे तुम्हाला बघायला मिळेल.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नोबेल पारितोषिक विजेत्यांचे विचार

Nobel laureates views on Dr Ambedkar

गुन्नार मर्डाल

गुन्नार मर्डाल (1898 – 1987) हे एक स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणी होते. 1974 मध्ये, त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गुन्नार मर्डाल यांनी बाबासाहेबांबद्दल म्हटले की, “पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉ. आंबेडकरांच्या स्मृती संपूर्ण जगात चिरकाल जिवंत राहतील.”

“All over the world, the memory of B.R. Ambedkar will live forever as a truly great Indian in the generation which laid down the direction of independent India.”Gunnar Myrdal

 

दलाई लामा

14 वे दलाई लामा (जन्म : 6 जुलै 1935) हे तिबेटी बौद्धधर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि तिबेटचे माजी राज्य प्रमुख आहेत. चीनने तिबेट गिळंकृत केल्यानंतर त्यांनी बुद्धभूमीत – भारतात आश्रय घेतला. त्यांना 1989 मध्ये नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दलाई लामा यांनी बाबासाहेबांचा उल्लेख अनेकदा आपल्या भाषणांमध्ये, आपल्या चर्चांमध्ये केलेला आहे. बौद्ध धर्माचे विश्वविख्यात धर्मगुरू आणि विद्वान परम पावन चौदावे दलाई लामा म्हणतात की,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मासाठी जे योगदान दिले आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ते निघून गेल्यानंतर त्यांचे आदर्श आणि त्यांच्या शिकवणीनुसार जगणे हीच त्यांना सर्वश्रेष्ठ आदरांजली ठरेल.”

दुसऱ्या एका ठिकाणी – औरंगाबादला झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये दलाई लामा म्हणतात की,

“डॉ. आंबेडकर हे एक महानायक आहेत. डॉ. आंबेडकर यांचे भारतीय बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. डॉ. आंबेडकर समतेचा पुरस्कार करणारे व जातीवर आधारित भेदभावाची व्यवस्था नाकारणारे महान नेते होते. जाती व्यवस्था हा भारताला लागलेला मोठा रोग आहे…” Nobel laureates views on Dr Ambedkar

 

नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला (जन्म 1918) हे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी कार्यकर्ते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती (1994 ते 1999) होते. त्यांना 1993 मध्ये नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

12 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसद भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण होत असताना नेल्सन मंडेला यांनी म्हटले होते की,

“आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवू ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.”

 

 डॉ. अमर्त्य सेन

अमर्त्य कुमार सेन (जन्म 1933) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत. 1998 मध्ये, त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. “Dr. Ambedkar is the father of my economics” असे त्यांनी म्हटले आहे.

अमर्त्य सेन यांच्यावर बाबासाहेबांचा मोठा प्रभाव असून ते बाबासाहेबांना आपले गुरु मानतात, आणि कदाचित बाबासाहेबांच्या प्रेरणेतून त्यांनी बौद्ध धर्माचे अनुयायीत्व स्वीकारले आहे. त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख अनेकदा आपल्या भाषणांमध्ये, आणि आपल्या चर्चांमध्ये केलेला आहे.

अमर्त्य सेन म्हणतात की,

“डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे गुरू आहेत. ते दलित व शोषितांचे खरे आणि प्रसिद्ध महानायक आहेत. त्यांना आजपर्यंत जो मान-सन्मान मिळाला आहे, ते त्या पेक्षाही खूप जास्तचे हक्कदार आहेत. भारतात ते अत्यंत वादग्रस्त आहेत. परंतु त्यांच्या जीवन आणि व्यक्तिमत्वात काहीही विवादायोग्य नाही. जे त्यांच्या टीकेमध्ये म्हटले जाते, ते पूर्णपणे वास्तवापलीकडील आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे योगदान फार प्रभावी आहे. त्यासाठी त्यांना सदैव स्मरणात ठेवले जाईल.”

बराक ओबामा

बराक ओबामा (जन्म 1961) हे अमेरिकेचे 44 वे राष्ट्रपती असून त्यांनी 2009 ते 2017 पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. त्यांना 2009 चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 8 नोव्हेंबर 2010 रोजी नवी दिल्लीतील भारतीय संसदेला संबोधित केले.  संसदेतील आपल्या या भाषणात ते म्हणाले की,

“तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला.”

 

कैलाश सत्यार्थी

कैलाश सत्यार्थी (जन्म 1954) हे एक भारतीय समाजसेवक आहेत, ज्यांनी भारतातील बालमजुरीविरुद्ध मोहीम चालवली आणि शिक्षणाच्या सार्वत्रिक हक्काचे समर्थन केले. त्यांना 2014 मध्ये नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. – Nobel laureates views on Dr Ambedkar

2017च्या आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या भाषणामध्ये, डॉ आंबेडकर यांच्या बद्दल कैलास सत्यार्थी म्हणतात की,

“डॉ. आंबेडकर हे एक असे ज्योतिपुंज आहेत, ज्यांचा जन्म महूच्या एका छोट्याशा ठिकाणी झाला आणि आज तो ज्योतिपुंज इतका विशाल झाला आहे की त्याच्या प्रकाशाला बांधले जाऊ शकत नाही – ना कोणत्या जातीच्या नावाने, ना कोणत्या धर्माच्या नावाने, येथपर्यंत की ना कोणत्या राष्ट्राच्या नावाने.”

पुढे कैलास सत्यार्थी म्हणाले की, “बाबासाहेब हे असे महापुरुष होते की ज्यांनी अत्युच्च शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या प्रतिभेने, बुद्धीने, प्रज्ञेने, करुणेने असे स्थान प्राप्त केले, जे समाजातील आवश्यक त्या सुधारणांचे व्यवस्थेत रूपांतर करण्यास सक्षम असेल.”

 

सारांश

नोबेल पुरस्कार विजेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचार (Nobel laureates views on Dr Ambedkar) सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

या लेखात नसलेल्या एखाद्या अन्य नोबेल पुरस्कार विजेत्याने बाबासाहेबांबद्दल मत व्यक्त केलेले तुम्हास माहिती असेल तर तेही तुम्ही आम्हाला कळवू शकता.

याशिवाय तुमच्या काही सूचना असतील तर त्या ही तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ईमेल द्वारे लिहून सांगू शकता. धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *