समतेचा संदेश देण्याबरोबरच नागरी हक्कांसाठी आवाज उठवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे अनेक देशांमध्ये बसवले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांचे पुतळे भारतात प्रचंड संख्येने आढळतात. भारताबाहेर विदेशांत उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांची यादी आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत.

How many countries have Ambedkar statue? भारताबाहेर बाबासाहेबांचे एकूण पुतळे किती आहेत?, ते पुतळे कोणकोणत्या देशांत आहेत?, विदेशांत बाबासाहेबांचे अर्धाकृती पुतळे आणि पूर्णाकृती पुतळे किती आहेत?, ते कोणत्या वर्षी हे पुतळे स्थापन करण्यात आले आहेत?, भारतानंतर इतर कोणत्या देशात बाबासाहेबांचे सर्वात जास्त पुतळे आहेत?, जगातल्या कोणत्या विदेशी विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे स्थानापन्न झाले आहेत… यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. Ambedkar statue in foreign countries
भारतानंतर, जगातील कोणत्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात जास्त पुतळे आणि स्मारके आहेत? हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे – United Kingdom.
जगातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची यादी
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात सर्वात जास्त पुतळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. त्यांच्यानंतर नंबर लागतो तो महात्मा गांधी यांचा. बाबासाहेबांच्या पुतळ्यांची संख्या ही एक लाखापेक्षा अधिक असावी. पहिल्यांदाच या लेखाच्या माध्यमातून आपल्याला जगातील [विदेशांतील] बाबासाहेबांच्या सर्व पुतळ्यांची माहिती बघायला मिळत आहे. How many Ambedkar statue in world
तथागत गौतम बुद्ध, बोधिधर्म आणि महात्मा गांधी यांच्यानंतर विदेशांत सर्वाधिक पुतळे असलेले भारतीय व्यक्ती हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच असावेत.
या लेखामध्ये बाबासाहेबांच्या शिल्पांची (sculptures of Ambedkar) यादी आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांचे पूर्णाकृती पुतळे (statues of Ambedkar) आणि बाबासाहेबांचे अर्धाकृती पुतळे (busts of Ambedkar) अशा दोन्ही प्रकारच्या पुतळ्यांचा समावेश आहे.
दक्षिण अमेरिका हा खंड सोडला तर मानवी वस्ती असलेल्या इतर सर्वच खंडांमध्ये (आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत, हेही विशेष.
अलीकडेच 28 सप्टेंबर 2022 रोजी मॉरीशस या देशामध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. तसेच येत्या आंबेडकर जयंतीला व्हिएतनाम देशामध्ये सुद्धा डॉ. आंबेडकरांचे 10 पुतळे स्थापन करण्यात येणार आहेत. विदेशांत उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती आणि अर्धाकृती पुतळ्यांची माहिती येथे प्रस्तुत करित आहे. List of Ambedkar statues in world
भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे
Which are Dr. Ambedkar’s statues and busts Outside India?
1. कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका

इ.स. 1991 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठात स्थानापन्न करण्यात आला. 1991 हे डॉक्टर बाबासाहेबांचे शंभरावे जयंतीवर्ष होते. मुंबईच्या विनय ब्रह्मेश वाघ यांनी बनविलेल्या या कांस्य मूर्तीला 24 ऑक्टोबर 1991 रोजी कोलंबिया विद्यापीठाच्या दक्षिण आशियाई संस्थेकडे फेडरेशन ऑफ आंबेडकराइट अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन, यूके या संघटनेने सादर केले होते आणि त्यानंतर न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या आंबेडकरवादी लोकांच्या संघटनेने हा पुतळा बसविण्यासाठी संगमरवरी चौथरा विद्यापीठास दान केला.
त्यानंतर 1995 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा लेहमन ग्रंथालयात बसवण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्याचे स्थान हे कोलंबिया विद्यापीठाच्या कॅम्पसमधील अतिशय लोकप्रिय जागांपैकी एक आहे. अनेक लोक विशेषतः भारतीय या पुतळ्याला मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. Ambedkar statue in USA
आपल्याला माहीतच असेल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. त्यांना कोलंबिया विद्यापीठामधून एम.ए., पी.एचडी. आणि एल.एल.डी. ह्या पदव्या प्राप्त झाल्या. विद्यापीठाची स्थापना होऊन 250 वर्षे झाल्याच्या निमित्ताने, 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या अडीचशे वर्षांतल्या जगातील सर्वात बुद्धिमान आणि सर्वश्रेष्ठ अशा शंभर विद्यार्थ्यांची यादी तयार केली होती आणि त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असल्याचे सर्वश्रुत आहेतच मात्र कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांचा “आधुनिक भारताचे निर्माते” म्हणून गौरव केला. संदर्भ
2. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन, UK

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSC) मध्ये सुद्धा बसवण्यात आला आहे. युनायटेड किंगडम (UK) मधील ह्या शैक्षणिक संस्थेत बाबासाहेब शिकले होते, आणि येथूनच त्यांनी MSc आणि DSc पदव्या मिळवल्या.
1994 मध्ये अनावरण केलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा सध्या LSE च्या जुन्या इमारतीच्या ॲट्रिअम गॅलरीत ठेवण्यात करण्यात आला आहे. Ambedkar statue in London
हा कांस्य धातूचा पुतळा प्रसिद्ध भारतीय शिल्पकार ब्रह्मेश व्ही. वाघ यांनी तयार केला होता. 14 एप्रिल 1994 रोजी एलएसईचे संचालक जॉन अॅशवर्थ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेली ही बाबासाहेबांची मूर्ती यूकेच्या फेडरेशन ऑफ आंबेडकर आणि बुद्धीस्ट ऑर्गनायझेशन्स कडून LSE ला भेट म्हणून देण्यात आली होती.
3. वोल्व्हरहॅम्प्टन बुद्ध विहार, UK

युनायटेड किंग्डम मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा २००२ साली ग्रेट ब्रिटनच्या डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटी सेंटरने वोल्व्हरहॅम्प्टन (Wolverhampton) मधील बुद्ध विहाराच्या परिसरात स्थापित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ अप्पर झार स्ट्रीटमधील बुद्ध विहार कम्युनिटी सेंटरला त्यांचे नाव देण्यात आले आहे. Ambedkar statue in the United Kingdom
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण १४ ऑक्टोबर २००० रोजी वल्व्हरहॅम्प्टनच्या महापौरांनी केले होते. प्रामुख्याने बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या डाव्या बगलेत “भारतीय संविधान” हा ग्रंथ दाखवलेला आपल्याला दिसतो, परंतु या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उजव्या हातात “The Buddha and His Dhamma” या ग्रंथाची प्रत आहे, आणि त्यांना बौद्ध धम्माची शिकवण देताना दर्शविण्यात आले आहे. हा पुतळा काढला जाणार आहे, आणि त्याऐवजी दुसरा नवीन बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
4. सायमन फ्रेझर युनिवर्सिटी, बर्नाबी, कॅनडा

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युनायटेड किंग्डम यांनंतर 2004 मध्ये कॅनडा देशातल्या बर्नाबी शहरातील सायमन फ्रेझर विद्यापीठाने (SFU) बाबासाहेबांचा पुतळा स्थापन केला. Ambedkar statue in Canada
या सायमन फ्रेझर विद्यापीठाने इन्स्टिट्यूट फॉर ह्युमॅनिटीजच्या माध्यमातून, WAC बेनेट लायब्ररीच्या तिसऱ्या मजल्यावरील विश्रामगृह परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून विद्यापीठ आणि ग्रंथालयाला सन्मानित करण्यात आले आहे. बाबासाहेबांचा अशा प्रकारे सन्मानित करण्यासाठी सायमन फ्रेझर विद्यापीठ (SFU) हे कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या रांगेमध्ये सामील झाले.
SFU मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर तीन फलक आहेत. समोरच्या बाजूला असलेल्या फलकावर बाबासाहेबांचा परिचय लिहिलेला आहे – “डॉ. बी.आर. आंबेडकर (1891-1956) “भारतीय राज्यघटनेचे जनक”; भारतरत्न (1990) (भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान); सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढणारा निर्भय योद्धा.”
इतर दोन फलक पुतळ्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत आणि त्या दोन्हींमध्ये डॉ. आंबेडकरांचे विचार लिहिलेले आहेत. एकावर लिहिले आहे की, “मी कुठल्याही समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करतो,” तर दुसऱ्या बाजूला “शिक्षण ही गोष्ट प्रत्येकाच्या आवाक्यात आणली पाहिजे.”
5. कोयासन युनिवर्सिटी, जपान

जपानच्या वाकायामा प्रांतात असलेल्या कोयासन विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 सप्टेंबर 2015 रोजी करण्यात आले. यावेळी कोयासन विद्यापीठ आपल्या स्थापनेचे 1200 वे वर्ष साजरे करीत होते तर भारतासह जगभरात बाबासाहेबांचे 125 वे जयंती वर्ष साजरे होत होते. Ambedkar statue in Japan
बाबासाहेबांचा हा पुतळा पंचधातूचा असून त्याला साधारणपणे 22.25 लाख रुपये खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची साडेदहा फूट असून मुख्य पुतळा साडेसहा फूट, तर त्याचा चौथरा चार फूट उंचीचा आहे. डिसेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीत शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हा पुतळा साकारला होता.
पर्यटनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा एक भाग म्हणून, जपानमधील वाकायामा राज्याबरोबर महाराष्ट्र सरकारचा ऑक्टोबर 2013 मध्ये सामंजस्य करार झाला होता. वर्ल्ड हेरिटेज साइटमध्येही ‘कोयासान’चा समावेश होतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) ‘कोयासान’वर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या स्थानावर प्रथमच एखाद्या परदेशी राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला गेला आहे.
(टीप : मी जपान मधील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर मराठी, हिंदी, इंग्लिश आणि जपानी विकिपीडियावर लेख बनवलेले आहेत.)
6. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, लंडन, UK

लंडन येथील डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे आहेत – स्मारकाच्या बाहेरील बाजूस डॉ. आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे, तर स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा मुख्य अर्धाकृती पुतळा आहे. Ambedkar statue in London
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 14 एप्रिल 2015 रोजी करण्यात आले आहे. हा पुतळा 20 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला येथे स्थानापन्न केले गेले नव्हते. या पुतळ्याच्या स्थापनेच्या 7 महिन्यांनंतर स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले होते.
7. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, लंडन, UK

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक किंवा डॉ. आंबेडकर हाऊस हे युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील 10 किंग हेनरी मार्गावर असलेले बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. या स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2015 रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 35 कोटी रूपयांना खरेदी केली होती.
या स्मारकास “डॉ. आंबेडकर हाऊस लंडन”, “डॉ. आंबेडकर मेमोरियल” या नावाने ओळखले जात असले तरी याचे अधिकृत नाव “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मेमोरियल” अर्थात “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक” असे होय.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेबांनी इ.स. 1921-22 दरम्यान या इमारतीत वास्तव्य केले होते. या वास्तुच्या भिंतीवर “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956), सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार, ज्यांनी 1921-22 मध्ये येथे वास्तव्य केले” अशी अक्षरे कोरलेली आहेत. संदर्भ
डॉ. आंबेडकरांच्या या स्मारकात त्यांच्याशी संबंधीत अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तू आहेत. अनेक विख्यात आणि प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्व या स्मारकास भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रमुख प्रेरणास्थान आहेत मात्र, हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे.
8. यॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा

कॅनडा देशातल्या टोरंटो शहरातल्या यॉर्क विद्यापीठ (York University) मध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त विष्णू प्रकाश यांनी 2 डिसेंबर 2015 रोजी टोरंटो येथील यॉर्क विद्यापीठात भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. Ambedkar statue in Canada
त्यांनी डॉ. आंबेडकर हे भारताचे महान सुपुत्र आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला. त्यांनी यॉर्क युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याद्वारे कॅनडातील लोकांना ही प्रतिमा समर्पित केली. List of Ambedkar statue in world
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) चे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी यावेळी प्रमुख भाषण केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांची डॉ. नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्याशी तुलना करून त्यांना 21 व्या शतकातील महान भारतीयांपैकी एक म्हणून संबोधले. संदर्भ
9. संयुक्त राष्ट्रसंघ (UN), अमेरिका

2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125 जयंती वर्ष युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्रसंघात साजरी करण्यात आले. त्या अनुषंगाने तेथे 14 एप्रिल 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा स्थापन करण्यात आला होता.
10. डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी

मध्य युरोपातील हंगेरी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा स्थापन करण्यात आला आहे. युरोपचे हृदय म्हणून ओळखले जाणार्या हंगेरी देशामधील जिप्सी लोक बाबासाहेबांपासून खूप जास्त प्रभावित झाले आहेत. Dr. B.R. Ambedkar Statue at the School of Sajokaza, Hungary!
हंगेरी देशातल्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाने हंगेरी देशामध्ये तीन माध्यमिक विद्यालये सुद्धा स्थापन केलेली आहेत. 14 एप्रिल 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष जगभरात साजरे होत असताना हंगेरीतील डॉ. आंबेडकर हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्यात आला. Ambedkar statue in Hungary
11. युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन सिडनी’ नावाच्या विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या भीम पुतळ्याचे अनावरण 14 जुलै 2016 रोजी करण्यात आले होते. (Dr Ambedkar statue in University Western Sydney) संदर्भ
वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने स्कूल ऑफ लॉच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी भारतीय सामाजिक हक्क वकील आणि राजकारणी भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सने देणगी दिलेला डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा विद्यापीठाच्या पॅरामट्टा कॅम्पसमधील स्कूल ऑफ लॉच्या मूट कोर्टमध्ये बसवण्यात आला आहे. Ambedkar statue in Australia
शिल्पकार गौतम पाल यांनी बनवलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेचे अनावरण एका विशेष समारंभात श्री नवदीप सुरी (भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त), भारतीय महावाणिज्यदूत बी वनलालवावना, ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायातील मान्यवर, वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्कूल ऑफ लॉ कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्कूल ऑफ लॉचे डीन, प्रोफेसर Michael Adams म्हणतात की, हे काम निःसंशयपणे वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या कायदेतज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देईल. “या वर्षी, स्कूल ऑफ लॉने अनेक भारतीय विद्यापीठांना अधिकृतपणे भेट दिली आणि अधिक दृढ संबंध निर्माण करण्याची आशा आहे. डॉ. आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याची उदार भेट आमच्या समुदायांमधील जवळचे संबंध प्रतिबिंबित करते,” प्रोफेसर Michael Adams म्हणतात. संदर्भ
12. ब्रँडीस विद्यापीठ, बोस्टन, अमेरिका

अमेरिकेमधील बोस्टन शहरात स्थित ब्रँडीस युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. 29 एप्रिल 2017 रोजी, या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण ब्रँडीस युनिव्हर्सिटीच्या प्रोव्हस्ट लीसा लिंच (Lisa Lynch) यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा युनिव्हर्सिटी मधील गोल्डफार्ब मुख्य लायब्ररीत स्थानापन्न आहे.
हा अमेरिकेतील डॉ. आंबेडकरांचा दुसरा पुतळा आहे, या आधी कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या पुतळा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा नागपुरच्या प्रज्ञा दर्शन यांच्याद्वारे बनविण्यात आला होता. Ambedkar statue in America
युनायटेड स्टेट्सच्या दलित भारतीय समुदायाने 29 एप्रिल रोजी ब्रँडीस विद्यापीठाला भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ बीआर आंबेडकर यांचा कांस्य प्रतिमा दान केली.
भारतीय संविधान आणि जातीय भेदभाव या तीन दिवसीय परिषदेचा भाग म्हणून ब्रँडीसच्या मुख्य लायब्ररीमध्ये झालेल्या प्रतिमा अनावरणासाठी न्यू इंग्लंडमधील अनेक दलित कुटुंबांसह 125 हून अधिक लोक उपस्थित होते. संदर्भ
GDS संचालक लॉरेन्स सायमन म्हणाले, “कोलंबिया विद्यापीठानंतर ब्रँडीस हे युनायटेड स्टेट्समधील एकमेव विद्यापीठ आहे, ज्याला या महान न्यायशास्त्रज्ञ आणि मानवाधिकार नेत्याच्या प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.” दलितांसाठी सामाजिक न्यायाचे कारण पुढे नेण्यात ऐतिहासिक योगदान म्हणून वर्णन केलेल्या ब्रँडीस विद्यापीठ आणि ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबिलिटी सेंटरचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
पुतळा उभारल्यानंतर लीसा लिंच म्हणाल्या की, “As an alumnus of London School of Economics (LSE), I am particularly pleased to see that we too will have bust of Dr. Ambedkar like LSE (London School of Economics) has. Impact of the legacy of Dr Ambedkar on the entire world and particularly his focus on education after coming out of oppression is a source of inspiration. This bust at Brandeis will not only inspire those who know about him but will inspire those who do not know about him to help them learn more and be inspired.” संदर्भ
13. मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया

30/31 मार्च 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात आला. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM) तर्फे डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्यादरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. Ambedkar statue in Australia संदर्भ
14. युनिवर्सिटी ऑफ मॅसच्युसेट्स एमहर्स्ट, अमेरिका

युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स, अॅमहर्स्ट, अमेरिका – 5 मे, 2018 रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 40 पौंड वजनाचा पितळ धातूचा अर्धपुतळा अमेरिकेच्या अॅमहर्स्ट शहरातील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात स्थापन करण्यात आला. Ambedkar statue in America
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपकुलगुरू स्टीव्ह गुडविन यांनी आफ्रिकन-अमेरिकन विद्वान आणि नेते डॉ. डब्ल्यू.ई.बी. ड्यू बोईस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधांवर प्रकाश टिकला. ड्यू बोईस आणि बाबासाहेब या दोघांनी जीवनात एकसारखे अनुभव अनुभवले होते आणि त्यांनी नागरी हक्कांच्या चळवळीत समांतर मार्गाचा प्रवास केला. Ambedkar statue in other countries
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा विद्यापीठात असल्याने त्यांना ‘ग्लोबल ह्युमन’ (वैश्विक व्यक्ती) म्हणून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तसेच या दोन महान माणसांचे जीवन आणि त्यांच्या वारस्याचा एकत्रितपणे शोध घेण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, “डॉ. बी.आर. आंबेडकर हे लोकशाहीचे प्रेरणादायक स्मरणपत्र म्हणून उभे आहेत आणि सर्वांसाठी समान हक्क आणि शिक्षण या मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांचे कार्य, वारसा आणि धडे आजच्या काळात फारच प्रासंगिक आहेत. ” संदर्भ
15. दक्षिण आफ्रिका

2019 च्या बातमीनुसार, दक्षिण आफ्रिकेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यांची निर्मिती होत आहे. हे पुतळे दक्षिण आफ्रिकेमध्येच काही निवडक ठिकाणी स्थापन केले जातील. BR Ambedkar statue in World संदर्भ
16. इंडियन हायकमिशन हाऊस, UK

इंडियन हायकमिशन (Indian High commission), इंडिया हाऊस (India house), लंडन, युनायटेड किंग्डम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे. अनेक मान्यवर लोक या पुतळ्याला भेटी देतात. हा पुतळा इंडियन हाय कमिशन, इंडिया हाऊस मधील डॉ. आंबेडकर हॉलमध्ये स्थित आहे. संदर्भ
17. भारताचे दूतावास, बाकू, अझरबैजान

अझरबैजान या मुस्लिम बहुल देशात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अर्धाकृती पुतळा आहे. अझरबैजानची राजधानी असलेल्या बाकू या शहरामध्ये भारताचा दूतावास आहे, आणि या दूतावासासमोर बाबासाहेबांचा पुतळा लावण्यात आला आहे. संदर्भ
18. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, मोका, मॉरिशस

मॉरिशस या देशामध्ये बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात आला. 28 सप्टेंबर 2022 रोजी या पुतळ्याचे अनावरण मॉरिशस देशाचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रुपम यांच्या हस्ते करण्यात आले. मोका शहरातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, पुणे तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा (Ambedkar Statue in Mauritius) मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनला प्रदान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे मोका मॉरिशस मधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केला होता.
19. थायलंड
20. व्हिएतनाम
लवकरच बाबासाहेबांचे 10 पुतळे व्हिएतनाम या देशामध्ये सुद्धा उभारण्यात येणार आहेत. 14 एप्रिल 2023 रोजी या पुतळ्यांचे अनावरण केले जाईल. बाबासाहेबांचे हे पुतळे 15 फूट उंचीचे पूर्णाकृती पुतळे असेल. Ambedkar statue in Vietnam
व्हिएतनामचे सर्वात मोठे शहर ‘हो ची मिन्ह सिटी’ मधील एका विद्यापीठाच्या परिसरात सुद्धा बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याला ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे नाव देण्यात आले आहे. व्हिएतनामी बौद्ध विचारवंत भदंत थिच नाथ हन यांनी आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचे 10 पुतळे उभारण्याचा संकल्प केला आहे. यासाठी प्रसिद्ध बौद्ध धर्मीय भारतीय अभिनेते गगन मलीक यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
बाबासाहेबांबाबत विदेशी लोकांमध्ये आकर्षण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आता देशापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते जगभरात पोहोचले असून त्यांच्याबाबत विदेशी लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. त्यामुळेच जगभरात बाबासाहेबांचे पुतळे उभे राहत आहेत. परंतु आता थेट महामानवाच्या पवित्र अस्थीचेच दर्शन विदेशी नागरिकांना होणार आहे. थायलंडने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे, हे विशेष. थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे.
सर्व लोकशाहीवादी राष्ट्रांत व बौद्ध बहुल राष्ट्रांत बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यासाठी काही संघटना कार्यरत आहेत. भारताबाहेर बाबासाहेबांच्या नावे अनेक विद्यापीठांमध्ये अध्यासने स्थापन झाली तसेच काही विद्यापीठांमध्ये अर्धपुतळे बसवले. संदर्भ
सारांश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची माहिती सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. या लेखामध्ये भारताबाहेरील अर्थात विदेशांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपास सर्व पुतळ्यांची माहिती देण्यात आली आहे.
टीप: तथापि या यादीमध्ये एखादा पुतळा समाविष्ट करायचा राहिला असेल तर त्याबद्दल तुम्ही उचित संदर्भासह कॉमेंट बॉक्समध्ये लिहून किंवा ई-मेल द्वारे सुद्धा मला कळवू शकता.
हे ही वाचलंत का?
- डॉ. आंबेडकरांवर प्रभाव टाकणाऱ्या थोर व्यक्ती
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
Dr BR Ambedkar is world knowledge of men and very good information in this webside … thanks