फेब्रुवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in February) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण ऑगस्ट ते जानेवारी महिन्यातील जीवनपट लेख बनवलेले आहेत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in February
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in February

Timeline of Dr BR Ambedkar in February

वेगवेगळ्या वर्षांतील फेब्रुवारी महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. जानेवारी महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in February – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

 

फेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो — हिंदू कोड बिल लोकसभेत मांडणे, येरवड्यात गांधी – आंबेडकर भेट, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा, ‘व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स’ ग्रंथ लिखाणाची सुरुवात, मुंबई विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपत, ‘हरिजन’ शब्दाला विरोध करण्यासाठी निवेदन, भारतीय राज्यघटनेचा कच्चा मसुदा संविधान सभेद्वारे प्रकाशित… इत्यादी.

 

फेब्रुवारीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 फेब्रुवारी

  • 1928 : सायमन कमिशन विरोधी भारतीयांची प्रचंड निदर्शने झाली.
  • 1932 : दिल्ली लोथियन कमिटीची पहिली बैठक झाली.
  • 1939 : सुरबा नाना टिपणीस (महाड) यांचे विरुद्ध खटला भरला.
  • 1956 : “पीपल्स एज्युकेशन सोसायटी”च्या लेटरहेड वरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.बी. चिटणीस यांना दिल्लीवरून दिनांक 1 फेब्रुवारी 1956 रोजी एक पत्र लिहिले होते. त्यात बाबासाहेब चिटणीस यांना सांगतात की मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली आहे त्यामध्ये खूप दुर्मिळ पुस्तकांचा संच आहे आणि तो संच आपण आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररी करिता विकत घ्यावा.

 

2 फेब्रुवारी

  • जागतिक पाणथळ प्रदेश दिन
  • मुकुंदराव आंबेडकर स्मृतिदिन
  • सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन
  • 1921 : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना डॉ. भीमराव आंबेडकरांनी इंग्लंडहून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ब्राह्मणेतर चळवळीविषयी पत्र लिहिले.

 

3 फेब्रुवारी

  • उमाजी नाईक स्मृतिदिन
  • 1928 : सायमन कमिशन पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली. डॉ. आंबेडकरांनी सायमन कमिशनसमोर अस्पृश्यांची बाजू मांडली आणि कमिशनला अस्पृश्यांच्या समस्या सांगितल्या. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने त्यांनी लेखी निवेदन दिले. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी आरक्षणाची मागणी केली परंतु स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नाही.

 

4 फेब्रुवारी

  • जागतिक कर्करोग दिन
  • आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिन
  • 1933 : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येरवडा जेल, पुणे येथे भेट झाली. म. गांधींची तार मिळाल्यावर डॉ.आंबेडकर येरवडा तुरुंगात त्यांना भेटायला गेले. या चर्चेवेळी डॉ. स्टॅनले जोन्स सुद्धा उपस्थित होते. केवळ मंदिर प्रवेशावर दलित वर्ग समाधानी नसल्याचे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले. नैतिक सामाजिक उन्नती, आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. संपूर्ण जातिव्यवस्थेचे निर्मूलन आवश्यक आहे. गांधींनी डॉ. आंबेडकरांकडे तेवढे लक्ष दिले नाही. गांधी म्हणाले, “अस्पृश्यता हे पाप आहे. जातिव्यवस्था हे केवळ सामाजिक विघटन आहे.” ‘हरिजन’मध्ये प्रकाशित झालेल्या गांधींच्या विचारांना उत्तर देताना डॉ. आबेडकर म्हणाले, जोपर्यंत जातींचे अस्तित्व आहे, तोपर्यंत अस्पृश्यता राहील. अस्पृश्यांचा उद्धार जातीच्या उच्चाटनाशिवाय शक्य नाही. अशा प्रकारे डॉ. आंबेडकरांनी फेब्रुवारी 1932 मध्ये जातींच्या उच्चाटनाचे [Annihilation of Castes] ध्येय ठेवले होते.
  • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जनता’ साप्ताहिकाचे ‘प्रबुद्ध भारत’ असे नामांतर झाले. डॉ. आंबेडकरांनी 24 फेब्रुवारी 1930 रोजी ‘जनता’ साप्ताहिक सुरू केले होते.
  • 1956 : ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’ची मालकी ‘द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’कडे सुपूर्द करण्यात आली.

 

5 फेब्रुवारी

  • 1951 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू आचारसंहिता बिल लोकसभेत मांडले. बाबासाहेबांनी 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले होते.
  • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाबोधी सोसायटीच्या सभेत दिल्ली येथे भाषण झाले.

 

 

6 फेब्रुवारी 

  • महिला जननेंद्रियाच्या विकृतीसाठी शून्य सहिष्णुता दिन
  • महाराजा सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन 

 

7 फेब्रुवारी

  • 1939 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने पाच जागा जिंकल्या.

 

8 फेब्रुवारी

  • 1923 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महारांच्या बलुत्यासंबंधी मुंबईत जाहीर भाषण झाले.
  • 1934 : मनमाड येथे बाबासाहेबांची जाहीर सभा झाली.

 

9 फेब्रुवारी

  • 1928 : बाबासाहेबांनी सरकारी लॉ कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केला.

 

10 फेब्रुवारी

  • राष्ट्रीय जंतनाशक दिन
  • जागतिक कडधान्य दिन
  • 1933 : एडवोकेट सर रुस्तम यांनी अल्पसंख्यांकांना प्रतिनिधीत्व असलेले व्हिलेज बेंच निर्माण करण्याची तरतूद केली.
  • 1938 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा झाला.

 

 

11 फेब्रुवारी

  • जागतिक युनानी दिन
  • विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन
  • 1936 : अहमदनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1939 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांना ‘जनता’च्या लेखात आदरांजली वाहिली (मृत्यू 6-2-1939). सामाजिक सुधारणांचे नेते, अस्पृश्यांचे तारणहार आणि राज्यांचे द्रष्टे असे बाबासाहेबांनी त्यांचे वर्णन होते.
  • 1946 : दिल्लीत लोकसभेच्या शिक्षण मंडळाचे चर्चासत्र झाले.
  • 1949 : संविधान सभेमध्ये वेठबिगार यावर बाबासाहेबांचे भाषण झाले. Ambedkar in February

 

12 फेब्रुवारी

  • राष्ट्रीय उत्पादकता दिन
  • डार्विन दिन
  • 1933 : मंदिर प्रवेश विधेयकासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवेदन प्रसिद्ध झाले. डॉ. आंबेडकरांनी मुंबई विधानपरिषदेत “ग्रामपंचायत विधेयका’वर आपले मत मांडले. “मंदिर प्रवेश विधेयक’ या विषयावरही त्यांनी अतिशय महत्त्वाचे विचार मांडले. जर हिंदू धर्माला सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर मंदिर प्रवेश विधेयकामधील सुधारणा पुरेशी ठरणार नाही. जर काही करणे आवश्यक असेल तर चातुर्वर्ण्य सिद्धांत नष्ट करणे आवश्यक आहे. हे असमानतेचे मुख्य मूळ आहे आणि जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेची जननी देखील आहे. असे होईपर्यंत दलित वर्ग मंदिर प्रवेश विधेयक नाकारेलच आणि हिंदू आस्था सुद्धा नाकारेल. मंदिर प्रवेश स्वीकारणे आणि त्याला समाधान मानने म्हणजे वाईटाशी तडजोड करणे होय. हे मानवी व्यक्तिमत्त्वाच्या पावित्र्याला अपमानित करणारे असेल.
  • 1938 : मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिषदेत बाबासाहेबांचे भाषण झाले.

 

13 फेब्रुवारी

  • राष्ट्रीय महिला दिन
  • जागतिक रेडिओ दिन
  • 1931 : पहिल्या गोलमेज परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून फ्रान्समार्गे परत निघाले.
  • 1942 : बाबासाहेबांनी आपल्या ‘व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स’ या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ केला.

 

14 फेब्रुवारी

  • 1922 : अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली.
  • 1929 : बहिष्कृत सेवा संघाचे वर्धा येथे वसतीगृह स्थापन झाले.

 

Timeline of Dr Ambedkar in February

15 फेब्रुवारी

  • आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 
  • 1949 : मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
  • 1953 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंडो-जपान मंडळातर्फे नवी दिल्ली येथे भाषण झाले.

 

16 फेब्रुवारी

  • 1922 : तिसरी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे झाली.
  • 1933 : राजनंदगाव येथील विहिरीस ‘डॉ. आंबेडकरांची विहीर’ असे नाव देण्याचा कार्यक्रम झाला.

 

 

17 फेब्रुवारी

  • 1929 : मद्रास इलाख्यान स्वाभिमान संघाची पहिली परिषद झाली. परिषदेमध्ये पेरियार रामस्वामी नायकर उपस्थित होते.
  • 1937 : मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले. भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 175 जागांवर निवडणुका झाल्या. 15 राखीव पैकी स्वतंत्र मजूर पक्षाने मुंबई विधानसभेत 11 राखीव जागा आणि 3 सर्वसाधारण जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे सीपी आणि बेरारमधून 4 राखीव जागा जिंकल्या. यापैकी प्रमुख डॉ. बी.आर. आंबेडकर, बी.के. गायकवाड, आर.आर. भोळे, डी.जी. जाधव, बी.एच. वराळे, ए. जे. सुब्बाना, विनायक चित्रे, आत्माराम गडकरी, रघुराम घाटगे, रेवप्प सोनपा काळे, श्यामराव परुळेकर, ए.जी. भटनाकर, के.एस. सावंत, जे. एस. आमदाळे, पी.जे. रोहम होते. बाबू हरदास एल. एन., राघोबाजी घोडीचोर, देवाजी भीमाजी खोब्रागडे, डी.के. पाटील इ. जिंकले. त्यानंतर 3 अपक्ष उमेदवारांनी (सीताराम पाटील, जांभूळकर) स्वतंत्र मजूर पक्षामध्ये प्रवेश केल्याने एकूण सदस्य संख्या 21 झाली.

 

18 फेब्रुवारी

  • 1927 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई विधिमंडळात शपथविधी झाला.
  • 1932 : ठाणे जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अध्यक्षपदावरून कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले.

 

19 फेब्रुवारी

  • मृदा आरोग्य कार्ड दिन
  • जागतिक पँगोलिन दिन
  • छ. शिवाजी महाराज जयंती
  • 1933 : जागृती निर्माण करण्यासाठी नागपुरातील सर्व महलयातील दलित फेडरेशनच्या जाहीर सभा झाल्या.

 

20 फेब्रुवारी

  • जागतिक सामाजिक न्याय दिन
  • 1929 : वर्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा बहिष्कृत संघातर्फे संपन्न झाली.
  • 1946 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेण्यासाठी अमेरिका व इंग्लंडहून पत्रकार आले.

 

21 फेब्रुवारी

  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
  • 1939 : मुंबई असेंबली मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंदाजपत्रकावर परखड भाषण झाले.
  • 1947 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनरल कोर्ट मार्शल, देवलाली येथे बिहारच्या 38 दलित सैनिकांचा खटला लढवला.
  • 1948 : संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सदस्यांकडून घटनेचा मसुदा संविधान सभेला सादर करण्यात आला. 30 ऑगस्ट 1947 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या 145 दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे 18 भाग होते, आणि त्यात 315 कलमे व 9 परिशिष्टे होती. 21 फेब्रुवारी 1948 पासून जवळपास 8 महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली.

 

22 फेब्रुवारी

  • जागतिक चिंतन दिन (World Thinking Day)
  • 1941 : कसबा, तळवड (उस्मानाबाद) येथे पहिली महार-मांग वतनदार परिषद संपन्न झाली.

 

23 फेब्रुवारी

  • संत गाडगेबाबा जयंती
  • 1924 : मोहपा येथे मध्य प्रांत वऱ्हाड महार परिषदेचे अधिवेशन झाले.
  • 1941 : महार-मांग-वतनदार परिषदेमध्ये लडवळे (ढोकी) येथे बाबासाहेबांचे भाषण झाले.

 

24 फेब्रुवारी

  • केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
  • 1927 : नवीन विधिमंडळात डॉ. आंबेडकरांचे अर्थसंकल्पावर भाषण झाले.
  • 1930 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जनता’ साप्ताहिक सुरू केले. ‘जनता’चे पुढे 4 फेब्रुवारी 1956 रोजी ‘प्रबुद्ध भारत’ असे नामकरण करण्यात आले.
  • 1956 : ‘बौद्ध पूजापाठ’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रसिद्ध केले.

 

25 फेब्रुवारी

  • 1921 : जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकरांनी तिथल्या प्रशासनास अस्खलित जर्मन भाषेत पत्र लिहिले. डॉ. आंबेडकर हे बहुभाषी होते. त्यांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक भाषा अवगत होत्या.
  • 1935 : गांधींनी अस्पृश्यांसाठी वापरलेल्या ‘हरिजन’ शब्दाला विरोध करण्यासाठी मध्य प्रांत सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन केले. Ambedkar in February

 

26 फेब्रुवारी

  • 1934 : अकोट फैल, अकोला येथे डॉ. आंबेडकर दलित तरुण संघ स्थापन करण्यात आला.
  • 1948 : भारतीय राज्यघटनेचा कच्चा मसुदा संविधान सभेने प्रकाशित केला.

 

27 फेब्रुवारी

  • राष्ट्रीय प्रथिन दिन
  • जागतिक स्वयंसेवी संस्था दिन
  • 1931 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिल्या गोलमेज परिषदेतून मुंबईला आगमन झाले.
  • 1947 : देवळाली लष्करी न्यायालयापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

28 फेब्रुवारी

  • राष्ट्रीय विज्ञान दिन
  • दुर्मिळ आजार दिन
  • 1932 : मद्रास येथे अस्पृश्य, ख्रिश्चन, मुसलमान, ब्राह्मणेतरांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्यात आले.

 

29 फेब्रुवारी

 

फेब्रुवारीमध्ये घडलेल्या अन्य घटना 

  • 1916 : विद्यार्थी डॉ. भीमराव आंबेडकरांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासक्रम केवळ 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे 1916 मध्ये ते लंडनला गेले.
  • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 पुस्तके लिहून पूर्ण केली. (1) भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म, (2) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, आणि (3) ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’. त्यांचे बौद्ध धर्माविषयीचे विचार समजून घेण्यासाठी या तीन पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे असा बाबासाहेबांचा विचार होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in February) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

4 thoughts on “फेब्रुवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

  1. खूप महत्त्वपूर्ण माहिती कौतुकास पात्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *