डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संपूर्ण पुस्तकांची यादी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अत्यंत प्रभावी लेखक होते त्यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे जाणून घेणार आहोत.

 यह लेख हिंदी में पढ़ें 

List of books written by Dr. Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे (फोटो: Jaysalian)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके

ग्रंथ-पुस्तके आणि प्रबंध

  1. Administration and Finance of the East India Company
  2. The Evolution of Provincial Finance in British India
  3. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
  4. Annihilation of Caste
  5. Which Way to Emancipation?
  6. Federation versus Freedom
  7. Pakistan or the Partition of India
  8. Rande, Gandhi and Jinaah
  9. Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables
  10. What Congress and Gandhi Have Done to the Untouchables
  11. Communal Deadlock and a Way to Solve It
  12. Who Were the Shudras?
  13. A Critique of The Proposals of Cabinet Mission for Indian Constitutional changes in so far as they affect the Scheduled Castes (Untouchable)
  14. The Cabinet Mission and the Untouchables
  15. States and Minorities
  16. Maharashtra as a Linguistic Province
  17. The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
  18. Thoughts on Linguistic States: A Critique of the Report of the States Reorganization Commission
  19. The Buddha and His Dhamma
  20. Riddles in Hinduism
  21. Dictionary of the Pali Language (Pali-English)
  22. The Pali Grammar
  23. Waiting for a Visa
  24. A People at Bay
  25. Untouchables or the Children of India’s Ghetto
  26. Can I be a Hindu?
  27. What the Brahmins Have Done to the Hindus
  28. Essays of Bhagwat Gita
  29. India and Communism
  30. Revolution and Counter-revolution in Ancient India
  31. Buddha and Karl Marx
  32. Constitution and Constitutionalism

 

टाचणे, पुरावे आणि निवेदने

  1. On Franchise and Framing Constituencies
  2. Statement of Evidence to the Royal Commission of Indian Currency
  3. Protection of the Interests of the Depressed Classes
  4. State of Education of the Depressed Classes in the Bombay Presidency
  5. Constitution of the Government of Bombay Presidency
  6. A Scheme of Political Safeguards for the protection of the Depressed Classes in the Future Constitution of a Self- governing India
  7. The Claims of the Depressed Classes for Special Representation
  8. Franchise and Tests of Untouchability
  9. The Cripps Proposals on Constitutional Advancement
  10. Grievances of the Scheduled Castes

 

शोधपत्रे, लेख, पुस्तकांची पुनरावलोकने

  1. Castes in India: Their Genesis, Mechanism and Development
  2. Mr. Russel and the Reconstruction of Society
  3. Small Holdings in India and Their Remedies
  4. Currency and Exchanges
  5. The Present Problem of Indian Currency
  6. Report of Taxation Enquiry Committee
  7. Thoughts on the Reform of Legal Education in the Bombay Presidency
  8. The Rise and Fall of Hindu Women
  9. Need for Checks and Balances
  10. Buddha Pooja Path (Marathi)

 

प्रस्ताविक आणि अग्रलेख

  1. Forward to Untouchable Workers of Bombay City
  2. Forward to Commodity Exchange
  3. Preface to the Essence of Buddhism
  4. Forward to Social Insurance and India
  5. Preface to Rashtra Raksha ke Vaidik Sadhan

येथे नमूद करणे महत्वाचे आहे की बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालय ‘राजगृह’मध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती आणि ते जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुमारे 64 विषयांमध्ये मास्टर होते.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले.

महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण 22 खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण 42 खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर मी मराठी विकिपीडियावर देखील एक लेख लिहिला आहे‌, ज्यामध्ये बाबासाहेबांच्या लेखन साहित्याची विस्तृत माहिती दिली आहे. (विकिपीडिया लेखाची लिंक)


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *