भारताव्यतिरिक्त ‘या’ देशांत आहेत डॉ. आंबेडकर रोड

नुकतेच 25 जून 2023 मध्ये अमेरिकेमधील एका रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. भारताबाहेर कोण-कोणत्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव रस्त्यांना देण्यात आले आहे याविषयी आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. – विदेशांतील आंबेडकर रोड

 यह लेख हिंदी में पढ़ें 

Ambedkar roads in the World
अमेरिका, जमैका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये आहेत ‘डॉ. बी.आर. आंबेडकर रोड’

भारतातील असंख्य रस्त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. भारताबाहेर सुद्धा  बाबासाहेबांचे नाव 4 रस्त्यांना देण्यात आले आहे. आजच्या लेखामध्ये आपण भारताव्यतिरिक्त कोणत्या देशांमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर रोड आहेत हे जाणून घेऊयात.

भारताबाहेरील डॉ. बी.आर. आंबेडकर रोड

1. न्यू जर्सी सिटी, अमेरिका

2014 च्या आधीपासून अमेरिकेतील न्यू जर्सी सिटी या शहरामध्ये ‘Dr BR Ambedkar Avenue’ आहे. हा भारताबाहेरील पहिला असा रस्ता आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आहे. [फोटो]

 

2. ऑकलंड, न्यूझीलंड

ऑगस्ट 2018 मध्ये न्यूझीलंड देशातील ऑकलंड (Auckland ) शहरामध्ये एका रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. Ambedkar Way नावाच्या या रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार 29 पुकेकोहे ईस्ट रोड जवळ आहे.

 

3. किंगस्टोन, जमैका

अमेरिका व न्यूझीलंड नंतर तिसरा Dr BR Ambedkar Avenue हा जमैका देशामध्ये आहे. 16 मे 2022 रोजी, जमैका मधील किंगस्टोन शहरातील एका रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. महत्त्वाची गोष्ट ही की भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या रस्त्याचे अनावरण करण्यात आले. विदेशामध्ये पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रप्रमुखाच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा अशाप्रकारे सन्मान झाला आहे.

 

4. न्यूयॉर्क, अमेरिका

25 जून 2023 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील एका रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. Dr BR Ambedkar Way असे या रस्त्याचे नाव असून बाबासाहेबांचे नाव असलेला हा अमेरिकेतील दुसरा मार्ग होय.

1913 ते 1916 या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकले. येथून त्यांनी डबल एमए, पीएचडी आणि मानद एलएलडी अशा एकूण चार पदव्या (दोन मास्टर्स आणि दोन डॉक्टरेट) मिळवल्या.


Way, Road, Avenue, Street यासारख्या इंग्लिश शब्दांचे अर्थ मराठीत ‘मार्ग’, ‘पथ’ किंवा ‘रस्ता’ असे होतात.


सारांश

या लेखामध्ये आपण भारताबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या स्त्यांविषयी माहिती जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. याशिवाय तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्हाला कळवू शकता. धन्यवाद. 🙏🏼


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *