जुलै महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुलै महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in July) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण ऑगस्ट ते जून महिन्यातील जीवनपट लेख बनवलेले आहेत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in July
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in July

Timeline of Dr BR Ambedkar in July

वेगवेगळ्या वर्षांतील जुलै महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. जुलै महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in July – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

 

जुलैमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 जुलै

  • 1908 : शि.जा. कांबळे यांनी ‘सोमवंशी मित्र’ मासिक सुरू केले.
  • 1954 : मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • कर्मवीर बाबू हरिदास आवळे जयंती

 

2 जुलै

  • 1942 : लॉर्ड वेव्हेल यांच्या एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मजूरमंत्री पदावर नियुक्ती झाली.

 

3 जुलै

  • 1851 : महात्मा फुलेंची बुधवार पेठेतील अण्णा चिपळूणकर यांच्या वाड्यात शाळा सुरू झाली.
  • 1927 : सर कासवजी जहागीर हॉल मुंबई येथे अस्पृश्यांची सभा झाली.

 

4 जुलै

  • 1925 : महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव जेधे यांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठवला.
  • 1936 : श्रीलंका, कोलंबोहून बुद्ध भिक्खू लोकनाथ यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र आले.

 

5 जुलै

  • 1920 : आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सिटी ऑफ एक्टिटर’ या बोटीने लंडनकडे रवाना झाले. यासाठी त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले होते. इंग्लंडमध्ये गेले असता (काही दिवसांनी) तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.
  • 1923 : बाबासाहेबांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायासाठी नोंदणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस ‘लॉयर्स डे‘ (वकील दिन) म्हणून पाळला जातो.

 

6 जुलै

  • 1920 : छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक महाविद्यालय वसतिगृह सुरू केले.
  • दलाई लामा जन्मदिन

 

7 जुलै

  • 1933 : भंडारा जिल्ह्यातील विहीरगाव येथील अस्पृश्य समाजाने मृत जनावरे ओढणे वगैरे कामे बंद केल्यामुळे स्पृश्यांकडून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.
  • 1945 : अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत

 

8 जुलै

  • 1936 : राजनांदगाव अस्पृश्य परिषद मोतीपूर येथे बाबू बन्सीलाला रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेथे अग्निकुंड पेटवून त्यात सर्वांनी आपापल्या तुळशीमाळा, जटा, दाढ्या टाकून बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

 

9 जुलै

  • 1942 : अस्पृश्यांच्या विकासाच्या दृष्टीने बजेटमधील रक्कम खर्च करावी म्हणून मुंबई सचिवालयावर मोर्चा काढण्यात आला.
  • 1972 : दलित पँथरची स्थापन झाली.

 

10 जुलै

  • 1887 : महात्मा जोतीराव फुले यांनी आपले मृत्युपत्र तयार केले.
  • 1932 : मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली
  • 1945 : बॉम्बे म्युन्सिपल कामगार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली.

 

11 जुलै

  • 1933 : कालीचरण नंदागवळी यांनी दलित फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 1933 : भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनकला होते. समितीच्या बैठका बैठकीचा पहिला टप्पा 11 ते 28 जुलै 1933 या कालावधीत पर पडला तर दुसरा 3 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 1933 या कालावधीत झाला.
  • 1997 : घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड – हुतात्म्यांचा स्मृतिदिन

 

Dr Ambedkar in July

 

12 जुलै

  • 1941 : म्युन्सिपल कामगार संघापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1942 : इंडिपेंडेंट लेबर पार्टी आणि बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियनने मुंबई येथे सभा आयोजित केली, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वायसराय द्वारा राष्ट्रीय संरक्षण परिषदेत कार्यकारी परिषदेचे (Executive Council in the National Defense Council) सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
  • 1949 : गाडगेबाबा व बाबासाहेबांची भेट झाली.

 

13 जुलै

  • 1930 : शिमला येथे ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली.
  • 1937 : चाळीसगाव येथे एका सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

14 जुलै

  • 1947 : बॉम्बे प्रांतातून घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.
  • 1949 : कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजारी पडले.
  • 1952 : मुंबईतील दामोदर हॉल, परळ येथे इमारत फंडाबाबत समाजसेवकांची सभा झाली.

 

Timeline of Dr Ambedkar in July

15 जुलै

  • 1904 : आंबेडकर चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचा जन्म पाचवड येथे झाला. त्यांनी 15 खंडांमध्ये ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र’ लिहिले आहे.
  • 1942 : मजूरमंत्री झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अभिनंदन करण्यात आले.
  • 1946 : पुणे कौन्सिल हॉलवर मोर्चा काढण्यात आला.
  • 1947 : ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव स्वीकृत केला.

 

16 जुलै

  • 1942 : नागपूर येथे डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले
  • 1970 : 4 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातील भिडे वाड्यात भाषणे झाली.

 

17 जुलै

  • 1946 : स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीसाठी पुण्यात सत्याग्रह झाला.
  • मॅक्झिम गॉर्की स्मृतिदिन

 

18 जुलै

  • 1883 : महात्मा फुले यांचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ पूर्ण झाला.
  • 1942 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे नागपूर येथे तिसरे अधिवेशन संपन्न झाले.
  • अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन (1969)

 

19 जुलै

  • 1926 :: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई विधिमंडळ सदस्य म्हणून शपथविधी झाला.
  • 1926 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात लहान मुलगा राजरत्न याचे निधन झाले.
  • 1937 : काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बनवले.
  • 1937 : नागपूर येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची महिला परिषद संपन्न झाली.

 

20 जुलै

  • 1924 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले. भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते.
  • 1942 : नागपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजूरमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली.

 

21 जुलै

  • 1913 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.
  • 1942 : ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश बाबासाहेबांनी अस्पृश्यांना दिला.
  • 1946 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वार्ताहरांना मुलाखत घेतली.

 

22 जुलै

  • 1940 : मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली.
  • 1947 : भारतीय संविधान सभेने अशोक चक्रांकित तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून निश्चित केला. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे भारतीय राष्ट्रध्वजामध्ये अशोकचक्र ठेवण्यात आले.

 

23 जुलै

  • 1946 : मुंबई विधिमंडळाकडून डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेवर निवड जाहीर झाली.
  • 1953 : बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

24 जुलै

  • 1917 : प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे सक्तीचे करण्याचा राजर्षी शाहू महाराजांचा हुकूम निघाला.
  • 1935 : नाशिक जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले.

 

25 जुलै

  • 1856 : विधवा विवाहाचा कायदा भारत सरकारने संमत केला.
  • 1950 : रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले.

 

26 जुलै

  • 1902 : राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गींयासाठी 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

 

27 जुलै

  • 1928 : सातारा तालुक्यातील एका खेड्यातील महार व्यक्तीचा खटला चालवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारा येथे पोहोचले.
  • 1942 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री पदावर रुजू झाले.

 

28 जुलै

  • 1928 : स्त्रियांना प्रसूतीनंतरच्या सवलतीसंबंधी चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1933 : भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनकला होते. समितीच्या बैठका बैठकीचा पहिला टप्पा 11 ते 28 जुलै 1933 या कालावधीत पर पडला तर दुसरा 3 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 1933 या कालावधीत झाला.
  • भदंत धम्मकीर्ती स्मृतिदिन

 

29 जुलै

  • 1927 : बहिष्कृत भारताचा नववा अंक प्रसिद्ध झाला.
  • 1933 : कन्हान नदीला महापूर आला आणि त्यात कामठी परिसरातील अस्पृश्यांची 40 घरे जमीनदोस्त झाली. बाबू हरिदास यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना निवारा दिला.

 

30 जुलै

  • 1930 : मराठवाडा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

31 जुलै

  • 1933 : पुणे करारावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीत चर्चा झाली.
  • 1937 : धुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 31 जुलै ते 2 ऑगस्ट यादरम्यान बाबासाहेब धुळे दौऱ्यावर होते.
  • 1941 : भारतमंत्री कर्नल अमेरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तार आली.

 

जुलैमध्ये घडलेल्या अन्य घटना 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण जुलै महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट ( Timeline of Dr Babasaheb Ambedkar in July ) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *