ऑक्टोबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट किंवा दिनविशेष (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in October) या लेखामध्ये समाविष्ट आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती महत्वाची आहे.

ऑक्टोबर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट – Timeline of Dr Babasaheb Ambedkar in October

Timeline of Dr Ambedkar in October

वेगवेगळ्या वर्षांतील ऑक्टोबर महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप साऱ्या ऐतिहासिक घटना घडल्या. ऑक्टोबर महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in October – बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा देखील समावेश या लेखामध्ये करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये — धर्मांतराची घोषणा, जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट, सामूहिक बौद्ध धर्मांतर, ‘द बुद्ध अँड हिज धम्म’ ग्रंथ लिहिण्यास सुरुवात, कायदेमंत्री पदाचा त्याग… यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट होतात.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in October

 

ऑक्टोबरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 ऑक्टोबर

  • जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
  • 1957 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष स्थापन करण्यासाठी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी या पक्षाची स्थापना करण्यात आली.

 

2 ऑक्टोबर

  • महात्मा गांधी जयंती (1969)
  • लालबहादूर शास्त्री जयंती (1904)
  • 1930 : दामोदर हॉल, मुंबई येथे अस्पृश्य वर्गाच्या वतीने गोलमेज परिषदेमध्ये नियुक्तीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले. डॉक्टर पी जी सोळंके हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
  • 1957 : शांताबाई दाणी यांचे अध्यक्षतेखाली अखिल भारतीय दलित महिलांची सभा नागपूर येथे झाली.

 

3 ऑक्टोबर

  • 1933 : लंडन येथे भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकीचा दुसरा टप्पा सुरू झाला, या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही समावेश होता. या समितीमध्ये सहभागी घेण्यासाठी डॉ आंबेडकर मुंबईहून बोटीने 24 एप्रिल 1933 रोजी लंडनकडे निघाले आणि 6 मे 1933 रोजी लंडनला पोहोचले होते. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा 11 ते 28 जुलै 1933 आणि दुसरा 3 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 1933 या कालावधीत झाल्या.
  • 1945 : “स्कूल ऑफ पॉलिटिक्स”, पुणे याच्या अनावरणाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांनी आपले विचार मांडले.
  • 1954 : आकाशवाणी दिल्ली येथून ‘माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1957 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज हे पक्षाचे अध्यक्ष झाले, जे अजीव (1957-1964) या पदावर होते.

 

4 ऑक्टोबर

  • 1929 : भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीसाठी मंडळाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रक काढले.
  • 1930 : एस.एस. व्हाईसरॉय नावाच्या जहाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईहून लंडनला प्रयाण झाले.

 

5 ऑक्टोबर

  • जागतिक शिक्षक दिन
  • 1927 : मुंबई विद्यापीठात कायदा दुरुस्ती विधेयकावर विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली.
  • बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल स्मृतिदिन (1968)

 

 

6 ऑक्टोबर

  • 1932 : ग्रामपंचायत विधेयकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1934 : मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदावर केळुसकर गुरुजींची निवड झाली.
  • 1951 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्री पदाचा राजीनामा मंजूर झाला.

 

7 ऑक्टोबर

  • 1951 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

 

8 ऑक्टोबर

  • 1928 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यवर्गीय मुलांच्या दुय्यम शिक्षणासाठी सरकारी योजना संमत करून घेतली.
  • 1931 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अल्पसंख्यांक करावरावर हस्ताक्षर केले.

 

9 ऑक्टोबर

  • 1931 : भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली.
  • 1939 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे व्हाईसरॉयची भेट घेतली.
  • प्राध्यापक धम्मानंद कोसंबी जयंती

 

10 ऑक्टोबर

  • जागतिक टपाल दिन
  • 1927 : अल्पभूधारकांच्या सवलती बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल मध्ये भाषण झाले. त्यांनी सहशेतीचा विचार मांडला.

 

 

11 ऑक्टोबर

  • 1951 : कायदे मंत्रीपदाच्या राजीनाम्या संबंधी निवेदन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसभेत अखेरचे भाषण झाले.
  • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीहून नागपूरला प्रयाण झाले
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (1968)

 

12 ऑक्टोबर

  • 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीहून धर्मांतर सोहळ्यासाठी नागपूरला आगमन झाले.

 

13 ऑक्टोबर

  • 1929 : पर्वती मंदिर (पुणे) प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. हा सत्याग्रह 20 जानेवारी 1930 पर्यंत चालला, नंतर हा सत्याग्रह बंद झाला आणि परत केव्हाही सुरू झाला नाही. सत्याग्रह सुरू झाल्याच्या तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी या सत्याग्रहाला समर्थन दिले.
  • 1935 : येवला येथे अस्पृश्यांशी परिषद झाली आणि त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. “मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही” अशी प्रतिज्ञा केली.
  • 1946 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित “शूद्र पूर्वी कोण होते?” Who were the Shudras? हा ग्रंथ ठाकर अँड कंपनी या प्रकाशनाने प्रसिद्ध केला.
  • 1956 : डॉ. आंबेडकर यांची धर्मांतरासंबंधी वार्ताहर परिषद झाली.

 

14 ऑक्टोबर

  • जागतिक मानक दिन
  • धम्मचक्र प्रवर्तन दिन
  • 1948 : डॉक्टर आंबेडकरांनी” धारा आयोगा”च्या समोर साक्ष दिली आणि त्यांना Maharashtra as a linguistic province सोपवला.
  • 1956 : नागपूर येथे पाच लाख अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

 

15 ऑक्टोबर

  • बौद्ध संघ दिवस
  • वाचन प्रेरणा दिन (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती – 1931)
  • कर्मवीर भाऊराव (दादासाहेब) गायकवाड जयंती
  • 1956 : नागपूर महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.

 

History of Dr Ambedkar in October

16 ऑक्टोबर

  • 1929 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समाज संघ आणि भारतीय बहिष्कृत समाजसेवा संघ द्वारे मुंबई प्रांत डिप्रेस क्लासेसच्या सभेमध्ये पर्वती मंदिर सत्याग्रहाला समर्थन दिले. 13 ऑक्टोबर ला हा सत्याग्रह सुरू झाला होता.
  • 1932 : येरवडा जेल, पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट झाली.
  • 1953 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन तर्फे मराठवाड्यात भूमिहीनांचा सत्याग्रह झाला.
  • 1956 : चंद्रपूर येथे धम्मचक्र दीक्षा सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये बाबासाहेबांनी तीन लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

 

 

17 ऑक्टोबर

  • 1930 : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद सुरू झाली.

 

18 ऑक्टोबर

  • 1930 : पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनला पोहोचले. आदल्या दिवशी पासून परिषद सुरू झाली होती.
  • 1931 : मद्रास येथे अस्पृश्य समाजाची विशेष परिषद झाली.
  • 1933 : वन्य जमाती प्रगतीच्या प्रश्नासंबंधी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1948 : डॉक्टर आंबेडकरांचा ग्रंथ The Untouchables हा ग्रंथ अमृत बुक कंपनी, दिल्ली द्वारे प्रकाशित करण्यात आला.

 

19 ऑक्टोबर

  • 1932 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना येरवडा जेलमध्ये भेटले आणि दलित वर्गाला aunty untouchability league मध्ये जास्त प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी त्यांना केली.
  • 1940 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोंदिया मुन्सिपल निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जनता मध्ये जाहीर केली.

 

20 ऑक्टोबर

  • 1929 : नेबरहूड हाऊसमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बहिष्कृत वर्गाची सभा झाली.
  • 1946 :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा व्हाइसरॉयचे कार्यकारी मंडळातील ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री पदाचा कार्यकाळ संपला.
  • 1946 : भारताच्या मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला.

 

21 ऑक्टोबर

 

22 ऑक्टोबर

  • 1929 : पर्वती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी मद्रास येथे नेपिअर पार्कमध्ये बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा झाली.

 

23 ऑक्टोबर

  • 1920 : मूकनायकाचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
  • 1928 : सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली व त्यांनी खलिता दाखल केला.
  • 1944 : मद्रास कॉर्पोरेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.
  • 1929 : टांग्यातून प्रवास करताना डॉक्टर आंबेडकरांचा अपघात झाला.
  • 1933 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विन्स्टंट चर्चिलशी शाब्दिक झटपट झाली.

 

24 ऑक्टोबर

  • संयुक्त राष्ट्र दिन
  • 1951 : डॉक्टर आंबेडकरांनी सकाळी सात वाजता द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली.

 

25 ऑक्टोबर

  • 1935 : डॉ कुर्तकोटी यांनी त्यांचा एक प्रतिनिधी डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी पाठवला. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना असे आश्वासन दिले की मी असे कोणतेही कार्य (धर्मांतर संदर्भात) करणार नाही, ज्यामुळे देशहिताला कोणतीही बाधा पोहोचेल. परंतु आपण हिंदू धर्माचे घृणास्पद रूप का लपवत आहात? माझा उद्देश फक्त एवढा आहे की अस्पृश्य लोकांनी असा धर्म निवडावा ज्यामुळे त्यांची प्रगती होईल. माझ्या नजरेसमोर बौद्ध धर्म, शीख धर्म आणि आर्य समाज धर्म हे तीन आहेत.
  • 1939 : मुख्यमंत्री बा.ग. खेर यांच्या ठरावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रदीर्घ भाषण झाले.
  • 1946 : ब्रिटिश पंतप्रधानांना पाठवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली.

 

 

26 ऑक्टोबर

  • 1947 : पहिल्या महार बटालियनला जम्मूत जाण्याचा हुकूम देण्यात आला.
  • 1951 : दयानंद कॉलेज, जालंधर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

27 ऑक्टोबर

  • 1935 : इतिहासकार प्रो. धर्मानंद कोसंबी यांनी डॉक्टर आंबेडकर यांची राजगृह येथे भेट घेतली.
  • 1951 : पंजाब (रामदासपुर, जालंधर, लुधियाना, पटियाला) मध्ये लोकसभा निवडणूक प्रचार सभांना संबोधित केले.
  • 1954 : सिद्धार्थ कॉलेज, मुंबईच्या हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत खेड्यातील बांधवांच्या हिताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

 

28 ऑक्टोबर

  • 1932 : कोवासजी जहांगर हॉल, मुंबई येथे कृषी समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले. या सभेमध्ये आंबेडकरांनी मार्गदर्शन केले की मंदिर प्रवेश आणि आंतरजातीय भोजन यामध्ये स्वतःला गुंतवू नका, कारण यामुळे तुमचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटणार नाही.
  • 1951 : लुधियाना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, त्यामध्ये ब्रिटिशांनी अस्पृश्यांचा विश्वासघात केला असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

29 ऑक्टोबर

  • 1942 : अस्पृश्यांच्या दुःखासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गव्हर्नर जनरलला खलिता सादर केला.
  • 1951 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पतियाळा येथे भाषण झाले.
  • 1954 : मुंबई शहर येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने डॉक्टर आंबेडकरांना रुपये 1,18,000 रुपयांची थैली अर्पण केली.

 

30 ऑक्टोबर

  • 1920 : शिक्षण प्रसार व सुधारणा या प्रचारासाठी मालापूर खानदेश येथे महार जातीची सभा झाली.

 

31 ऑक्टोबर

  • 1931 : जनता मासिकाचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले.
  • वल्लभभाई पटेल जयंती (1875)

 

ऑक्टोबर मध्ये झालेल्या अन्य गोष्टी 

निश्चित तारीख माहिती नसलेल्या ऑक्टोबर महिन्यातील घटना येथे समाविष्ट आहेत.

  • 1922 : ‘द प्रोब्लम ऑफ रुपी‘ (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.
  • 1926 : ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर “देशाचे दुश्मन” हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर 1926 मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.
  • 1939 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली. बाबासाहेब दलितांच्या अधिकाराबद्दल नेहरूंचे विचार जाणू इच्छित होते. प्रचंड बुद्धी असलेल्या बाबासाहेबांनी या व्यक्तिगत चर्चामध्ये नेहरूंना चौथ्या वर्गाचा विद्यार्थी म्हटले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in October) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी बाब समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणीय चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *