आंध्र प्रदेशात बनतोय 205 फूट उंचीचा आंबेडकर पुतळा, जुलै 2023 मध्ये होईल तयार

आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 205 फूट उंचीच्या विशाल पुतळ्याचे काम वेगाने सुरू आहे. जुलै 2023 पर्यंत हा पुतळा पूर्ण होईल. या पुतळ्याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. (DR BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi)

 यह लेख हिंदी में पढ़ें 

Dr Ambedkar statue in Vijayawada Andhra Pradesh
आंबेडकर पुतळा, विजयवाडा – Dr Ambedkar statue in Vijayawada in Marathi

Dr BR Ambedkar statue in Vijayawada

अलीकडेच 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. चबुतऱ्यासह या पुतळ्याची उंची 175 फूट इतकी आहे.

आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा हा हैदराबादचा आहे. मात्र विजयवाडा येथील पुतळा उभा राहिल्यानंतर तो बाबासाहेबांचा सर्वात उंच पुतळा ठरेल.

हैदराबाद आणि विजयवाडा या दोन्ही पुतळ्याची उंची 125 फूट अशी समान असल्याचे दिसते. मात्र दोन्ही पुतळ्यांच्या चबुतऱ्यांची उंची म्हणजेच आधार भवनांच्या उंचीत तफावत आहे.

हैदराबादचा पुतळा 25 फुटाच्या गोलाकार संसद भवनाच्या प्रतिकृती असलेल्या चबुतऱ्यावर उभा आहे, तर विजयवाडाच्या पुतळ्याचा चबुतरा हा 80 फूट उंच असेल. त्यामुळे विजयवाडा येथील बाबासाहेबांचा पुतळा हैदराबादच्या पुतळ्याहून 30 फुटांनी अधिक उंचीचा असणार आहे आणि हा जगातील सर्वात उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा बनेल.

2020 पासून विजयवाडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वराज्य मैदानावर डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारकाचे निर्माण कार्य सुरू आहे. या स्मारकातील मुख्य आकर्षणाचे केंद्र हे बाबासाहेबांचा 125 फूट (38 मीटर) उंचीचा पुतळा असेल.

या लेखांमध्ये आपण विजयवाडा येथील निर्मला दिन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊ. यापूर्वी आपण हैदराबाद येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. या सोबतच लेखाच्या शेवटी आपण या दोन्ही पुतळ्यांची तुलनात्मक माहिती सुद्धा बघूया.

model of 125 ft Ambedkar statue in Vijayawada
विजयवाड्यातील विशाल आंबेडकर पुतळ्याची ही 12 फुटांची प्रतिकृती आहे (idhatri.com)

 

स्मारकाचा इतिहास

2015 पासून पुढील वर्षात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीची (125 वी) सुरुवात झाली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या पद्धतीने बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी करणार होती. त्यातच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांनी आपापल्या राज्यात बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे 125 फुटांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला 2015 मध्ये आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बाबासाहेबांचे भव्य स्मारक आणि त्यात 125 फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकासाठी यासाठी त्यांनी 100 कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती.

पुढे एप्रिल 2017 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशाची नवी राजधानी अमरावती येथे बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु चार वर्षे सत्तेत असताना देखील ते या स्मारकाला पूर्णत्वास नेऊ शकले नाही.

पुढे 2019 मध्ये जेव्हा जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी अमरावती मधील बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प सोडून दिला आणि विजयवाडा येथे तत्सम नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली.

त्यानुसार जगन मोहन रेड्डी यांनी 9 जुलै 2020 रोजी विजयवाडा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर स्वराज्य मैदानावर बाबासाहेबांचा 125 फूट उंच पुतळा असलेल्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महोदयांनी स्वराज्य मैदानाचे नाव बदलून ‘डॉ बी आर आंबेडकर स्वराज्य मैदान’ असे केले.

बाबासाहेबांच्या विशाल पुतळ्याच्या बांधकामास सुरुवात झाली. परंतु तीन वर्षांमध्ये या स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. जुलै 2023 पर्यंत हा पुतळा तयार होईल, असे आंध्र प्रदेश सरकारने सांगितले आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये

Dr BR Ambedkar statue in Vijayawada
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याचे काम “जुलै 2023” मध्ये पूर्ण होईल

Dr BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi

डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृती वनम’ हे स्मारकाचे अधिकृत व स्थानीय तेलुगू भाषेमधील नाव असून त्याचा अर्थ ‘डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक’ असा आहे.

20 एकर भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक साकारण्यात येईल.

स्मारकामधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे 125 फूट उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एकूण उंची 205 फूट इतकी असणार आहे. ज्यामध्ये पुतळा 125 फूट उंच आणि त्याचा चबुतरा 80 फूट उंच असणार आहे.

205 फूट उंचीचा हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल. हा पुतळा हैदराबाद येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा 30 फुटांनी अधिक उंच असणार आहे. हैदराबादचा पुतळा 175 फूट उंच आहे.

या पुतळाच्या बांधकामात सुरुवात झाली आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बुटांची उंची 12 फूट आणि त्यांचे वजन तब्बल 12 टन इतके आहे.

डॉक्टर बी आर आंबेडकर स्मृतीवनम मध्ये भव्य पुतळा, उद्यान, पुस्तकालय, संग्रहालय, गॅलरी, संशोधन केंद्र, सभागृह, ध्यान केंद्र इत्यादी संरचना असतील.

स्मारकातील सभागृह 2000 लोकांची क्षमता असलेले असेल, तर ओपन थेटर हे 500 लोकांच्या क्षमतेचे असेल. हे स्मारक बौद्ध वास्तुकलेशी संबंधित असेल.

भव्य पुतळा हा ब्राँझ धातूपासून बनवण्यात येईल. पुतळा बनवण्यासाठी सुमारे 352 मॅट्रिक टन स्टील आणि 212 मॅट्रिक टन पितळ वापरण्यात येईल.

चेन्नईच्या आयटीने पुतळ्याची डिझाईन तयार केली आहे.

12 फूट उंचीचा पुतळा स्मारकामध्ये ठेवण्यात आलेला आहे जो विशाल पुतळ्याची प्रतिकृती आहे.

सुमारे 400 कोटी रुपये खर्च स्मारकासाठी लागणार आहे.


सारांश

या लेखात आपण विजयवाडा येथील निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची (BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi) माहिती जाणून घेतली आहे. या स्मारक पुतळ्याचे बांधकाम जसे जसे पुढे जाईल तसा तसा हा लेख अद्ययावत केला जाईल. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *