2024 आणि 2019 मध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना किती मते मिळाली? वंचितच्या ‘पराभवाची कारणे’ कोणती?

2024 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते आपण जाणून घेणार आहोत. या दोन निवडणुकांमध्ये फरक सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. लोकसभेसाठी 2019 मध्ये 47 तर 2024 मध्ये 38 उमेदवार वंचितने उभे केले होते.

2024 आणि 2019 मध्ये 'वंचित'च्या उमेदवारांना मिळालेली मतं
2024 आणि 2019 मध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना मिळालेली मतं

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 38 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर 8 ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. या आधीच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने 47 जागांवर उमेदवार दिले होते आणि एका जागेवर एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना एकूण 15,82,855 मते (3.6%) मिळाली आहेत. तर 2019 च्या लोकसभा निवडणूक वंचितला 37,43,200 मते (6.9%) मिळाली होती.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढले आणि तिसऱ्या स्थानी राहिले. अकोल्यात खरी लढत भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यातच झाली. 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते होती, आणि ते दुसऱ्या स्थानावर होते.

2024 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचितच्या उमेदवारांना किती मते मिळाली हे खालील तक्त्यातून तुम्हाला पाहता येईल :

मतदारसंघ

2024 चे उमेदवार

मिळालेली मते

2019 चे उमेदवार

मिळालेली मते

1) नंदुरबार

हेमंत कोळी

4,081

दाजमल गजमल मोरे

25,702

2) धुळे

-

-

नबी अहमद अहमदुल्ला

39,449

3) जळगाव

युवराज जाधव

21,177

अंजली बाविस्कर

37,366

4) रावेर

संजय ब्राह्मणे

59,120

नितीन कांडेलकर

88,365

5) बुलढाणा

वसंतराव मगर

98,441

बळीराम सिरस्कार

1,72,627

6) अकोला

प्रकाश आंबेडकर

2,76,747

प्रकाश आंबेडकर

2,78,848

7) अमरावती

-

-

गुणवंत देवपारे

65,135

8) वर्धा

राजेंद्र साळुंखे

15,492

धनराज वंजारी

36,340

9) रामटेक

शंकर चिंतामण चहांदे

1,884 

किरण रोडगे

36,340

10) नागपूर

-

-

सागर डबरासे

26,128

11) भंडारा - गोंदिया

संजय केवत

24,858

एन.के. नान्ह

45,842

12) गडचिरोली- चिमूर

हितेश माधवी

15,922

रमेश गजबे

1,11,468

13) चंद्रपूर

राजेश बेळे

21,980

राजेंद्र महाडोळे

1,12,079

14) यवतमाळ- वाशिम

-

-

प्रवीण पवार

94,228

15) हिंगोली

बी.डी. चव्हाण

1,61,814

मोहन राठोड

1,74,051

16) नांदेड

अविनाश भोसीकर

92,512

यशपाल भिंगे

1,66,196

17) परभणी

पंजाब डख

95,967

आलमगीर खान

1,49,946

18) जालना

प्रभाकर बकले

37,810

शरदचंद्र वानखेडे

77,158

19) औरंगाबाद

इरफान खान

69,266

-

-

20) दिंडोरी - ST

मिताली धोमासे

34,103

बापू केळू बरडे

58,847

21) नाशिक

करन गायकर 

47,193

पवन पवार

1,09,981

22) पालघर

विजया म्हात्रे

10,936

सुरेश अर्जुन पडवी

13,728

23) भिवंडी 

-

-

ए.डी. सावंत

51,455

24) कल्याण

शहाबुद्दीन शेख

18,741

संजय हेडावू

65,572

25) ठाणे

-

-

मल्लिकार्जुन पुजारी

47,432

26) मुंबई नॉर्थ

सोनल गोंडाणे

6,052

सुनील उत्तम थोरात

15,651

27) मुंबई नॉर्थ वेस्ट

परमेश्वर रणसुर

10,052

संभाजी शिवाजी काशीद

23,367

28) मुंबई नॉर्थ इस्ट

दौलत खान

14,657

नीहारिका खोंडले

68,239

29) मुंबई नॉर्थ सेंटर

संतोष अंबुळगे

8,288

अब्दुल रहमान

33,703

30) मुंबई साऊथ सेंटर

अबुल हसन खान

26,867

संजय सुशील भोसले

63,412

31) मुंबई साऊथ

अफजल दवूजी

5,612

अनिल कुमार

30,348

32) रायगड

कुमुदिनी चव्हाण

19,618

सुमन कोळी

23,196

33) मावळ

माधवी जोशी

27,768

राजाराम पाटील

75,904

34) पुणे

वसंत मोरे

32,012

अनिल जाधव

64,793

35) बारामती

-

-

नवनाथ पडळकर

44,134

36) शिरूर

अनवर शेख

17,462

राहुल ओव्हाळ

38,070

37) अहमदनगर

दिलीप खेडकर

13,749

सुधाकर आव्हाड

31,807

38) शिर्डी

उत्कर्षा रूपवते

90,929

संजय सुखदान

63,287

39) बीड

अशोक हिंगे 

50,867

विष्णू जाधव

92,139

40) उस्मानाबाद

भाऊसाहेब अंधलकर

33,402

अर्जुन सलगर

98,579

41) लातूर

नरसिंगराव उदगीरकर

42,225

राम गारकर

1,12,255

42) सोलापूर

-

-

प्रकाश आंबेडकर

1,70,007

43) माढा

रमेश बारस्कर

20,604

विजय मोरे

51,532

44) सांगली 

-

-

गोपीचंद पडळकर

3,00,234

45) सातारा

प्रशांत कदम

11,912

सहदेव एवळे

40,673

46) रत्नागिरी-सिंधुदुर्ग

मारुती जोशी

10,039

मारुती रामचंद्र जोशी

30,882

47) कोल्हापूर

-

-

अरुणा माळी

63,439

48) हातकणंगले

दादासाहेब पाटील

32,696

असलम बादशाहजी सय्यद

1,23,419

एकूण 

15,82,855

37,43,200

2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही 2024 मध्ये, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी शंका अनेकांना होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही शंका फोल ठरली आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाहीये. त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. किंबहुना, लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावलेले दिसून येतात.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 38 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर 8 ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता.

 

2019 च्या निवडणुकीत वंचितच्या तेरा उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतातील फरकापेक्षा जास्त मते होती. म्हणजेच वंचितही महाविकास आघाडी सोबत असती तर या 13 ठिकाणी महायुती (भाजप+) जिंकू शकली नसती. मात्र यावेळी असे चित्र कुठेही बघायला मिळाले नाही. फक्त अकोला मतदारसंघांमध्ये अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्या मतांतील फरक हा प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या मतदानापेक्षा कमी होता.

 

अवास्तव मागण्या


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *