‘या’ 15 विद्यापीठांना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

आपल्या भारत देशातील तब्बल 14 विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भारतातील सर्वाधिक विद्यापीठांना दिले गेले आहे. त्यांच्यानंतर नंबर दोनवर महात्मा गांधी हे येतात. बाबासाहेबांच्या नावे असलेल्या सर्व विद्यापीठांची यादी आपण या लेखामध्ये बघणार आहोत. – Universities named after Ambedkar

  यह लेख हिंदी में पढ़े  

Universities named after Ambedkar
Universities named after Ambedkar

Universities named after Ambedkar

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर” आणि “शिक्षण” हे दोन्ही शब्द एकमेकांना पर्याय म्हणून वापरले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण महान शिक्षणप्रेमी आणि प्रकांड विद्वत्तेचे धनी असलेल्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आणि शिक्षणाच्या आधारे मनुष्य उत्कर्ष करू शकतो असे सांगितले. बाबासाहेबांना “चालते-फिरते विद्यापीठ” म्हणतात, आणि असे त्यांच्या ठाई असलेल्या प्रचंड ज्ञानामुळे म्हटले जाते. आज विद्यापीठांसह, अनेक इन्स्टिट्यूट, शाळा, व महाविद्यालये यासारख्या शेकडो शैक्षणिक संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.

विद्यापीठ (University) ही एक सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. समाजाला सुसंस्कृत आणि समृद्ध बनवण्याचे कार्य या विद्यापीठांवर असते. जगभरात असंख्य विद्यापीठे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि यापैकी अनेकांना महान विभूतींची नावे देण्यात आली आहेत. अशा थोर व्यक्तींची नावे विद्यापीठाला देऊन त्यांच्या कार्याचा एकप्रकारे गौरवच केला जातो.

ऑक्टोबर 2021 नुसार, आपल्या भारतात 1013 विद्यापीठे आहेत आणि या विद्यापीठांपैकी अनेकांना काही महान व्यक्तींची नावे दिली गेली आहेत. थोर उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देशातील 14 विद्यापीठांना दिलेले आहे आणि हे प्रमाण भारतातल्या अन्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच भारतामध्ये कोणत्या व्यक्तीचे नाव सर्वाधिक विद्यापीठांना दिलेले आहेत तर ते नाव आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यानंतर नंबर 2 वर महात्मा गांधी यांचा नंबर लागतो.

ज्या अस्पृश्य व्यक्तीला लहानपणी जातीयतेमुळे शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले, पदोपदी अपमान करण्यात आला. आज त्याच व्यक्तीच्या नावे देशात तब्बल 14 विद्यापीठे उभी आहेत (Universities named after Ambedkar), ही खरोखर एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. महान शिक्षणप्रेमी आणि प्रकांड विद्वत्तेचे धनी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कोणकोणत्या विद्यापीठांना दिले आहे, याची यादी आपण बघू.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली 14 विद्यापीठे (Universities named after Ambedkar)


लेखामध्ये प्रत्येक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) तसेच इंग्लिश नावामध्ये इंग्लिश विकिपीडियाची लिंक दिलेली आहे.

 

1. डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी

  • इंग्लिश नाव : Dr. B. R. Ambedkar School of Economics University, Bengaluru
  • संक्षिप्त नाव : BASE University
  • जुने नाव : Bengaluru Dr. B. R. Ambedkar School of Economics University
  • स्थान : बंगळूर, कर्नाटक, भारत
  • स्थापना : 2017
  • संकेतस्थळ : base.ac.in

डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी (BASE युनिव्हर्सिटी) हे कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे स्थित एक एकक विद्यापीठ (unitary university) आहे. हे सुरुवातीला 2017 मध्ये एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यात आले होते, मात्र नंतर 2018 मध्ये त्याला विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. 43.45 एकर जागेवर अभी असलेली ही संस्था प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या (LSC) धर्तीवर तयार केली जात आहे.

 

2. डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली

  • इंग्लिश नाव : Dr. B. R. Ambedkar University Delhi
  • संक्षिप्त नाव : AUD
  • जुने नाव : Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar University Delhi आणि Ambedkar University Delhi
  • स्थान : दिल्ली
  • स्थापना : 2007
  • ब्रीदवाक्य : ‘बोधिवृक्ष’ (चिन्ह)
  • संकेतस्थळ : www.aud.ac.in

डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली हे दिल्ली विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने 2007 साली स्थापन केलेले एक राज्य विद्यापीठ आहे. ऑगस्ट 2008 मध्ये विद्यापीठाने कामकाज सुरू केले. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने या विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी दिली आहे.

 

3. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुझफ्फरपूर

  • इंग्लिश नाव : Babasaheb Bhimrao Ambedkar Bihar University
  • संक्षिप्त नाव : BRABU
  • जुने नाव : Bihar University
  • स्थान : मुझफ्फरपूर, बिहार, भारत
  • स्थापना : 1960
  • ब्रीदवाक्य : नास्ति विद्या समम चक्षुः
  • संकेतस्थळ : brabu.edu.in

बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ हे बिहार राज्याच्या मुझफ्फरपूर शहरात स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. 1960 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात 39 घटक महाविद्यालये आहेत. दूरस्थ शिक्षण (Distance education) अभ्यासक्रम देखील येथे उपलब्ध आहे. याचे पूर्वीचे नाव बिहार विद्यापीठ होते, मात्र 1992 मध्ये विद्यापीठाचे नाव बदलून बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ असे करण्यात आले.

 

4. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ

  • इंग्लिश नाव : Babasaheb Bhimrao Ambedkar University
  • संक्षिप्त नाव : BBAU
  • स्थान : लखनऊ, उत्तर प्रदेश, भारत
  • स्थापना : 1996
  • ब्रीदवाक्य : प्रज्ञा शील करुणा
  • संकेतस्थळ : www.bbau.ac.in

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ (बीबीएयू) हे उत्तर प्रदेशातील लखनौमधील एक केंद्रीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 10 जानेवारी 1996 रोजी झाली. विद्यापीठाचा अमेठी येथे देखील उपग्रह परिसर आहे, ज्याची स्थापना 2016 मध्ये झाली.

 

5. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ

  • इंग्लिश नाव : Dr. B.R. Ambedkar National Law University, Sonipat
  • संक्षिप्त नाव : DBRANLU
  • जुने नाव : राष्ट्रीय विधी विद्यापीठ हरियाणा
  • स्थान : सोनीपत, हरियाणा, भारत
  • स्थापना : 2012
  • ब्रीदवाक्य : नीयते विवक्षितार्थः अनेन इति न्यायः
  • संकेतस्थळ : www.dbranlu.ac.in

डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सोनीपत (DBRANLU) हे राजीव गांधी एज्युकेशन सिटी, सोनीपत, हरियाणा येथे स्थित एक राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे 2012 मध्ये हरियाणा राज्य सरकारने 2012 मध्ये राज्य विधिमंडळ अधिनियम क्रमांक 15 द्वारे भारतात स्थापित केलेले 23वे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे आधीचे नाव ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी हरियाणा’ होते, पुढे 2014 मध्ये बदलून ते ‘डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सोनीपत’ असे करण्यात आले. Ambedkar University

 

6. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ

  • इंग्लिश नाव : Dr. B.R. Ambedkar Open University
  • संक्षिप्त नाव : BRAOU
  • जुने नाव : Andra Pradesh Open University
  • स्थान : हैदराबाद, तेलंगणा, भारत
  • स्थापना : 1982
  • ब्रीदवाक्य : Education at Your Doorstep
  • संकेतस्थळ : braou.ac.in

डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ हे तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. यास तेलंगणा मुक्त विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते. राज्य विधिमंडळाच्या अधिनियमाने ऑगस्ट 1982 मध्ये “आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठाची” स्थापना झाली (त्यावेळी तेलंगणा हे आंध्र प्रदेशचा भाग होते), आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या विद्यापीठाचे संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते प्रा. जी. राम रेड्डी हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 24 ऑक्टोबर 1991 रोजी विद्यापीठाचे नाव “डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ” असे ठेवण्यात आले. Universities named after Ambedkar

 

7. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम

  • इंग्लिश नावDr. B.R. Ambedkar University, Srikakulam
  • संक्षिप्त नाव : BRAU
  • स्थान : एचेर्ला, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
  • स्थापना : 2008
  • ब्रीदवाक्य : Education For Everyone
  • संकेतस्थळ : www.brau.edu.in

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील एचरला (Etcherla) येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. आंध्र प्रदेश सरकारने 2008 मध्ये त्याची स्थापना केली. या विद्यापीठाला एचरला येथील आंध्र विद्यापीठ परिसर आणि श्रीकाकुलममधील सर्व संलग्न महाविद्यालयांचे नियंत्रण देण्यात आले आहे.

 

Universities named after Ambedkar

8. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ

  • इंग्लिश नावDr. B.R. Ambedkar University of Social Sciences
  • संक्षिप्त नाव : BRAUSS
  • स्थान : डॉ. आंबेडकर नगर (महू), मध्य प्रदेश
  • स्थापना : 2016
  • ब्रीदवाक्य : अत्त दीपो भव
  • संकेतस्थळ : brauss.in

डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ (BRAUSS) हे मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर (महू) येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. 2016 मध्ये मध्य प्रदेश सरकारने डॉ. बी.आर. आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशल सायन्सेस ॲक्ट, 2015 च्या अंतर्गत याची स्थापना केली होती. सामाजिक विज्ञान (Social Sciences) या विषयाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. महू हे बाबासाहेबांचे जन्मस्थळ आहे.

 

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

  • इंग्लिश नावDr. Babasaheb Ambedkar Marathwada University
  • संक्षिप्त नाव : BAMU
  • जुने नाव : मराठवाडा विद्यापीठ
  • स्थान : औरंगाबाद, महाराष्ट्र
  • स्थापना : 1958
  • ब्रीदवाक्य : हे ज्ञानिची पवित्रता । ज्ञानीचि आथि
  • संकेतस्थळ : www.bamu.ac.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठ आहे. मराठवाडा विभागातील हे प्रमुख विद्यापीठ आहे. 1958 ला स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे नाव ” मराठवाडा विद्यापीठ” असे होते, पुढे नामांतराच्या लढ्यानंतर (1976 ते 1994 ) महाराष्ट्र शासनाने त्याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  असे केले. विद्यापीठ परिसर 725 एकर (2.93 चौ. किमी) पसरलेला आहे.

औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव 27 जुलै इ.स. 1978 ला संमत करण्यात आला. मात्र या निर्णयास जातिवादी लोकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, दुसरीकडे शासकीय निर्णयाच्या समर्थनार्थ सुद्धा प्रचंड लोक समोर आले. 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व 14 जानेवारी इ.स. 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला.

 

10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ

  • इंग्लिश नावDr. Babasaheb Ambedkar Open University
  • संक्षिप्त नाव : BAOU
  • स्थान : अहमदाबाद, गुजरात
  • स्थापना : 1994
  • ब्रीदवाक्य : स्वाध्याय: परमं तप:
  • संकेतस्थळ : www.baou.edu.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ही गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थित एक उच्च शिक्षणाची सार्वजनिक संस्था आहे. याची स्थापना 1994 मध्ये झाली होती. हे विद्यापीठ दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे डिप्लोमा आणि पदवी यासारखे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रदान करते.

 

11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ

  • इंग्लिश नावDr. Babasaheb Ambedkar Technological University
  • संक्षिप्त नाव : DBATU
  • स्थान : लोणेरे, महाराष्ट्र
  • स्थापना : 1989 
  • ब्रीदवाक्य : Development through Technology
  • संकेतस्थळ : www.dbatu.ac.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीबीएटीयू) ही महाराष्ट्रातील लोनेरे येथे मुख्यालय असलेले एक वैधानिक राज्य तांत्रिक विद्यापीठ आहे. याला महाराष्ट्र सरकारने विशेष डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी कायद्याद्वारे स्थापित केले आहे. 2014 च्या महाराष्ट्र कायदा क्रमांक XXIX द्वारे विद्यापीठाला 2 मार्च 2016 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ‘संलग्न’ विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असे म्हटले जाते.

 

12. डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर

  • इंग्लिश नावDr. Bhimrao Ambedkar Law University , Jaipur
  • संक्षिप्त नाव : ALUJAIPUR
  • स्थान : जयपूर, राजस्थान
  • स्थापना : 2019
  • ब्रीदवाक्य : Knowledge is Immortal
  • संकेतस्थळ : www.alujaipur.ac.in

डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ (ALU जयपूर) हे एक निवासी-सह-संलग्न विद्यापीठ आहे, जे राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये कायद्याच्या अभ्यासाठी विशेष आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये राजस्थान विधानसभेने पारित केलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, जयपूर, 2019 या विधेयकाद्वारे स्थापित केले गेले. या विद्यापीठाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने देखील मान्यता दिली आहे.

 

13. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा

  • इंग्लिश नावDr. Bhimrao Ambedkar University
  • संक्षिप्त नाव : DBRAU
  • जुने नाव : Agra University
  • स्थान : आग्रा, उत्तर प्रदेश
  • स्थापना : 1927
  • ब्रीदवाक्य : तमसो मा ज्योतिर्गमय
  • संकेतस्थळ : dbrau.org.in

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. यास ‘आग्रा विद्यापीठ’ म्हणूनही ओळखले जाते. 1 जुलै 1927 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. पूर्वी विद्यापीठाचे नाव “आग्रा विद्यापीठ” असे होते, मात्र 24 सप्टेंबर 1995 रोजी राज्य सरकारच्या एका अधिसूचनेनुसार विद्यापीठाचे नाव बदलून “डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा” असे करण्यात आले.

 

14. तामिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ

  • इंग्लिश नावTamil Nadu Dr. Ambedkar Law University
  • संक्षिप्त नाव : TNDALU
  • स्थान : चेन्नई, तामिळनाडू
  • स्थापना : 1997
  • ब्रीदवाक्य : Lex Supremus
  • संकेतस्थळ : www.tndalu.ac.in

तामिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी हे तामिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी ॲक्ट, 1996 अंतर्गत तामिळनाडू सरकारने चेन्नई येथे 1997 मध्ये स्थापन केलेले सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. तामिळनाडूतील सर्व लॉ कॉलेजेस या विद्यापीठाच्या अंतर्गत व नियंत्रणात आहेत. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 20 सप्टेंबर 1997 रोजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले होते.

 

15. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी

  • इंग्लिश नाव : Baba Saheb Ambedkar Education University
  • संक्षिप्त नाव : BAEU
  • स्थान : कोलकाता, पश्चिम बंगाल
  • स्थापना : 2015
  • ब्रीदवाक्य : Excellence in Teacher Education
  • संकेतस्थळ : bsaeu.in

बाबा साहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी ही 2015 मध्ये स्थापना झालेली पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आहे. पूर्वी पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ टीचर्स ट्रेनिंग, एज्युकेशन प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन (WBUTTEPA) म्हणून ओळखले जात होते. कोलकाता गॅझेट, एक्स्ट्राऑर्डिनरी, 16 जानेवारी 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या कायद्याद्वारे ही युनिव्हर्सिटी स्थापित केली गेली. कोणत्याही राज्य सरकारने केवळ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेले हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावर विविध शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (बीएड आणि एम.एड.) देते. त्याच्या कार्यक्षेत्राशी संलग्न 200 शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये आहेत आणि त्याच्या क्षितिजात संपूर्ण पश्चिम बंगाल राज्य समाविष्ट आहे.

27 जून 2022 रोजी, पश्चिम बंगाल सरकारने विद्यापीठाचे तत्कालीन नाव WBUTTEP&A वरून बदलून बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी असे केले आहे.


List of Universities named after Ambedkar
List of Universities named after Ambedkar – Dr Ambedkar University list

संदर्भ –

 

हे ही वाचलंत का?

 


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

8 thoughts on “‘या’ 15 विद्यापीठांना आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

    1. Dr. Babasaheb Ambedkar ji ka name vidyapeeth ko jo bhi sarkar ne diya hai oh unchi ke prati apani adar aur baki sarkaro ko prerena lena chahiye

  1. The best collection of information about Babasaheb Dr. Bhimrao Ambedkar. I appreciate & Congratulate you for this important work.

    WAKUDE NAGPUR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *