निकाल : भीमस्मरण महापरीक्षा 2024 चा निकाल जाहीर

निकाल भीमस्मरण महापरीक्षा : भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षेचा निकाल 22 जून 2024 रोजी संत कबीर जयंतीदिनी जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांची नावे जाणून घ्या…

bhimsmaran-pariksha-result-2024
भीमस्मरण महापरीक्षेचा निकाल

प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 चा निकाल संत कबीर यांच्या 626व्या जयंतीदिनी — दिनांक 22 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. 

ही भीमस्मरण महापरीक्षा खालील 2 भागांत पार पडली होती.

1. मुख्य परीक्षा – 19 मे 2024 (ऑनलाईन)
2. अंतिम परीक्षा – 9 जून 2024 (व्हिडिओ कॉन्फरन्स)

या दोन्ही परीक्षेतील सर्व स्पर्धकांच्या गुणांची यादी प्रत्येक स्पर्धकाच्या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या दहा स्पर्धकांची व्हिडिओ कॉन्फरन्सवर परीक्षा घेण्यात आली व त्यातून सर्वोच्च गुण प्राप्त करणार्‍या स्पर्धकांना विजेते घोषित करण्यात येत आहे.

 

विजेते आणि त्यांची बक्षिसे

प्रथम पारितोषिक विजेते

भूपती प्रभू जगधने (सोलापूर जिल्हा)

बक्षिस स्वरूप – ₹15,000/- आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

 

द्वितीय पारितोषिक विजेते 

तेजस रवींद्र इंगळे (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)

बक्षिस स्वरूप – ₹12,500/- आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

(7 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)

 

तृतीय पारितोषिक विजेते

ऋषभ राजेंद्र बागडे (अमरावती जिल्हा)

बक्षिस स्वरूप – ₹10,000/- आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

 

प्रोत्साहन पारितोषिक विजेते

सागर महादेव ससाणे (पुणे जिल्हा)
बक्षिस स्वरूप – ₹५००/- सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

राशा मिलिंद कांबळे (नागपूर जिल्हा)
बक्षिस स्वरूप – ₹५००/- सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

अमिषा अनिल बालवीर (वर्धा जिल्हा)
बक्षिस स्वरूप – ₹५००/- सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र


भीमस्मरण राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजक प्रबुद्ध टिव्ही (युट्यूब चॅनल) आणि संयोजक धम्मभारत (वेबसाईट) यांच्या तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!


परीक्षेविषयी थोडसं…

आधुनिक भारताचे शिल्पकार, घटनाकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 133व्या जयंतीनिमित्त वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी प्रबुद्ध टीव्ही या YouTube चॅनलने भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा आयोजित केली होती.

या परीक्षेच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्य वाचून बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तरुणांना उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठांना कृतिशील होण्याची ऊर्जा मिळावी, असा सम्यक हेतू या परीक्षेमागे आयोजकांचा आहे.

परीक्षेस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 1650 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. एकूण सहभागी स्पर्धकांपैकी 56 टक्के महिला तर 44 टक्के पुरुष होते. तसेच एक तृतीयलिंगी व्यक्ती देखील स्पर्धेत सहभागी झाली होती.

भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाइन महापरीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून तीन स्रोत निर्धारित करण्यात आले होते — ज.गो. संत द्वारे संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘माझी आत्मकथा’ पुस्तक, ‘धम्म भारत’ वेबसाईटवरील निवडक 40 लेख आणि ‘मराठी विकिपीडिया’वरील बाबासाहेब आंबेडकर लेख.


हेही पहा


सोशल मीडिया माध्यमे

  • प्रबुद्ध टीव्हीचे YouTube चॅनल – लिंक
  • प्रबुद्ध टीव्हीचे WhatsApp चॅनल – लिंक
  • धम्म भारतचे WhatsApp चॅनल – लिंक

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *