बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती

विज्ञानाशी सुसंगत आणि अद्भुत तत्त्वज्ञान असलेल्या बौद्ध धर्माबद्दल काही खास गोष्टी आणि महत्त्वपूर्ण माहिती (buddha dharma information in marathi) आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. – Interesting facts about Buddhism

  यह लेख हिंदी में पढ़े  

interesting facts about Buddhism
interesting facts about Buddhism – buddha dharma information in marathi

Interesting facts about Buddhism – बौद्ध धर्माची माहिती आणि इतिहास

बौद्ध धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म असून तो आज घडीला जगातील एक प्रमुख धर्म आहे. तथागत भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आहे. विज्ञानाशी सुसंगत आणि अद्भुत तत्त्वज्ञान असलेल्या या बौद्ध धर्माबद्दल काही महत्त्वपूर्ण आणि खास रंजक माहिती (Interesting facts about Buddhism) आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया बौद्ध धर्माशी निगडित काही महत्त्वपूर्ण आणि रंजक तथ्ये… (Interesting facts about Buddhism)

 

Buddha Dharma information in Marathi – बौद्ध धर्माशी संबंधित खास गोष्टी

1. Buddha in Marathi – भगवान गौतम बुद्ध एक भारतीय तत्त्वज्ञ, श्रमण, ध्यानी, आध्यात्मिक गुरु व समाजसुधारक होते. ते प्राचीन भारतात (इ.स.पू. 7वे ते इ.स.पू. 6वे शतक), (इ.स.पू. 6वे ते इ.स.पू. 5वे शतक) किंवा (इ.स.पू. 5वे ते इ.स.पू. 4थे शतक) राहत होते.

 

2. बुद्धांचा जीवनकाळ एकतर इ.स.पू. 563 – इ.स.पू. 483 किंवा इ.स.पू. 480 – इ.स.पू. 400 असल्याचे मानले जाते. मात्र अलीकडील संशोधनानुसार, प्रचलित जन्म वर्षाच्या एक शतक अगोदर बुद्धांचा जन्म झाल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यात इ.स.पू. 623 – इ.स.पू. 543 हा बुद्धाचा जीवनकाळ मानला गेला आहे.

 

3. मृत्यूनंतर, बुद्धाच्या शरीराचे अवशेष आठ भागात विभागले गेले आणि त्यावर आठ स्तूप बांधले गेले होते.

 

4. बुद्ध” हे वैयक्तिक नाव नसून ती एक सन्माननीय उपाधी आहे, ज्याचा अर्थ “जागृत व्यक्ती” असा होय. बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतम होते.

 

5. जगभरातील 173 कोटी ते 200 कोटी लोक बौद्ध आहेत, जे जगातील लोकसंख्येच्या 22% ते 25% हिस्सा आहेत.

 

6. ज्याप्रमाणे मुस्लिमांसाठी कुराण आणि ख्रिश्चनांसाठी बायबल आहे, त्याप्रमाणे बौद्धांसाठी एकही केंद्रीय धर्मग्रंथ नाही. बौद्ध धर्माचे असंख्य धर्मग्रंथ आहेत, जे कोणीही एक व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यात वाचू शकत नाही. “त्रिपिटक” हा बौद्ध ग्रंथांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.

 

7. बौद्ध धर्माची तीन रत्ने आहेत, ज्यांना “त्रिरत्न” म्हटले जाते –
(i) बुद्ध
(ii) धम्म
(iii) संघ

 

8. बुद्धांचा जन्म लुंबिनी येथील (नेपाळमध्ये) एका सुंदर बागेत वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाला होता.

 

9. इतर धार्मिक प्रथांप्रमाणे, बौद्ध धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीला निर्माता, ईश्वर किंवा देवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नसते. बौद्ध धर्म तीन मूलभूत संकल्पनांवर विश्वास ठेवतो: 1) काहीही शाश्वत नसते, 2) सर्व क्रियांचे परिणाम असतात आणि 3) ते बदलणे शक्य आहे.

 

10. जेव्हा बुद्धांना त्यांच्या शिकवणींचा एका शब्दात सारांश सांगण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले – “जागरूकता.”

 

11. बुद्धांना अनेकदा “महान चिकित्सक” किंवा “महान वैद्य” असे संबोधले जाते. कारण ते प्रामुख्याने मानवी दुःखाचे कारण ओळखण्यासाठी आणि ते दूर करण्याचा मार्ग शोधण्यासाठी ओळखले जातात.

 

12. बुद्धांच्या मते, आनंदाचे रहस्य सोपे आहे: आपल्याकडे जे आहे ते हवे आणि जे नाही ते नको.

 

13. आचार्य ओशो (रजनीश) यांनी म्हटले आहे की, “गौतम बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.”

 

14. मार्को पोलोच्या मते, “जर बुद्ध ख्रिश्चन असते तर ते आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे महान गुरू झाले असते, इतके चांगले आणि शुद्ध त्यांचे जीवन होते.”

 

15. बुद्ध हे कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्चचे एक प्रमाणित संत आहेत.

 

16. जगात एकूण 18 बौद्ध देश आणि प्रजासत्ताक आहेत जिथे बौद्ध धर्म बहुसंख्य आहे. (सूची पहा)

buddhism facts
Distribution of Buddhists Around the World (photo: slideplayer.com)

17. बौद्ध धर्म हा जगातील 6 देशांचा “अधिकृत धर्म” आहे. (सूची पहा)

 

18. बुद्धांना सामान्यत: लांबलचक कानांसह दर्शविले जाते, जे ज्ञान आणि समजूतदारपणाचे प्रतीक आहेत.

 

19. बुद्धांना अनेकदा ज्वालासारखे शिरोभूषण घातलेले चित्रित केले जाते, जे सर्वोच्च ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतिनिधित्व करते.

 

20. बुद्धांच्या शिकवणींना “धम्म” असेही म्हटले जाते, ज्याचा अर्थ शिकवण, सत्य किंवा कायदा असा आहे.

 

21. बौद्ध आत्म्यावर विश्वास करत नाही. हिंदू धर्मात आत्मा हा अमर असल्याची संकल्पना आहे.

 

22. जेव्हा शास्त्रज्ञांनी बौद्ध भिक्खूंच्या मेंदूचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळले की ध्यानाने भिक्खूंच्या मेंदूतील लहरी अशा प्रकारे बदलल्या ज्यामुळे आनंद आणि लवचिकतेची भावना वाढते.

 

23. बुद्धांचे निधन आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर, त्यांची अस्थी (राख) भारतातील त्यांच्या अनुयायांमध्ये विभागली गेली आणि विविध ठिकाणी पुरण्यात आली. प्रत्येक दफन स्थळावर एक मोठा व घुमट-आकाराचा भव्य स्तूप बांधण्यात आला होता.

 

24. भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि पुतळे एक बोधिसत्व म्हणून भगवान बुद्धांच्या समवेत स्थापित केलेले असतात. भारतामधील बौद्ध मंदिरांमध्ये, बौद्ध धम्म परिषदांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये, धार्मिक-सामाजिक मिरवणुकींमध्ये, तसेच सण-उत्सवांमध्ये बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांना एकत्रितपणे ठेवलेले आढळते.

 

25. लोकसंख्या आणि आकारमानानुसार चीन हा जगातील सर्वात मोठा बौद्ध देश असून तेथे जगातील 1.7 अब्ज किंवा 173 कोटी बौद्ध लोकसंख्येच्या 67% बौद्ध राहतात. एका सर्वेक्षणानुसार, चीनची 50% ते 80% लोकसंख्या (72 कोटी ते 1.15 अब्ज लोक) बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. (पहा – सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले 10 देश)

 

26. जगातील दोन सर्वात मोठे उभे असलेले बुद्ध पुतळे अफगाणिस्तानात होते. मात्र, 2001 मध्ये इस्लामिक कट्टरतावादी तालिबानने या विशाल बुद्ध पुतळ्यांना नष्ट केले.

 

27. जगातील सर्वात मोठा बसलेला बुद्ध पुतळा सुमारे इ.स. 800 मध्ये चीनच्या लेशानमधील लिंगयुन टेकडीच्या खडकामध्ये कोरलेला आहे. हा पुतळा सुमारे 230 फूट (70 मीटर) उंच आहे आणि त्याचे खांदे 90 फूट (30 मीटर) लांब आहेत.

 

28. ‘स्प्रिंग टेंपल बुद्ध‘ ही चीनमध्ये असलेली जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती आहे. तिची एकूण उंची 208 मीटर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतरचा हा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा आहे.

 

29. बौद्ध धर्मात “भूत” नाही. त्याऐवजी, एखादी गोष्ट दुःखास कारणीभूत ठरत असेल तर तिला “दुष्ट” मानले जाते. बुद्धाच्या मते, दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला ‘अहंकार’ किंवा ही धारणा की ‘आपण जगापासून वेगळे आहोत’. जेव्हा अहंकार संपतो तेव्हा आनंद सुरू होतो. buddha dharma information in marathi

 

30. बुद्धाची पूजा केली जात नाही. हिंदू धर्माला मानणारे काही लोक बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात, तर बौद्ध लोक बुद्ध ‘मानव’ आहे, असे मानतात.

 

31. बौद्ध धर्मानुसार, यशस्वीरित्या ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर कोणीही व्यक्ती “बुद्ध” बनू शकतो.

 

32. जगातील सर्वात मोठे धर्मांतर मुंबईत झाले, जेव्हा एकाच दिवसात दहा लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 7 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार चैत्यभूमी, मुंबई येथे झाले जेव्हा त्यांच्या पार्थिवाच्या उपस्थितीत त्यांच्या दहा लाखांहून अधिक समर्थकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

 

33. बुद्धाने आपले सर्वाधिक उपदेश कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथे दिले.

 

34. बौद्ध धर्मात, एखाद्या व्यक्तीला त्याच्या पापांपासून वाचवण्यासाठी कोणताही मसिहा येत नाही. केवळ बौद्ध धर्मावर विश्वास ठेवल्याने कोणत्याही प्रकारची कृपा होत नाही; त्याऐवजी, प्रत्येक व्यक्ती त्याचे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.

 

35. बौद्ध धर्मात कमळ हे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. हे आत्मज्ञानाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करते कारण ते गढूळ पाण्यातून प्रकाशाकडे वाढते, अगदी त्याच प्रमाणे जसे ‘बुद्ध’ किंवा ‘ज्ञानी व्यक्ती’ करतात.

 

36. बौद्ध धर्म अनीश्वरवादी (नास्तिक) आहे आणि त्यात आत्म्याची संकल्पना सुद्धा नाही आहे.

 

37. अन्य धर्म संस्थापकांच्या विपरीत, बुद्धांनी ईश्वराच्या जागी मानवी प्रतिष्ठेवर भर दिला आहे.

 

38. बुद्धाचे अनुयायी दोन भागांत विभागले गेले आहेत.

  1.  भिक्खू व भिक्खुनी – ज्या पुरुषांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी संन्यास घेतला त्यांना भिक्खु म्हणतात, तर महिलांना भिक्खुनी म्हणतात.
  2. उपासक व उपासिका – घरगुती जीवन जगत असताना जे पुरुष बौद्ध धर्म स्वीकारतात त्यांना उपासक म्हणतात, तर महिलांन उपासिका म्हणतात. त्यांचे किमान वय 15 वर्षे आहे.

 

39. बहुतांश धर्म स्वतःला सृजन आणि मृत्यू नंतरच्या जीवनाशी संबंधित मानतात. मात्र बौद्ध धर्मामध्ये, सर्वात महत्त्वाची संकल्पना ही की भूतकाळ आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करणे सोडून केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे.

 

40. काही बौद्ध संप्रदाय स्वर्ग आणि नरक यावर विश्वास ठेवतात, मात्र बहुतांश बौद्ध मानतात की स्वर्ग किंवा नरक ही मनाची एक स्थिती आहे. थोडक्यात, आपली जागरूकता स्थानांतरीत करून, आपण चेतनेची एक वेगळी पातळी गाठतो.

 

Interesting facts about Buddhism ( buddha dharma information in marathi )

41. बौद्ध संघातील प्रवेशाला उपसंपदा म्हणतात.

 

42. प्रसिद्ध भारतीय बौद्धांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राहुल सांकृत्यायन, पी. लक्ष्मी नरसू, रामदास आठवले, प्रियंका गांधी, किरेन रिजिजू, प्रकाश आंबेडकर, राजेंद्र पाल गौतम, जी. परमेश्वरा; न्यायमूर्ती भूषण गवई; अर्थतज्ज्ञांमध्ये डॉ. अमर्त्य सेन, डॉ. नरेंद्र जाधव; चित्रपट कलाकारांमध्ये तुषार कपूर, आयुष्मान खुराना, हंसिका मोटवानी, मंदाकिनी, श्रद्धा दास, डॅनी डेन्झोंगपा, अक्षरा हासन, गगन मलिक, उषा जाधव आणि नकुल मेहता यांचा समावेश आहे.

 

43. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी नोंदवले आहे की आशियाई देशांतील बहुसंख्य लोक स्वतःला कोणत्याही धर्माचा भाग न मानता बौद्ध धर्मात किंवा इतर धार्मिक प्रथांमध्ये संलग्न होऊ शकतात. चीन, जपान, कोरीया, वियतनाम यासारख्या देशांमधील जनता तेथील स्थानिक लोकधर्माला (folk religions) मानताना बौद्ध धर्माचे सुद्धा पालन करतात.

 

44. बौद्ध धर्मात रस घेणारे पहिले प्रमुख पाश्चात्य विचारवंत जर्मन तत्त्वज्ञ आर्थर शोपेनहॉवर (1788-1860) हे होते. त्यांनी बौद्ध धर्माला जगातील सर्व विश्व धर्मांपैकी सर्वात तर्कसंगत आणि नैतिकदृष्ट्या विकसित धर्म म्हणून पाहिले.

 

45. जगातील आतापर्यंतचे सर्वात महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की, “भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरीरधारी ईश्वराच्या पलीकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणाऱ्या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. आधुनिक विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे.

 

46. बौद्ध धर्माची चार आर्यसत्य खालीलप्रमाणे आहेत, जी बौद्ध धम्माचा पाया होय. सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती —

  1. जगात दुःख आहे.
  2. त्या दुःखाला कारण आहे.
  3. हे कारण म्हणजे तृष्णा होय.
  4. दुःख निवारण्याचा मार्ग (अष्टांगिक मार्ग) आहे.

 

47. बौद्ध धर्मातच सर्वप्रथम धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती.

 

48. जगातील सर्वात मोठे 3 सामूहिक बौद्ध धर्मांतरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात केले होते. त्यांनी 3 दिवसांत सुमारे 11 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. आंबेडकरांनी 5,00,000 लोकांचे बौद्ध धर्मात धर्मांतर केले, दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी 3,00,000 लोकांचे धर्मांतर केले आणि दुसऱ्या दिवशी 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा 3,00,000 लोकांचे धर्मांतर केले.

 

49. चौथ्या बौद्ध परिषदेनंतर बौद्ध धर्माचे दोन भाग झाले:
(i) हीनयान
(ii) महायान

 

Buddha Dharma information in Marathi

50. आधुनिक जगातील बौद्ध धर्माच्या तीन प्रमुख शाखा आहेत – interesting facts about buddhism

  1. थेरवाद बौद्ध धर्म: श्रीलंका, कंबोडिया, लाओस आणि बर्मा येथे प्रचलित
  2. महायान बौद्ध धर्म: चीन, जपान, तैवान, कोरिया, सिंगापूर आणि व्हिएतनाम येथे प्रचलित
  3. वज्रयान बौद्ध धर्म: तिबेट, नेपाळ, मंगोलिया, भूतान आणि, रशिया आणि उत्तर भारताचा कही भाग येथे प्रचलित

महायान ही सर्वात मोठी शाखा असल्याचे मानले जाते. थेरवाद आणि वज्रयान हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

51. जगातील सर्वात मोठे बुद्ध मंदिर हे इंडोनेशियातील ‘बोरोबुदुर‘ येथे आहे. इंडोनेशिया हा एकेकाळी बौद्ध देश होता मात्र आज तो एक मुस्लिम देश आहे.

 

52. सांसारिक दुःखांपासून मुक्त होण्यासाठी, बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितला, जो मध्यम मार्ग आहे. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीति आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्धिस्टापर्यंत पोहचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणूकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात.

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाणी
  4. सम्यक कर्म
  5. सम्यक उपजीविका
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी

 

53. बौद्ध धर्मानुसार, ‘कर्म’ नैतिक आणि चांगले जीवन जगण्याचा आधार आहे. कर्माला लिफ्टचा एक प्रकार म्हणून पाहिले जाऊ शकते जे लोकांना चेतनाच्या एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाते.

 

54. गौतम बुद्ध यांची माहिती – भगवान बुद्धांशी संबंधित 8 सर्वात महत्त्वपूर्ण स्थान – लुंबिनी, गया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, संकास्य, राजगृह आणि वैशाली हे बौद्ध ग्रंथांमध्ये अष्टमहास्थान या नावाने ओळखले जातात.

 

55. 6 कोटी पेक्षा जास्त भारतीय बौद्ध धर्मीय आहेत, जे भारत देशातील ख्रिश्चन आणि शीख लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. भारताच्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये सुमारे 5 कोटी बौद्धांना ‘हिंदू’ म्हणून नोंदवले गेले आहे, असा दावा अनेक बौद्ध विद्वानांनी केला आहे. (पहा)

 

56. बुद्धांचे शेवटचे शब्द होते, “क्षय सर्व गोष्टींमध्ये अंतर्निहित आहे: मनाच्या स्पष्टतेने (निर्वाणासाठी) प्रयत्न करणे सुनिश्चित करा.”

 

57. दुःखाचे निवारण करणे हे बौद्ध धर्माचे अंतिम ध्येय आहे. चांगुलपणा आणि आनंदासाठी मानवी क्षमता पूर्ण करणे हा दु:ख संपवण्याचा मार्ग आहे.

 

58. कॅथोलिक क्रिश्चन धर्मात पोप सारखा बौद्ध धर्मात कोणताही एक असा सर्वोच्च नेता नाही. परम पावन 14वे दलाई लामा हे जगभरात एक बौद्ध गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत, मात्र ते केवळ तिबेटी (वज्रयान) बौद्ध धर्माचे सर्वोच्च नेते आहेत.

 

59. बुद्धांना राहुल नावाचा एकच मुलगा होता. त्याच्या जन्माच्या काही काळानंतर, बुद्धाने ज्ञान मिळविण्यासाठी आपले कुटुंब सोडले. त्याचा मुलगा नंतर पहिला श्रामनेर (भिक्खू) बनला.

 

60. आशियातील बौद्ध लोक त्यांच्या धर्माचा उल्लेख “बौद्ध धर्म” असा करत नाहीत. ते त्याला धम्म / धर्म (“कायदा”) किंवा बुद्ध-सासन (“बुद्धांची शिकवण”) म्हणतात.

 

61. सर्वाधिक बुद्ध मूर्ती गांधार शैलीत बनवल्या गेल्या होत्या. पण बुद्धांची पहिली मूर्ती मथुरा कला अंतर्गत बनवण्यात आली होती.

 

62. काल्मिकिया हे युरोपमधील एकमेव गणराज्य आहे जेथे बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे.

 

63. लांबीनुसार जगातील सर्वात मोठी मूर्ती चीन मध्ये आहे, जी 1,365 फूट लांबीची विशाल बुद्धमूर्ती आहे. पूर्व चीनमधील जिआंग्शी प्रांतातील यियांग काउंटीमध्ये जगातील सर्वात मोठी झोपलेल्या स्थितीतील बुद्ध मूर्ती आहे, जी 68 मीटर उंच आणि 416 मीटर (1,365 फूट) लांब आहे. ही दगडी महाकाय बुद्ध मूर्ती डोंगराच्या एका प्रचंड खडकातून उभारण्यात आली आहे आणि या पुतळ्याच्या उभारणीचे काम 2002 मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागला.

मूर्ति पहाड़ के मूल आकार का लाभ उठाती है, जो मानव शरीर के समान था। निर्माण कार्य 2002 में शुरू हुआ और इसे पूरा होने में दो साल से अधिक का समय लगा।
World’s largest reclining Buddha statue in Yiyang County, Jiangxi, China – chinadaily.com

64. बौद्ध धर्म हा जगातील पहिला विश्व धर्म तसेच पहिला प्रचारक धर्म होता, जो आपल्या उगम स्थानापासून निघून जगभरात दूरदूरपर्यंत पसरला.

 

65. जगातील सर्वाधिक बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी थायलंड या देशामध्ये आहेत.

 

66. भारतामधील बौद्ध धर्मीयांमध्ये 90 ते 95 टक्के हे आंबेडकरवादी बौद्ध अनुयायी आहेत; आणि उर्वरित 5 ते 10 टक्के हे पारंपरिक बौद्ध अनुयायी आहेत.

 

67. गौतम बुद्ध यांची माहिती – बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाला आणि बुद्धांना ज्ञान प्राप्ती भारतामध्ये झाली, मात्र बौद्ध धर्माशी संबंधित या दोन्ही देशांमध्ये आज बौद्ध धर्म ‘अल्पसंख्यांक धर्म’ आहे.

 

68. गौतम बुद्धांनी सुमारे 1 लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. बुद्धांच्या हयातीतच बुद्धधम्म वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पसरला होता.

 

69. 2022 मध्ये, महाराष्ट्रामधील 6 ते 10 टक्के लोकसंख्या (75 लाख ते 1.57 कोटी) ही बौद्धधर्मीय आहे. कारण महाराष्ट्रातील महार समाजाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, जो महाराष्ट्रातील लोकसंख्येत 9-10% तर राज्यातील अनुसूचित जातींमध्ये त्याचे प्रमाण 70% आहे.

 

70. महाराष्ट्रामधील बौद्ध लोकसंख्या भूतान, मंगोलिया, लाओस, मलेशिया, नेपाळ, रशिया, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडोनेशिया यासारख्या देशांमधील बौद्ध लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

 

71. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात, मौर्य भारतीय सम्राट अशोक याने बौद्ध धर्माला अखंड भारताचा ‘राज्य धर्म’ (state religion) बनवले होते.

 

सारांश (Summary):

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बौद्ध धर्माशी संबंधित रंजक तथ्ये (interesting facts about buddhism in marathi) जाणून घेतली. बौद्ध धर्माची माहिती (buddha dharma information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.


हे ही वाचलंत का?


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

5 thoughts on “बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती

  1. Apan dileli Gautam Budha yanchi mahiti tasech Dr. Babasaheb Ambedker yanchi 14 vidhyapitha la dilelya navachi yadi far avadli.

  2. बौद्ध धर्माबद्दल अत्यंत समर्पक व थोडक्यात खूप सारी माहिती दिली आहे, great

  3. अचुक माहिती दिली. सर्वांनी वाचावे अशी मी मंगल कामना व मंगल मैत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *