2022 ची मराठी विकिपीडिया वरील 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज हे महाष्ट्रातील दोन सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. वर्ष 2022 च्या मराठी विकिपीडियावरील टॉप 20 सर्वाधिक वाचले गेलेले चरित्रलेख अर्थात यांची माहिती आपण या लेखात बघणार आहोत. ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक views असणारे हे लोग महाराष्ट्रीय मराठी जनतेत लोकप्रिय आणि प्रभावशाली आहेत. The 20 Most Viewed Personalities on Marathi Wikipedia in 2022

20 Most Famous People on Marathi Wikipedia in 2022
The Top 20 Most Famous People on Marathi Wikipedia in 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज हे महाष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध दोन व्यक्तिमत्व आहेत. मराठी विकिपीडियावरील दरवर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये हे दोघे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आळीपाळीने येत असतात. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत.

 

2022 मधील ‘मराठी विकिपीडिया‘ वरील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व…

फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील असणाऱ्या साईटच्या फॉलोवर्स आणि सबस्क्राईब दृष्टीने आपण सेलिब्रिटींची लोकप्रियता ठरवीत असतो. आणि सर्वाधिक फॉलोअर्स असणार्‍या प्रसिद्ध व्यक्तींचा नेटकऱ्यांवर मोठा प्रभाव असतो.

अशाप्रकारे विकिपीडियावर सर्वाधिक माहिती ज्या व्यक्तींची वाचली जाते त्यावरून त्या व्यक्तींची लोकप्रियता किंवा प्रसिद्धी ठरवली जात असते. ‘विकिपीडिया’ हा व्यापक माहितीच्या आदान-प्रदानाचं एक माध्यम बनलंय.

आज रोजी दहा कोटी पेक्षा अधिक लोकांची भाषा मराठी आहे. हिंदी आणि बंगाली नंतर भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा म्हणजे मराठी होय. मराठी भाषिक लोक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. मराठीवाचक वर्गामध्ये सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मराठी विकिपीडियाची आकडेवारी विचारात घेतली जाते.

मराठी विकिपीडिया हा विकिपीडियाच्या 318 आवृत्तींपैकी एक आवृत्ती आहे. सर्वाधिक लेख (आर्टिकल्स) असलेल्या 25+ भारतीय विकिपीडियांमध्ये हिंदी विकिपीडिया आणि तमिळ विकिपीडिया नंतर मराठी विकिपीडियाचा तिसरा नंबर लागतो. म्हणजेच मराठी भाषेतली विकिपीडियावरील माहिती प्रचंड प्रमाणावर वाचली जाते हे आपल्याला कळून येईल.

महाराष्ट्रीय किंवा मराठी लोक मराठी विकिपीडियाच्या आवृत्तीवरील लेख मोठ्या संख्येने वाचतात. आणि याच आधारावर आपण मराठी वाचकांनी सर्वाधिक वाचलेल्या मराठी विकिपीडिया वरील 2022 च्या 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची नावे जाणून घेणार आहोत.

या प्रसिद्ध व्यक्तींबद्दलची मराठी विकिपीडियावरील माहिती व चरित्रलेख लाखो वेळा वाचली गेली आहेत. मराठी जनमानसांत कोणकोणत्या प्रसिद्ध व महान व्यक्तींचा प्रभाव आहे, हेही आपल्याला या लेखातून स्पष्ट होईल.

या वीस प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीमध्ये बहुतेक व्यक्तींचे लेख हे दरवर्षी मोठ्या संख्येने वाचली जातात. मात्र दोन-चार लेख दरवर्षी असेही असतात की जे विशिष्ट तत्कालिक कारणांमुळे बहुतांश वेळा वाचली जातात आणि त्यांची गणना वर्षातल्या टॉप 20 सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या चरित्र लेखांमध्ये होते.

मराठी माणूस असला म्हणजे तो एखाद्या प्रसिद्ध व महान मराठी माणसाबद्दलच जास्त माहिती वाचत असतो. परंतु काही अ-मराठी व्यक्ती सुद्धा मराठी वाचकांमध्ये अर्थात महाराष्ट्रीय व्यक्तींमध्ये लोकप्रिय असल्याचे आढळून येते.

 

टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची यादी 

2022 मध्ये मराठी विकिपीडियावर सर्वाधिक व्हुज (वाचकसंख्या) असणार्‍या टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत. ‘बदल’ कॉलममध्ये मागील वर्ष 2021 मधील रँकच्या तुलनेत झालेला बदल दर्शवला आहे.

रँक लेख वाचकसंख्या बदल
1 6,67,598 +1
2 6,64,179 -1
3 2,69,800
4 2,67,095 +6
5 2,65,642 +1
6 2,65,128 -2
7 2,37,464 +1
8 2,36,039 -3
9 2,20,781 -2
10 1,90,426 +2
11 1,89,842 *
12 1,84,191 +2
13 1,64,687 *
14 1,58,360 *
15 1,50,540 -6
16 1,42,978 -3
17 1,33,958 -6
18 1,33,252 -1
19 1,28036 -4
20 1,24,465 -4
संदर्भ

टीप : ‘बदल’मध्ये ‘ * ’ हे चिन्ह केवळ तत्कालीन कारणांसाठी पहिल्यांदाच या यादीत समाविष्ट झालेल्या व्यक्तींसाठी आहे. उदा. सिंधुताई सपकाळ आणि लता मंगेशकर यांचे या वर्षी निधन झाले होते. तर उत्कृष्ट वक्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्या जास्त प्रमाणात प्रकाशझोतात आल्या.

मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय व्यक्तींमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये 5 अ-मराठी (non-marathi) आहेत –  महात्मा गांधी, डॉ. कलाम, गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद.

क्लिओपात्रा या लेखाला 13,46,062 वाचकसंख्या अथवा व्हुज मिळाले असल्याचे दिसते. सॅमसंग अँड्रॉइड स्मार्टफोन व्हॉईस कमांड क्लियोपेट्राचा विकिपीडिया लेख उघडण्याचे सुचवतो. हे एक लोकप्रिय साधन असल्याने, बहुतांश views नकळत घडतात. क्लिओपात्रा लेखाला मिळालेली वाचकसंख्या फसवी असल्याने येथे हा लेख टॉप-20 मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. मागच्या 2022 वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारे या लेखाला याप्रकारे मोठ्या प्रमाणात व्युज मिळाले होते. मराठी विकिपीडिया खैरे खेरीज इंग्लिश विकिपीडिया हिंदी विकिपीडिया आणि इतरही अनेक विकिपीडियांमध्ये अशा प्रकारचे फसवे व्हुज क्लिओपात्रा लेखाला मिळालेले आहेत.

सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वी वर्षनिहाय 2016201720182019, 2020 आणि 2021 मधील top 20 लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारत च्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *