भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024

प्रबुद्ध टीव्ही द्वारे 133व्या भीम जयंतीनिमित्त भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचा स्वरूप, अभ्यासक्रम, तसेच नियम व अटी जाणून घ्या आणि आजच परीक्षेसाठी नाव नोंदणी करा.

भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरिक्षा 2024 - bhimsmaran mahapariksha 2024
भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरिक्षा 2024 – bhimsmaran mahapariksha 2024

प्रबुद्ध टीव्ही द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 (वर्ष 2 रे) आयोजित करण्यात आली आहे. सदर लेखाच्या माध्यमातून, भीमस्मरण परीक्षेचा उद्देश, स्वरूप, अभ्यासक्रम, शुल्क, बक्षीस, आणि नियम व अटी जाणून घ्या आणि परीक्षेसाठी आजच नाव नोंदणी करा. येथे 

    निर्धार वाचण्याचा…
संकल्प वैचारीक भीमजयंतीचा..!

 

वैचारिक आदरांजली

बंधू आणि भगिनींनो,

आधुनिक भारताचे शिल्पकार, घटनाकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 133व्या जयंतीनिमित्त वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी प्रबुद्ध टीव्ही या YouTube चॅनलद्वारे भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाइन महापरीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्य वाचून बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तरुणांना उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठांना कृतिशील होण्याची ऊर्जा मिळावी, असा सम्यक हेतू या परीक्षेमागे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ नाचून नव्हे तर वाचूनही साजरी व्हावी, असा विचार डोळ्यांसमोर ठेवून प्रबुद्ध टीव्हीचे संचालक आयु. प्रवीण दीपक जामनिक हे गेल्या दोन वर्षांपासून अशा ऑनलाईन परीक्षांचे आयोजन करीत आहेत.

 

बक्षिस आणि पारितोषिके

  • प्रथम पारितोषिक
    ₹15,000/- आणि ट्रॉफी व प्रमाणपत्र

 

  • द्वितीय पारितोषिक
    ₹12,500/- आणि ट्रॉफी व प्रमाणपत्र
    (7 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)

 

  • तृतीय पारितोषिक
    ₹10,000/- आणि ट्रॉफी व प्रमाणपत्र

 

  • सर्व सहभागी स्पर्धकांना ई – सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

परीक्षेचा अभ्यासक्रम

भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाइन महापरीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून खालील तीन स्रोत आहेत.

  1. ज.गो. संत द्वारे संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘माझी आत्मकथा‘ पुस्तक (25 प्रश्न)
  2. धम्म भारत‘ वेबसाईटवरील निवडक 40 लेख (20 प्रश्न)
  3. मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर‘ लेख (5 प्रश्न)

 

परीक्षेचे स्वरूप

भीमस्मरण महापरीक्षा 2 भागांत होणार आहे.

1. मुख्य परीक्षा – 19 मे 2024 (ऑनलाईन)
2. अंतिम परीक्षा – 9 जून 2024 (व्हिडिओ कॉन्फरन्स)

 

मुख्य परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे एकूण 50 प्रश्न (100 गुणांसाठी) विचारले जातील आणि कालावधी 45 मिनिटे असेल.

व्हिडिओ कॉन्फरन्सवरील परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे एकूण 15 प्रश्न (30 गुणांसाठी) विचारले जातील, तर याचा कालावधी 15 मिनिटे असेल.

• व्हिडिओ कॉन्फरन्सवरील परीक्षा ही पारदर्शकता आणण्यासाठी आहे.

• परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती अथवा निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

• परीक्षेत सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल.

• परीक्षेची भाषा मराठी असेल.

मुख्य परीक्षेसाठी सर्व सहभागी स्पर्धक पात्र असतील. तर मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारे पहिले 10 स्पर्धक हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरतील.

 

महत्त्वाच्या तारखा

नाव नोंदणी अंतिम दिनांक15 एप्रिल 2024

मुख्य परीक्षा दिनांक19 मे 2024 (रविवार) रोजी दुपारी 1 ते 1.45 दरम्यान असेल.

व्हिडिओ कॉन्फरन्स परीक्षा दिनांक9 जून 2023 रोजी दुपारी 1 ते 1:10 दरम्यान असेल.

स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण दिनांक22 जून 2024 (संत कबीर जयंती) रोजी सायंकाळी 7:00 वा. जाहीर केला जाईल.

 

नियम व अटी

• परीक्षा नोंदणी शुल्क : फक्त ₹100 (शंभर रुपये)

 

1. ही भीमस्मरण महापरीक्षा ‘ऑनलाईन‘ पद्धतीची असल्याने स्पर्धक स्वतःच्या मोबाईल फोनवर घरी बसून ही परीक्षा देऊ शकतात.

2. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाचे किमान वय 7 वर्षे असावे तर जास्तीत जास्त कितीही वयाची व्यक्ती सहभाग घेऊ शकते. (कमाल वयोमर्यादा नाही.)

3. परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे 7 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव असेल. नियम व अटी लागू.

4. परीक्षा लिंक (प्रश्नपत्रिका) रजिस्टर व्हाट्सअप नंबर वरच पाठविल्या जाईल. परीक्षा लिंक प्राप्त करण्यासाठी 7447755627 हा व्हॉट्सॲप क्रमांक सहभागी स्पर्धकाने सेव्ह करून ठेवावा. (अनिवार्य)

5. ही परीक्षा राज्यस्तरीय असल्याने महाराष्ट्र राज्याचे रहिवासीच ‘महाराष्ट्रीय‘ पात्र असतील.

6. मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या दहा स्पर्धकांची व्हिडिओ कॉन्फरन्सवर परीक्षा घेण्यात येईल व त्यातून सर्वोच्च गुण प्राप्त करणार्‍या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल.

7. स्पर्धेचा निकाल संत कबीर जयंतीच्या दिवशी 9 जून 2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता प्रबुद्ध टीव्ही युट्युब चॅनेलवर आणि धम्म भारत वेबपोर्टलवर जाहीर केला जाईल.

8. वरीलपैकी या स्पर्धेचा कुठलाही नियम बदलण्याचा तसेच नवीन नियम बनविण्याचा अधिकार आयोजकास राहील व तो सर्वांना बंधनकारक असेल.

 

भीमस्मरण परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील निवडक 40 लेखांची यादी

 

सहभागी व्हा

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तसेच संपूर्ण माहितीसाठी
7447755627 या आयोजकांच्या WhatsApp क्रमांकावर Registration Link असा मेसेज करावा.

परीक्षार्थींची संख्या मर्यादित असल्याने नाव नोंदणी आजच करावी.


आयोजक व संयोजक

आयोजक : प्रबुद्ध टीव्ही युट्यूब चॅनल (संचालक – प्रवीण दीपक जामनिक)

संयोजक : प्रबुद्ध टीव्हीचे सर्व प्रतिनिधी; युवा फाऊंडेशन अकोला; धम्म भारत वेबसाईट; वंडर किड्स स्कूल, कापशी, अकोला; आशिषभाऊ शिरसाठ विचारमंच; सार्थक वक्तृत्व अकॅडमी, अकोला; संदीप मेश्राम स्पर्धा परीक्षा अभ्यास समूह; साप्ताहिक शांतिसूर्य; अजिंक्य फोटोग्राफी; धम्मिक मॅट्रोमनी ॲप; आणि संबोधी टूर्स.

 

प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित अन्य परीक्षा

गेल्या दोन वर्षांपासून प्रबुद्ध टीव्ही बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होण्यासाठी अशा ऑनलाईन स्पर्धांचे नियमित आयोजन करीत आले आहे. प्रबुद्ध टीव्हीने यापूर्वी आयोजित केलेल्या ऑनलाईन परीक्षा खालीलप्रमाणे आहेत :

1. प्रबुद्ध परिवर्तन राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2022-23

प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित पहिली परीक्षा म्हणजे प्रबुद्ध परिवर्तन राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2022-23. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन-कार्यावर आधारित असलेल्या या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून ज.गो. संत संपादित ‘माझी आत्मकथा’ पुस्तक ठेवण्यात आले होते. ही परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाली होती. यामध्ये एकूण 1273 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

 

2. राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त, राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 2145 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ही परीक्षा 23 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्र, ज.गो. संत द्वारे संपादित बाबासाहेबांचे ‘माझी आत्मकथा’ पुस्तक, ‘मराठी विकिपीडिया’वरील बाबासाहेब आंबेडकर लेख आणि ‘धम्म भारत’ वरील बाबासाहेबांशी संबंधित लेख असे चार स्रोत परीक्षेसाठी अभ्यासक्रम म्हणून ठेवण्यात आले होते.

 

3. राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने, राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा 29 ऑक्टोबर 2023 घेण्यात आली होती. यामध्ये 2087 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ तसेच ‘धम्म भारत’ वेबसाईटवरील बौद्ध धर्मावरील निवडक 30 लेख अभ्यासक्रम म्हणून ठेवण्यात आले होते.


सोशल मीडिया माध्यमे

  • प्रबुद्ध टीव्हीचे लेटेस्ट व्हिडीओ अपडेट मिळवण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. (लिंक क्लिक करा)
  • भीमस्मरण परीक्षेसंबंधी सूचना मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
  • भीमस्मरण परीक्षेचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी सबंधित धम्मभारतच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)

हेही बघा


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *