धम्मज्ञान परीक्षा : व्हिडिओ कॉन्फरन्सवरील आणि 2 सराव परीक्षांच्या उत्तर पत्रिका

29 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा पार पडली. ही परीक्षा प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स यांनी आयोजित केली होती. या मुख्य परीक्षेपूर्वी दोन सराव परीक्षा सुद्धा घेतल्या होत्या आणि मुख्य परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या टॉप 11 स्पर्धकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परीक्षा घेण्यात आली होती. दोन सराव परीक्षा आणि एक व्हिडिओ लाईव्ह परीक्षा अशा एकूण तीन परीक्षांच्या प्रश्न – उत्तर पत्रिका आपण या लेखात बघणार आहोत.

Dhamma exam question answer key
Dhamma exam question answer key

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणि धम्म भारत या वेबसाईटवरील निवडक 30 लेख अभ्यासक्रम म्हणून या परीक्षेसाठी ठेवण्यात आले होते. सगळ्या वयोगटातील दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी ही ऑनलाईन धम्मज्ञान महापरीक्षा दिली.

ही मुख्य परीक्षा होण्यापूर्वी आयोजकांनी दोन सराव परीक्षा (प्रत्येकी 10 प्रश्न) सुद्धा स्पर्धकांच्या घेतल्या होत्या. पहिली सराव परीक्षा ही 22 ऑक्टोबर रोजी तर दुसरी ही 23 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. (त्यानंतर पुढे 29 ऑक्टोबर रोजी मुख्य परीक्षा (50 प्रश्न) पार पडली, आणि 5 नोव्हेंबर रोजी या मुख्य परीक्षेची उत्तर पत्रिका सुद्धा जाहीर करण्यात आली.)

मुख्य परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या टॉप 11 स्पर्धकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परीक्षा 14 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेची सुद्धा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका येथे समाविष्ट आहे.

चला तर जाणून घेऊया आयोजकांनी घेतलेल्या तीन परीक्षांच्या एक एक उत्तर पत्रिका….

 


व्हिडिओ कॉन्फरन्स परीक्षा : उत्तर पत्रिका

(मुख्य परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या टॉप 11 स्पर्धकांची ही व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेली परीक्षा होती.

14 नोव्हेंबर 2023 : एकूण 10 प्रश्न, 20 गुण आणि 10 मिनिटे वेळ; ग्रंथावर 7 प्रश्न तर वेबसाईटवर 3 प्रश्न विचारले होते. या अंतिम स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे 3 विजेते ठरवण्यात आले आहेत.) 

 

प्रश्न 1 : ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात पूर्व भारतातील स्थिती दर्शविणारे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

1) तेव्हा राजाची सत्ता असलेली एकूण 16 राज्ये होती.
2) तेव्हा राजाची सत्ता नसलेली देखील राज्ये होती, ज्यांना ‘संघ’ म्हणत.
3) तेव्हा मगध राज्य हे एक ‘जनपद’ होते.
4) तेव्हा कपिलवस्तू हे एक ‘गणतंत्र’ राज्य होते.

A) 1 व 3 बरोबर, आणि 2 व 4 चूक
B) 2 व 4 बरोबर, आणि 1 व 3 चूक
C) 1, 2, 3 व 4 बरोबर (सर्व बरोबर)
D) 1, 2, 3 व 4 चूक (सर्व चूक)

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 1, भाग 1, प्रकरण 1


प्रश्न 2: अविद्या नष्ट करण्यासाठी दुःखदायक कारागृहातून बाहेर जाणाऱ्या दारापर्यंत पोहचून पुढील मार्ग मोकळा करणे, याला काय म्हणतात?

A) सम्यक दृष्टी
B) सम्यक व्यायाम
C) सम्यक स्मृती
D) सम्यक संकल्प

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 2, भाग 2, प्रकरण 4, बिंदू 32


प्रश्न 3 : तथागत बुद्धांचा ‘हेतूवाद’ हा कोणत्या विद्वानाच्या विचाराचे खंडन करतो?

1. मख्खली गोसाल
2. अजीत केशकंबल
3. पकुध कच्चान

A) फक्त (1) बरोबर
B) फक्त (2) बरोबर
C) (1), (2), (3) तिन्ही बरोबर
D) (1), (2), (3) तिन्ही चूक

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 3, भाग 4, प्रकरण 1, बिंदू 9


प्रश्न 4 : वैदेही पुत्र म्हणून कोणास ओळखले जाते?

A) राजा अजातशत्रू
B) राजा प्रसेनजित
C) महाकश्यप
D) जिवक

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 4, भाग 5, प्रकरण 3, बिंदू 2


प्रश्न 5 : गृहस्थी जीवन जगणाऱ्यांसाठी (उपासकांसाठी) अत्यंत आवश्यक म्हणून खालीलपैकी काय सांगितले आहे?

अ) विपश्यना
ब) अष्टांग मार्ग
क) कर्म सिद्धांत
ड) पारमिता
इ) पंचशील
फ) प्रत्युत समुत्पाद

A) ब, क, आणि फ
B) अ, क, आणि ड
C) केवळ इ
D) ब, ड, आणि इ

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 5, भाग 4, प्रकरण 3, बिंदू 9


प्रश्न 6 : भगवान बुद्धांनी धम्म प्रचारार्थ अनेक स्थळांना काही वेळा भेटी दिल्या होत्या. “स्थळे आणि बुद्धांच्या भेटींची संख्या” अशाप्रकारे योग्य जोड्या जुळवा.

1. कपिलवस्तू    अ) 75
2. श्रावस्ती        ब) 24
3. राजगृह         क) 4
4. कम्मासधम्म   ड) 6

A) 1 – क, 2 – अ, 3 – ब, 4 – ड
B) 1 – ड, 2 – अ, 3 – ब, 4 – क
C) 1 – ड, 2 – ब, 3 – अ, 4 – क
D) 1 – ब, 2 – क, 3 – ड, 4 – अ

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 7, भाग 1, प्रकरण 1


प्रश्न 7 : तथागत गौतम बुद्धांनी खालील वाक्य कोणास उद्देशून वापरले आहे?

“सग्यासोयऱ्यांची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”

A) राजा शुद्धोधनास
B) यशोधरेस
C) भिक्खुंना
D) गृहस्थांना

 

संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म — खंड 8, भाग 3, प्रकरण 4, बिंदू 9


प्रश्न 8 : भारतीय जनगणनेनुसार, 2001 ते 2011 या दहा वर्षांच्या कालावधीत …… आणि ……. .

(अ) भारतातील बौद्धांची संख्या 7 लाखांनी वाढली.
(ब) महाराष्ट्रातील बौद्धांची संख्या 5 लाखांनी वाढली.
(क) भारतातील बौद्धांची संख्या 5 लाखांनी वाढली.
(ड) महाराष्ट्रातील बौद्धांची संख्या 7 लाखांनी वाढली.

A) अ आणि ब बरोबर
B) अ आणि ड बरोबर
C) क आणि ड बरोबर
D) ब आणि क बरोबर

 

संदर्भ : धम्म भारत — लेख क्र. 13 : भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?


प्रश्न 9 : 2022 वर्षामधील, मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 चरित्रलेखांमध्ये गौतम बुद्ध यांचे स्थान कितवे (किंवा कोठे) होते?

A) टॉप 5 मध्ये (1-5 व्यक्तींमध्ये)
B) टॉप 10 मध्ये (6-10 व्यक्तींमध्ये)
C) टॉप 15 मध्ये (11-15 व्यक्तींमध्ये)
D) टॉप 20 मध्ये (16-20 व्यक्तींमध्ये)

 

संदर्भ : धम्म भारत — लेख क्र. 19 : 2022 वर्षातील मराठी विकिपीडिया वरील 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व


प्रश्न 10 : खाली काही देशांची नावे दिली आहेत. जास्त बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांकडून कमी बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांकडे (उतरत्या क्रमाने) जाणारा योग्य पर्याय निवडा. 

A) जपान, थायलंड, कंबोडिया, श्रीलंका
B) थायलंड, जपान, कंबोडिया, श्रीलंका
C) जपान, थायलंड, श्रीलंका, कंबोडिया
D) थायलंड, जपान, श्रीलंका, कंबोडिया

 

संदर्भ : धम्म भारत — लेख क्र. 6 : जगातील ‘या’ 10 देशांत राहतात सर्वाधिक बौद्ध




धम्मज्ञान सराव परीक्षा 1 : उत्तर पत्रिका

(22 ऑक्टोबर 2023 : एकूण 10 प्रश्न, 20 गुण आणि 15 मिनिटे वेळ; ग्रंथावर 8 प्रश्न तर वेबसाईटवर 2 प्रश्न विचारले होते.) 

➖➖➖➖➖➖➖➖➖

1. सिद्धार्थ गौतमास सांख्य तत्त्वज्ञानाची तत्त्वे कोणी स्पष्ट केली?
पर्याय
A) भृगूऋषी
B) आलारकालाम ✅
C) उद्दक रामपुत्त
D) कौंडिण्य

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-1)

➖➖➖➖➖➖➖➖➖

2. धम्माचा प्रथम उपदेश गौतम बुद्धांनी कोठे दिला?
पर्याय
A) बुद्ध गया
B) राजगृह
C) सारनाथ ✅
D) वैशाली

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-2)

➖➖➖➖➖➖➖➖➖

3. हिंसा न करणे, चोरी न करणे आणि मिथ्याचार न करणे हे कोणत्या शुचितेमध्ये येते?
पर्याय
A) वाक् शुचिता
B) देहशुचिता ✅
C) मनःशुचिता
D) यापैकी नाही

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-3)

➖➖➖➖➖➖➖➖➖

4. धम्माचा उत्तराधिकरी म्हणून कुणास नेमण्यात आले?
पर्याय
A) भंते आनंद
B) भंते उपाली
C) भंते काश्यप
D) यापैकी नाही ✅

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-3)

➖➖➖➖➖➖➖➖➖

5. बुद्धांचे उपदेश जसेच्या तसे पाठ करून ठेवत असलेल्या भिक्खुला काय म्हणत असत?
पर्याय
A) दायक
B) वाचक
C) भणक ✅
D) वृत्त कथक

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-4)

➖➖➖➖➖➖➖➖➖

6. भिक्खू होण्यास कोणत्या दोन अवस्थांतून जावे लागते?
पर्याय
A) गृहत्याग आणि परीव्रज्या
B) परीव्रज्या आणि उपनयन
C) गृहत्याग आणि उपसंपाद
D) परीव्रज्या आणि उपसंपदा ✅

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-5)

➖➖➖➖➖➖➖➖➖

7. तथागत गौतम बुद्धांनी अंतिम धम्म दीक्षा कुणास दिली?
पर्याय
A) न्हावी उपाली
B) परिव्राजक सुभद्र ✅
C) पटीसेनास
D) यापैकी नाही

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-7)

➖➖➖➖➖➖➖➖➖

8. बौद्धधर्म (Budhism) या ग्रंथाचे लेखक कोण?
पर्याय
A) श्री. ई.जे. मिल्स ✅
B) श्री. रेव्हरँड लेस्ली
C) प्रा. डब्लू.टी. स्टेस
D) श्री. ई.जी. टेलर

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, उपसंहार)

➖➖➖➖➖➖➖➖➖

9. जगातील पहिली बौद्ध महिला राष्ट्रपती कोण आहे/होती?
पर्याय
A) सिरिमावो भंडारनायके
B) त्साई इंग-वेन
C) चंद्रिका कुमारतुंगा ✅
D) आँग सान सू क्यी

संदर्भ – धम्म भारत, लेख लिंक

➖➖➖➖➖➖➖➖➖

10. महायान बौद्ध धर्माचे अनुयायी खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात?
अ) थायलंड व म्यानमार
ब) जपान व तैवान
क) चीन व श्रीलंका
पर्याय
A) फक्त अ
B) फक्त ब ✅
C) अ आणि ब
D) अ, ब, आणि क

(संदर्भ – धम्म भारत, लेख लिंक)

➖➖➖➖➖➖➖➖➖


धम्मज्ञान सराव परीक्षा 2 : उत्तर पत्रिका

(23 ऑक्टोबर 2023 : एकूण 10 प्रश्न, 20 गुण आणि 15 मिनिटे वेळ; ग्रंथावर 8 प्रश्न तर वेबसाईटवर 2 प्रश्न विचारले होते.)

1. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारतात किती जनपद होती?
पर्याय
A) 14
B) 16 ✅
C) 18
D) 12

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 1)

➖➖➖➖➖➖➖➖➖

2. धम्माचा उपदेश देण्याच्या विचाराने भगवान बुद्धांना प्रथम कुणाची आठवण झाली?
पर्याय
A) उद्दक रामपुत्त
B) आलारकलाम ✅
C) ५ परिव्राजक
D) भल्लिक

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 2)

➖➖➖➖➖➖➖➖➖

3. बुद्धपूर्व लोक निब्बाण (निर्वाण) म्हणजे काय समजायचे?
पर्याय
A) मृत्यू्
B) ईश्वर प्राप्ती
C) आत्म्याचा मोक्ष ✅
D) दिव्यशक्ती प्राप्त करणे

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 3)

➖➖➖➖➖➖➖➖➖

4. अहिंसा या तत्त्वासोबत कशाचा जिव्हाळ्याचा संबंध आहे?
पर्याय
A) करुणा आणि प्रेम
B) करुणा आणि प्रज्ञा
C) मैत्री आणि प्रज्ञा
D) मैत्री आणि करुणा ✅

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 4)

➖➖➖➖➖➖➖➖➖

5. तर्जनीय कर्म म्हणजे काय?
पर्याय
A) बहिष्कार टाकणे
B) संघातून हकालपट्टी करणे
C) वेडा म्हणून जाहीर करणे
D) वरीलपैकी एकही नाही ✅

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 5)

➖➖➖➖➖➖➖➖➖

6. व्रतग्रहण म्हणजे काय?
पर्याय
A) वासना, असूया, अहंकार ह्यांचे नियमन
B) कुविचारांचे निर्मूलन
C) पर्याय A आणि B ✅
D) वरीलपैकी एकही नाही

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 6)

➖➖➖➖➖➖➖➖➖

7. तथागत बुद्धांनी राजगृहास किती वेळा भेटी दिल्या होत्या?
पर्याय
A) सुमारे 34 वेळा
B) सुमारे 36 वेळा
C) सुमारे 24 वेळा ✅
D) सुमारे 22 वेळा

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 7)

➖➖➖➖➖➖➖➖➖

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी Buddhism चा अभ्यास करण्यास कोणते 3 ग्रंथ सांगितले आहेत?
पर्याय
A) त्रिपिटक, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध चरित्र
B) बौद्धधर्म नीतिशास्त्र, Buddhism, Buddhism and Modern Thoughts
C) सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक
D) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध की कार्ल मार्क्स ✅

(संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रस्तावना)

➖➖➖➖➖➖➖➖➖

9. खालील विधानांचा विचार करा.
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे धर्मांतराची घोषणा केली त्याला क्रांतिभूमी म्हणतात.
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे धर्मांतर केले त्याला दीक्षाभूमी म्हणतात.

पर्याय
A) फक्त अ बरोबर
B) फक्त ब बरोबर ✅
C) अ आणि ब दोन्ही बरोबर
D) अ आणि ब दोन्ही चूक

(संदर्भ – धम्म भारत, लेख लिंक )

➖➖➖➖➖➖➖➖➖

10. खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये बौद्ध धर्म हा राज्य धर्म (State Religion) आहे?
अ) भूतान
ब) जपान
क) कंबोडिया
ड) म्यानमार
पर्याय
A) अ आणि ब
B) अ, क आणि ड ✅
C) ब, क आणि ड
D) अ, ब, क आणि ड

(संदर्भ – धम्म भारत, लेख लिंक )


हे ही बघा 


परीक्षेचा अंतिम निकाल 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी प्रबुद्ध टीव्ही युट्यूब चॅनलवर तसेच या धम्म भारत वेबसाईटवर जाहीर केला. 


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *