मॉरिशस मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा | Dr Ambedkar Statue in Mauritius

नुकतेच मॉरिशसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे (Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius) अनावरण करण्यात आले. ही भारतीयांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची घटना आहे.

 इस लेख को हिंदी में पढ़ें

Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius
मॉरिशसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा – Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius (Twitter)

भारताखेरीज जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुमारे 20 पुतळे आहेत. आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या पाच खंडांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. अलीकडेच रशियातील मॉस्को शहरामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

 

मॉरिशस मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

28 सप्टेंबर 2022 रोजी मॉरिशस (Mauritius) येथील मोका शहरातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपम यांच्या हस्ते झाले. पहिल्यांदाच राष्ट्रपती सारख्या अत्युच्च पदावरील व्यक्तीने बाबासाहेबांच्या विदेशातील पुतळ्याच्या अनावरण केले आहे.

Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius
Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius

अनावरणाच्या वेळी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रूपन, उपपंतप्रधान लिलादेवी डुकून, परराष्ट्रमंत्री एलन गणू, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद, मॉरिशसच्या मोकाचे जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष सुधीरचंद्र सूनराने, नितीन बाप्पू आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास भारतातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जेष्ठ पत्रकार, विचारवंत व पत्रकार उत्तम कांबळे, माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू विजय खरे, आभास थोरात, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्राचार्य प्रकाश कुंभार, सुरेश गोरेगावकर, सौ. सीमाताई आठवले, जित आठवले हे उपस्थित होते.

 

फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, पुणे तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा (Ambedkar Statue in Mauritius) मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनला प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे मोका मॉरिशस मधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केला होता.

 

Dr Ambedkar Statue in Mauritius

महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित सोहळ्यात “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सोशल वर्क अवॉर्ड” पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रसन्न देशमुख, संतोष बारणे, सुवर्णा पवार, सुरेश गोरेगावकर आदींना मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रूपन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बाबासाहेबांच्या या पुतळ्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीयांनी लोकवर्गणीतून हा पुतळा मॉरिशस देशाला भेट दिला.

Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius
Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius

मॉरिशस मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारावे त्यासाठी मॉरिशस सरकारने जमीन द्यावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग रूपन यांच्याकडे केली.

मॉरिशस हा हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. त्याची लोकसंख्या साडेबारा लाखापेक्षा अधिक असून त्यातील 67% लोक भारतीय वंशाचे आहेत. येथे 49% हिंदू, 33% ख्रिश्चन, 17% मुस्लिम आणि इतर अन्य धर्माचे लोक राहतात.


बाबासाहेबांच्या नावातील मोठी चुकी

मॉरिशसमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारलाय ही आनंदची बातमी कानावर येत असताना याच संबंधित एक अत्यंत चुकीची गोष्ट सुद्धा निदर्शनास आली आहे. मॉरिशसमधील या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या नेम प्लेटवर त्यांचे नाव “डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर” असे अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे!!

आपण डॉ. आंबेडकरांसाठी ‘बाबासाहेब’ हे नाव “सर्वनाम” म्हणून वापरतो. त्यामुळे त्याचा वापर हा [भीमराव] नामाऐवजी करावा, नामासोबत नव्हे.

त्यामुळे त्यांचे नाव एकतर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” लिहायला पाहिजे किंवा “डॉ. भीमराव आंबेडकर” लिहायला पाहिजे, किंवा “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” वा “डॉ. बी. आर. आंबेडकर” असेही लिहिले असते तरी चालले असते.

काही हिंदी लोक “बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर” आणि “बाबासाहेब डॉ. आंबेडकर” असेही चुकीच्या पद्धतीने उल्लेख करताना आढळतात. बाबासाहेब हे नाव विशिष्ट आहे, त्याला विशिष्ट पद्धतीने लिहिले जाते, याची कल्पना पुतळा समितीला असू नये, याचे नवल वाटते.

Ambedkar statue Mauritius
A mistake in Ambedkar name

ज्याप्रमाणे “मोहनदास करमचंद गांधी” यांच्यासाठी “महात्मा गांधी” नाव वापरले जाते, आणि “महात्मा मोहनदास गांधी” असे वापरले जात नाही. अगदी त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे नाव सुद्धा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” वापरले जाते “डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर” नव्हे.

वल्लभभाई पटेल यांच्यासमोर “सरदार” जोडून “सरदार वल्लभभाई पटेल” लिहिले जाऊ शकते, नेहरूंच्या समोर “पंडित” लिहून “पंडित जवाहरलाल नेहरू” लिहिले जाऊ शकते, मात्र बाबासाहेबांच्या प्रकरणात असे करता येत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

यामुळे शासन-प्रशासनाने ही गंभीर चूक दुरुस्त करावी आणि या मॉरिशसमधील पुतळ्याच्या नेम प्लेटवरील “डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर” हे नाव वगळून त्याऐवजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” किंवा “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” असे समर्पक नाव द्यावे, ही आग्रही मागणी व विनंती समाज बांधव करीत आहेत.


मॉरिशसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची (Dr Babasaheb Ambedkar Statue in Mauritius) माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. लवकरच बाबासाहेबांच्या विदेशातील सर्व पुतळ्यांविषयी माहिती देणारा लेख आपल्यासमोर सादर केला जाईल.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

One thought on “मॉरिशस मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा | Dr Ambedkar Statue in Mauritius

  1. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. भीमराव रामजी आंबेडकर किंवा विश्वरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर असे नाव लिहिलं जावे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *