भारतातील बौद्ध गायक आणि गायिकांची यादी | Buddhist singers in India

या लेखामध्ये भारतातील बौद्ध धर्मीय गायक आणि गायिकांची माहिती दिली गेली आहे. ह्या व्यक्ती भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध बौद्ध सेलिब्रिटी आहेत. – Buddhist singers in India

Famous Buddhist singers in India

बौद्ध धर्म हा बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. जगभरात अब्जावधी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. आपल्या भारत देशामधील विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी हे बौद्ध धर्मीय असल्याचे आढळतात. यापूर्वी आपण भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांबद्दल माहिती पाहिली आहे. आजच्या लेखामध्ये आपण भारतातील 25+ बौद्ध गायक आणि गायिकांबद्दल जाणून घेणार आहोत. Buddhist celebrities in India

भारतात अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये गीते बनवली जातात, आणि अशा विविध भारतीय भाषांमध्ये गीत गाणाऱ्या प्रसिद्ध बौद्ध सेलिब्रिटींचा समावेश या लेखात केलेला आहे. यातील अनेक गायक किंवा संगीतकार बौद्ध पार्श्वभूमीचे आहेत, तर काही सेलिब्रिटींनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. हे बौद्ध सेलिब्रिटी – बुद्धिस्ट सिंगर्स वेगवेगळ्या बौद्ध संप्रदायांचे पालन करणारे आहेत. आपल्या देशातील बौद्ध गायक आणि गायकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

 

 

भारतीय बौद्ध गायक व गायिका

Buddhist celebrities – Buddhist singers in India

1. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant)

Buddhist singers in India abhijeet sawant
Getty Images

अभिजीत सावंत (जन्म 1981) हा एक भारतीय गायक, अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडॉल (सीझन 1) चा विजेता आहे. तो ‘जो जीता वही सुपरस्टार’चा पहिला उपविजेता होता आणि एशियन आयडॉलमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावला होता. मुंबईतील एका मराठी बौद्ध कुटुंबात जन्मलेला अभिजीत अप्रतिम गायक आहे. तो हिंदी अणि मराठी गाणी गातो. buddhist celebrities

 

 

2. आदर्श शिंदे (Adarsh Shinde)

Strar pravah

आदर्श शिंदे (जन्म 1988) हा एक मराठी पार्श्वगायक आहे. त्याने अनेक आंबेडकरी गाणी (भीम गीते), बुद्ध गीते आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बौद्ध समाजातून तो आलेला आहे. तो मराठी लोकगीते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. आदर्श शिंदे हा आंबेडकरी चळवळीचा वारसा भीम गीतांच्या माध्यमातून तेवत ठेवणाऱ्या शिंदे कुटुंबातील एक सदस्य आहे. आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे, आणि काका मिलिंद शिंदे या दिग्गज गायकांचा वारसा तो पुढे चालवत आहे. Buddhist singers in India

 

 

3. शिबानी कश्यप (Shibani Kashyap)

buddhist celebrity
NDA India

शिबानी कश्यप (जन्म 1979) ही एक भारतीय गायिका आहे, जी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिने बाथरूम सिंगर नावाच्या रिअलिटी  सिंगिंग शोला जज (परीक्षक) देखील केले आहे. ही एक बौद्ध धर्म अनुसरणारी सेलिब्रिटी आहे. (संदर्भ – 1, 2) Celebrities who converted to Buddhism

 

 

4. अभिजीत कोसंबी (Abhijeet Kosambi)

meetkalakar.com

अभिजीत कोसंबी (जन्म 1982) हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने 2007 साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला ‘महागायक’ होण्याचा सन्मान मिळविला. तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो.

 

 

5. मियांग चँग (Meiyang Chang)

Buddhist actor Meiyang Chang
Getty Images

मियांग चँग (जन्म 1982) हा एक भारतीय अभिनेता, टेलिव्हिजन होस्ट, गायक आणि दंतचिकित्सक आहे. तो तिसऱ्या पिढीचा भारतीय-चीनी आहे, ज्याचे मूळ चीनच्या हुबेई प्रांतात आहे. त्याचा जन्म झारखंडमधील एका बौद्ध कुटुंबात झाला होता आणि तो स्वतःला देखील बौद्ध मानतो. हिंदी चित्रपटसृष्टी मधील हा अभिनेता आणि गायक असे दोन्ही वैशिष्ट्य असलेला बौद्ध सेलिब्रेटी आहे. buddhist celebrities  Buddhist singers in India

 

 

6. वैशाली माडे (Vaishali Mhade)

Vaishali-Mhade-buddhist celebrity
News Bugz

वैशाली भैसने-माडे (जन्म 1984) या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे 24 ऑगस्ट 1984 रोजी एका गरीब बौद्ध कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. माडे या दूरचित्रवाणीवर 2008 साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. buddhist celebrities in india

हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीम गीते गायली आहेत.

 

 

7. आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)

buddhist actors in marathi
Getty Images

आयुष्मान खुराना (जन्म 1984) हा एक भारतीय अभिनेता, गायक, लेखक आणि टेलिव्हिजन होस्ट आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने अनेक गाणी गायली आहे. तो निचिरेन बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. त्यांची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) देखील निचिरेन बौद्ध धर्माचे पालन करते. आयुष्मान हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांचा विजेता आहे. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 2013 आणि 2019च्या फोर्ब्स इंडियाच्या Celebrity 100 यादीत तो दिसला आहे. टाइम मॅगझिनने 2020 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्याचे नाव नोंदवले आहे. Buddhist singers in India

बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप या पती-पत्नीला बौद्ध धर्मानेच कर्करोगाविरुद्धच्या लढाईत त्याला शह देण्यासाठी इंधन पुरवले आहे. बौद्ध धर्माने खुरानाला अभिनेता म्हणून त्याचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यात मदत केली आहे, असे आयुष्मान  सांगतो. “मी निचरेन बौद्ध धर्माचे पालन करते. याने मला शिकवले की तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे. त्याचा प्रभाव तुमच्या भौतिक अस्तित्वावर पडत असतो. ते (कर्करोग) माझ्यासाठी किरकोळ निराशाजनक होते. पण मी ते मनापासून स्वीकारले. मी ठरवले की मी नकारात जगणार नाही आणि ते जगापासून लपवणार नाही,” असे ताहिरा सांगते, ज्यांना उच्च दर्जाच्या घातक पेशी असलेल्या DCIS आढळून आले होते. (संदर्भ – 1, 2, 3, 4)

 

 

8. श्रद्धा दास (Shraddha Das)

shraddha das buddhist actress
Getty Images

श्रद्धा दास (जन्म 1989) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे जी तेलुगु, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम सारख्या विविध चित्रपट उद्योगांमध्ये दिसली. याशिवाय तिने अनेक गाणी गायली आहे. श्रद्धा बौद्ध धर्माचे पालन करते आणि अभिनेत्री पूनम बाजवा हिने तिची ओळख बौद्ध धर्माशी करून दिली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ती स्वतः बौद्ध असल्याचे सांगितले होते. indian celebrities following nichiren buddhism

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचा परिणाम रस्त्यावरील माणसांइतकाच सेलिब्रिटींवर देखील झाला आहे. तेव्हा श्रद्धा दास मुंबईत होती आणि कठीण काळ होता, परंतु बौद्ध मंत्र तिला त्या परिस्थितीचा सामना करण्यास मदत करत असे.

“ते 20 दिवस सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते आणि चिंतेने माझ्याकडून बरेच काही घेतले.” श्रद्धा म्हणते की ती बौद्ध धर्माचे पालन करत आहे आणि जर असे झाले नसते तर ती वेडी झाली असती. मी “नाम म्योहो रेंगे क्यो” चा जप करते. हे मला शांती, शक्ती देते आणि मला संयमित ठेवते,” ती सांगते. (स्रोत – 1, 2, 3)

 

 

9. नंदेश उमप (Nandesh Umap)

buddhist singer nandesh umap
nandeshumap.com

नंदेश उमप हे मराठी गायक आणि लोककलाकार आहेत. ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्म यांना मानणारे आहेत. त्यांच्या वडिलांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता, त्याचाच प्रभाव नंदेश यांच्यावर सुद्धा झालेला आहे. हे एक महाराष्ट्रातील मराठी बौद्ध गायक व लोककलाकार आहेत. Buddhist singers in India

 

 

10. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar)

marathi buddhist Surekha Punekar
CONTESTANT.IN

सुरेखा पुणेकर (जन्म 1978) या मराठी लोककलाकार आहेत ज्या त्यांच्या लावणी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक मराठी लावण्या सादर केले आहेत ज्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. सुरेखा पुणेकर बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत. buddhist celebrities in bollywood

 

 

11. आनंद शिंदे (Anand Shinde)

tv9 Marathi

आनंद शिंदे (जन्म 1965) हा महाराष्ट्रातील एक मराठी गायक आहे. आंबेडकरी गीते, बौद्ध गीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक हजाराहून अधिक गाणी गायली आहेत आणि 250+ चित्रपटांमध्ये गायली आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांच्या कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. indian buddhist celebrities

 

 

12. कडूबाई खरात (Kadubai Kharat)

buddhist celebrities in marathi kadubai kharat
YouTube

कडूबाई खरात या मराठी लोकगायिका आणि भीमगायिका आहेत. त्यांनी अनेक भीमगीते गायली आहेत. भिमान माय सोन्यान भरली ओटी, तुम्ही खाता त्या भाकरीवर, कुंकू लावील रमानं, आमचा मास्तर शिकवतो यासारखी अनेक गाणी यांनी गायलेली आहेत जी महाराष्ट्रातील बौद्ध रसिकांमध्ये खूप लोकप्रिय सुद्धा झाली. त्यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला होता, मात्र नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. (स्रोत) famous buddhist celebrities

 

 

13. संभूलाल चकमा (Sambhulal Chakma)

Sambhulal-Chakma buddhist celebrity
Sambhulal Chakma Tweeter

संभूलाल चकमा (जन्म 1989) हे भारतातील चकमा गायक आणि राजकारणी आहेत. ते त्रिपुरा विधानसभेत चावमानू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. ते चकमा या बौद्ध समाजातून येणारे गायक आहेत. famous buddhist celebrities

 

 

14. शीतल साठे (Sheetal Sathe)

buddhist singers in india
alchetron.com

शीतल साठे (जन्म 1986) या मराठी लोक गायिका, लेखिका आणि दलित हक्क कार्यकर्त्या आहेत. ती कबीर कला मंच आणि नवयान महाजलसाची प्रसिद्ध आणि महत्त्वाची गायिका आहे. त्यांचा जन्म एका मातंग (दलित समाज) कुटुंबात झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्या बौद्ध धम्माला मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नवयान बौद्ध धर्माचे नाव आपल्या कला मंचाला दिले आहे. त्यांचे पती सचिन माळी सुद्धा कवी आणि शाहीर आहेत. Celebrities who converted to Buddhism

 

 

15. मिलिंद शिंदे (Milind Shinde)

buddhit celebrities
tv9 Marathi

मिलिंद शिंदे (जन्म १९६२) हा महाराष्ट्रातील एक उल्लेखनीय मराठी गायक आहे, जे आंबेडकरी/भीम गीते, बौद्ध गीते, भक्तीगीते आणि चित्रपट गीतांसाठी प्रसिद्ध आहेत.

 

 

16. प्रल्हाद शिंदे (Prahlad Shinde)

Bol Bhidu

प्रल्हाद भगवानराव शिंदे (1933 – 2004) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी गायक होते. ते भक्तिगीते, आंबेडकरी गीते आणि कव्वालीसाठी प्रसिद्ध होते. गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे त्यांचे पुत्र, तर आदर्श शिंदे हा त्यांचा नातू होय. शिंदे कुटुंबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे आणि ते बौद्ध धर्माचे पालन करतात. Buddhist singers in India

 

 

17. सीमा पाटील (Seema Patil)

Buddhist celebrities
mumbailive.com

सीमा पाटील या मराठी लोकगीतकार (शाहीर) आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 6,000 हून अधिक प्रयोग केले आहेत. शाहीर सीमा पाटील यांचा जन्म हिंदू ओबीसी कुटुंबात झाला. परंतु बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी अशोक विजया दशमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. याच दिवशी 1956 मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. (स्रोत) Celebrities who converted to Buddhism

 

 

18. उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde)

 buddhist celebrities
arealnews.com

डॉ. उत्कर्ष शिंदे (जन्म 1986) हे महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक आंबेडकरी गीते [भीमगीते], चित्रपटगीते आणि लोकगीते गायली आहेत, तसेच अनेक गीते रचली देखील आहेत. ते गायक आनंद शिंदे यांचे पुत्र आणि आदर्श शिंदे यांचे मोठे बंधू आहेत. buddhist singers

 

 

19. संभाजी भगत (Sambhaji Bhagat)

buddhist celebs Sambhaji Bhagat and his troupe at a show in Nashik
The Indian Express

संभाजी भगत (जन्म 1959) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहेत. त्यांनी अनेक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजी भगत यांनी बरीच व्याख्याने दिली आहेत. buddhist celebrities in india

 

 

20. सायली कांबळे (Sayli Kamble)

सायली कांबळे (जन्म 1997) ही एक मराठी गायिका आहे. तिने अनेक म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, ज्यात स्टार प्लसच्या मुलांचे गाणे या रिअॅलिटी टीव्ही शो अमूल व्हॉइस ऑफ इंडिया – मम्मी के सुपरस्टार मधून पदार्पण केले आहे. सायलीने गौरव महाराष्ट्राचा आणखी एक शो केला आणि स्टार प्लस आणि एटीव्ही मराठीच्या गायन कार्यक्रमांमध्येही दिसली. सायली कांबळेचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय बौद्ध कुटुंबात झाला आहे.

 

 

21. विठ्ठल उमप (Vitthal Umap)

buddhist singer

विठ्ठल उमप (1931 – 2010) हे महाराष्ट्र राज्यातील मराठी लोकगायक, अभिनेता, शाहीर आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते विधारधारेने आंबेडकरवादी आणि धर्माने बौद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी “माझी वाणी भीमाचरणी” आणि “माझी आई भीमाई” ही गीते-पुस्तके लिहिली. त्यांचा जन्म एका हिंदू कोळी कुटुंबात झाला पण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी अनेक भीमगीते अणि कोळी गीते गयलि आहेत, तसेच अनेक चित्रपटांमध्ये त्यानी अभिनय देखील केलेला आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटामध्ये त्यांनी गायलेल्या “भीमाईच्या वासराचा” गण्याला ते आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गीत मानत. buddhist actors in marathi

 

 

22. रेशमा सोनवणे (Reshma Sonawane)

facebook
रेश्मा सोनवणे ही भारतीय गायिका आहे. रेश्मा सोनवणे यांनी बहुतांशी मराठीत काम केले आहे आणि मराठीसारख्या भाषांमध्येही काम केले आहे.

 

23. किरण सोनावणे (Kiran Sonawane)

buddhist singer
tv9marathi

किरण सोनावणे हे एक आंबेडकरी गायक व गीतकार आहेत. त्यांनी असंख्य गाणी लिहिली आणि गायली आहेत. त्यांनी आपलं क्षेत्रं संगीतापुरते मर्यादित न ठेवता धार्मिक कार्यातही भाग घेतला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक कार्य केले. लोकांमध्ये बौद्ध धर्माविषयी जागृती करण्याचे कामही त्यांनी केले. ‘दूध प्यायलो जिचे त्या आईची चिता’ सोनावणे यांचं हे गीत अत्यंत लोकप्रिय आहे.अशी असंख्य प्रबोधनपर गीतं त्यांनी लिहिली. (स्रोत)

 

 

24. राजेश ढाबरे (Rajesh Dhabre)

YouTube

राजेश फत्तेसिंग ढाबरे हे महाराष्ट्रातील संगीतकार, गायक, गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरवादी-बौद्ध आहेत. ते भीमगीते आणि बौद्ध भक्ती संगीत तयार करतात. त्यांचे अल्बम ‘बुद्ध ही बुद्ध है‘ (2010) आणि ‘सिद्धार्थ‘ (2013) हे बौद्ध धर्मावर केंद्रित आहेत. 2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांनी ‘सरणं‘ अल्बम काढला, जी बॉलीवुडची बाबासाहेबांना दिलेली पहिली आजरांजली होती. त्यांनी मुंबईत कस्टम आयुक्त म्हणून काम केले. राजेश ढाबरे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ लिमिटेड, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

 

25. डॅनी डेन्झोन्ग्पा (Danny Denzongpa)

Buddhist actor Danny Denzongpa
Sukree Sukplang/Reuters

शेरिंग फिंटसो “डॅनी” डेन्झोन्ग्पा (जन्म 1948) हे एक भारतीय अभिनेता, गायक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. 1971 पासून त्यांनी 190 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2003 मध्ये, डेन्झोंगपा यांना भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान – पद्मश्री देण्यात आला.

सिक्कीम मधील एका बौद्ध कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता, आणि आजही ते बौद्ध धर्माचे पालन करतात. भारतातील सर्वाधिक वरिष्ठ बौद्ध अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. एका मुलाखतीमध्ये डॅनी डेन्झोन्ग्पा यांनी सांगितले की, “माझ्या संगोपनाचे आणि बौद्ध धर्माचे श्रेय मी माझ्या पालकांना आणि शिक्षकांना देतो. आज लोक याला धर्म म्हणतात पण ते खरोखरच एक तत्त्वज्ञान आहे. मी माझ्या कामात शांतता शोधण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही घाई करत नाही.” (स्रोत) Indian celebrities who practice Buddhism

 

 

26. वीरा साथीदार (Vira Sathidar)

Buddhist Celebrity from Maharashtra
YouTube – Indian Cultural Forum

वीरा साथीदार (1960 – 2021) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. 2014 मध्ये आलेल्या साथीदारांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते, आणि सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती.


बौद्ध सेलिब्रिटी – दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते

खालील सेलेब्रिटी हे भारतीय दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते आहेत.

 

27. अलंकृता श्रीवास्तव (Alankrita Shrivastava)

openthemagazine.com

अलंकृता श्रीवास्तव (जन्म 1979) ही एक भारतीय पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. 2011 मध्ये दिग्दर्शिका म्हणून पदार्पण केल्यावर, तिने फिल्म्स डी फेम्स ग्रँड प्रिक्स आणि फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन यांसारखी प्रशंसा मिळवली आहे. ही एक बौद्ध सेलेब्रिटी आहे, आणि तिने बौद्ध धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली तेव्हा ती 21 वर्षांची होती. (स्रोत)

 

 

28. पा. रंजीत (Pa. Ranjith)

timesofindia

पा. रंजित (जन्म 1982) एक भारतीय दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आहे जो तमिळ भाषेतील चित्रपट बनवतो. त्याने 2012 च्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘अट्टाकथी’ मधून दिग्दर्शनात पदार्पण केले, तसेच त्याने ‘कबाली’ आणि ‘काला’ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे.

 

 

29. नागराज मंजुळे (Nagraj Manjule)

Nagraj Manjule
reuters.com

नागराज पोपटराव मंजुळे (जन्म 1978) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक, कवी, आणि चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम असा सैराट चित्रपट बनवला आहे, याशिवाय ते पिस्तुल्या या लघुपटासाठी देखील प्रसिद्ध आहेत, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि बौद्ध धर्माच्या शिकवणींवर त्यांचा विश्वास आहे. Buddhist singers in India


टीप :

या पोस्टमध्ये सतत नवीन नावे जोडली जातात, आणि ही पोस्ट नेहमी अद्ययावत (अपडेट) होत असते. तथापि, एखादे नाव या सूचित हवे होते असे तुम्हाला वाटल्यास (संदर्भासह) कमेंट बॉक्समध्ये लिहावे.

 

  • सदर सेलिब्रिटी खरोखरच बौद्ध धम्माचे अनुयायी असल्याचे पुरावे/ संदर्भ/ स्रोत लेखात जोडण्यात आलेले आहेत.
  • सेलिब्रिटींच्या निळ्या रंगातील इंग्रजी नावांना विकिपीडियाचे दुवे जोडले आहेत, ज्यावर क्लिक केल्यास त्या सेलिब्रिटीविषयीची अधिक माहिती वाचायला मिळेल.
  • हा लेख भारतातील बौद्ध गायक आणि गायिका यांची माहिती देणारा आहे, मात्र याआधीचा लेख भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यावर होता. भविष्यामध्ये भारतातील बौद्ध राजकीय व्यक्तींची (खासदार व आमदार) माहिती सांगणारा लेख सुद्धा तयार करण्यात येईल.
  • भारतातील बौद्ध सेलिब्रिटींविषयी यापूर्वीही 2 लेख (हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये) बनवलेले गेले आहेत, त्या लेखांमध्ये अभिनेते आणि गायक या दोन्हींचा समावेश होता – (हिंदी लेख येथे बघा आणि इंग्लिश लेख येथे बघा)

 

सारांश

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण भारतीय बौद्ध गायक आणि गायिका (Buddhist singers in India) यांची माहिती पाहिली. बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध सेलिब्रिटींविषयी (Buddhist celebrities in India) ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखाचे notification मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

One thought on “भारतातील बौद्ध गायक आणि गायिकांची यादी | Buddhist singers in India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *