मराठी विकिपीडिया विषयी 30 रंजक तथ्य | Interesting facts about Marathi Wikipedia

मराठी विकिपीडिया बद्दलच्या या 30 खास गोष्टी…

interesting facts about marathi wikipedia

मराठी विकिपीडिया हा एक ऑनलाइन विश्वकोश आहे, ज्याचा वापर महाराष्ट्रातील मराठी जनता मोठ्या प्रमाणात करत असते.

या लेखामध्ये, आपण मराठी विकिपीडिया बद्दल मनोरंजक तथ्ये जाणून घेऊ, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 20 Interesting facts about Marathi Wikipedia. विकिपीडिया हा इंटरनेटवरील सर्वात मोठा ज्ञानकोश आहे, याचेच एक संस्करण मराठी विकिपीडिया आहे. – Wikipedia facts in Marathi

जगभरातील 325 पेक्षा जास्त भाषण मध्ये विकिपीडिया उपलब्ध आहेत, यापैकी 24 विकिपीडिया भारतीय भाषांमधील आहे.

 

मराठी विकिपीडिया विषयी रोचक तथ्य – Interesting facts about Marathi wikipedia

1. विकिपीडिया चा उदय कोणत्या शतकात झाला – मराठी विकिपीडियाची सुरुवात 1 मे 2003 रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाला झाली. भारतामध्ये हिंदी विकिपीडिया नंतर सर्वाधिक वाचला जाणारा विकिपीडिया हा मराठी विकिपीडिया होय.

2. मराठी विकिपीडिया वरील पहिला लेख वसंत पंचमी आहे, जो 2 मे 2003 रोजी लिहिला गेला होता.

3. मराठी विकिपीडिया वरील सर्वात मोठा लेख बाबासाहेब आंबेडकर हा आहे. या लेखाचा आकार 7,80,719 बाईट इतका आहे. त्यांनतर अमेरिकेच्या काउंट्यांची यादी ‎[७,७७,२७२ बाइट] आणि पुरस्कार ‎[६,८९,३२८ बाइट] हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लेख आहेत.

4. मराठी विकिपीडियावर सर्वाधिक लोकप्रिय अर्थात सर्वात जास्त वेळा वाचला गेलेला लेख शिवाजी महाराज हा आहे, ज्याला जुलै 2015 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 30,13,193 views मिळाले. यानंतर बाबासाहेब आंबेडकर (24,36,637 views) आणि महात्मा गांधी (17,76,276 views) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय लेख आहेत. (यादी बघा)

5. मराठी विकिपीडियावर सर्वात जास्त वेळा संपादित (edit) केलेला लेख बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यास 1,976 वेळा संपादित करण्यात आले आहे. जर धूळपाटीवरील या लेखाच्या कच्चा कामांची संपादन संख्या (971) सुद्धा गृहित धरली तर बाबासाहेब आंबेडकर लेखाला 2,947 इतक्या प्रचंड वेळा संपादित केले गेले आहे. त्यानंतर पुणे‏‎ (1,310), पुरस्कार‏‎ (996), आणि मराठी भाषा‏‎ (892) हे लेख अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा बदलण्यात आलेले लेख आहेत.

6. विकिपीडियाची निर्मिती जिमी वेल्सलॅरी सँगर यांनी केली. किपीडियाची पहिली आवृत्ती इंग्लिश विकिपीडिया ही होती.

7. मराठी विकिपीडियाची मालकी विकिमीडिया फाउंडेशन या संस्थेकडे आहे.

8. मराठी विकिपीडियावरील पानांची (pages) संख्या 2,68,560 पेक्षा अधिक आहेत. यात लेख, चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, सदस्य पाने इ. सह एकूण पानांचा समावेश असतो.

9. मराठी विकिपीडियावरील लेखांची (articles) संख्या 80,440 पेक्षा अधिक आहेत. मराठी विकिपीडियावर चढवलेल्या संचिका (अपलोड केलेल्या फाइल्स) यांची संख्या 19,142 आहे.

10. लेखसंख्येचा (no. of articles) विचार करता हिंदी विकिपीडिया आणि तमिळ विकिपीडिया नंतर तिसऱ्या स्थानी मराठी विकिपीडिया येतो.

 

Interesting facts about Marathi Wikipedia

 

11. मराठी विकिपीडियावरील नोंदणीकृत सदस्य (विकिपीडियन्स) यांची संख्या 1,36,633 इतकी आहे. (सदस्यांची यादी)

12. मराठी विकिपीडियावरील एका महिन्यातील वाचकसंख्या सुमारे 1.5 कोटी ते 2 कोटी इतकी असते.

13. मराठी विकिपीडियावरील एका वर्षातील वाचकसंख्या म्हणजेच वर्षभरात मराठी विकिपीडिया वरील लेख सुमारे 15 कोटी ते 20 कोटी वेळा वाचले जातात.

14. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2021 या काळात मराठी विकिपीडियाला सुमारे 60 कोटी वेळा वाचले गेले आहे.

15. मराठी विकिपीडिया ना नफा – ना तोटा या तत्त्वावर चालते. त्यामुळे येथे पैसे कमावण्यासाठी जाहिराती दाखवल्या जात नाहीत.

16. विकिपीडिया जगभरातील एकूण 323 भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी मराठी विकिपीडिया ही केवळ एक आवृत्ती आहे.

17. मराठी विकिपीडियावर येणारे सर्वात जास्त वाचक हे भारतातील मुख्यतः महाराष्ट्रातील आहेत. भारतानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, फ्रांस, जर्मनी या देशांमध्ये मराठी विकिपीडियावरील लेख जास्त वेळा वाचले जातात.

18. उर्दू विकिपीडिया, हिंदी विकिपीडिया, तमिळ विकिपीडिया, आणि बंगाली विकिपीडिया या 4 भारतीय भाषांमधील विकिपीडियांनंतर सर्वाधिक लेख असणारी मराठी विकिपीडिया 5वी आहे. (विकिपीडियांची संपूर्ण यादी)

19. मराठी विकिपीडिया ही टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय मराठी संकेतस्थळांपैकी (वेबसाइट्स) एक आहे.

20. मराठी विकिपीडिया या वेबसाईटचे बहुतांश ट्राफिक हे Google द्वारे येते.

 

विकिपीडिया मराठी माहिती Interesting facts about Marathi Wikipedia

 

21. मराठी विकिपीडियाला संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांच्या संख्येपैकी बहुतांश पुरुष आहेत, आणि अत्यल्प महिला आहेत.

22. मराठी विकिपीडियावर कोणीही व्यक्ती लिहू शकते अगर संपादन करू शकते. मात्र ती व्यक्ती तिला हवे तसे लिहू शकत नाही तर त्याला विकिपीडियाच्या नियमांतर्गत राहुनच लिहावे लागते. अन्यथा व्यक्तीने केलेले सर्व अनुचित बदल विकिपीडिया सदस्याद्वारे (wikipedian) हटवले जातात.

23. व्यक्तींना मराठी विकिपीडिया लेखांमध्ये काही बदल किंवा संपादन करण्यासाठी विकिपीडियावर खाते (wikipedia account) बनवण्याची गरज असतेच असं नाही. 10 टक्के पेक्षा कमी संरक्षित लेख असतात, ज्यात संपादन करण्यासाठी खाते बनवलेले असले पाहिजे आणि संपादनांचा अनुभव सुद्धा असला पाहिजे.

24. व्यक्तींना मराठी विकिपीडियावर एखादा नवीन लेख तयार करण्यासाठी विकिपीडियावर खाते बनवण्याची गरज नसते. मात्र असे इंग्लिश विकिपीडियावर असे नसते, तेथे तुम्हाला लेख निर्माण करण्यासाठी wikipedia account उघडणे आवश्यक असते, शिवाय तुम्ही त्या खात्यावरून काही विकिपीडिया लेखांमध्ये थोडेफार योगदान (संपादने) सुद्धा दिलेले पाहिजे असते.

25. मराठी विकिपीडियावर महिन्याभरात कोट्यवधी ट्राफिक किंवा views येत असले तरी त्यावर जाहिराती दाखवल्या जात नाही. तर विकिपीडियाचा कारभार हा देणगीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमार्फत चालवला जातो.

26. विकिपीडियावर केवळ उल्लेखनीय विषयांवर लेख लिहिले जातात. एखादा विषय उल्लेखनीय आहे की नाही हे ठरवण्याचे निकष व नियम विकिपीडियामध्ये लिहिलेले आहेत. जर एखादा लेख त्या नियमांमध्ये बसत नसेल तर तो लेख उल्लेखनीय नाही असे म्हणुन विकिपीडियावरून हटवला जातो.

27. मराठी विकिपीडियावर एखादी व्यक्ती स्वतःचा चरित्रलेख, आपली संस्था, आपली वेबसाईट किंवा ब्लॉग, इत्यादींची माहिती लिहून स्वतःच्या प्रोडक्टची जाहिरात करु शकत नाही. जर कुणी स्वतःच्या किंवा इतरांच्या वेबसाईटच्या लिंक्स विकिपीडिया लेखांमध्ये जोडत असेल तर त्यांना ‘जाहिरात सदृश्य मजकूर’ ठरवून विकिपीडियावरुन हटवल्या जाते.

28. मराठी विकिपीडियामध्ये अन्य सोशल मीडियांवर होतात त्यापेक्षा कैक पटींनी मोठ्या प्रदीर्घ अशा चर्चा होत असतात. चर्चा करण्यासाठी विकिपीडियावर विविध प्रकारचे पाने (pages) असतात. उदा. सदस्य चर्चा पान, लेख चर्चा पान इत्यादी.

29. 23 सप्टेंबर 2021 रोजी मराठी विकिपीडियाने 80,000 लेखांचा टप्पा पूर्ण केला.

30. विकिपीडिया हा ‘विकिमीडिया फाउंडेशन’ या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात : कॉमन्स, विकिस्रोत, विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट्स, विकिन्यूज, विकिस्पेशीज, विकिविद्यापीठ, मेटा-विकि.

31. मराठी विकिपीडियावर संपादने 19,55,267 पेक्षा जास्त झाली आहेत.

 

टीप : या लेखातील मराठी विकिपीडिया बद्दल दिलेली आकडेवारी सप्टेंबर 2021 नुसार आहे.

 

संदर्भ

 

हे ही वाचलंत का?


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *