पंजाब विधानसभा संकुलात उभारले जाणार डॉ. आंबेडकर, भगतसिंग, रणजितसिंग यांचे पुतळे

अलीकडेच पंजाब विधानसभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आणि रणजीत सिंग यांचे पूर्णाकृती पुतळे विधानसभेच्या परिसरामध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संसद परिसरामध्ये सुद्धा भगतसिंग आणि बाबासाहेबांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

बाबासाहेबांचे पुतळे देशातील 11 विधानसभेंच्या समोर उभारण्यात आलेले आहेत, ती राज्ये कोण-कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे. 

 

डॉ. आंबेडकर, भगतसिंग, रणजितसिंग यांचे पुतळे पंजाब विधानसभा परिसरात उभारले जाणार

पंजाब विधानसभेने 22 मार्च 2022 रोजी सभागृह नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पंजाब विधानसभेच्या परिसरात शहीद-ए-आझम भगतसिंग, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शेर-ए-पंजाब महाराजा रणजित सिंह यांचे पुतळे बसवण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सभागृहात म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे ऋण राष्ट्र म्हणून आपण कधीही विसरू शकत नाही. तसेच डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे भवितव्य घडवले. या महान नेत्यांचे जीवन सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

भगतसिंग आणि बाबासाहेबांचे पुतळे
पंजाब विधानसभेत उभे राहतील रणजित सिंग, भगतसिंग आणि बाबासाहेबांचे पुतळे

या महान व्यक्तींचा वारसा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. तसेच शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांचा पुतळाही पंजाब विधानसभेच्या आवारात बसवण्यात येणार आहे. यावेळी भगवंत मान यांनी शहीद-ए-आझम भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या हुतात्मा दिनानिमित्त बुधवारी (23 मार्च) राज्यभर राजपत्रित सुट्टी जाहीर केली.

शहीद-ए-आझम भगतसिंग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे विधानसभेच्या आवारात बसवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाब विधानसभेत मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत काँग्रेसचे प्रतापसिंह बाजवा यांनी दोन्ही पुतळे बसविण्यास पाठिंबा दिला, मात्र शेर-ए-पंजाब महाराजा रणजित सिंग यांचाही पुतळा विधानसभेच्या आवारात बसवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत आपण विचार करू असे सांगितले.

 

‘या’ राज्यांतील विधानसभेत आहेत डॉ. बाबासाहेबांचे पुतळे

भारतातल्या दहा पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधान परिषदेच्या समोर गणराज्य भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. भारतीय संसदेच्या परिसरात सुद्धा संविधानाच्या शिल्पकाराचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आलेल्या विधानसभेंची नावे खालीलप्रमाणे आहेत :

  1. महाराष्ट्र विधानसभा
  2. कर्नाटक विधानसभा
  3. केरळ विधानसभा
  4. दिल्ली विधानसभा
  5. तेलंगणा विधानसभा
  6. गुजरात विधानसभा
  7. सिक्किम विधानसभा
  8. त्रिपुरा विधानसभा
  9. हरियाणा विधानसभा
  10. पोंडीचेरी विधानसभा
  11. प. बंगाल विधानसभा

 

राजस्थान विधानसभेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी जोरदार मागणी सुरू आहे. बिहार विधानसभेत सुद्धा अशी मागणी केली गेली आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश विशानसभेत सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा असायला हवा. बाबासाहेबांचे देशासाठी आणि देशवासियांसाठी थोर कार्य बघता त्यांचे पुतळे भारतातील सर्व विधान सर्वांसमोर उभारण्यात यायला हवेत.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ पर मराठी, हिंदी और अंग्रेजी में लेख लिखे जाते हैं :


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *