टॉप 36 लोकप्रिय भारतीय व्यक्तींची यादी; बुद्ध अव्वल तर PM मोदी सातवे

आपल्या भारत देशात असंख्य थोर व्यक्ती होऊन गेल्या आहेत, आणि अनेक आजही आहेत. आज आपण अशाच निवडक तीस लोकप्रिय आणि प्रभावशाली भारतीयांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे विकिपीडियावर सर्वाधिक चरित्रलेख उपलब्ध आहेत. – World Famous Indians by Wikipedia pages

आपल्याला विकिपीडियाबद्दल माहिती असेलच किंबहुना आपण अनेकदा विकिपीडियाचा वापर देखील केलेला असेल. विकिपीडिया हा एक बहुभाषी आणि जगातील सर्वात मोठा ऑनलाईन विश्वकोश आहे, ज्यावर अब्जावधी लेख किंवा आर्टिकल्स उपलब्ध आहेत.

बहुभाषी असणारा हा विकिपीडिया जगभरातील वेगवेगळ्या 325 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. सर्वांमध्ये इंग्लिश विकिपीडिया हा लेख संख्येनुसार सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठा विकिपीडिया आहे. – World Famous Indians by Wikipedia 2022

 यह लेख हिंदी में पढ़े

Top 30 World Famous Indians by Wikipedia
जगातील सर्वात प्रभावशाली भारतीय व्यक्ती, ज्यांचे विकिपीडिया लेख सर्वाधिक भाषांमध्ये लिहिलेले आहेत

इंग्लिश विकिपीडिया, हिंदी विकिपीडिया, जर्मन विकिपीडिया, रशियन विकिपीडिया, तेलुगू विकिपीडिया, फ्रेंच विकिपीडिया, जपानी विकिपीडिया, उर्दू विकिपीडिया यासारख्या 325 पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहेत. भारत देशातील अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींचे विकिपीडियावरील लेख जास्तीत जास्त भाषांमध्ये उपलब्ध असतात. – World Famous Indians by Wikipedia

टॉप 36 ‘जगविख्यात भारतीय’ ज्यांचे विकिपीडिया लेख सर्वाधिक भाषांमध्ये लिहिलेले आहेत

Top 36 World-famous Indians whose Wikipedia articles written in the greatest number of languages 

World Famous Indians by Wikipedia – विकिपीडियावर प्रामुख्याने दोन पद्धतीने एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता ओळखली किंवा मोजली जाते : (१) सदर व्यक्तीच्या विकिपीडिया लेखाला मिळालेल्या view ची संख्या आणि (२) सदर व्यक्तीचे विकिपीडियाच्या विविध आवृत्तीवरील चरित्रलेख. आणि आपण येथे केवळ दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करून काही विशेष भारतीयांची यादी बनवली आहे, ज्यांचे विकिपीडिया चरित्रलेख (Wikipedia profile) जास्तीत जास्त भाषांमध्ये उपलब्ध असतील. विकिपीडियावरील व्यक्तींच्या (चरित्र) लेखांना अनेकदा त्या व्यक्तीची विकिपीडिया प्रोफाइल सुद्धा म्हटले जाते.

या लेखामध्ये विकिपीडियाच्या 80 भाषांपेक्षा जास्त विकिपीडियांवर लेख चरित्रलेख उपलब्ध असणाऱ्या भारतीयांची यादी आहे. तत्त्वज्ञ, राजकारणी, सेलिब्रेटी, शास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रांतील ख्यातनाम भारतीय व्यक्ती समाविष्ट आहेत. World Famous Indians by Wikipedia

आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सर्वाधिक लोकप्रिय भारतीयाचा विचार केला तर निःसंशय एकच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांचं. आज रोजी विकिपीडियावर देखील त्यांचे चरित्रलेख सर्वाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

आधीच वर सांगितल्याप्रमाणे विकिपीडिया हा जगभरातील वेगवेगळ्या 325+ भाषांमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे लेख प्रामुख्याने अधिकाधिक विकिपीडियांवर बनवले जातात. नोबेल विजेते व्यक्ती असल्यास सुद्धा असे होते. यामुळे त्यांची ‘उल्लेखनीयता’ अधिक असते.

 

जगातील सर्वात प्रभावशाली भारतीय व्यक्तींची यादी – World Famous Indians by Wikipedia pages

प्रख्यात भारतीय व्यक्तींची यादी, ज्यांचे लेख बहुतांश विकिपीडिया भाषांमध्ये लिहिलेले आहेत. सदर आकडेवारी ही जुलै 2022 मधील आहे. विकिपीडियावर नवनवीन बदल होत असतात, त्यामुळे सदर यादी ही कायमस्वरूपी नसून वेळोवेळी बदलणारी आहे.

According to no. Of Wikipedia pages: Top 30 World famous and Most Influential Personalities of India

      ऑगस्ट 2023 मधील अपडेटेड यादी येथे पहा      

#1  गौतम बुद्ध – 189

बुद्ध (इ.स.पू. 623/ 563 – इ.स.पू. 543/ 483) हे तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. जगामध्ये बुद्धांचे 180 कोटी अनुयायी आहेत. बुद्ध हे भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली नाव आहे.

विकिपीडिया नुसार, गौतम बुद्ध हे सर्वात लोकप्रिय भारतीय ठरले आहेत. सुमारे 2600 वर्षापूर्वी होऊन गेलेले बुद्ध आजही सर्वश्रेष्ठ भारतीय ठरले आहेत. भगवान बुद्ध यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 189 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#2  महात्मा गांधी – 188

महात्मा गांधी (2 ऑक्टोबर 1869 – 30 जानेवारी 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. जगभरातील त्यांची लोकप्रियता प्रचंड अफाट आहे. गांधी हे बुद्धांपेक्षा केवळ एकाच विकिपीडिया लेखाने मागे आहेत.

इंग्लिश विकिपीडियावर जर कोणत्या भारतीय व्यक्तीचा लेख सर्वाधिक वाचला गेला असेल तर ती व्यक्ती महात्मा गांधी आहे. महात्मा गांधी हे दिडशे वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत, तर भगवान बुद्ध (#1) आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये सुमारे अडीच हजार वर्षांचे अंतर आहे. गांधी यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 188 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#3  रवींद्रनाथ टागोर – 151

रवींद्रनाथ टागोर (7 मे 1861- 7 ऑगस्ट 1941) हे बंगाली कवी, लेखक, नाटककार, संगीतकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि चित्रकार होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस त्यांनी बंगाली साहित्य आणि संगीत तसेच भारतीय कलेची पुनर्रचना केली. त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवला. यामुळे त्यांची जगभरात प्रचंड लोकप्रियता वाढली आणि ते बुद्ध व गांधी नंतर तिसरे जगविख्यात भारतीय व्यक्ती ठरले आहेत. टागोर यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 151 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#4  अकबर – 138

अबूल-फतह जलाल-उद्दीन मुहम्मद अकबर (25 ऑक्टोबर 1542 – 27 ऑक्टोबर 1605) हा तिसरा मुघल सम्राट होता, ज्याने 1556 ते 1605 पर्यंत राज्य केले. अकबराने आपले मुगल साम्राज्य भारतीय उपखंडाच्या बहुतेक भूभागावर स्थापन केले होते, जे मौर्य साम्राज्य नंतरचे सर्वात मोठे भारतीय साम्राज्य होते. जगभरातल्या महान शासकांमध्ये अकबराचे नाव घेतले जाते, त्यामुळे तो जगविख्यात भारतीयांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे.

सम्राट अशोक (#8) नंतर बादशाह अकबर यास भारताचा सर्वात महान सम्राट देखील मानले जाते. विकिपीडिया नुसार, बादशहा अकबर हा सर्वात प्रसिद्ध भारतीय शासक आहे. अकबर यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 138 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#5  जवाहरलाल नेहरू – 135

जवाहरलाल मोतीलाल नेहरू (1889 – 1964) हे भारताचे पहिले पंतप्रधान (1974 – 1964) व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. नेहरू हे भारताच्या राजकारणातील एक सर्वात प्रभावशाली व लोकप्रिय नाव आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तसेच ते सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान पदी कार्यरत होते आणि भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, यासारख्या गोष्टींमुळे नेहरूंचा समावेश भारतातील 30 प्रख्यात व्यक्तींमध्ये झालेला आहे. नेहरू यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 135 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#5  मदर तेरेसा – 135

मदर तेरेसा (26 ऑगस्ट 1910 – 5 सप्टेंबर 1997) रोमन कॅथोलिक नन आणि मिशनरी होत्या. तिचा जन्म स्कोप्जे (आता उत्तर मॅसेडोनियाची राजधानी) येथे झाला होता, अठरा वर्षे स्कोप्जे येथे राहिल्यानंतर, त्या आयर्लंडला गेल्या आणि नंतर भारतात गेल्या, आणि भारतातच आयुष्यभर वास्तव्य केले. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मदर तेरेसा यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 135 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#7  नरेंद्र मोदी – 134 (+1)

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म 17 सप्टेंबर 1950) हे भारताचे 14 वे आणि वर्तमान पंतप्रधान म्हणून काम करणारे भारतीय राजकारणी आहेत. ते 2014 पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. वर्तनात पदी भारताच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असल्यामुळे मोदी हे 30 जगविख्यात भारतीयांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. नरेंद्र मोदी हे हयात असलेले पहिले जगविख्यात भारतीय आहेत. मोदी यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 133 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#8  सम्राट अशोक – 126

अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हा मौर्य वंशाचा एक भारतीय सम्राट होता, जो बिंदुसाराचा मुलगा आणि चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता. इ.स.पू. 268 ते इ.स.पू. 232 त्याने जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडात राज्य केले, जे भारतीय इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य (मौर्य साम्राज्य) आहे. अशोकाने प्राचीन आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यांना जगातील महान सम्राटांपैकी एक मानले जाते.

सम्राट अशोकाला भारतातील सर्वात महान सम्राट आणि सर्वात शक्तिशाली सम्राट सुद्धा मानले जाते. या सर्वांमुळे सम्राट अशोक जगविख्यात भारतीयांमध्ये समाविष्ट आहेत. विकिपीडिया नुसार, सम्राट अशोक हा (बादशहा अकबर यांच्यानंतर) दुसरा सर्वात प्रसिद्ध भारतीय शासक आहे. अशोक यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 126 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#8  कालिदास – 126

कालिदास (4थे – 5वे शतक) हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते ज्यांना प्राचीन भारतातील महान कवी आणि नाटककार मानले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदास यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 126 भाषांमध्ये लिहिलेले आहेत. World Famous Indians by Wikipedia

 

#10  इंदिरा गांधी – 123

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (19 नोव्हेंबर 1917 – 31 ऑक्टोबर 1984) या भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान होत्या आणि त्या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले. विकिपीडिया नुसार, इंदिरा गांधी ही व्यक्ती पहिली जगविख्यात भारतीय महिला आहे. इंदिरा गांधी यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 123 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

World Famous Indians by Wikipedia pages 

#11  डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 122

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली.

ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. डॉ. आंबेडकर यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 122 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#12  सत्यजीत रे – 116

सत्यजित रे (2 मे 1921 – 23 एप्रिल 1992) एक भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, माहितीपट चित्रपट निर्माता, लेखक, निबंधकार, गीतकार, मासिक संपादक, चित्रकार, सुलेखनकार आणि संगीत संयोजक होते. रे हे सर्व काळातील महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. ते भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात विख्यात व्यक्तिमत्व आहे. रे यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 116 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#13  चाणक्य – 109

चाणक्य (इ.स.पू. 375 – इ.स.पू. 283) हा एक प्राचीन भारतीय बहुविज्ञानी होता जो शिक्षक, लेखक, रणनीतिकार, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार म्हणून सक्रिय होता. ते भारतातील राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील प्रणेते मानले जातात आणि त्यांचे कार्य शास्त्रीय अर्थशास्त्राचे एक महत्त्वाचे अग्रदूत मानले जाते. चाणक्य यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 109 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#14  अमिताभ बच्चन – 108

अमिताभ बच्चन (जन्म : 11 ऑक्टोबर 1942) हे एक भारतीय चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दूरदर्शन होस्ट, आणि हिंदी भाषेतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. 1970-1980 च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेता होते.

अमिताभ बच्चन हे सर्वात विख्यात भारतीय चित्रपट अभिनेते आहेत, तसेच (#12सत्यजित रे यांच्यानंतर) भारतीय चित्रपट क्षेत्रातील दुसरे सर्वात विख्यात व्यक्तिमत्व आहे. नरेंद्र मोदी (#7) यांच्यानंतर, बच्चन हे हयात असलेले दुसरे जगविख्यात भारतीय ठरले आहेत. बच्चन यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 108 भाषांमध्ये लिहिलेले आहेत. World famous Indian celebrities

 

#15  शाहरुख खान – 107

शाहरुख खान (जन्म 2 नोव्हेंबर 1965), हा एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. मीडियामध्ये “बॉलिवुडचा बादशाह” (त्याच्या 1999 च्या बादशाह चित्रपटाच्या संदर्भात), “बॉलिवुडचा राजा” आणि “किंग खान” म्हणून ओळखला जातो.

त्याचे आशिया आणि जगभरात लक्षणीय fans आहेत. प्रेक्षक संख्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत, त्याचे वर्णन जगातील सर्वात यशस्वी film stars पैकी एक म्हणून केले जाते. अमिताभ बच्चन (#14) यांच्यानंतर, शाहरुख खान हा दूसरा सर्वात विख्यात भारतीय चित्रपट अभिनेता आहे. शाहरुख़ याचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 107 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#16  ऐश्वर्या राय – 106

ऐश्वर्या राय बच्चन (जन्म 1 नोव्हेंबर 1973) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती आहे. प्रामुख्याने हिंदी आणि तमिळ चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखल्या जाणार्‍या, तिने तिच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीद्वारे स्वतःला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली सेलिब्रिटींपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. तिला अनेकदा माध्यमांमध्ये “जगातील सर्वात सुंदर स्त्री” म्हणून उद्धृत केले गेले आहे.

विकिपीडिया नुसार, ऐश्वर्या राय ही पहिली जगविख्यात भारतीय अभिनेत्री आहे, तसेच इंदिरा गांधी (#10)नंतर, ती दुसरी जगविख्यात भारतीय महिला सुद्धा ठरली आहे. ती हयात असलेली सर्वात प्रसिद्ध भारतीय महिला ठरली आहे. ऐश्वर्या हीचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 106 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#17  ब्रह्मगुप्त – 97

ब्रह्मगुप्त (598 – 668) हे भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ते गणित आणि खगोलशास्त्रावरील दोन सुरुवातीच्या ग्रंथांचे लेखक आहे – ब्रह्मस्फुटसिद्धांत आणि खांडखाद्यक. ब्रह्मगुप्ताने प्रथम शून्य गणनेचे नियम दिले. ब्रह्मगुप्त यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 97 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#18  प्रियांका चोप्रा – 95

प्रियांका चोप्रा जोनास (जन्म 18 जुलै 1982) ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. मिस वर्ल्ड 2000 स्पर्धेची विजेती, चोप्रा ही भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तिंपैकी एक आहे.

टाइमने तिला जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये सूचीबद्ध केले आणि पुढील दोन वर्षांत, फोर्ब्सने तिला जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सूचीबद्ध केले आहे. विकिपीडिया नुसार, प्रियंका चोप्रा ही (ऐश्वर्या राय #16 नंतर) जगातील दुसरी सर्वात प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियंका हीचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 95 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#19  सी.व्ही. रमन – 93

सर चंद्रशेखर वेंकट रमण (७ नोव्हेंबर १८८८ – २१ नोव्हेंबर १९७०) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते जे प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आणि विज्ञानाच्या कोणत्याही शाखेत नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले आशियाई होते. रमन यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 93 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#20  श्रीनिवास रामानुजन – 92

श्रीनिवास रामानुजन (22 डिसेंबर 1887 – 26 एप्रिल 1920) एक भारतीय गणितज्ञ होते. त्यांना शुद्ध गणिताचे जवळजवळ कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नसले तरी, त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले. रामानुजन यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 92 भाषांमध्ये लिहिलेले आहेत. World Famous Indians by Wikipedia

 

#20  राजीव गांधी – 92

राजीव गांधी (20 ऑगस्ट 1944 – 21 मे 1991) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १९८४ ते १९८९ या काळात भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून काम केले. १९८४ मध्ये त्यांची आई, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (#10) यांच्या हत्येनंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला. वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे पंतप्रधान बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती बनले. राजीव गांधी यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 92 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

World Famous Indians by Wikipedia articles

#22  गुरुनानक – 90

गुरु नानक (15 एप्रिल 1469 – 22 सप्टेंबर 1539) हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि ते दहा शीख गुरूंपैकी पहिले आहेत. त्यांचा जन्म जगभरात गुरु नानक गुरुपूरब म्हणून साजरा केला जातो. शीख धर्म हा सर्वात अलीकडे स्थापन झालेल्या प्रमुख संघटित धर्मांपैकी एक आहे आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे 25-30 दशलक्ष अनुयायांसह (शीख) जगभरात पाचव्या क्रमांकावर आहे.

बुद्धानंतर (#1) या सूचीत समाविष्ट होणारे गुरुनानक हे दुसरे धर्म-संस्थापक आहेत. गुरुनानक यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 90 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#23  नागार्जुन – 89

नागार्जुन (150 – 250) हा भारतीय महायान बौद्ध विचारवंत, विद्वान-संत आणि तत्त्वज्ञ होता. त्याला सर्वांत महत्त्वाच्या बौद्ध तत्त्वज्ञांपैकी एक मानले जाते. शिवाय, जॅन वेस्टरहॉफच्या मते, ते आशियाई तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील महान विचारवंतांपैकी एक आहेत. नागार्जुन यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 89 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

त्यांना महायान या बौद्ध धर्माच्या प्रमुख पंथाचे प्रवर्तक मानले जाते, ज्याचे जगभरात 130 कोटी अनुयायी आहेत. संपूर्ण जगात जवळजवळ 1.8 अब्ज (180 कोटी) बौद्ध असून यामध्ये साधारणपणे 70% ते 75% महायानी बौद्ध आहेत आणि उर्वरित 25% से 30% थेरवादी, वज्रयानी, नवयानी आणि अन्य इतर पंथांचे बौद्ध आहेत.

 

#24  स्वामी विवेकानंद – 88

स्वामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902) हे एक भारतीय हिंदू संत आणि तत्त्वज्ञ होते. ते 19व्या शतकातील भारतीय गूढवादी रामकृष्ण (#28) यांचे मुख्य शिष्य होते. पाश्चात्य गूढवादाने प्रभावित होऊन, वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण्या, पद्धती) पाश्चात्य जगाला परिचय करून देण्यात ते प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. विवेकानंद यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 88 भाषांमध्ये लिहिलेले आहेत. World Famous Indians by Wikipedia

 

#25  सलमान खान – 87

सलमान खान (जन्म – 27 डिसेंबर 1965) हा एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून मीडियामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. फोर्ब्सने आपल्या 2015च्या आणि 2018च्या जगातील टॉप-पेड 100 सेलिब्रिटी एंटरटेनर्सच्या यादीत समावेश केला आहे.

पुरुष अभिनेत्यांमध्ये सलमान खान हा अमिताभ बच्चन (#14) आणि शाहरुख़ खान (#15) यांच्या नंतर तिसरा जगविख्यात भारतीय चित्रपट अभिनेता आहे. तसेच ऐश्वर्या राय (#16) आणि प्रियंका चोपडा (#18) ह्या दोन अभिनेत्रीसुद्धा जागतिक लोकप्रियतेमध्ये सलमान खानच्या पुढे आहेत. सलमान याचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 88 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#25  रविशंकर – 87

पंडित रविशंकर (7 एप्रिल 1920 – 11 डिसेंबर 2012) हे भारतीय सितारवादक आणि संगीतकार होते. ते 20व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा जगातील सर्वात प्रसिद्ध गायक बनले आणि त्यांनी भारतातील आणि जगभरातील अनेक संगीतकारांना प्रभावित केले. त्यांना 1999 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. रविशंकर यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 87 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#27  आमिर खान – 86

हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान यांचे 86 वेगवेगळ्या भाषांमधील विकिपीडियावर लेख उपलब्ध आहेत. सर्वाधिक विकिपीडिया लेख असणार्‍या भारतीयांमध्ये ते 27व्या क्रमांकावर आहेत.

 

#27  विश्वनाथ आनंद  – 86

बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचे सुद्धा 86 विकिपीडियावर चरित्रलेख बनवण्यात आली आहेत.

 

#29  प्रतिभा पाटील – 85

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे 85 विकिपीडियांवर चरित्रलेख उपलब्ध आहेत.

 

#30  आर्यभट्ट – 84

आर्यभट्ट (476 – 550) हे भारतीय गणितज्ञ होते, तसेच ते भारतीय गणित आणि भारतीय खगोलशास्त्राच्या शास्त्रीय युगातील खगोलशास्त्रज्ञ होते. ते गुप्त युगात प्रकाशझोतात आले आणि त्यांनी आर्यभटीय आणि आर्य-सिद्धांत यांसारखी कलाकृती निर्माण केली. आर्यभट्ट यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 84 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#30  प्रणव मुखर्जी – 84

भारताच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 विकिपीडियांवर चरित्रलेख उपलब्ध आहेत.

 

#32  रामकृष्ण – 82

रामकृष्ण परमहंस (18 फेब्रुवारी 1836 – 16 ऑगस्ट 1886) हे 19व्या शतकातील बंगालमधील भारतीय हिंदू गूढवादी आणि धार्मिक नेते होते. देवी कालीप्रती भक्ती आणि तंत्र, भक्ती, वैष्णव आणि अद्वैत वेदांतातील घटकांचे पालन, तसेच ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम यांच्याशी घनिष्ठता यासह अनेक धार्मिक दृष्टीकोनातून रामकृष्ण यांनी आकर्षित केले. त्यांच्या मृत्यूनंतर,

त्यांचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद (#24) यांनी त्यांच्या कल्पना पाश्चात्य लोकांमध्ये लोकप्रिय केल्या आणि धर्मादाय, सामाजिक कार्य आणि शिक्षण प्रदान करण्यासाठी मठ आणि गृहस्थ भक्तांसाठी आध्यात्मिक प्रशिक्षण देणारे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या दोन्हींची स्थापना केली. रामकृष्ण यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 82 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#32  प्राण – 82

अभिनेते प्राण हे हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर कलावंत असून त्यांचे 82 वेगवेगळ्या भाषेतील विकिपीडियांवर लेख उपलब्ध आहेत.

 

#34  अमर्त्य सेन – 81

अमर्त्य कुमार सेन (जन्म 3 नोव्हेंबर 1933) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत, त्यांनी 1972 पासून युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये शिकवले आणि काम केले. सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवड सिद्धांत, आर्थिक आणि सामाजिक न्याय, दुष्काळाचे आर्थिक सिद्धांत, निर्णय सिद्धांत, विकास अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि देशांच्या कल्याणाचे उपाय यामध्ये योगदान दिले आहे.

कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक आणि 1999 मध्ये भारताचा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमर्त्य सेन हे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (#11) अर्थशास्त्रातील आपले गुरू मानतात. सेन यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 81 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#35  ए.पी.जे. अब्दुल कलाम – 80

अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (15 ऑक्टोबर 1931 – 27 जुलै 2015) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते ज्यांनी 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम केले. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा जवळून सहभाग होता.

1998 मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली होती. कलाम यांचे विकिपीडिया चरित्र-लेख एकूण 80 भाषांमध्ये लिहिलेले आहेत.

 

#35  करीना कपूर – 80

हिंदी सिनेअभिनेत्री करिना कपूर हीचे 80 विकिपीडियांवर चरित्रलेख उपलब्ध आहेत. सर्वाधिक विकिपीडियांवर चरित्रलेख असणार्‍या भारतीय अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या, प्रियंका नंतर करीनाचा क्रमांक लागतो.


80+ विकिपीडियांवर चरित्रलेख असणारी 36 भारतीय व्यक्तिमत्त्वे आपण जाणून घेतली. अर्थात ह्या भारतीय व्यक्तींचे लेख अनेक विदेशी भाषांमधील विकिपीडियांवर उपलब्ध आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की, या 36 भारतीयांची प्रसिद्धी किंवा लोकप्रियता केवळ भारतातच नसून संपूर्ण जगभरात आहेत. 


संदर्भ

  • विकिपीडिया (wikipedia) प्रमाणेच विकिमीडिया फाउंडेशनचा सिस्टर असलेल्या विकीडेटा (wikidata) मध्ये एखाद्या विषयाचे/व्यक्तीचे नाव टाकून, त्या विषयावर एकूण किती भाषांतील विकिपीडियांवर लेख लिहिलेले आहेत, ते समजते. उदाहरणार्थ –  Bhimrao Ramji Ambedkar wikidata
  • Wikipedia:Wikipedia_articles_written_in_the_greatest_number_of_languages

 

सारांश

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण काही ‘जगविख्यात भारतीय’ व्यक्तींबद्दल जाणून घेतले, ज्यांचे विकिपीडिया लेख सर्वाधिक भाषांमध्ये लिहिलेले आहेत (most famous Indians on Wikipedia). या प्रभावशाली भारतीयांविषयीची (influential Indians on Wikipedia) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद.

आपल्याला अन्य कोणत्याही भारतीय किंवा विदेशी व्यक्तीचा लेख किती विकिपीडिया भाषांमध्ये उपलब्ध आहे, याची माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.

 

हे ही वाचलंत का?


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

3 thoughts on “टॉप 36 लोकप्रिय भारतीय व्यक्तींची यादी; बुद्ध अव्वल तर PM मोदी सातवे

  1. वाह, अभ्यासपूर्ण संकलन. ही माहिती अगदी विरळ असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *