बौद्ध धर्माचा भारतीय समाज जीवनावरील प्रभाव

बौद्ध धर्माने असे अनेक सामाजिक योगदान दिले आहे, ज्याचा भारतीय समाज आणि संस्कृतीवर खोलवर परिणाम झाला आहे. आज आपण बौद्ध धर्माचा भारतीय समाज जीवनावर प्रभाव (Influence of Buddhism on Indian Social Life) याविषयी जाणून घेणार आहोत. buddha dharma in marathi

 इस लेख को हिंदी में पढ़ें 

Influence of Buddhism on Indian Social Life
बौद्ध धर्माचा समाजावर मोठा प्रभाव आहे – Influence of Buddhism on Indian Social Life

बौद्ध धर्माचा विविध संस्कृतींवर, विशेषत: आशियामध्ये खोलवर प्रभाव पडला आहे. बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध कला, बौद्ध वास्तुकला, बौद्ध पाककृती आणि बौद्ध सण हे आशियातील आधुनिक संस्कृतीचे प्रभावशाली घटक आहेत. लिटियन फॅंगच्या मते, या आशियाई प्रदेशांमध्ये बौद्ध धर्माने “राजनीती, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, कला आणि चालीरीती यासारख्या विस्तृत क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे”.

बौद्ध शिकवणींनी आधुनिक हिंदू धर्माच्या विकासावर तसेच इतर आशियाई धर्म जसे की ताओवाद आणि कन्फ्यूशियन धर्माच्या विकासावर प्रभाव पाडला. दिग्नागा आणि धर्मकीर्ती सारख्या बौद्ध तत्वज्ञांचा भारतीय तर्कशास्त्र आणि ज्ञानरचनावादाच्या विकासात खूप प्रभाव होता. नालंदा आणि विक्रमशिला सारख्या बौद्ध शैक्षणिक संस्थांनी शास्त्रीय भारतीय ज्ञानाच्या विविध शाखा जसे की व्याकरण, खगोलशास्त्र/ज्योतिष आणि वैद्यकशास्त्र जतन केले आणि आशियातील परदेशी विद्यार्थ्यांना शिकवले.

पाश्चात्य जगात, आधुनिक नवीन युगातील अध्यात्म आणि इतर पर्यायी अध्यात्मांवर बौद्ध धर्माचा जोरदार प्रभाव आहे. याची सुरुवात 20 व्या शतकातील हेलेना ब्लाव्हत्स्की सारख्या थिओसॉफिस्टवर झाली, जे बौद्ध धर्माला आध्यात्मिक परंपरा म्हणून गांभीर्याने घेणारे पहिले पाश्चात्य होते. अगदी अलीकडे, बौद्ध ध्यान पद्धतींनी आधुनिक मानसशास्त्राच्या विकासावर प्रभाव टाकला आहे. बौद्ध धर्माचा मानसशास्त्रावरील प्रभाव आधुनिक मनोविश्लेषणाच्या विशिष्ट प्रकारांमध्येही दिसून येतो.

 

बौद्ध धर्माचा सामाजिक प्रभाव आणि योगदान

बौद्ध धर्म हा भारतात अल्पसंख्याक धर्म आहे, परंतु बौद्ध धर्माचा आजही भारतीय समाजावर मजबूत प्रभाव आहे. या लेखाद्वारे आपण बौद्ध धर्माच्या सामाजिक योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने भारतीय संस्कृतीवर मोठा प्रभाव पाडला आहे.

बौद्ध धर्माचा भारतीय समाज आणि संस्कृतीवर खोलवर परिणाम झाला आहे. या लेखात, आपण बौद्ध धर्माच्या 12 सामाजिक योगदानांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा हिंदू धर्म, भारतीय समाज आणि भारतीय संस्कृतीवर परिणाम झाला आहे.

 

बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव :-

बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.

 

वैचारिक स्वातंत्र्य :-

वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला. buddha dharma in marathi

 

सद्गुणांचा विकास :-

बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.

 

समता तत्त्वाचा प्रभाव :-

तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.

 

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास :-

विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.

 

नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव :-

करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.

 

बौद्ध धर्माचे कलेतील योगदान :-

वास्तुविद्या, लेण्यांचॆ आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.

बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.

 

स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान :-

बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.

 

शिक्षणास प्रोत्साहन :-

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.

 

मूर्तीपूजा :-

मूर्तीपूजा ही बौद्ध धर्माची देणगी आहे. मूर्तीपूजेची सुरुवातही बौद्ध धर्मानेच केली होती आणि सम्राट कनिष्कच्या काळात प्रथमच मूर्तीपूजा सुरु झाली होती जेव्हा लोकांनी गौतम बुद्धांच्या मूर्ती बनवल्या होत्या. त्यानंतर हिंदू धर्मात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बनवणे आणि त्यांची पूजा सुरू झाली.

 

भारतीय संस्कृतीचा परदेशांत प्रसार :-

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हांगकांग, तिबेट, मकाउ इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

आर्थिक विकासाला प्रोत्साहन :-

बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

 

आजच्या जगात बौद्ध धर्माचे स्थान :-

बौद्ध धर्म हा एक अतिप्राचीन धर्म असून तो जगातील पहिला संघटित धर्म (विश्व धर्म) आहे. ख्रिस्त पूर्व ६ व्या शतकात तथागत बुद्धांनी बौद्ध धर्माची (धम्माची) स्थापना केली आहे. बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून तो आता एक जागतिक धर्म सुद्धा आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा चौथ्या क्रमांकाचा धर्म नसून ‘दुसऱ्या’ किंवा ‘तिसऱ्या’ क्रमांकाचा धर्म आहे. एक अहवालानुसार, आज (सन २०११) बौद्ध धर्माचे जगभरात सुमारे १८० कोटी (२५%) बुद्ध अनुयायी आहेत. सर्वाधिक बौद्ध अनुयायी असलेला देश चीन होय. चीन देशातील लोकसंख्येत (२०१० नूसार) ९१% किंवा १२२ कोटी बौद्ध अनुयायी आहेत. म्हणजेच एकट्या चीन देशात जगभरातील ६७% पेक्षा अधिक बौद्ध अनुयायी राहतात.

चीनी बौद्धांची ही संख्या ही भारताच्या लोकसंख्येपेक्षाही एक कोटींनी अधिक आहे. तसेच जगभरातील समस्त हिंदू लोकसंख्येहून किंवा जगातील टॉप १७ मुस्लिम राष्ट्रांतील मुस्लिमांहूनही अधिक आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. जगातील १८ देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून ६ देशांत तो राष्ट्रधर्म सुद्धा आहे. आशिया खंडात ४९% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.

बौद्ध धर्म लोकसंख्येच्या दृष्टीने आशिया खंडात प्रथम, जगात द्वितीय आणि जन्मभूमी भारतात तृतीय क्रमांकाचा धर्म आहे. भारत देशात अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतात ७ कोटींपर्यंत बौद्ध धर्मीय लोक आहेत.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *