2023 मधील मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

मराठी विकिपीडियावर हजारोंच्या संख्येने चरित्र लेख आहेत. 2023 वर्षातील मराठी विकिपीडियावरील टॉप 20 सर्वाधिक वाचले गेलेले चरित्रलेख आपण बघणार आहोत. ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक views असणार्‍या या 20 व्यक्ती मराठी लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली आहेत. The 20 Most Viewed Personalities on Marathi Wikipedia in 2022

Most famous Personalities on Marathi Wikipedia in 2023
Most famous Personalities on Marathi Wikipedia in 2023

2023 मधील ‘मराठी विकिपीडिया‘ वरील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व…

फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील असणाऱ्या साईटच्या फॉलोवर्स आणि सबस्क्राईब दृष्टीने आपण सेलिब्रिटींची लोकप्रियता ठरवीत असतो. आणि सर्वाधिक फॉलोअर्स असणार्‍या प्रसिद्ध व्यक्तींचा नेटकऱ्यांवर मोठा प्रभाव असतो. अशाप्रकारे विकिपीडियावर सर्वाधिक माहिती ज्या व्यक्तींची वाचली जाते त्यावरून त्या व्यक्तींची लोकप्रियता किंवा प्रसिद्धी ठरवली जात असते. ‘विकिपीडिया’ हा व्यापक माहितीच्या आदान-प्रदानाचं एक माध्यम बनलंय.

मराठी विकिपीडिया हा विकिपीडियाच्या 325+ आवृत्तींपैकी एक आवृत्ती आहे. सर्वाधिक लेख (आर्टिकल्स) असलेल्या 25+ भारतीय विकिपीडियांमध्ये तमिळ विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडिया नंतर मराठी विकिपीडियाचा (90,000+ लेख) तिसरा नंबर लागतो. म्हणजेच मराठी भाषेतली विकिपीडियावरील माहिती प्रचंड प्रमाणावर वाचली जाते हे आपल्याला कळून येईल.

आज रोजी दहा कोटी पेक्षा अधिक लोकांची भाषा मराठी आहे. हिंदी आणि बंगाली नंतर भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा म्हणजे मराठी होय. मराठी भाषिक लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. मराठीवाचक वर्गामध्ये सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मराठी विकिपीडियाची आकडेवारी विचारात घेतली जाते.

महाराष्ट्रीय किंवा मराठी लोक मराठी विकिपीडियाच्या आवृत्तीवरील लेख मोठ्या संख्येने वाचतात. आणि याच आधारावर आपण मराठी वाचकांनी सर्वाधिक वाचलेल्या मराठी विकिपीडिया वरील 2023 च्या 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची नावे जाणून घेणार आहोत.

 

टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची यादी 

2022 मध्ये मराठी विकिपीडियावर सर्वाधिक व्हुज (वाचकसंख्या) असणार्‍या टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत. वाचकसंख्या म्हणजे लेखाला किती वेळा वाचले गेलेय ती संख्या. ‘बदल‘ कॉलममध्ये मागील वर्ष 2022 मधील रँकच्या तुलनेत झालेला बदल वा फरक दर्शवला आहे.

रँक लेख वाचकसंख्या बदल
1 10,96,537 Increase1
2 6,58,526 Decrease1
3 3,05,020 Increase12
4 2,64,500 Increase3
5 2,60,012 Increase1
6 2,45,876 Decrease2
7 2,32,590 Increase5
8 2,31,052 steady
9 2,28,023 Decrease4
10 2,19,502 Decrease7
11 2,11,669 Decrease1
12 1,71,832 Decrease3
13 1,43,087 *
14 1,36,624 *
15 1,35,727 Increase2
16 1,24,564 Increase2
17 1,23,606 Increase2
18 1,16,788 *
19 1,14,766 Decrease3
20 1,14,480 *
संदर्भ

बदल‘ कॉलममध्ये ‘ * ’ हे चिन्ह अशा व्यक्तींना दर्शवते ज्यांचा समावेश मागील वर्षाच्या (2022) टॉप 20 सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये झालेला नव्हता. उदाहरणार्थ: जिजाबाई शहाजी भोसले, अहिल्याबाई होळकर इत्यादी. ‘ — ’ हे चिन्ह दोन्ही वर्षांची रँक समान असल्याचा संकेत देते. उदाहरणार्थ : ज्ञानेश्वर.

छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन व्यक्तिमत्त्वे मराठी विकिपीडियावरील (2016 पासून 2023 पर्यंत) दरवर्षीच्या सर्वात प्रसिद्ध व्यक्तींमध्ये सदैव पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आळीपाळीने येत असतात. 2023 या वर्षी पहिल्या दोन लेखांमध्ये तब्बल 4,38,000 वाचकसंख्येचे अंतर आहे.

2022 या वर्षाची तुलना आताच्या 2023 वर्षातील लोकप्रिय लेखांसोबत करता शिवाजी महाराज, संभाजी भोसले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध आणि गाडगे महाराज यांच्या रँकमध्ये वाढ झालेली आढळते तर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम, अण्णा भाऊ साठे आणि सचिन तेंडुलकर यांच्या रँकमध्ये घट झालेली आहे.

2023 यावर्षी, सर्वाधिक रँक वृद्धी (+12) ही संभाजी भोसले यांची झालेली दिसते, जी 2022 मध्ये 15वी होती आणि आता 2023 मध्ये तिसरी झाली. 2023 या वर्षामध्ये औरंगाबाद या शहराचे व जिल्ह्याचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ झाल्यामुळे संभाजी महाराजांच्या लेखाला जास्त वेळा (गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट) वाचले गेले.

दुसरीकडे, सर्वाधिक रँक घट (-7) हे महात्मा गांधी या लेखाची झालेली आहे, जी 2022 मध्ये तिसरी होती आणि 2023 मध्ये 10वी झाली आहे.

मराठी वाचकांनी मराठी विकिपीडियावरील 20 सर्वाधिक व्यक्तींबद्दल वाचले, ज्यांपैकी 16 या महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती आहेत तर 4 ह्या महाराष्ट्राबाहेरील मराठी नसलेल्या व्यक्ती आहेत.

महात्मा गांधी, डॉ. अब्दुल कलाम, गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद या चार अमराठी व्यक्ती (Non-Marathi) 2023 वर्षातील मराठी वाचकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.

 

 

क्लिओपात्रा या लेखाला 18,49,579 वाचकसंख्या अथवा व्हुज मिळाले असल्याचे दिसते. सॅमसंग अँड्रॉइड स्मार्टफोन व्हॉईस कमांड क्लियोपेट्राचा विकिपीडिया लेख उघडण्याचे सुचवतो. हे एक लोकप्रिय साधन असल्याने, बहुतांश views नकळत घडतात. क्लिओपात्रा लेखाला मिळालेली वाचकसंख्या फसवी असल्याने येथे हा लेख टॉप-20 मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. मागच्या 2022 वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारे या लेखाला याप्रकारे मोठ्या प्रमाणात व्युज मिळाले होते. मराठी विकिपीडिया खैरे खेरीज इंग्लिश विकिपीडिया हिंदी विकिपीडिया आणि इतरही अनेक विकिपीडियांमध्ये अशा प्रकारचे फसवे व्हुज क्लिओपात्रा लेखाला मिळालेले आहेत.

 

सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वी वर्षनिहाय 2016201720182019, 2020, 2021 आणि 2022 प्रकाशित केल्या आहेत.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारत च्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *