भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधी दरम्यान मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या 20 चरित्र लेखांची माहिती येथे देण्यात आली आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वीच्या वर्षातील 2019 मधील लोकप्रिय व्यक्तींची सूची सुद्धा पहावी. – Famous Personalities in Maharashtra
Famous Personalities in Maharashtra on Marathi Wikipedia in 2020
खरं तर विकिपीडिया 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यापैकीच एक मराठी विकिपीडिया आहे. मराठी विकिपिडीयावर 70,000 पेक्षा जास्त लेख उपलब्ध आहेत.
मराठी विकिपीडियावर महाराष्ट्रातीलच प्रसिद्ध व्यक्तींबद्दल वाचले जात नाही तर महाराष्ट्रेतर भारतातील प्रसिद्ध व्यक्तींबद्दलही वाचले जाते. महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती आजही लोकप्रिय आहेत याविषयीची तुलनात्मक आकडेवारी येथे तुम्हाला बघायला मिळेल.
2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
2020 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 व्यक्तींपैकी 14 व्यक्ती ह्या महाराष्ट्रातील आहेत, तर 6 व्यक्ती (#4, #6,#14, #17, #18 व #20 ) ह्या इतर भारतीय राज्यांतील आहेत.
लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येनुसार (views नुसार) त्याची rank ठरली आहे. प्रत्येक फोटोखाली हिरव्या रंगात कोणत्या चरित्रलेखाला वर्षभरात किती वेळा पहिले गेले (म्हणजे किती views मिळाले) ते दिलेले आहे.
20 Most Popular Persons on Marathi Wikipedia in 2020
20. जवाहरलाल नेहरू
1,04,209 वेळा वाचले गेले
जवाहरलाल मोतीलाल नेहरू (1889 – 1964) हे भारताचे पहिले पंतप्रधान (1974 – 1964) व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात. नेहरू हे भारताच्या राजकारणातील एक सर्वात प्रभावशाली व लोकप्रिय नाव आहे, आणि मराठी वाचक त्यांची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचत असतो. 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी केवळ तीन वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये नेहरू हे समाविष्ट झालेले आहेत. मागील वर्ष 2019 मधील टॉप-20 व्यक्तींमध्ये त्याची रँक 17व्या स्थानावर होती.
थोर व्यक्तींची माहिती
Famous Personalities of Maharashtra
19. शाहू महाराज
1,04,706 वेळा वाचले गेले*
राजर्षी शाहू महाराज (1874 – 1922) हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारवंत, समाज सुधारक व शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तिमत्व होते. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. 1884 – 1922 दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील जनता राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल मराठी विकिपीडियावर माहिती वाचत असते. मात्र त्यांचा लेख केवळ 2016, 2018 आणि 2020 या 3 वर्षांमधील टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे. मागील वर्ष 2019 या मध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट नव्हते.
थोर मराठी व्यक्ती
Famous Personalities of Maharashtra
18. गौतम बुद्ध
1,12,502 वेळा वाचले गेले
बुद्ध (इ.स.पू. 623/ 563 – इ.स.पू. 543/ 483) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. जगामध्ये बुद्धांचे 180 कोटी अनुयायी आहेत. बुद्ध हे भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली नाव असले तरी ते केवळ या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झाले आहेत.
भारतातील थोर व्यक्ती
Famous Personalities of Maharashtra
17. विराट कोहली
1,12,641 वेळा वाचले गेले
विराट कोहली (जन्म: 1988) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे. तो अचूक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तो मराठी विकिपीडियाच्या 2016 ते 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे. यावर्षी तो 17व्या स्थानी असला तरी मागील वर्ष 2019 मध्ये त्याची रँक 12वी होती.
Famous Sports personalities of Maharashtra
16. अण्णा भाऊ साठे
1,14,322 वेळा वाचले गेले
अण्णा भाऊ साठे (1920 — 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. त्यांना साहित्यरत्न म्हटले जाते. साठे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्ती आहे. मराठी विकिपीडियावर दरवर्षी मोठ्या संख्येने त्यांना वाचले जाते. 2016 ते 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये ते समाविष्ट झालेले आहेत. 2019 या मागील वर्षातील त्यांची रँक 14वी होती. साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय अनुसूचित जातीचे व्यक्ती आहेत.
थोर मराठी साहित्यिक
15. भाऊराव पाटील
1,14,472 वेळा वाचले गेले
कर्मवीर भाऊराव पाटील (1887 – 1959) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक सदस्य होते. तसेच त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. ते केवळ या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.
Who are the famous personalities of Maharashtra?
14. स्वामी विवेकानंद
1,23,941 वेळा वाचले गेले
स्वामी विवेकानंद (1863 – 1902) हे भारतीय विचारवंत व हिंदू संन्यासी होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच प्रसिद्ध नाही आहेत, तर ते महाराष्ट्रातील सुद्धा प्रसिद्ध आहे. ते एक बंगाली व्यक्ती होते, तथापि मराठी लोक मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात. त्यामुळेच स्वामींचा लेख प्रत्येक वर्षीच्या (2016 ते 2020) मध्ये टॉप 20 लोकप्रिय चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे. मागील वर्ष 2019 मध्ये त्यांची रँक 13वी होती.
थोर व्यक्तींची नावे
13. सचिन तेंडुलकर
1,31,012 वेळा वाचले गेले
सचिन तेंडुलकर (जन्म: 1973) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2009 मध्ये त्याने कारकीर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक मराठी व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मराठी विकिपीडियावर मोठ्या संख्येने माहिती वाचली जाते. मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. मागील वर्ष 2019 मध्ये त्याची रँक 8व्या स्थानावर होती.
Famous Sports personalities of Maharashtra
1,36,656 वेळा वाचले गेले
जिजाबाई (1598 – 1674) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झालेला आहे. राजमाता जिजाबाई ह्या सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती वाचली जात आहे, 3 वर्षांतील टॉप-20 व्यक्तींमध्ये यांचा समावेश झाला आहे. 2018 या गेल्या वर्षीच्या टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्या 15व्या स्थानी होत्या. यावर्षी एकाच घराण्यातील चार सदस्य (#19, #12, #5, #1) टॉप-20 व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.
महाराष्ट्रातील थोर महिला
Famous Maharashtrian female personalities
11. लोकमान्य टिळक
1,36,769 वेळा वाचले गेले
बाळ गंगाधर टिळक (1856 – 1920) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य टिळक असाही त्यांचा उल्लेख केला जातो. टिळक हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांची माहिती खूप जास्त वेळा वाचण्यात आलेली आहे. मराठी विकीपीडियावरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. मागील वर्ष 2019 मध्ये त्याची रँक 5वी होती.
थोर नेत्यांची माहिती
famous political leaders of maharashtra
10 Famous Personalities in Maharashtra on Marathi Wikipedia in 2020
10. ज्ञानेश्वर
1,52,953 वेळा वाचले गेले
संत ज्ञानेश्वर (1275 – 1296) हे मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी संत आहेत. त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. यामुळे ते 2016 ते 2020 या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा त्याची रँक 11व्या स्थानावर होती.
1,56,498 वेळा वाचले गेले
महात्मा जोतीराव फुले (1827 – 1890) हे मराठी लेखक, शिक्षक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. फुले हे सुद्धा एक खूप लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल जास्त वेळा माहिती वाचण्यात येते. सर्व वर्षांमध्ये (2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे. मागील वर्ष 2019 मध्ये ते 7व्या स्थानावर होते. सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले हे एकमेव असे दांपत्य आहे की, या दोघांचाही समावेश मराठी विकिपीडियाच्या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय लोकांमध्ये (#9 व #3) झालेला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती
1,92,889 वेळा वाचले गेले
तानाजी मालुसरे (1626 – 1670) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार होते. तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता. 2020 या वर्षीच “तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर” नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यामुळे त्यांचा लेख या top 20 लेखांच्या यादीत सामील होऊ शकला. ते केवळ या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झाले आहेत.
great leaders of maharashtra
7. संत तुकाराम
1,96,570 वेळा वाचले गेले
संत तुकाराम (1608 – 1650) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम हे एक शिवकालीन मराठी संत असून, ते आजही महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडिया वरील यावर्षीचे ‘सर्वाधिक लोकप्रिय संत‘ ठरले आहेत. त्यांच्या पेक्षा अधिक वाचकसंख्या कोणत्याही संताच्या लेखाला मिळालेली नाही. 2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान नेहमी 10व्या रँकच्या आतच राहिले आहे. मागील वर्ष 2019 मध्ये त्याची रँक 9वी होती.
most powerful person in maharashtra
2,30,285 वेळा वाचले गेले
ए.पी.जे अब्दुल कलाम (1931 – 2015) भारताचे ११वे राष्ट्रपती व एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना “मिसाईल मॅन” असेही म्हणतात. त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे एक तमिळ व्यक्ती, मात्र ते मराठी लोकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा लेख मराठी विकिपीडियाच्या प्रत्येक वर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समावेश झालेला आहे. त्यातही ते सदैव पहिल्या दहा मध्येच राहिले. डॉ. कलाम हे यावर्षीचे महाराष्ट्रातील “दुसरे सर्वात लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरले आहेत. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा ते 6व्या स्थानावर राहिले.
Great personalities of Maharashtra
5. संभाजी भोसले
2,49,235 वेळा वाचले गेले
छत्रपती संभाजी महाराज (1657 – 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे. संभाजी महाराज सुद्धा सर्व वर्षांमधील (2016 ते 2020) टॉप-20 लोकांमध्ये राहिलेले आहेत. मागील वर्ष 2019 मध्ये ते 10व्या स्थानावर होते.
Famous Personalities in Maharashtra
2,59,055 वेळा वाचले गेले
मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधी हे मराठी किंवा महाराष्ट्रीय व्यक्ती नाहीत, तर ते एक गुजराती आहेत. मात्र तरीही ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरलेले आहेत. 2016 ते 2020 या सर्व वर्षांमध्ये ते मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-20 लेखांमध्ये कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज हे दोघे वगळता अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा त्यांना मराठी विकिवर सर्वाधिक वेळा वाचले गेले आहे. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा ते 4थ्या स्थानावर होते.
Famous Personalities of Maharashtra
थोर समाज सुधारक मराठी
3,34,442 वेळा वाचले गेले
सावित्रीबाई जोतीराव फुले (1831 – 1897) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या मराठी विकिपीडियावरील या वर्षाच्या “सर्वात लोकप्रिय महिला” ठरल्या आहेत. दरवर्षी प्रचंड संख्येने वाचकवर्ग त्यांच्या बद्दलची माहिती मराठी विकिपीडियावर वाचत असतो. वाचकसंख्येच्या दृष्टीने लोकप्रियतेचा विचार केला तर त्या आपले पती महात्मा फुले यांनाही मागे टाकतात. त्या दर वर्षी टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये सामील होतात, एवढेच नाही तर 2016 वगळता पुढील सर्वच वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची रँक पहिल्या पाच मध्ये आलेली आहे. एक महिला म्हणून तर त्या अव्वल आहेच, परंतु एक मराठी व्यक्ती म्हणून सुद्धा त्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा त्या 3ऱ्या स्थानावरच होत्या.
थोर समाजसेविका मराठी
4,00,964 वेळा वाचले गेले**
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. ते एक मराठी म्हणून अन्य भारतीय भाषांमधील विकिपीडियांवरही त्यांची सर्वात जास्त लोकप्रियता आहे. 2016 ते 2020 या वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान कधी दुसरे तर कधी पहिलेच राहिले आहे. शिवाजी महाराज वगळता मराठी विकिपीडियावरील अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा ते सर्वात जास्त लोकप्रिय ठरले आहेत. यावर्षी बाबासाहेब हे दुसरे “सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती” तसेच ते “सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी” सुद्धा ठरले आहेत. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा ते दुसऱ्या स्थानावर होते.
Who is hero of Maharashtra?
7,05,820 वेळा वाचले गेले
छत्रपती शिवाजी महाराज (1630 – 1680) हे एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून आपले स्वराज्य स्थापन केले. त्यांनी वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे यावर्षीचे मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती तसेच ते सर्वाधिक लोकप्रिय शासक आहेत. 2016 ते 2020 या वर्षांमध्ये त्यांचा चरित्रलेख हा कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर राहिलेला होता. मागील वर्ष 2019 मध्ये सुद्धा ते पहिल्या स्थानावर होते.
Who are the famous personalities of Maharashtra?
हेही वाचलंत का?
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- 2021 (जानेवारी ते जून) मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय 20 व्यक्ती
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2019 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2018 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2017 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2016 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2015 (जुलै ते डिसेंबर) मधील महाराष्ट्रातील Top-20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
- 2016 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2017 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2018 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2019 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- भारत की मशहूर बौद्ध हस्तियां (अभिनेता & गायक) | List of Buddhist Celebrities in India
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख है ‘बी. आर. आंबेडकर”; तथा मराठी विकिपीडिया में ‘शिवाजी महाराज’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- १३०व्या जयंतीच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३० प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- अन्य लेख वाचा
टीप
* १ जानेवारी २०२० ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक चौथा शाहू असे होते, याकाळात हा लेख १५,००४ वेळा पाहिला गेला; तर ९ फेब्रुवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक शाहू महाराज असे होते, याकाळात हा लेख ८९,७०२ वेळा पाहिला गेला.
** १ जानेवारी २०२० ते ५ एप्रिल २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक बाबासाहेब अांबेडकर असे होते, याकाळात हा लेख १,१७,८२२ वेळा पाहिला गेला; तर ५ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लेखाचे शीर्षक बाबासाहेब आंबेडकर असे होते, याकाळात हा लेख २,८३,१४२ वेळा पाहिला गेला.
या सूचित नसलेल्या इतर उल्लेखनीय चरित्रलेखाच्या views आणि rank बद्दल जाणून घेऊ इच्छित असाल तर आपण आम्हाला विचारू शकता.
2 thoughts on “भारतातील टॉप 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2020 ची मराठी विकिपीडिया Ranking)”