हे आहेत भारतातील 5 बौद्ध अर्थशास्त्रज्ञ – Top 5 Buddhist Economists in India

भारतात असे काही बौद्ध धर्मीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतुलनीय योगदान दिले आहे. यातील एक अर्थतज्ज्ञ तर अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार विजेते सुद्धा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून तर डॉ. नरेंद्र जाधव यांच्यापर्यंत थोर असे बौद्ध धर्मीय अर्थशास्त्रज्ञ भारताला लाभलेले आहेत. – Top 5 Buddhist Economists in India

  यह लेख हिंदी में पढ़े  

Top 5 Famous Buddhist Economists in India

भारत ही बुद्ध भूमी आहे आणि येथे अनेक महान बौद्ध अनुयायी झालेले आहेत. तसेच, भारतामध्ये अनेक थोर अर्थशास्त्रज्ञ सुद्धा झालेले आहेत, अगदी चाणक्य पासून तर डॉ. सेन पर्यंत. या सर्वांनी अर्थशास्त्रामध्ये तसेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, ज्यामुळे भारत गतिशील झालेला आहे, प्रगतिपथावर गेलेला आहे.

आजच्या या लेखात आपण ‘भारतीय बौद्ध धर्म’ आणि ‘अर्थशास्त्र’ यांची एकत्रितपणे सांगड घालत भारतातील 5 उल्लेखनीय बौद्ध अर्थशास्त्रज्ञांबद्दल जाणून घेणार आहोत. हे पाचही अर्थशास्त्रज्ञ बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. शिवाय, ही यादी अपूर्ण आहे कारण भारतात यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक बौद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. – Buddhist Economists in India

यापूर्वी, मी भारतातील बौद्धधर्मीय अभिनेते गायक आणि दिग्दर्शक यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत, ज्यांची एकत्रितपणे संख्या 60+ आहे. आणि भविष्यात भारतातील बौद्ध राजकीय व्यक्ती (खासदार व आमदार) यांच्यावर लेख तयार केला जाईल.

यादीच्या शेवटी, या बौद्ध अर्थतज्ज्ञांबद्दल काही तथ्यात्मक आणि रंजक माहिती सुद्धा दिलेली आहे, जी तुम्ही आवर्जून वाचायला हवी. Top 5 Indian Buddhist Scientists in Economics

 

Top 5 Famous Buddhist Economists in India

5. डॉ. नरेंद्र जाधव

Dr. Narendra Jadhav

डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (जन्म 28 मे 1953) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, सार्वजनिक धोरणतज्ञ, प्राध्यापक, खासदार आणि लेखक आहेत. एप्रिल 2016 पासून, ते भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी भारताच्या नियोजन आयोगाचे आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे कुलगुरू म्हणून काम केले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आर्थिक संशोधनाचे प्रमुख म्हणून काम पाहिले.

डॉ. नरेंद्र जाधव हे एक आंबेडकरवादी विद्वान आणि बौद्धधर्मीय आहेत. त्यांचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” विषयावर गाढा अभ्यास आहे. नरेंद्र जाधव यांचा जन्म 28 मे 1953 रोजी ओझर (नाशिक जिल्हा) गावातील एका महार कुटुंबात झाला आणि ते मुंबई उपनगर वडाळा येथे लहानाचे मोठे झाले. 1956 मध्ये त्यांच्या कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी 1973 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून सांख्यिकी विषयात बीएस्सी आणि 1975 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए पूर्ण केले. नंतर 1986 मध्ये त्यांनी इंडियाना विद्यापीठ, यूएसए मधून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली.

जाधव यांना 67 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ज्यात चार मानद डी. लिट पदवी आणि फ्रान्स सरकारकडून कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ ॲकॅडमिक पाम्स ही पदवी आहे. इंडियाना युनिव्हर्सिटी, यूएसए मधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ नरेंद्र जाधव यांची सार्वजनिक सेवेत चार दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट व्यावसायिक कारकीर्द आहे. इकॉनॉमिस्ट म्हणून जाधव यांनी 31 वर्षे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अफगाणिस्तान आणि इथिओपियामध्ये काम केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये चार वर्षांपेक्षा जास्त काळ सल्लागार म्हणून काम केले.

ते ऑक्टोबर 2008 मध्ये RBI चे मुख्य सल्लागार आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ या पदावरून निवृत्त झाले. अर्थशास्त्रावरील त्यांच्या लिखाणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे: Ambedkar – An Economist Extraordinaire (2016), Monetary Policy, Financial Stability and Central Banking in India (2006) , Re-emerging India – A Global Perspective (2005) आणि Monetary Economics for India (1994). जाधव यांनी भारतीय रिझर्व्ह बँक इतिहास सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहेत.

 

4. डॉ. सुखदेव थोरात

Sukhadeo Thorat (Photo : MyRepublica’s Kamal Pariyar)

डॉ. सुखदेव थोरात (जन्म 12 जुलै 1949) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, आणि लेखक आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंटमध्ये प्रोफेसर एमेरिटस आहेत. थोरात महाराष्ट्रातील महार समाजातील आहे. त्यांनी बी.ए. मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद येथून केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल/पीएचडी, आणि मेन स्कूल ऑफ प्लॅनिंग, वॉर्सा, पोलंड येथून इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये डिप्लोमा केला.

डॉ. सुखदेव थोरात हे एक आंबेडकरवादी विद्वान आणि बौद्धधर्मीय आहेत. त्यांचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” विषयावर गाढा अभ्यास आहे.  1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामूहिक धर्मांतराच्या प्रभावामुळे थोरात यांच्या कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारला. थोरात हे बौद्ध धर्माला अनुसरणारे व्यक्ती आहेत. ते 1973 ते 1980 पर्यंत वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद येथे व्याख्याते (lecturer) होते. 1980 पासून ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथे प्राध्यापक होते आणि 1989-1919 या काळात आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी, एम्स, यूएसए येथील अर्थशास्त्र विभागातील व्हिजिटिंग फॅकल्टी होते.

ते 1992 पासून इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन, डीसीचे संशोधन सहकारी आहेत. ते जानेवारी 2003 ते फेब्रुवारी 2006 पर्यंत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज, नवी दिल्लीचे संचालक होते. त्यांनी 2006-2011 पर्यंत UGC चे अध्यक्ष म्हणून काम केले. Buddhist Economists in India

डॉ. थोरात हे कौन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी (कपार्ट), नियोजन आयोगाचा सामाजिक न्याय विभाग, बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाची शैक्षणिक परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बुद्धिस्ट स्टडीज सेंटर, हैदराबाद, विद्यापीठ, हिमाचल प्रदेश विद्यापीठ आणि यांसारख्या अनेक संस्थांच्या प्रशासकीय मंडळांमध्ये संस्थांचे सदस्य राहिले आहेत. थोरात भारतीय सामाजिक विज्ञान आणि संशोधन परिषदेचे अध्यक्षही होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या 70 शोधनिबंधांचेही त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी 25 हून अधिक संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

 

 

3. डॉ. भालचंद्र मुणगेकर

डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर (जन्म 2 मार्च 1946) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते कृषी अर्थशास्त्रात पारंगत आहेत. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. ते आंबेडकरी विचारसरणीपासून प्रभावित आणि बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.

डॉ. भालचंद्र मुणगेकर हे एक आंबेडकरवादी विद्वान आणि बौद्धधर्मीय आहेत. त्यांचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” विषयावर गाढा अभ्यास आहे. त्यांचा जन्म कोकण महाराष्ट्रातील मुणगे गावातील एका दलित कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए, एमए आणि पीएचडी केली. 1965 मध्ये, ते भारतीय रिझर्व्ह बँकेत लिपिक म्हणून रुजू झाले आणि पुढे सहाय्यक अर्थशास्त्रज्ञ या पदावर रुजू झाले. ते आंबेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे शिक्षक होते.

भारतीय रिझर्व बँकेमध्ये नोकरीवर असताना त्यांना 1600 रुपये पगार मिळत होता, मात्र त्यांनी 650 रुपये पगार असणारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. याचे कारण असे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमुळे (पीईएस) भालचंद्र मुणगेकर शिक्षण घेऊ शकले आणि त्याचे उत्तरदायित्व वा कृतज्ञता म्हणून त्यांनी डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.

ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (2000 ते 2004) राहिले आहेत आणि त्यांनी नियोजन आयोग, भारताच्या कृषी मूल्य आयोगात काम केले आहे. मुणगेकर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी, सिमला चे अध्यक्षही राहिले आहेत. तसेच ते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे (University Grand Commission) अध्यक्ष राहिले आहेत.

 

2. डॉ. अमर्त्य सेन

Nobel laureate economist Amartya Sen (Photo : Mint)

अमर्त्य सेन (जन्म 3 नोव्हेंबर 1933) एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहे, ज्यांनी 1972 पासून युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये शिकवले आणि काम केले. सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवड सिद्धांत, आर्थिक आणि सामाजिक न्याय, दुष्काळाचे आर्थिक सिद्धांत, निर्णय सिद्धांत, विकास अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि देशांच्या कल्याणाचे उपाय यामध्ये योगदान दिले आहे. ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिले आहेत.

ते सध्या थॉमस डब्ल्यू. लॅमोंट विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत आणि हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी पूर्वी केंब्रिज विद्यापीठात ट्रिनिटी कॉलेजचे मास्टर म्हणून काम केले होते. कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पारितोषिक आणि 1999 मध्ये भारताचा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जर्मन पब्लिशर्स अँड बुकसेलर्स असोसिएशनने त्यांना जागतिक न्याय आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेतील सामाजिक असमानतेचा सामना करण्यासाठी त्यांच्या अग्रगण्य शिष्यवृत्तीसाठी जर्मन बुक ट्रेडचा 2020 चा शांतता पुरस्कार दिला. Buddhist Economists in India

डॉ. सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला अर्थशास्त्रातील गुरू मानतात. अमर्त्य सेन हे बौद्ध आहेत. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगालमधील एका हिंदू बैद्य कुटुंबात झाला होता. 2018 मध्ये, हार्वर्डमध्ये डॉ. सूरज एंगडे यांच्याशी बाबासाहेबांवर चर्चा करत असताना अमर्त्य सेन म्हणाले होते की, “डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही त्यांची निवड अतिशय तर्कशुद्ध होती, आणि मी स्वतः सुद्धा बौद्ध आहे.”

 

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल, 1891– 6 डिसेंबर, 1956), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दअस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

बाबासाहेबांनी देशातील आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. 2012 मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सर्वाधिक शिक्षित अर्थतज्ञ आहेत. अनेक विषयांमध्ये प्रभुत्व आणि अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदान असले तरी बाबासाहेब हे एक अर्थतज्ञ म्हणून विख्यात आहेत. अर्थशास्त्र मध्ये विदेशातून डॉक्‍टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रीय गुरु मानतात.

 

काही रंजक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी

या पाच भारतीय बौद्ध अर्थशास्त्रज्ञांबद्दल काही रंजक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी

  • ह्या पाचही अर्थतज्ज्ञांचा जन्म हिंदू परिवारात झाला होता.
  • डॉ. आंबेडकर, डॉ. मुणगेकर आणि डॉ. जाधव हे तिघे भारतीय संसदेचे सभासद (राज्यसभा खासदार) राहिलेले आहेत.
  • जाधव, थोरात आणि मुणगेकर यांच्या कुटुंबीयांनी 1956 मध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली; त्यानंतर अमर्त्य सेन सुद्धा डॉ. आंबेडकरांच्या तर्कशुद्ध धर्मांतराच्या प्रभावामुळेच बौद्धधर्मीय बनले असल्याचे समजते.
  • डॉ. सेन हे बंगाली व्यक्ती आहेत तर इतर चौघे मराठी.
  • डॉ. सेन व्यतिरिक्त इतर चारही अर्थतज्ज्ञ अनुसूचित जातीतून (दलित) आलेले आहेत.
  • ह्या पाचही अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे.
  • डॉ. अमर्त्य सेन, डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि डॉ. नरेंद्र जाधव हे तिघे विद्यापीठांचे कुलगुरु राहिलेले आहेत.
  • या पाच अर्थतज्ज्ञांपैकी एक नोबेल पारितोषिक विजेते आहेत, तर दोघे भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत.
  • या पाच अर्थतज्ज्ञांपैकी चार अर्थतज्ज्ञ पाचव्या अर्थतज्ज्ञाला (बाबासाहेब आंबेडकर) आपला आदर्श किंवा आपला गुरू मानतात.

 


टीप : ही पोस्ट नेहमी अद्ययावत (अपडेट) होत असते. तथापि, एखादे नाव या सूचित हवे होते असे तुम्हाला वाटल्यास कृपया  (संदर्भासह) कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहावे किंवा ईमेल द्वारे कळवावे.


सारांश

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण भारतीय बौद्ध अर्थशास्त्रज्ञ (Buddhist Economists in India) यांची माहिती पाहिली. बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध व्यक्तिंविषयी (Famous Buddhists in India) ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

 

 

‘धम्म भारत’ पर मराठी, हिंदी और अंग्रेजी में लेख लिखे जाते हैं :


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

3 thoughts on “हे आहेत भारतातील 5 बौद्ध अर्थशास्त्रज्ञ – Top 5 Buddhist Economists in India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *