मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक (स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी) होत आहे, आणि त्यासाठी बाबासाहेबांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त (2 जून 1960), बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आनंदराज साहेबांनी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा येथे मांडण्यात आलेला आहे, आणि हा लेख विवेक बनसोडे यांनी लिहिला आहे. इंदू मिल आंबेडकर स्मारक
इंदू मिल आंबेडकर स्मारक
युगप्रवर्तक, विश्वभूषण, महामानव, प्रज्ञासूर्य, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले, त्यानंतर बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचे स्मारक उभे रहावे याकरिता प्रयत्न करून चैत्यभूमीचे निर्माण केले. त्यामुळे त्यांना ‘चैत्यभूमीचे शिल्पकार’ संबोधले जाते. भैय्यासाहेबांचे सुपुत्र सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आपले आजोबा – भारत भाग्यविधाते, व जनसामान्यांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक व्हावे याकरीता तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळासह भेट घेतली व चैत्यभूमी लगतची इंदू मिलची साडेबारा एकर जागेत बाबासाहेबांचे भव्य स्मारक व्हावे अशी आग्रहाची मागणी केली, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी मी निश्चित प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
मा. सरसेनानी आंनदराज आंबेडकर एवढ्यावरच न थांबता शासनाकडे या जागेसंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत राहिले. पंरतू शासन यास गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात येताच १ जानेवारी २०११ रोजी भिमा कोरेगांवचा आस्मितेचा व स्वाभिमानाचा रणसग्राम ज्या भूमीवर झाला, त्याच विजयरणस्तंभावर शहीदांनामानवंदना देण्याकरिता रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, शहरप्रमुख युवराज बनसोडे यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
यावेळी काशिनाथ निकाळजे, रमेश जाधव, ख्वाँजामिया पटेल, अमरदिप कांबळे, प्रतीक कांबळे, विनय पाण्डेय, बबलू शेट्टी, विशाल म्हस्के, नाना गायकवाड, आशिष गाडे, मनोज गायकवाड इत्यादींची भाषणे झाली. सर्वांचे लक्ष लागले होते ते आपल्या लाडक्या नेत्यांचे भाषणाचे, त्यात ते काय आदेश – संदेश काय देतात त्याचे… त्याचवेळेस सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी जमलेल्या जनसमुदाय समोर अशी गगनभेदी भिमगर्जना केली की सर्व लोक अचंबित झाले. “ज्या भिमा कोरेगावचा इतिहास हा सार्या जगाला माहीत आहे, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती तुम्हाला आम्हाला करायची. येत्या ६ डिसेंबर २०११ रोजी चैत्यभूमी लगत असलेली इंदू मिलचा ताबा आपणास घ्यायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, जिंकू किंवा मरू पंरतु इंदू मिलच्या ताबा घेऊ,” अशी प्रज्ञासूर्यांचे नातू सूर्यपुत्राचे सुपुत्र सरसेनानी आंनदराज आंबेडकर साहेबांनी भिमगर्जना केली. त्याच क्षणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी त्यांचा शब्दात ‘एकच राज आंनदराज’ अशी घोषणा केली. या घोषणेने भिमा कोरेगाव परीसर दणाणून गेला. हिच घोषणा इंदू मिलच्या संपूर्ण लढ्यात भिमसैनिकांच्या मुखात होती.
आंनदराज आंबेडकरांनी इंदू मिलच्या ताब्याची भिमगर्जना पुणे शहरात करताच पुण्यापासून राज्यात, राज्यापासून ते दिल्ली पर्यंत सर्व हादरून गेले जणू काय भुंकप झाला याची चर्चा सामान्य जनतेपासून राजकीय लोकांपर्यंत होती. भूकंपाचा सौम्य झटका आहे अशी काही नाठाळानी निंदा देखील केली (आसो निंदकाचे घर असावे शेजारी). दिनांक १ जानेवारी २०११ रोजी क्रांतीस्तंभावरील भिमगर्जेनंतर सरसेनानी आंनदराज आंबेडकर साहेबांनी मार्च २०११ ला मुंबई मधील आझाद मैदानावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने इंदू मिलची साडेबारा एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून आंदोलन केले. शासनाला अल्टीमेटम दिला की “६ डिसेंबर २०११ महापरिनिर्वाणदिनाच्या आत तुम्ही स्मारकला जागा द्या नाहीतर आम्ही ताबा घेऊन स्मारक करु,” या आंदोलनाची दखल सर्व मिडीयाने घेतली. त्यांनतर रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वर्षभरात अनेक बैठका घेतल्या गेल्या, आणि आंदोलनाची तयारी सुरू केली आपण सर्वांनी पाहिलेच असेल की मुंबई पुण्यासह राज्यभर वाँल पेन्टींग फ्लेक्स बँनर पोस्टर तसेच प्रसिद्धी माध्यमांतून आंदोलनात सहभागी होण्याकरीता जनजागृती मोहीम अभियान राबविण्यात आली होती.
२१ नोव्हेंबर हा रिपब्लिकन सेना वर्धापनदिन आंदोलन होण्याच्या दिवसापूर्वी असल्याने ठाणे जिल्हाप्रमुख विजय घाटे यांनी ठाणे जिल्ह्यात वर्धापनदिन सोहळा आयोजित केला. त्यावेळेस राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हाप्रमुख यांच्या समवेत आंनदराज आंबेडकर साहेबांनी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील रणनीती आखली व मेळाव्यास संबोधित करताना भिमसैनिकांनो काही दिवसात आपणास इंदू मिलचा ताबा घ्यायचा त्याकरिता सज्ज व्हा इतिहास घडवायच इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आसाल अशा शब्दांत आंदोलन तयारीला लागा असे आदेश दिले.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांच्यावर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती व भन्तेगण आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
पुणे शहरातील पाषाण येथील धम्माकुंर बुद्ध विहाराचे आद. भन्ते संघबोधी यांची भेट विवेक बनसोडे यांनी आंनदराज आंबेडकर साहेब यांच्या सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आसणार्या रिपब्लिकन सेना कार्यालयात घडवून आणली. आंनदराज साहेबांनी आपण आंदोलनात आपले भन्तेगण घेऊन सहभागी व्हावे आसे भन्ते संघबोध्दीना सांगताच मला आंनद होईल प्रज्ञासूर्यांच्या नातवासोबत मला काम करायला मिळेल हे मी माझे भाग्य कर्तव्य समजतो अशा शब्दांत भन्तेजी ही आंदोलनाच्या तयारीस लागले.
धम्माकुंर बुद्धविहार पाषाण पुणे याठिकाणी ५० फुट उंच पंचधातुच्या बुद्धमुर्ती निर्मितीचे काम चालू होते. तेथील मूर्तीकार वाल्मीकी सुतार यांच्याकडून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुंदर अशा दोन्ही मूर्ती विवेक बनसोडे भन्ते संघबोधी यांनी बनवून विकत घेऊन सरसेनानी आंनदराज साहेबांना फोनद्वारे कळविले. साहेब आंदोलनात सहभागी होण्यासाठी भन्तेगण व मुर्ती तयार आहेत.
मुर्ती विकत घेतल्यानंतर विवेक बनसोडे यांनी फोनव्दारे रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई अध्यक्ष आशिष गाडे व त्यांचे सहकारी मनोज गायकवाड विशाल मोरे आनंद अवचर अक्षय मोरे राजेश गायकवाड यांना दोन्ही मुर्ती मी भन्तेजींन सोबत पाठवत आहे त्यास आपण सुरक्षित जागेत ठेवावेत आसे कळविले त्यांनी दोन्ही मुर्ती डाँ बाबासाहेब आंबेडकर काँलेज वडाळा याठिकाणी असणार्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यालयात दिनांक १ डिसेंबर २०११ रोजी मुर्तीच्या वंदना घेऊन सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या याची सुचना ही आंनदराज साहेबांना देण्यात आली
रिपब्लिकन सेना /रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मार्फत धरपकड सत्र सुरू झाले राज्यातील सर्व कार्यकर्ते फोनव्दारे एकमेकांच्या संपर्कात होते विवेक बनसोडे काशिनाथ निकाळजे रमेश जाधव युवराज बनसोडे भाई सांवत आशिश गाडे साजन घोलप विनय पाण्डेय इ. अनेक प्रमुख कार्येकर्ते आंनदराज साहेबांच्या संपर्कात होते ते जे आदेश देत त्यानुसार राज्यातील अन्य कार्यकर्त्यांना कळवित होते आम्ही प्रमुख पदाधिकारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दि. २ डिसेंबर २०११ रोजी मुंबईत दाखल झालो पोलिसांच्या धरपकड कारवाईत आमची नावे आघाडीवर असल्याने रिपब्लिकन सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष विनयकुमार पाण्डेय यांनी अज्ञातस्थळी मुंबईतील हॉटेल मध्ये विवेक बनसोडे बबलू शेट्टी काशिनाथ निकाळजे भाई सावंत साजन घोलप रमेश जाधव यांची राहण्याची सोय केली त्याठीकाणाहून आंनदराज साहेबांच्या संपर्कात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते तसेच दुसरीकडे राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आप आपल्या शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना एकत्रित करूण आंदोलनाची तयारी करीत होते काहीही होवू जीव गेला तरी चालेल आंनदराज साहेबांच्या आदेशानुसार इंदू मिलचा घ्यायचा हा पण सर्वांनी केला होता
रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी पुण्याहून कार्यकर्त्यांना आण्याकरीता ५ खाजगी बसगाड्या नियोजन केले होते त्यानुसार युवराज बनसोडे विशाल म्हस्के हे दिनांक ५डिसेंबर२०११ रोजीच्या मध्यरात्रीच बस घेऊन दाखल झाले अशाच प्रकारे राज्यातील जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख यांनी आपआपल्या पध्दतीने मिळेल त्या वाहनांनी आंदोलनास येण्यास सुरूवात केली
दि. ५ डिसेंबर २०११ रोजी रिपब्लिकन सेना सरसेनानी आंनदराज आंबेडकर साहेबांची काही वृत्तवाहिनीने आंदोलन संदर्भातील मुलाखत दाखवली व त्यांना प्रश्न विचारले आपण इंदू मिलचा ताबा घेणार म्हणजे काय करणार आंनदराजांनी हास्यमुद्रेत बोलले आँखो देखा हाल देखो उद्या लाईव्ह पहा आम्ही काय करतो हि मुलाखत पाहून राज्यातील कार्यकर्त्यांसह आंबेडकरी अनुयायीमधे जोश निर्माण झाला विविध पक्ष संघटनांमध्ये इंदू मिलच्या आंदोलनबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या पंरतु सर्वांच्या चर्चेतून एक दिसून येत होते की आंनदराज आंबेडकरचे आंदोलन अयशस्वी होणार ताबा घेणार म्हणजे काय करणार घोषणा देणार निदर्शने करणार नाहीतर पोलिस आंदोलन चिरडतील यापलीकडे काय होणार? आसे बोलून आंदोलनचे हसू उडविण्याचा प्रयत्न देखील झाला यापलीकडे जाऊन हा विषय आपला आहे हे दाखविण्यासाठी काहीनी धरणे, उपोषणे मंत्र्यांना अडविणे घेराव घालणे मिडियामध्ये बातम्या प्रसिद्ध करणे जेणेकरून प्रसिध्दी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे कसे केंद्रीत होऊन आपले नाव व्हावे आसा प्रयत्न केला हे करताना ते विसरले की भारतीय संविधानंचे निर्माते शिल्पकार या देशाचा उध्दार करूण लोकशाही प्रस्थापित ज्यांनी केली देशात नव्हे तर परदेशात ज्यांची ख्याती आहे कोलंबिया विद्यापीठाने जगातील विद्वानापैकी सर्वोच्च विद्वान म्हणून गौरविले असे विश्वभुषन परमपूज्य प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच रक्त आंनदराज आंबेडकर यांच्या शरीरात वाहत आहे हे रक्त सळसळ्याशिवाय राहणार नाही आंनदराज साहेबांचा आत्मविश्वास प्रंचड बुलंद होता की आंदोलंनाची रणनीती व्यूहरचना याप्रकारे तयार केली होती ताबा घेणे अयशस्वी होऊच शकले नाही
रिपब्लिकन सेना /रिपब्लिकन विद्यार्थी सेनाचे कार्येकर्ते दिवसरात्र इंदू मिलच्या परीसरात आवारात घडणाऱ्या घडामोडीचा आढाव घेत महाराष्ट्र शासनाने या आंदोलंनाची एवढी धास्ती घेतली होती की इंदू मिलच्या सरक्षण भिंतीवर काचा लावण्यात होत्या दरवाजे दुरूस्ती केली होती भिंतीवर तारा लावण्यात आल्या होत्या रँपिडँक्शन फोर्स कंमाडर एसारपीएफ जवान मिलिट्री पोलिस हजारोंच्या संख्येने संपूर्ण परीसरात तैनात केली होती जणू काही एखाद्या पक्षीदेखील त्या परिसरात उडताना दिसला तर त्यांचे पंख छाटून टाकले जातील ऐवढा कडक बंदोबस्त की त्या भागात युध्द होणार आहे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप देखील दिसत होते ऐवढे सर्व होत असताना देखील प्रजासूर्यांचे नातू आंनदराज आंबेडकर यांनी हास्यमुद्रेत आम्ही काय करणार उद्या (लाईव्ह )पहा प्रसिध्दी माध्यमातून शासनाला इशारा दिला ही हिमंत फक्त बाबासाहेबांच्या रक्तात आसू शकते
बघता बघता ६ डिसेंबर २०११ चा दिवस उजडला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर जी जवाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार आद. भन्तेजी आपल्या भन्तेगणासोबत शिवाजी पार्कवर एकत्रित थाबांवे मी आपणास घ्यायला त्याठिकाणी येतो व त्यानंतर आपण आंदोलनाच्या दिशेने जाऊ आंदोलनाच्या एक दिवसापूर्वी विवेक बनसोडे यांनी भंन्ते संघबोध्दी यांना कळविले होते ठरल्याप्रमाणे भन्ते संघबोध्दी यांनी भन्तेगण संघाला एकत्रित केले व आंदोलनास भन्तेगण तयार आहेत आपण शिवाजी पार्कवर यावे आसे कळविले त्यानुसार भन्तेगणाना सन्मानपूर्वक आंदोलनाच्या दिशेने भन्ते संघबोध्दी विवेक बनसोडे बबलू शेट्टी हिलेरी रासरँडो सिध्दार्थ शिंदे हे चैत्यभूमी समोर घेऊन आले त्यानंतर विवेक बनसोडे यांनी रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई अध्यक्ष आशिष गाडे मनोज गायकवाड विशाल मोरे आनंद अवचर अक्षय मोरे यांना मुर्ती घेऊन या आसे देखील कळविल त्यानुसार डाँ बाबासाहेब आंबेडकर काँलेज वडाळा याठिकाणी असणार्या दोन्ही मुर्ती ते घेऊन आलेत
चैत्यभूमी समोर रिपब्लिकन सेना/विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख शहरप्रमुख आपआपल्या कार्यकर्त्यांसह जमण्यास सुरूवात झाली होती त्याच बरोबर देशातील आंबेडकरी जनता बाबासाहेबांचे स्मारक बनावे ही इच्छा बाळगून आंदोलनात मोठ्या संख्येने सामिल झाले होते हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्याठिकाणी जमल्याचे पाहून पोलिसांनी फौजच्या फौज समोर तैनात केली तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती ही सर्वात पुढे ठेवण्यात आली त्यामागे भन्तेगण भन्तेगणांमागे असंख्य भिमसैनिक लढाईसाठी सज्ज झाले होते सर्वांच्या मुखात एकच राज आंनदराज ही घोषणा होती पंरतु भिमसैनिकांनपासून ते पोलिसांनपर्यंत सर्वच आंनदराज आंबेडकर यांच्या प्रतिक्षेत होते आंनदराज साहेबांच्या निवासस्थानी (राजगृहावर )पोलिसांचा छुपा पहारा होता त्यांना नजरकैदेत ठेवले गेले होते आम्हाला आठवण आली त्या क्षणाची रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज हे मुघलांच्या कैदेतून गमिनीकावा करत कडक पहारा तोडून स्वराजाच्या लढ्यात निघले याच क्षणाची आठवण डोळ्यासमोर ठेवून आंनदराज आंबेडकर साहेबांनी राजगृहासमोर धुर फवारणी केली पोलिसांचा नजरकैद तोडून निळी टोपी डोक्यावर घालून सामान्य माणसासारखे आंदोलनात उपस्थित झाले होते आंनदराज आल्याले आपणास कसे दिसेल नाही हे पाहून पोलिस अचंबित झाले होते
आंनदराज येताच कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आंनदराजांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीना पुष्पहार घालून वंदन केले त्याठिकाणी जमलेल्या जनसमुदायास मार्गदर्शन करण्यास सुरुवात केलेली पाहून पोलिस प्रशासनास वाटले ह्याना अडविण्यात आपण यशस्वी झालो पोलिसांना काही समजण्यापूर्वी आंनदराज साहेबांनी चला उठा लढा म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तोडून इंदू मिलकडे पलायन केले विद्यार्थी सेनेचे विशाल म्हस्के अजिम शेख विशाल मोरे शैलेश चौगुले अक्षय मोरे इत्यादी अनेक कार्यकर्तेनी दोन्ही मुर्ती आपल्या हातात उचलत आंनदराज साहेबांन सोबत चालू लागले इंदू मिलच्या समोर रँपिडेक्शन फोर्स, कंमाडर एसाआरपीएफ मिलट्री पोलिस हे आदोंलकाना अडविण्याचा प्रयत्न करीत होते एवढा कडक बंदोबस्त असतांना देखील एकही भिमसैनिक घाबरला नाही त्यांना सामोरे गेला गोळी लागली तरी छातीवर घेऊ पाठीवर नाही असा पण सर्वांनी केलेला दिसत होता
भिमसैनिकांनी सुरक्षाकडे तोडून इंदू मिलच्या दरवाज्याचवर धडक मारली पोलिस पोलिस हे आंदोलकांस अडविण्याचा प्रयत्न करत असताना एक महीला पोलिस कर्मचारी खाली पडली हे पाहताच भिमसैनिकांनी त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहचू न देता काळजीपूर्वक सुरक्षित जागी पोहचवले आंदोलकांच्या हाताला पायाला अंगाला मारा लागत असंताना देखील तो लढत राहिला पोलिसांचा अडविण्याचा प्रयत्न सुरू असंतानाच रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई अध्यक्ष आशिष गाडे हातात मुर्ती घेऊन इंदू मिलच्या गेटवर चढले त्यांच्या सोबत अरूण जाधव प्रकाश गायकवाड हे ही गेटवर चढले आशिष गाडे यांनी गेटवरून उडी मारत इंदू मिलच्या आत प्रवेश करून इंदू मिलच मुख्यप्रवेव्दार गेट (दरवाज्या) उघडला सरसेनानी आंनदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भन्तेगणासह भिमसैनिक आंदोलकांनी इंदू मिलच्या आत प्रवेश केला आतमध्ये जाताच कोणी कपाळवर माती लावत तर कोणी लोटांगण घालत आंदोलकांनी इंदू मिलच्या सर्वांत उच्च टोकावर रिपब्लिकन सेनेचा ध्वज फडकविला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आसो, एकच राज आंनदराज या घोषणांनी सर्व इंदू मिल परिसर दणाणून गेला
रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे रिपब्लिकन सेना मुंबई अध्यक्ष रमेश जाधव पुणे शहरप्रमुख युवराज बनसोडे व अन्य कार्यकर्त्यांनी मिळून दोन्ही मूर्ती ठेवण्याकरीता सुरक्षित अशी जागा पाहून त्या ठिकाणी मुर्ती ठेवण्याकरीता जागा बनवली व त्याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती प्रस्थापित केल्या आंनदराज आंबेडकर साहेब, भन्ते संघबोध्दी व भन्तेगणांनी बुध्दवंदना घेऊन मुर्तीचे पुजन करूण मुर्तीची स्थापना केली प्रसिध्दी माध्यम व वृत्तवाहिनीने द्वारे सारे जग हे आंदोलन लाईव्ह पाहत होते सदर आंदोलन कुठल्याही गटातर्फे नाही तर रिपब्लिकन सेना या सामाजिक संघटेनेमार्फत करण्यात आले आहे असे प्रसिध्दीमाध्यमांनवृत्तवाहिनांना इंदू मिलच्या आवारात रिपब्लिकन सैनिक सांगत होते
आंदोलक हजारोंच्या संख्येने इंदू मिलच्या आत घुसलेले पाहून रँपिडक्शन फोर्स कमांडर एसआरपीएफ जवान व पोलिसांनी आंदोलकांना घेरावा घालून मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते इंदू मिलच्या आत आणि बाहेर डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आसो एकच राज आंनदराज या घोषण देत भिमसैनिकांचा जोश वाढत होता प्रशासनाने घेरावा घातला असून देखील एकही भिमसैनिक घाबरला नाही याऊलट कुठल्याही प्रसंगाना सामोरे जाण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता इंदू मिलचा दरवाजा खोला आमच्या भिमसैनिकांना आत येऊ द्या असा इशारा आंनदराज साहेबांनी दिला इशारा देताच मुख्य प्रवेशद्वार पुन्हा खोलण्यात आले त्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी उभे राहून आपण इंदू मिलचा ताबा घेतला आहे जोपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक बनविण्याकरीता शासन जागा देत नाही तोपर्यंत आपण इंदू मिलचा ताबा सोडणार नाही अशी घोषणा केली त्यानंतर भन्ते संघबोध्दी यांना आंनदराज साहेबांनी सांगितले आपण इंदू मिलचा ताबा घेतला आहे परंतु आपण आपल्या आद.भन्तेगंणासोबत व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांसह याठिकाणी वास्तवास राहून ठिय्या आंदोलन करायचे आहे
डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इंदू मिलचा ताबा सोडायचा नाही त्यासाठी किती कालावधी लागेल तेवढ्या दिवसापर्यंत इंदू मिलच्या आत आंदोलन चालू ठेवायचे आहे रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबईच्या कार्यकत्यांनी ६ डिसेंबर २०११ च्या रात्री चटई अंगावर पाघरूण व भन्तेगण व आदोलंकाच्या खाण्याची व्यवस्था केली भंतेगणांची कसल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही पाहीजे अशा शब्दात आंनदराज साहेबांनी रिपब्लिकन सेना कार्यकर्त्यांना आदेश दिले
६ डिसेंबर २०११ ते २९ डिसेंबर २०११ पर्यंत या २४ दिवस चालू असलेल्या आदोंलनाची प्रत्येक बातमी विशेषतः दै. सम्राटसह आंबेडकरी चळवळीतील इतर वृत्तपत्र त्यासह इतर वृत्तपत्र ही सामान्य माणसांपर्यंत पोहचवित होते राज्यातील जनता हजारोंच्या संख्येने दररोज इंदू मिलच्या आतमध्ये येऊन आंनदराज साहेबांची भेट घेऊन आम्ही आपल्या सोबत आहे हे सांगून पाठींबा देत होते त्याचप्रमाणे विविध पक्ष संघटनाही भेटून आपला पाठिंबा घोषित करीत होते तर इंदू मिलमध्ये येणारे आंबेडकर अनुयायी भन्ते संघबोध्दी व भन्तेगणाना फळे धान्य व आंदोलनास लागणारे साहित्य सुविधा आंदोलन चालू रहावे याकरिता सातत्याने पुरवित होते
एकीकडे आंदोलन शांत आणि सुरळीत चालू असता दुसऱ्या बाजूने इंदू मिल विषयी विविध पक्ष संघटनेच्या पायाखालची वाळू सरकली होती आंनदराज साहेबांनी सुरु केलेल्या आंदोलनास जनतेचा वाढता पाठींबा मिळत असलेले पाहून आपले त्याठिकाणी काही तरी स्थान असावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंदोलन करून अभी हम जिंदा है दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे भासत होते त्यांच्या या प्रयत्नांने एनटीसीने (केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यानी ) मा .न्यायालयात धाव घेतली न्यायालयीन लढाई सुरू झाली न्यायालयाच्या लढाईत आंदोलकांनची बाजू मांडण्याकरीता आंनदराज साहेबांनी अँड संघराज रूपवते व त्यांचा टीमला आंदोलनात सहभागी करून घेतले
मा. न्यायालयात चाललेल्या या लढाईत न्यायालयाने आसे सुनावले आज इंदू मिलचा ताबा घेतला उद्या मंत्रालयाचा ताबा घेतील अशा शब्दांत आंनदराज आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांना (आंदोलकांना) इंदू मिलच्या बाहेर काढा आसे म्हणत निकाल जाहीर केला निकाल लागताच दिनाक २९ डिसेंबर २०११ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान वरळी ते इंदू मिल पर्यंत विराट मोर्चाचे आयोजन सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी केले मुंबई पोलिस कमिशनर यांनी आपल्या कार्यालयात आंनदराज आंबेडकर साहेबांना बोलवून घेतले त्या ठिकाणाहून राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा येथील निवासस्थानी त्यांना घेऊन गेले
मा. मुख्यमंत्री व आंनदराज साहेब यांच्यात स्मारकाबदल चर्चा झाली मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाकरीता इंदू मिलची जागा मिळवून देतो माझ्यावर आपण विश्वास ठेवावा आपले चालू असलेले आंदोलन स्थगित करावे अशी विनंतीही केली यावर आंनदराज आंबेडकर यांनी मा.मुख्यमंत्री यांना सांगितले मला १२.५ एकर म्हणजे साडेबारा एकरच संपूर्ण जागा पाहीजे स्मारकासाठी एक इंच सुध्दा कमी घेणार नाही आपण जर हे मान्य करणार असाल तर मी विचार करेल त्यावर मुख्यमंत्रीनी साडेबारा एकर जागा मिळवून देण्याचे आश्वासन आंनदराज आंबेडकर यांना दिले शासनाच जे काही म्हनने फक्त मलाच न सांगता समस्त आंबेडकरी जनतेसमोर मांडावे असे आंनदराज आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले
दि. २९ डिसेंबर २०११ रोजी विराट मोर्चाचे आयोजन सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी ठरल्याप्रमाणे केले होते या मोर्चात सहभागी होण्याकरीता राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो भिम सैनिक वरळीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठीकाणी जमा झाले होते या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर त्याचप्रमाणे प्रा जोगेंद्र कवाडे आमदार हरिभाऊ भदे आमदार रामभाऊ पंडागळे डाँ राजेंद्र गवई पदमश्री नामदेव ढसाळ टी एम कांबळे इ. अनेक नेतेगणांनी हजर राहिले व आपला पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी सामिल झाले होते
सर्वांना आंनदराज आंबेडकर साहेबांनी मंचावर (विचारपीठ) बोलावून सन्मानित केले मोर्चामधे अनेक मान्यवरांची भाषण सुरू होते तेवढ्यात त्याठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनांची बाजू मांडण्यासाठी आंनदराज आंबेडकर यांना जो शब्द दिला होता त्याप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे गृहमंत्री मा. आर आर पाटील व पशुवर्धन मंत्री डॉ नितिन राऊत यांचे मोर्चात आगमन झाले व त्यांनी सरकारची भूमिका मांडण्यास सुरुवात केली आपण आंदोलन स्थगित करावे व आमच्यावर आंनदराज आंबेडकरसह राज्यातील जनतेनी विश्वास ठेवावा दिलेला शब्द आम्ही पुर्ण करू आणि इंदू मिलची साडेबारा एकर जागा केंद्र सरकार कडून हस्तारिंत करून त्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करुन त्यासाठी जो काही खर्च होईल तो शासन करेल शासनाचा आपला मागणीस पाठींबा आहे लवकरात लवकर स्मारकासाठी हि जागा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आसे सांगितले
शेवटचे भाषण आंनदराज आंबेडकर साहेबांचे होते आंनदराजांनी मोर्चात आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेस मा.मुख्यमंत्री व त्यांच्यात झालेली चर्चा सांगितले आंबेडकर जनतेला मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द ते पाळतील असा विश्वास ठेवून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करून इंदू मिलचा ताबा कायदेशीररीत्या आमच्याकडे देतील असा विश्वास सरकारवर ठेवून इंदू मिलचा ताबा सोडू पंरतू तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती आहेत त्याठीकाणीच इंदू मिलच्या परीसरात राहतील आसे जमलेल्या जनसमुदाय सांगितले
आंदोलन अनेक जण करतात पण शासनावरती विश्वास ठेवून आंदोलन यशस्वी होईल याची खात्री बाळगून आंदोलन तात्पुरते स्थगित करुण आंनदराज आंबेडकरांनी जी संयमाची भूमिका दाखवली त्याची प्रशंसा शासनाप्रमाणेच सर्व स्तरातून करण्यात आली
दिनांक २९ डिसेंबर २०११ रोजी मुंबईतील विराट मोर्चात सहभागी होण्याकरीता राज्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते परतीचा प्रवास करत आपआपल्या शहराकडे निघाले त्याचप्रमाणे मी विवेक बनसोडे ही पुण्याला निघालो होतो रात्री ९ च्या सुमारास आंनदराज साहेबांनी मला फोन केला आणि इंदू मिलच्या संदर्भात दिल्ली येथे सर्व पक्षीय बैठक मा. प्रधानमंत्री सोबत उद्या ३० डिसेंबर २०११ रोजी आयोजित केली आहे त्यासाठी आपणास दिल्लीला जायचे आहे दिल्लीमधे असणारे रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष विनयकुमार पाण्डेय यांना देखील कळव आसे साहेबांनी सांगताच विनय पाण्डेय यांना कळविले आंनदराज आंबेडकर साहेब व अँड संघराज रूपवते हे मुंबई हून तर मी विवेक बनसोडे पुण्याहून दिल्लीकडे रवाना झालो ही बातमी वृत्त वाहिनीनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली सार्या देशाचे लक्ष लागून होते बैठकीत काय होणार याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती
दिल्ली विमानतळावर धुक्याचे सावट असल्यामुळे मा मुख्यमंत्री बरोबर राज्यातील अनेक मंत्री आमदार खासदार तसेच आंनदराज आंबेडकर अँड संघराज रूपवते विवेक बनसोडे यांची विमाने हवेत तरंगत होते धुके कमी होण्याची प्रतिक्षा करीत होते बैठकीचा वेळ निघून गेला होता आंनदराज आंबेडकर हे पहाटे ५.३० ला विमानात बसले होते तर ते दुपारी साडेबाराच्या सुमारास दिल्लीत पोहचले त्यावेळेस विमानतळावर विनयकुमार पाण्डेय यांनी त्यांचे स्वागत केले अशाच प्रकारे सर्वांची विमाने उशीरा पोहचली ३० डिसेंबरची बैठक रद्द होऊन ३१ डिसेंबर २०११ रोजी दुपारी १२ वाजता मा. प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी होईल आसे सर्वांना कळविण्यात आले
ठरल्याप्रमाणे आंनदराज आंबेडकर साहेब अँड संघराज रूपवते विवेक बनसोडे विनयकुमार पाण्डेय ३१ डिसेंबरला दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठीकाणी बैठकीला जाण्यासाठी पोहचले तेथे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आर आर पाटील माणिकराव ठाकरे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड पशुवर्धनमंत्री नितिन राऊत महीला बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड खासदार एकनाथ गायकवाड विजय कांबळे आमदार चंद्रकांत हंडोरै आमदार रामभाऊ पंडागळे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आरपीआय चे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई बीजेपीजे विनोद तावडे हे सर्व महाराष्ट्र संदनात अगोदरच उपस्थित होते आंनदराज आंबेडकर त्या ठिकाणी पोहचताच गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्वंताची बसलेली खुर्ची त्यांना देऊन आदरपूर्वक त्यांचा सन्मान केला काही मंत्री केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना हे आंनदराज आंबेडकर हे सांगताच शिंदे म्हणाले मी त्यांना चांगला ओळखतो मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकास मिळावी ही मागणी केली होती माझे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे ही मागणी राहीली आसे वक्तव्य करून एक अर्थी साहेबांच्या स्मारकाच्या मागणीस पाठींबा दर्शविला
महाराष्ट्र सदनात सर्व पक्षीय नेते एकत्र जमले होते तर काही प्रमुख पक्षाचे आमदार खासदार अनुपस्थित आहे अशी चर्चा देखील दिसत होती तेथून सर्वपक्षीय शिष्टमंडळ मा. प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानाकडे निघाले मा. प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आंनद शर्मा, केंद्रीय समाज कल्याण मंत्री मुकुल वासनिक व एनटीसीचे अधिकारी वर्ग अगोदरच उपस्थित होते सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे पोहचताच लगेच मा.प्रधानमंत्री मनमोहन सिंग हेही बैठकीत उपस्थित झाले व बैठकीस सुरूवात झाली मा. मुख्यमंत्रीनी प्रधानमंत्री सोबत सर्वांची ओळख करून दिली व इंदू मिलच्या जागेसंदर्भांतील गांभीर्य लक्षात घ्यावे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक बनवावे यासाठी जो काही खर्च येईल तो महाराष्ट्र शासन करण्यास तयार आहे
आंनदराज आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दिनी ६ डिसेंबर रोजी स्मारक व्हावे म्हणून आंदोलन केले होते महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या जनतेची आंतराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी इच्छा आहे अशा शब्दांत त्यांनी इंदू मिलच्या जागेसंदर्भातील गांभीर्य पटवून दिले त्यावर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आंनद शर्मा यानीही जागा देण्यास सहमती दर्शविली व मा. प्रधानमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी माझी देखील इच्छा आहे अशा शब्दांत मान्यता देण्यात आली बैठक चालू असतानाच महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लढाऊ आमदार रामभाऊ पंडागळे उठले आणि प्रधानमंत्रीसह सर्व शिष्टमंडळासमोर उभे राहून बोलले की आंनदराज आंबेडकर यांनी आंदोलन केले त्यामुळेच तुम्ही जागा देताय हे श्रेय केवळ आंनदराज आंबेडकर यांचे आहे दुसरे कोणाचेच नाही या सर्व बैठकीत केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार रामभाऊ पंडागळे यांनी आंनदराज आंबेडकर यांच्या आदोलंनास यश आले आसे त्यांच्या शब्दातून दिसून येत होते
मा.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री राज्यातील मंत्री मंडळानी इंदू मिलची जागा डाँ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकास देण्यात यावी या मागणीला मा प्रधानमंत्री यांनी तत्वता मान्यता दिली अशी माहिती प्रसिद्धी माध्यम व वृत्तवाहिनाना दिली आंनदराज आंबेडकरांचे इंदू मिलचा ताबा घेतलेल आंदोलन यशस्वी झाल्याने आंबेडकरी जनतेसह देशातील नागरिकांना मधे आनदांचे वातावरण होते
बघता बघता वर्ष संपले १ जानेवारी २०१२ नविन वर्षे उजडले आंनदराज आंबेडकर साहेब दिल्लीतून मुंबई तर आम्ही पुण्याला ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पोहचलो दुसऱ्या दिवशी लगेच आंनदराज साहेब पुणे दिशेने रवाना झाले ५०० महार शुर विरांना वंदन करण्याकरीता विजयरणस्तंभावर अभिवादन सभेला पोहचताच पुणे शहरात जागोजागी आंनदराज आंबेडकर साहेबांचे जनतेनी स्वागत केले तो क्षण पाहण्यासारखा होता आंबेडकरी चळवळीत आनंदाचे वातावरण होते विजयरणस्तंभावर सालाबादाप्रमाणे यंदाचे ही सभेची आयोजन मी विवेक बनसोडे युवराज बनसोडे विशाल म्हस्के बबलू शेट्टी अजिम शेख अरविंद पाण्डेय विनय पाण्डेय आकाश कांबळे पुण्याच्या टीमने केल होत यंदाच्या नविन वर्षी मात्र आता फक्त भिमाच रक्त या घोषणांनी भिमाकोरेगाव परीसर दणाणून गेला होता
आंनदराज आंबेडकर साहेबांन वर्षभरात मा.मुख्यंमत्री व राज्य शासनाच्या अनेक बैठका झाल्या त्याच दरम्यान मा. प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची भेट देखील आंनदराज आंबेडकर यांनी घेतली व सातत्याने पाठपुरावा करीत असताना राज्य सरकार आम्ही आपणास ही जागा मिळवून देणार आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे आंबेडकरी जनतेचा विश्वासघात होऊ देणार नाही या शब्दात सांगत होते आंनदराज आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक कसे असावे याचे संकल्पित चित्र (आराखडा )राज्य शासनाकडे सुपूर्द केला व ३५० फुटी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मारकामधे उभा करूण स्टँचू आँफ इक्वालिटी समतेचा संदेश देणारा असावा अशा स्वरूपाची मागणीही त्यांनी केली
दि. ५ डिसेंबर २०१२ मा. प्रधानमंत्री सह वस्त्रोद्योग मंत्री यांनी संसदेत तर मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात इंदू मिलची साडेबारा एकर जागा डाँ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाकरीता देत आहे ही घोषणा केली देशातील प्रसिध्दी माध्यम व वृत्तवाहिनीने तसेच आंबेडकरी जनतेच्या आंदोलनास यश आले आसे सांगून सर्वांचे आभार आंनदराज आंबेडकर यांनी मानले त्यांनतर लगेच इंदू मिलच्या आत असणार्या तथागत भगवान गौतम बुध्द व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती ला पुष्पहार अर्पण करून वंदना
करत आनदोस्तव रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाठून साजरा केला
इंदू मिलच्या लढाईत विनय पाण्डेय बबलू शेट्टी ख्वाँजामिया पटेल साजन घोलप हिलेरी रासरँडो अजिम शेख आसे अनेक इतर धर्मीय बांधव स्मारक व्हावे म्हणून आंनदराज आंबेडकर साहेबांन सोबत लढत होते त्याच प्रमाणे आंदोलन यशस्वी करण्याकरीता रिपब्लिकन सेना /रिपब्लिकन विद्यार्थी सेनाचे पदाधिकारी काशिनाथ निकाळजे रमेश जाधव विवेक बनसोडे युवराज बनसोडे आशिष गाडे मिलिंद बनसोडे रजनीकांत क्षीरसागर राजू आढाव अमरदीप कांबळे विशाल म्हस्के मनोज गायकवाड आनंद अवचर भाई सांवत नाना गायकवाड अक्षय मोरे राजेश गायकवाड वंसत कांबळे विशाल मोरे शैलेश चौगुले याच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्तेनी मेहनत घेतली होती अनेक अशी नावे आहेत जे आंदोलनात सक्रिय सहभागी होते पण मला जेवढे आठवतात ते मांडण्याचा प्रयत्न मी केला
– विवेक बनसोडे
प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे; एक असेल जगात तिसऱ्या क्रमांकाचा!
- दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 10 पुतळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘जगातील सर्वात हुशार व्यक्ती’ ठरवणाऱ्या काही खास गोष्टी
- दुनिया की पहली डॉ आंबेडकर प्रतिमा 1950 में कोल्हापुर में बनी हैं | World’s first Dr. Ambedkar statue
- पंजाब विधानसभा संकुलात उभारले जाणार डॉ. आंबेडकर, भगतसिंग, रणजितसिंग यांचे पुतळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 30+ शैक्षणिक विचार | Dr Ambedkar Quotes on Education
- भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी | Buddhist actors in Marathi
- प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)