आनंदराज आंबेडकर यांचा जन्मदिन – Anandraj Ambedkar’s birthday

आदरणीय आनंदराज आंबेडकर यांना 62व्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा – Anandraj Ambedkar’s birthday

anandraj ambedkar birthday

आनंदराज आंबेडकर यांचा जन्मदिन – Anandraj Ambedkar’s birthday

आज अशा एका नेत्याचा जन्मदिवस आहे, ज्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचा समर्थ वारसा आहे.
या वारसा मधून अर्थातच संघर्ष हा गुण मिळणे स्वाभाविक आहे. अशाच संघर्षातून निर्माण झाली आहे रिपब्लिकन सेना.

आणि या रिपब्लिकन सेनेची स्थापना केली ती बोधिसत्व राजकीय नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने अर्थात आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी.

तरुण मनाची आणि बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी म्हणून तिची ओळख आहे अशा रिपब्लिकन सेनेची स्थापना—– साली श्रद्धेय आनंदराज साहेबांनी केली.

 

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यात २ जून १९५७ रोजी जन्मलेल्या आनंदराज साहेबांनी आपल्याच विश्वात न रमता लोकांचे प्रश्न समोर ठेवून त्याला संघर्षातून वाचा फोडण्याचं कार्य हाती घेतल.

लोकांच्या सुखदुःखात रमणारा, शांत स्वभावी वेळ प्रसंगी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असलेला श्रद्धेय आनंदराज आंबेडकर यांच्यासारखा नेता चळवळीत सापडणार नाही.

फुले-आंबेडकरी विचार म्हणजे समतेचा पुरस्कार.. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून बहुजन समाजाचा उद्धार याच मार्गाने ते एकनिष्ठपणे वाटचाल करीत आहेत.

भावनिक प्रश्नांवर समाजाची मानसिकता वेळप्रसंगी कठीण परिस्थितीतून जावे लागते. पण त्याही परिस्थितीत आंबेडकर घराणे आपल्या व्रताशी बांधील आहे.

आजपर्यंत समाजाने आंबेडकर घराण्याकडे बारकाईने पाहिले नाही. ही समाजाची शोकांतिका आहे.

ज्या महापुरुषाने आपल्या वैयक्तिक बाबींकडे कधीच लक्ष न देता समाजासाठी संपूर्ण जीवन अर्पण केले. समाज कल्याणाला प्रथम प्राधान्य देऊन वेळ प्रसंगी उपासमार झेलून समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणला. या सर्व कार्यात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.

याच महामानवाच्या कुटुंबात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जन्म झाला.

त्यांनीदेखील आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आपले आयुष्य समाजासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्यामध्ये दडलेल्या कणखर बाण्यामुळे आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

अनेक सामाजिक समस्या सोडवल्या. दादर येथील उड्डाणपुलाचे नामकरण, बेरोजगारी प्रश्नावर मोर्चा, फुले-आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा कुटील डाव उधळणे,
खाजगीकरणाच्या मुद्द्यावर समाज प्रबोधन करणे, चड्डी-बनियान मोर्चा, जातीयवादी सरकारच्या विरोधात मुंडण करून मोर्चा, झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी व त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांवर परिषद घेऊन न्याय दिला.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. महिलांच्या विकास योजनेअंतर्गत बचत गटाच्या स्थापन केल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची मजबूत बांधणी केली.

महाराष्ट्राबाहेर दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, या राज्यात कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे.

त्याचप्रमाणे तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब देखील कार्यकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

आणि याच केवळ कारण म्हणजे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुजन समाज चळवळीत सहभागी होतोय.

हे चित्र फार आश्वासक आहे. समोर उभ्या ठाकलेल्या धर्मांध शक्तींना विरोधात समतेचा आवाज बुलंद करण्यासाठी..

इंदू मिलचे आंदोलन सर्व जगाने पाहिलं. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रक्ताचा एकही थेंब न सांडता आंदोलन यशस्वीपणे पार पाडले गेले.

आज त्या ठिकाणी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहणार आहे.

आणि हे केवळ सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे यशस्वी झाले आहे.

कोकणातील बौद्ध समाजाच्या विकासासाठी बौद्धजन पंचायत समितीचे सलग दोन वेळा सभापती पद भूषवणारे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य आठ मजली इमारत उभी राहताना दिसत आहे.

आज रिपब्लिकन चळवळीला सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आपला हक्काचा खरा नेता मिळाला आहे.
आणि भविष्यात या संपूर्ण देशातील बहुजन असं नेतृत्व करतील याबाबत आपल्या सर्वांच्या मनात शंका नाही.

साहेबांच्या या वाढदिवशी आपण सर्व रिपब्लिकन सैनिकांनी असा निर्धार करू येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका विधानसभा लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेचे कर्तबगार उमेदवार जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात पाठवू हीच खरी शुभेच्छा असेल…
अशा या दिग्विजय नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!


हे ही वाचलंत का?

 

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *