महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी

या लेखात आपण महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी (List of Scheduled Castes in Maharashtra) बघणार आहोत. राज्यातील अनुसूचित जाती लिस्ट मध्ये 59 जातसमूहांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती लिस्ट - List of Scheduled Castes in Maharashtra
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती लिस्ट – List of Scheduled Castes in Maharashtra

अनुसूचित जातीला शेड्युल्ड कास्ट, एससी, दलित, अस्पृश्य अशा नावांनी देखील ओळखले जाते. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या 1 कोटी 33 लाख होती, जी राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे 12% आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी

 1. अगेर
 2. अनमुक
 3. आरेमाला
 4. अरवा माला
 5. बहना, बहाना
 6. बाकड, बंट
 7. बलाही, बलाई
 8. बसोर, बुरुद, बांसोर, बांसोडी
 9. बेडा जंगम, बुडगा जंगम
 10. बेडर
 11. भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार
 12. भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला
 13. बिंदला
 14. ब्यागारा
 15. चलवादी, चन्नय्या
 16. चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी
 17. डक्कल, डोक्कलवार
 18. ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर
 19. डोम, डुमार
 20. येल्लमलवार, येल्लमलवंडलु
 21. गंडा, गंडी
 22. गरोड, गारी
 23. घासी, घासीया
 24. हल्लीर
 25. हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार
 26. होलार, व्हलार
 27. होलय, होलेर, होलेया, होलिया
 28. कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील तसेच राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील)
 29. कटिया, पथरिया
 30. खंगार, कनेरा, मिरधा
 31. खाटीक, चिकवा, चिकवी
 32. कोलुपुल-वंडलु
 33. कोरी
 34. लिंगडेर
 35. मादगी
 36. मादिगा
 37. महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू
 38. माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर
 39. माला
 40. माला दासरी
 41. माला हन्नाई
 42. माला जंगम
 43. माला मस्ती
 44. माला साले, नेटकानी
 45. माला सन्यासी
 46. मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग
 47. मांग-गारोडी, मांग-गारुडी
 48. मन्ने
 49. मष्टी
 50. मेंघवाल, मेंघवार
 51. मिठा, अय्यलवार
 52. मुक्री
 53. नाडीया, हादी
 54. पासी
 55. सांसी
 56. शेणवा, चेणवा, सेडमा, रावत
 57. सिंधोल्लू, चिंदोल्लू
 58. तिरगार, तिरबंदा
 59. तुरी

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येसंबंधी सविस्तर आणि विविधांगी स्वरूपाची माहिती :

अनुसूचित जातीची व्याख्या, प्रत्येक अनुसूचित जातीची लोकसंख्या, लोकसंख्येनुसार एससी चे वर्गीकरण, एससी लोकसंख्येबाबत गावनिहाय माहिती, दारिद्र्यरेषेखाली एससी कुटुंबे, एससी भूधारकांची संख्या, एससींना मिळणारे आरक्षण आणि धर्मनिहाय एससी लोकसंख्या यासारख्या प्रमुख गोष्टी जाणून घेण्यासाठी, खाली दिलेल्या लेखाच्या लिंकवर क्लिक करा.

 

अनुसूचित जातीची व्यक्ती ही केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असू शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील अनुसूचित जातीची लोकसंख्या या तीन धर्मांमध्ये विभागली गेली आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीत, महाराष्ट्रातील सर्व (59) अनुसूचित जातींमध्ये हिंदू आढळले. याशिवाय बौद्ध हे 53 तर शीख केवळ 36 अनुसूचित जातींमध्ये आढळले आहेत. राज्यातील प्रत्येक अनुसूचित जातीची धर्मनिहाय लोकसंख्या जाणून घेण्यासाठी, खाली दिलेल्या लेखाच्या लिंकवर क्लिक करा.धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *