महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या

आपण यापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक अनुसूचित जातीची लोकसंख्या [2011 च्या जनगणनेनुसार] पाहिली आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रत्येक अनुसूचित जातीची धर्मनिहाय लोकसंख्या जाणून घेणार आहोत. अनुसूचित जातीची लोकसंख्या हिंदू, शीख आणि बौद्धांमध्ये विभागली गेली आहे.

Religion wise population of scheduled castes in Maharashtra
Religion wise population of scheduled castes in Maharashtra

कायदेशीररीत्या, अनुसूचित जातीची व्यक्ती केवळ धर्माने हिंदू, बौद्ध किंवा शीख असू शकते आणि या तिघांशिवाय अन्य कोणीही नाही. म्हणून, 59 अनुसूचित जातींपैकी, प्रत्येक जातीची लोकसंख्या हिंदू, बौद्ध आणि शीख या तीन धर्मांमध्ये विभागली गेली आहे.

अनुसूचित जातीचा धर्म : “संविधानाच्या परिच्छेद 3 नुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसूचित जातीचे मानले जाणार नाही. म्हणजेच धर्माने केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असलेली व्यक्तीच अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकते.

1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसूचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदू धर्मावर आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्येची व्याप्ती वाढवून हिंदू धर्मासह शीख आणि 1990 मध्ये बौद्ध धर्माचाही यात समावेश करण्यात आला होता.

ज्या दलित [अनुसूचित जातीच्या] नागरिकाने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला आहे, त्याला कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. त्याला शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

अनेक महार, मांग तसेच इतर दलित जातींच्या [अनुसूचित जातींच्या] लोकांनी जनगणनेत त्यांचा ‘धर्म’ ख्रिश्चन किंवा इस्लाम नोंदवला आहे, म्हणून सरकारने त्यांची नोंद ‘अनुसूचित जाती’ म्हणून केली नाही.

 

59 अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या

महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे म्हणजेच दलितांचे प्रमाण 11.8% आहे आणि राज्यात अनुसूचित जातींसाठी 13 टक्के आरक्षण आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,32,75,898 असून त्यापैकी 80.60 लाख हिंदू, 52.04 लाख बौद्ध आणि 11 हजार शीख धर्मीय आहेत.

Religion wise population of Scheduled Castes in Maharashtra – 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

अनुसूचीत जाती

धार्मिक लोकसंख्या

1

अगेर

  • हिंदू : 820

  • बौद्ध : 75

  • शीख : 1

  • एकूण : 896

2

अनमुक

  • हिंदू : 57

  • बौद्ध : 11

  • शीख : 0

  • एकूण : 68

3

आरेमाला

  • हिंदू : 345

  • बौद्ध : 5

  • शीख : 0

  • एकूण : 350

4

अरवा माला

  • हिंदू : 501

  • बौद्ध : 2

  • शीख : 0

  • एकूण : 503

5

बहना, बहाना

  • हिंदू : 169

  • बौद्ध : 41

  • शीख : 0

  • एकूण : 210

6

बाकड, बंट

  • हिंदू : 1,429

  • बौद्ध : 212

  • शीख : 8

  • एकूण : 1,649

7

बलाही, बलाई

  • हिंदू : 16,506

  • बौद्ध : 436

  • शीख : 15

  • एकूण : 16,957

8

बसोर, बुरुद, बांसोर, बांसोडी, बसोड

  • हिंदू : 55,090

  • बौद्ध : 465

  • शीख : 9

  • एकूण : 55,564

9

बेडा जंगम, बुडगा जंगम

  • हिंदू : 26,469

  • बौद्ध : 690

  • शीख : 9

  • एकूण : 27,168

10

बेडर

  • हिंदू : 13,956

  • बौद्ध : 71

  • शीख : 2

  • एकूण : 14,029

11

भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार

  • हिंदू : 13,93,097

  • बौद्ध : 17,412

  • शीख : 563

  • एकूण : 14,11,072

12

भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला

  • हिंदू : 2,15,094

  • बौद्ध : 1,732

  • शीख : 340

  • एकूण : 2,17,166

13

बिंदला

  • हिंदू : 606

  • बौद्ध : 18

  • शीख : 1

  • एकूण : 625

14

ब्यागारा

  • हिंदू : 351

  • बौद्ध : 28

  • शीख : 0

  • एकूण : 379

15

चलवादी, चन्नय्या

  • हिंदू : 2,822

  • बौद्ध : 482

  • शीख : 5

  • एकूण : 3,309

16

चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी

  • हिंदू : 600

  • बौद्ध : 8

  • शीख : 0

  • एकूण : 608

17

डक्कल, डोक्कलवार

  • हिंदू : 933

  • बौद्ध : 14

  • शीख : 3

  • एकूण : 950

18

ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर

  • हिंदू : 1,12,413

  • बौद्ध : 833

  • शीख : 41

  • एकूण : 1,16,287

19

डोम, डुमार

  • हिंदू : 3,599

  • बौद्ध : 91

  • शीख : 0

  • एकूण : 3,690

20

येल्लमलवार, येल्लमलवंडलु

  • हिंदू : 3,288

  • बौद्ध : 17

  • शीख : 1

  • एकूण : 3,306

21

गंडा, गंडी

  • हिंदू : 562

  • बौद्ध : 23

  • शीख : 0

  • एकूण : 585

22

गरोड, गारी

  • हिंदू : 575

  • बौद्ध : 26

  • शीख : 0

  • एकूण : 601

23

घासी, घासीया

  • हिंदू : 1,954

  • बौद्ध : 30

  • शीख : 5

  • एकूण : 1,989

24

हल्लीर

  • हिंदू : 99

  • बौद्ध : 3

  • शीख : 0

  • एकूण : 102

25

हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार

  • हिंदू : 144

  • बौद्ध : 3

  • शीख : 1

  • एकूण : 148

26

होलार, व्हलार

  • हिंदू : 1,07,968

  • बौद्ध : 929

  • शीख : 11

  • एकूण : 1,08,908

27

होलय, होलेर, होलेया, होलिया

  • हिंदू : 17,398

  • बौद्ध : 856

  • शीख : 9

  • एकूण : 18,263

28

कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील तसेच राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील)

  • हिंदू : 5,489

  • बौद्ध : 110

  • शीख : 0

  • एकूण : 5,599

29

कटिया, पथरिया

  • हिंदू : 5,085

  • बौद्ध : 122

  • शीख : 0

  • एकूण : 5,207

30

खंगार, कनेरा, मिरधा

  • हिंदू : 1,993

  • बौद्ध : 26

  • शीख : 1

  • एकूण : 2,020

31

खाटीक, चिकवा, चिकवी

  • हिंदू : 1,07,869

  • बौद्ध : 543

  • शीख : 79

  • एकूण : 1,08,491

32

कोलूपूल-वंडलु

  • हिंदू : 33

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 33

33

कोरी

  • हिंदू : 15,553

  • बौद्ध : 451

  • शीख : 14

  • एकूण : 16,018

34

लिंगडेर

  • हिंदू : 5,269

  • बौद्ध : 29

  • शीख : 0

  • एकूण : 5,298

35

मादगी

  • हिंदू : 53,556

  • बौद्ध : 2,902

  • शीख : 23

  • एकूण : 56,481

36

मादिगा

  • हिंदू : 15,162

  • बौद्ध : 119

  • शीख : 37

  • एकूण : 15,318

37

महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू

  • हिंदू : 30,54,158

  • बौद्ध : 49,43,821

  • शीख : 8,081

  • एकूण : 80,06,060

38

माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर

  • हिंदू : 14,807

  • बौद्ध : 129

  • शीख : 3

  • एकूण : 14,939

39

माला

  • हिंदू : 14,894

  • बौद्ध : 362

  • शीख : 10

  • एकूण : 15,266

40

माला दासरी

  • हिंदू : 1,748

  • बौद्ध : 41

  • शीख : 0

  • एकूण : 1,789

41

माला हन्नाई

  • हिंदू : 27

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 27

42

माला जंगम

  • हिंदू : 8,444

  • बौद्ध : 46

  • शीख : 1

  • एकूण : 8,491

43

माला मस्ती

  • हिंदू : 17

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 17

44

माला साले, नेटकानी

  • हिंदू : 250

  • बौद्ध : 19

  • शीख : 0

  • एकूण : 269

45

माला सन्यासी

  • हिंदू : 46

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 46

46

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग

  • हिंदू : 24,52,170

  • बौद्ध : 35,831

  • शीख : 530

  • एकूण : 24,88,531

47

मांग-गारोडी, मांग-गारुडी

  • हिंदू : 39,762

  • बौद्ध : 217

  • शीख : 14

  • एकूण : 39,993

48

मन्ने

  • हिंदू : 2,488

  • बौद्ध : 43

  • शीख : 11

  • एकूण : 2,542

49

मष्टी

  • हिंदू : 47

  • बौद्ध : 18

  • शीख : 4

  • एकूण : 69

50

मेंघवाल, मेंघवार

  • हिंदू : 40,296

  • बौद्ध : 108

  • शीख : 12

  • एकूण : 40,416

51

मिठा, अय्यलवार

  • हिंदू : 38

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 38

52

मुक्री

  • हिंदू : 49

  • बौद्ध : 4

  • शीख : 1

  • एकूण : 54

53

नाडीया, हादी

  • हिंदू : 330

  • बौद्ध : 3

  • शीख : 0

  • एकूण : 333

54

पासी

  • हिंदू : 24,442

  • बौद्ध : 201

  • शीख : 21

  • एकूण : 24,664

55

सांसी

  • हिंदू : 481

  • बौद्ध : 8

  • शीख : 2

  • एकूण : 491

56

शेणवा, चेणवा, सेडमा, रावत

  • हिंदू : 1,223

  • बौद्ध : 93

  • शीख : 10

  • एकूण : 1,326

57

सिंधोल्लू, चिंदोल्लू

  • हिंदू : 989

  • बौद्ध : 6

  • शीख : 7

  • एकूण : 1,002

58

तिरगार, तिरबंदा

  • हिंदू : 80

  • बौद्ध : 0

  • शीख : 0

  • एकूण : 80

59

तुरी

  • हिंदू : 455

  • बौद्ध : 35

  • शीख : 0

  • एकूण : 490

एकूण


  • हिंदू : 80,60,130

  • बौद्ध : 52,04,284

  • शीख : 11,484

  • एकूण : 1,32,75,898

 

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या त्यांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

  • हिंदू : 80,60,130  (60.71%)
  • बौद्ध : 52,04,284  (39.20%)
  • शीख : 11,484  (0.09%)
  • एकूण : 1,32,75,898  (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, राज्यात महार समाजाची लोकसंख्या 80,06,060 आहे, त्यापैकी 49,43,821 बौद्ध, 30,54,158 हिंदू आणि 8,081 शीख आहेत. जर या 30.54 लाख ‘हिंदू महार’ लोकांची नोंदणी ‘बौद्ध महार’ म्हणून झाली असती तर अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे असली असती.

  • बौद्ध : 82,58,442 (62.21%)
  • हिंदू : 50,05,972 (37.71%)
  • शीख : 11,484 (0.09%)
  • एकूण : 1,32,75,898 (100%)

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या हिंदूंमध्ये महारांचे प्रमाण सर्वाधिक 38% आहे. अनुसूचित जातीच्या बौद्धांमध्ये 95% तसेच अनुसूचित जातीच्या शीखांमध्ये 70% महार जातसमूह आहे.

 

Religion wise population of scheduled castes in Maharashtra
Religion wise population of scheduled castes in Maharashtra

 

किती अनु. जातींमध्ये हिंदू, बौद्ध आणि शीख आहेत?

महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित जाती आहेत. त्यापैकी सर्व (59) अनुसूचित जातींमध्ये हिंदू आढळून आले. पण बौद्ध हे 53 अनुसूचित जातींमध्ये तर शीख फक्त 36 अनुसूचित जातींमध्ये आढळले. बौद्ध लोकसंख्या नसलेल्या 6 अनुसूचित जातींपैकी 5 ची लोकसंख्या 50 पेक्षा कमी आहे, तर एका अनुसूचित जातीची लोकसंख्या 100 पेक्षा कमी आहे. (संदर्भ : भारताची जनगणना, 2011)

एकही बौद्ध नसलेल्या (शून्य बौद्ध लोकसंख्या) 6 अनुसूचित जातींचे यादीमधील क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – 32, 41, 43, 45, 51 आणि 58. एकही शीख नसलेल्या 23 अनुसूचित जातींचे क्रमांक आहेत – 2, 3, 4, 5, 14, 16, 19, 21, 22, 24, 28, 29, 32, 34, 40, 41, 43, 44, 45, 51, 53, 58 आणि 59.

59 पैकी 58 अनुसूचित जातींमध्ये हिंदूंची लोकसंख्या बौद्धांपेक्षा जास्त आहे. एकमेव [37] महार जातसमूहामध्ये बौद्धांचे प्रमाण हिंदूंपेक्षा अधिक आहे. प्रत्येक अनुसूचित जातींमध्ये शीख धर्मीयांची संख्या ही हिंदू आणि बौद्ध धर्मीयांपेक्षा कमी आहे. अपवाद एक – [57] सिंधोल्लू-चिंदोल्लू जातीमध्ये शीख हे बौद्धांपेक्षा अधिक (पण हिंदूंपेक्षा कमी) आहेत.

 

सर्वात मोठ्या अनुसूचित जाती 

2011 च्या जनगणनेनुसार, 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील 7 अनुसूचित जाती खालीलप्रमाणे आहेत.

  • [37] महार जातीसमूह – 80,06,060 (60.31%)
  • [46] मांग जातीसमूह – 24,88,531 (18.74%)
  • [11] चांभार जातीसमूह – 14,11,072 (10.63%)
  • [12] भंगी जातीसमूह – 2,17,166 (1.64%)
  • [18] ढोर जातीसमूह – 1,16,287 (0.88%)
  • [26] होलार जातीसमूह – 1,08,908 (0.82%)
  • [31] खाटीक जातीसमूह – 1,08,491 (0.82%)

 

सर्वात मोठ्या हिंदू धर्मीय अनुसूचित जाती

महाराष्ट्रातील पाच सर्वात मोठ्या हिंदू धर्मीय अनुसूचित जाती, त्यांमधील हिंदू लोकसंख्या आणि एकूण अनुसूचित जातीच्या हिंदूंमधील त्यांचे प्रमाण (%) खालीलप्रमाणे आहे.

  • [37] महार जातसमूह – 30,54,158 (37.89%)
  • [46] मांग जातसमूह – 24,52,170 (30.42%)
  • [11] चांभार जातसमूह – 13,93,097 (17.28%)
  • [12] भंगी जातसमूह – 2,15,094 (2.67%)
  • [18] ढोर जातसमूह – 1,12,413 (1.39%)

 

सर्वात मोठ्या बौद्ध धर्मीय अनुसूचित जाती

महाराष्ट्रातील पाच सर्वात मोठ्या बौद्ध धर्मीय अनुसूचित जाती, त्यांमधील बौद्ध लोकसंख्या आणि एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांमधील त्यांचे प्रमाण (%) खालील प्रमाणे आहे.

  • [37] महार जातसमूह – 49,43,821 (94.98%)
  • [46] मांग जातसमूह – 35,831 (0.69%)
  • [11] चांभार जातसमूह – 17,412 (0.33%)
  • [35] मादगी जातसमूह – 2,902 (0.06%)
  • [12] भंगी जातसमूह – 1,732 (0.03%)

 

59 अनुसूचित जातींमधील बौद्ध लोकसंख्येची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. 

  • 1,000 पेक्षा जास्त बौद्ध लोकसंख्या – 5 जातसमूह
  • 500-1,000 बौद्ध लोकसंख्या – 5 जातसमूह
  • 100-500 बौद्ध लोकसंख्या – 13 जातसमूह
  • 50-100 बौद्ध लोकसंख्या – 4 जातसमूह
  • 10-50 बौद्ध लोकसंख्या – 17 जातसमूह
  • 1-10 बौद्ध लोकसंख्या – 9 जातसमूह
  • 0 बौद्ध लोकसंख्या – 6 जातसमूह

 

सर्वात मोठ्या शीख धर्मीय अनुसूचित जाती

महाराष्ट्रातील पाच सर्वात मोठ्या शीख धर्मीय अनुसूचित जाती, त्यांमधील शीख लोकसंख्या आणि एकूण अनुसूचित जातीच्या शीखांमधील त्यांचे प्रमाण (%) खालील प्रमाणे आहे.

  • [37] महार जातसमूह – 8,081 (70.37%)
  • [11] चांभार जातसमूह – 563 (4.90%)
  • [46] मांग जातसमूह – 530 (4.62%)
  • [12] भंगी जातसमूह – 340 (2.96%)
  • [31] खाटीक जातसमूह – 79 (0.69%)

 

महार, मांग व चांभार यांचे धर्म 

महार, मांग आणि चांभार या सर्वात मोठ्या तीन एससी जातसमूहांची धार्मिक लोकसंख्येचे प्रमाण जाणून घेऊया (2011 ची जनगणना).

  • महार जातसमूहामध्ये 61.75% बौद्ध, 38.15% हिंदू व 0.10% शीख आहेत.
  • मांग जातसमूहामध्ये 98.54% हिंदू, 1.44% बौद्ध आणि 0.02% शीख धर्मीय आहेत.
  • चांभार जातसमूहामध्ये 98.73% हिंदू, 1.23% बौद्ध आणि 0.04% शीख आहेत.

 

महार समूहामध्ये बौद्धा़ंचे प्रमाण सर्वाधिक (62%) असले तरी हिंदूंचे प्रमाण (38%) सुद्धा जास्त आहे. मातंग आणि चर्मकार समाजांमध्ये हिंदू धर्मीयांचे प्रमाण जवळजवळ 98-99% दरम्यान तर बौद्ध धर्मीयांचे प्रमाण अवघे एक ते दीड टक्क्यांपर्यंत आहे. शीख धर्मीयांचे प्रमाण तिन्ही जातसमूहांमध्ये एक टक्क्यापेक्षा कमी आहे.

 

महाराष्ट्रातील धार्मिक लोकसंख्येत अनु. जाती 

महाराष्ट्राची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे (2011 ची जनगणना).

  • हिंदू : 8,97,03,057 (79.80%)
  • मुस्लिम : 1,29,71,152 (11.54%)
  • बौद्ध: 65,31,200 (5.81%)
  • जैन : 14,00,349 (1.25%)
  • ख्रिस्ती : 10,80,073 (0.96%)
  • शीख : 2,23,247 (0.20%)
  • अन्य : 1,78,965 (0.16%)
  • निधर्मी : 2,86,290 (0.25%)

महाराष्ट्र राज्यात एकूण हिंदूं लोकसंख्येच्या 9% अनुसूचित जाती आहेत. बौद्धांमध्ये सुमारे 80 टक्के अनुसूचित जाती आहेत. शीख धर्मांमध्ये 5 टक्के अनुसूचित जाती आहेत.

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र - Population of Mahar community in Maharashtra by religion
महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – Population of Mahar community in Maharashtra by religion

 

जर ‘हिंदू महार’ यांची नोंद ‘बौद्ध महार’ झाली असती तर…

लोकसंख्येच्या दृष्टीने, मराठा समाजानंतर महार समाज हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समाज आहे. राज्यात महारांची लोकसंख्या सुमारे 9 टक्के इतकी आहे. महार समाज हा 98-99% जरी बौद्ध धर्मीय असला तरी सुद्धा महारांचा एक मोठा गट (38%) 2011 मध्ये जनगणनेत धर्माने ‘हिंदू’ म्हणून नोंदवला गेला आहे. परिणामी राज्यात बौद्धांची संख्या बरीच कमी दिसते.

 

2001 च्या जनगणनेनुसार, महार समाजाची धार्मिक वर्गवारी खालीलप्रमाणे होती. [संदर्भ]

  • बौद्ध महार – 31,91,548 (56.2%)
  • हिंदू महार – 24,81,684 (43.7%)
  • शीख महार – 5,983 (0.10%)
  • एकूण महार – 59,78,912 (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, महारांची धार्मिक वर्गवारी खालीलप्रमाणे होती.

  • बौद्ध महार – 49,43,821 (61.75%)
  • हिंदू महार – 30,54,158 (38.15%)
  • शीख महार – 8,081 (0.10%)
  • एकूण महार – 80,06,060 (100%)

 

राज्यातील 30.54 लाख हिंदू महारांची नोंद जर बौद्ध महार म्हणून झाली असती तर खालीलप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये बौद्धांची संख्या वाढली असती आणि हिंदूंची संख्या कमी झाली असती.

  • बौद्ध : 82,58,442 (62.21%)
  • हिंदू : 50,05,972 (37.71%)
  • शीख : 11,484 (0.09%)
  • एकूण : 1,32,75,898 (100%)

 

हिंदू म्हणून नोंदवलेल्या साडेतीस लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर खालीलप्रमाणे बदल झाले असते.

1) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील 49.44 लाख बौद्ध महार आणि 30.54 लाख हिंदू महार यांची लोकसंख्या एकत्रित होऊन ’80 लाख [बौद्ध महार]’ झाली असती. जवळजवळ सर्व महार हे बौद्ध झाले असते.

2) महाराष्ट्रात, अनुसूचित जातीमधील 80.60 लाख (61%) दलित हिंदू आणि 52.04 लाख दलित बौद्ध (39%) यांचे गुणोत्तर बदलून 82.58 लाख (62%) दलित बौद्ध आणि 50.06 लाख (38%) दलित हिंदू झाले असते. म्हणजे अनुसूचित जातीतील हिंदू आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या अगदी उलट-सुलट झाली असती.

3) महाराष्ट्र राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्या 65 लाख ही वाढून 95.85 लाख झाली असती. म्हणजेच राज्यातील बौद्धांचे प्रमाण 6 टक्क्यांवरून 8.5 टक्क्यांपर्यंत वाढले असते. यावेळी राज्यातील हिंदूंचे प्रमाण सुद्धा 79.80% वरून 77.30% झाले असते.

4) 30.53 लाख महारांमुळे, भारतातील अधिकृत बौद्ध लोकसंख्या 84 लाख (0.70%) वरून 1 कोटी 15 लाख (0.95%) झाली असती. मात्र, देशातील लोकसंख्येत 1% होण्यासाठी अजून 7 लाख बौद्ध लोकसंख्या कमी पडली असती‌.

 

2011 च्या जनगणनेत, 80 लाख लोकांची नोंदणी ‘महार’ म्हणून झाली आहे, तथापि 15 ते 20 लाख महार पार्श्वभूमीच्या लोकांची नोंदणी अनुसूचित जातीचे महार म्हणून झाली नाही. कमाल 13 लाख ‘पूर्वाश्रमीचे’ महार असेही आहेत, ज्यांनी जनगणनेत स्वतःला ‘महार’ म्हणून नोंदणीकृत केले नाही, त्यांनी फक्त धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध’ नोंदवले, आणि [अनुसूचित] जातीचा रकाना रिकामा ठेवला. अशा व्यक्तींची गणना बौद्धांमध्ये तर झाली परंतु अनुसूचित जातींमध्ये (तसेच महार लोकसंख्येमध्ये) ते समाविष्ट झाले नाही. यामुळे बौद्धांची लोकसंख्या थोडी वाढली परंतु अनुसूचित जातींची आणि महारांची लोकसंख्या घटली.

या व्यतिरिक्त अजून सुमारे 7 लाख महार हे अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट झालेले नाही. हे महार लोक प्रामुख्याने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म मानणारे आहेत. बौद्ध बनलेले पूर्वश्रमीचे महार तसेच ख्रिश्चन व इस्लाम आणणारे महार यांची लोकसंख्या आणि अनुसूचित जातीच्या (हिंदू, बौद्ध व शीख) महारांची लोकसंख्या एक कोटी पेक्षा जास्त होते, जे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के आहे.

 

जनगणनेमधील नोंदणी नुसार, 2001 मध्ये, 56 टक्के महार हे बौद्ध होते, जे 2011 मध्ये 62 टक्के झाले. म्हणजेच या दहा वर्षांमध्ये सुमारे 5.5 टक्के महार लोकांनी स्वधर्माची नोंद ‘बौद्ध’ म्हणून केली. दुसरीकडे 2001 ते 2011 या वर्षांमध्ये हिंदू धर्म नोंदवणारे महार 43.7% हून 38.15% झाले (साडेपाच टक्क्यांची घट). 2021 मध्ये जनगणना झाली असती तर बौद्ध धर्म नोंदवणारे महार हे निश्चितच 70% च्या पुढे दिसले असते. पुढील 2-3 दशकांमध्ये, महार समाजामध्ये 90% पेक्षा जास्त बौद्ध धर्माची नोंदणी होणार असल्याचे दिसत आहे.

महार समाजाची विभागणी खालील तीन गटांमध्ये करता येईल.

  1. धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
  2. धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
  3. धर्म ‘बौद्ध’ नोंदवणारे पण कोणतीही जात न नोंदवणारे [पूर्वाश्रमीचे महार]

 

महारांचा धर्म

महार म्हणजेच हिंदू का?

मिथक : ‘महार म्हणजेच हिंदू’ आणि ‘बौद्ध म्हणजेच महार’

अनुसूचित जातीची व्यक्ती किंवा दलित व्यक्ती ही सामान्यतः ‘हिंदू’ मानली जाते, परंतु प्रत्यक्षात अनुसूचित जातीची व्यक्ती ही केवळ धर्माने हिंदू असते, ही एक मिथक आहे असे दिसते. अनुसूचित जातींमध्ये हिंदूंसोबत बौद्ध आणि शीख यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे ‘महार जात’ लिहिल्याने ‘धर्म’ आपोआप ‘हिंदू’ होतो, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

अनेक बौद्ध लोक महार लोकांना हिंदू मानतात. त्यांच्या मते, महार ही एक ‘हिंदू जात’ आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शाळेच्या कागदपत्रावर (टीसी वगैरे) किंवा जनगणनेत जातीच्या रकान्यात महार नोंद केली गेली असेल तर त्या व्यक्तीचा ‘धर्म’ हा आपोआप ‘हिंदू’ होतो. परंतु या खरे नाही.

व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी तिला स्वतःचा धर्म निवडण्याचा अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती महार असेल तर ती हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांपैकी कोणताही धर्म नोंदवू शकते. तेव्हा फरक इतकाच राहील की हिंदू, बौद्ध किंवा शीख हे तीन धर्म नोंदवणारे महार लोक हे अनुसूचित जातीचे असतील; तर जैन, ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म नोंदवणारे महार हे अनुसूचित जातीमध्ये मोडणार नाहीत. त्यामुळे महार व्यक्तीने धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध धर्म’ नोंदवला तर तिच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर देखील गदा येत नाही. त्यामुळे महारांनी धर्माची नोंद ‘बौद्ध’ करणे काहीही गैर नाही. हेच मांग, चांभार यांच्यासह सर्वच अनुसूचित जातींसाठी लागू आहे.

 

बौद्ध धर्मात तर जाती नाहीत मग आपण जातीच्या रकान्यात महार/ मांग/ चांभार/ भंगी किंवा इतर जात का नोंदवायची?

याचे उत्तर सोपे आणि सरळ आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येण्यासाठी आपण 59 अनुसूचित जातींपैकी कोणतीतरी एक जात नोंदवणे गरजेचे वा अनिवार्य असते. अशावेळी दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बौद्ध धर्मात जाती नाही तर मग आपण अनुसूचित जाती प्रवर्गात का यायचे? याचे उत्तर सरळ आहे की आपण ‘मागास‘ (backward) आहोत म्हणून आपणास अनुसूचित जाती प्रवर्गात यायचे आहे. बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आपण पुढारलेलो (forward) झालो नाहीत. आपल्या समाजात प्रचंड गरिबी आणि मागासलेपण आहे हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे, बौद्ध धर्मात जाती नाहीत यामुळे आपण अनुसूचित जातीची नोंद लिहिणे टाळण्याऐवजी, आपण ‘मागासलेले’ आहोत म्हणून [अनुसूचित] जातीची नोंद लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. बौद्ध धर्मासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण नाकारण्या इतपत बौद्ध समाज बांधव सक्षम झालेले नाहीत, हे सत्य आपण विसरायला नको. बौद्धांमधील एक फार लहान गट हा श्रीमंत आणि सधन झालेला आहे, या गटाला एससीचे आरक्षण नाही मिळाले तरी तो स्वबळावर कर्तुत्व गाजवू शकतो.

परंतु बहुंशी बौद्ध समाज हा आरक्षणाशिवाय आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी भरण्यास सक्षम नाही. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सवर्ण किंवा पुढारलेल्या जातींमधील विद्यार्थ्यांएवढ्या उपलब्ध बाबी अनुसूचित जातीच्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नसतात. अशावेळी बौद्ध समाजाला आरक्षणाची गरज असल्याची जाणवते. आजच्या बौद्ध आणि अनुसूचित जातींच्या समाजाने ‘अस्पृश्यता’ भोगली आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाच्या मदतीने पुढे येण्याची संधी मिळत आहे.

महत्त्वाचे हे की, आपला उद्देश हा जातीच्या रकान्यात ‘जात’ नोंदवणे नसून आपली नोंद ही ‘अनुसूचित जाती’ म्हणून व्हावी यासाठी आहे. अनुसूचित जातीची नोंद व्हावी म्हणून आपल्याला 59 पैकी कोणती तरी एक जात नोंदवणे अनिवार्य असते. धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध धर्म’ नोंदवावा.

  • धर्म : बौद्ध
  • जात : (59 पैकी एक)
  • प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC)

 

‘सर्व बौद्ध’ हे ‘महार’ आहेत

‘सर्व बौद्ध’ हे ‘महार’ आहेत – हा सुद्धा एक गैरसमज आहे. महार हा अनुसूचित जातींमधील सर्वात मोठा समाज आहे आणि बहुसंख्य महार हे बौद्ध धर्मीय आहेत. उर्वरित 58 अनुसूचित जातींपैकी एकाही जातीमध्ये बौद्ध धर्म बहुसंख्यक नाही. असे असले तरी सर्वच महार हे बौद्ध नाहीत हेही तितकेच खरे.

आता आपण दुसरा मुद्दा विचारात घ्यायला हवा. महाराष्ट्रातील 59 जातींपैकी जवळजवळ सर्वच (53) जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळतात. ज्या 6 जातींमध्ये बौद्ध नाहीत त्या जातींची एकूण लोकसंख्या ही 50-100 च्या आत आहे. जर या जातींची लोकसंख्या 200-400 जरी असली असती तरी सर्वच 59 जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले असते.

महाराष्ट्रातील बौद्ध बांधव हे केवळ महार जातीशी संबंधित नसून ते जवळजवळ सर्वच अनुसूचित जातींमधून आहेत. त्यामुळे ‘सर्व बौद्ध हे महार आहेत’ किंवा ‘महार या एकाच जातीमध्ये बौद्ध धर्म आहेत’ हा एक गैरसमज आहे. बौद्धांनी महार या समाजाला ‘जात’ (caste) समजण्याऐवजी ‘समूह’ (community) समजणे जास्त उपयुक्त ठरेल.

अनुसूचित जातींमध्ये जेवढे बौद्ध धर्मीय आहेत, त्यापैकी 95 टक्के हे एकट्या महार जातीतून येतात, उर्वरित 58 अनुसूचित जातींमध्ये 5 टक्के बौद्ध आहेत.

 

नवबौद्ध

‘नवबौद्ध’ ही एक सरकारी संज्ञा आहे. महाराष्ट्र शासन वेळोवेळी अनुसूचित जातींसाठी योजना काढते तेव्हा त्यावर लिहिलेले असते – ‘अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी’ योजना. प्रत्यक्षात नवबौद्ध हा ‘प्रवर्ग’ नाही, नवबौद्ध ही ‘जात’ नाही, किंवा 59 पैकी एखादी ‘अनुसूचित जाती’ नाही, तसेच नवबौद्ध हा ‘धर्म’ देखील नाही. नवबौद्ध हे निश्चितच बौद्ध धर्मीय असले तरी त्यांची ओळख थोडी वेगळी आहे. नवबौद्ध म्हणजेच ‘अनुसूचित जातीमधील बौद्ध धर्मीय व्यक्ती‘.

नवबौद्ध हे अनुसूचित जातींच्या अंतर्गत येतात, बौद्ध धर्माच्या अंतर्गत येतात. ‘बौद्ध धर्म स्वीकारलेले’ किंवा ‘बौद्ध धर्म अंगीकारणारे’ पूर्वाश्रमीचे अस्पृश्य (किंवा दलित) लोक म्हणजे नवबौद्ध होत. महाराष्ट्रातील 53 अनुसूचित जातींमध्ये जे 52,04,284 बौद्ध आहेत, ते सर्व नवबौद्ध आहेत.

नवबौद्ध हे बहुसंख्य (95%) महार असले तरी सर्वच नवबौद्ध हे महार समाजाचे नाहीत, आणि सर्वच महार देखील नवबौद्ध नाहीत. नवबौद्ध यास पर्यायी शब्द ‘अनुसूचित जातीचे बौद्ध’ (एससी बुद्धिस्ट) आणि ‘दलित बौद्ध’. ‘दलित हिंदू’ व ‘दलित शीख’ प्रमाणे ‘दलित बौद्ध’ ही संज्ञा हिंदी मिडीयामध्ये वापरली जाते.


जनगणेचे अधिकृत संदर्भ 


सारांश

या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय यादी आणि संबंधित इतरही माहिती जाणून घेतली. धम्म भारतच्या माध्यमातून पहिल्यांदाच राज्यातील प्रत्येक अनुसूचित जातीची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या + धर्मनिहाय लोकसंख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला? या लेखाविषयी तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ईमेल द्वारे जरूर कळवा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *