विक्रम गोखले दिसतील डॉ‌‌. आंबेडकरांच्या भूमिकेत; येतेय Ambedkar – The Legend ही भव्य वेबसिरीज

संजीव जयस्वाल दिग्दर्शित ‘आंबेडकर – द लेजंड‘ या भव्य वेब सिरीजची निर्मिती सध्या सुरु आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले साकारतील. या वेब सिरीजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अस्पर्शित पैलू दाखवले जाईल. Ambedkar – The Legend
Ambedkar The Legend

2021 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी एक बातमी आली होती, जी जाणून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या कालावधीपर्यंत टीव्हीवर आणि सिनेमांतून डावलण्यात आले होते. पण आज घडीला त्यांच्यावर एकावर एक चित्रपट व वेबसिरीज बनत आहेत. सध्या अशाच एका भव्य वेबसिरीजची निर्मिती होत आहे, जीचे नाव आहे ‘आंबेडकर – द लेजंड‘. वेब सिरीजचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक संजीव जयस्वाल आहेत. या वेब सीरिजमध्ये अशाही काही घटनांचा उल्लेख असेल ज्यांना यापूर्वी आपण चित्रपटांत किंवा टीव्ही मालिकेत पाहिलेले नसेल. या मालिकेत भारतरत्न डॉ. आंबेडकरांची भूमिका जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले साकारणार आहेत.

 

 

एक डझन पेक्षा जास्त अभिनेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रपटांच्या आणि मालिकांच्या माध्यमातून पडद्यावर साकारले आहे. यांमध्ये 21 वर्षापूर्वी दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी साऊथचा सुपरस्टार मामूट्टी यांच्या प्रमुख भूमिकेतील बनवलेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपट उल्लेखनीय आहे. प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ही एक महत्त्वाकांक्षी वेब सिरीज बनत आहे. Ambedkar – The Legend ही मालिका ओटीटीवर बाबा प्ले नावाच्या ॲपवर रिलीज होईल. ६ डिसेंबर २०२१ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालिकेच्या निर्मात्यांनी सोमवारी ही घोषणा केली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सोशल मीडिया एंटरटेनमेंट ॲप आणि ओटीटी प्लॅटफॉर्म बाबा प्लेच्या ‘आंबेडकर – द लेजंड’ वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. ही बायोपिक सिरीज भारताचे महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘आंबेडकर – द लेजंड’ या मालिकेत डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग दाखवले जाणार आहेत, ज्याने त्यांना भारताचा चेहरामोहरा बदलून टाकणारा नेता बनवला. विक्रम गोखले हे महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आहेत. वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारताना ते दिसत आहेत. गोखले यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच ते अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा झळकले आहेत.

 

बाबासाहेबा़ची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेता विक्रम गोखले म्हणाले की,

भारतातील एका सर्वात प्रभावशाली व्यक्तीची भूमिका साकारणे ही सन्मानाची गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत आणि मी माझ्या अभिनयातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देण्याची जबाबदारी घेतो. मी OTT वर माझा ठसा उमटवण्यास देखील उत्सुक आहे. विक्रम गोखले पुढे म्हणाले की, मनोरंजन क्षेत्रात बाबा प्ले जे काही करत आहेत ते आपल्या तरुणांना आपल्या इतिहासाशी जोडण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यावर्षी 6 डिसेंबर (2021) रोजी येणारी डॉ. आंबेडकरांची पुण्यतिथी ही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या स्मृतीस श्रद्धांजली असेल.

 

वेब सिरीजचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक संजीव जयस्वाल म्हणाले की,

डॉ. आंबेडकरांना भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार किंवा दलित नेते म्हणून ओळखले जाते, परंतु प्रत्यक्षात ते भारतातील महिला सक्षमीकरणाचा चेहरा आहेत. त्यांच्या कार्याने समाजात महिलांच्या समान हक्कांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या चर्चेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उदाहरण म्हणून, 1930 च्या दशकाच्या सुरुवातीस भारताच्या संवैधानिक स्थितीवर गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटिशांनी निवडलेल्या दोन अस्पृश्य प्रतिनिधींपैकी एक म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या दिशेने होणाऱ्या चर्चेत देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अस्पृश्य हा समाजातील एकमेव दलित वर्ग नव्हता जो डॉ. आंबेडकरांच्या कार्याने उभा राहिला. भारतातील सामाजिक-आर्थिक भेद कमी करण्यासाठीही त्यांनी काम केले.

 

या वेब सिरीजचे सादरीकरण दिग्दर्शक संजीव जयस्वाल करत आहेत. त्यांनी फरेब, अन्वर, शूद्र: द रायझिंग आणि प्रणाम यासारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केलेली आहे. जैस्वाल म्हणाले की, आपले राष्ट्र एका अधिक न्यायसंगत आणि सर्वसमावेशक संस्कृतीकडे वाटचाल करत आहे, कारण एका व्यक्तीने एक चळवळ सुरू केली ज्याने आम्हाला या मार्गावर आणले. त्यांच्या विचारधारेला आदरांजली म्हणून, आम्ही आंबेडकरवाद्यांना समर्पित भारतातील पहिले सोशल मीडिया मंच तयार केला आहे. मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्याचे ते एक साधन असेल. ‘आंबेडकर – द लेजंड’ ही केवळ मनोरंजनाची मालिका वा वेब सिरीज नाही आहे, तर ही या सुधारक नेत्याच्या कार्याच्या महानतेला दिलेली श्रद्धांजली आहे. बाबा प्ले ॲप ‘आंबेडकर द लिजेंड’ या वेब सिरीजचे मोशन पोस्टर आणि ट्रेलरचे अनावरण करेल, जे भारताचे महान सुधारणावादी नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे प्रदर्शन करेल.

संजीव जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वी ‘कोटा – द रिझर्वेशन’चे टेलर आपल्या बाबा प्ले ॲप वर प्रसिद्ध केले होते. हा चित्रपट शैक्षणिक क्षेत्रातील जातीय भेदभाव यावर आधारित असणार आहे.

 

हे ही वाचलंत का?

 


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखाचे notification मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *