भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती

भारतासह जगभरात अनेक महान बौद्ध व्यक्ती निर्माण झाल्या आहेत. आज आपण भारतीय इतिहासातील टॉप 30 सर्वात प्रसिद्ध व महान बौद्ध व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेणार आहोत. क्रमवार पद्धतीने भारत भूमीतील शीर्ष सर्वात प्रसिद्ध बौद्ध धर्मीय व्यक्ती कोणकोणत्या असाव्यात? असा प्रश्न अनेकांच्या मनात कदाचित पडलेला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून जाणणार आहोत. या यादीमध्ये प्राचीन काळापासून ते वर्तमान काळापर्यंतच्या 30 उल्लेखनीय भारतीय बौद्धांचा समावेश आहे. – top 30 most famous buddhists in India

 Read this article in English 

Top 30 Most Famous Indian Buddhists of All Time
Top 30 Most Famous Indian Buddhists of All Time

India’s Top 30 most famous Buddhist people of all time; sorted or ranked by the Historical Popularity Index (HPI)  of Pantheon

भारत ही बुद्धभूमी आहे. सुमारे 2600 वर्षांपूर्वी प्राचीन भारतात बुद्धांचा जन्म झाला होता. भारत हे बौद्ध धर्माचे उगम स्थान असल्याने भारताला अनेक जगप्रसिद्ध आणि महानतम बौद्ध धर्मीय लोक लाभले असल्याचे आपल्याला दिसते.

पँथिऑनच्या 2022 च्या ‘हिस्टॉरिकल पॉप्युलरिटी इंडेक्स’ (HPI) अर्थात ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकांनुसार या टॉप 30 सर्वात लोकप्रिय आणि महान भारतीय बौद्धांची क्रमवारी लावली गेली आहे.

Top 30 Most Famous Indian Buddhists of All Time

या यादीमधील बौद्ध व्यक्ती जगभरात लोकप्रिय आहेत. ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (एचपीआय) खेरीज, या बौद्ध व्यक्तींचे विकिपीडिया चरित्रलेख विकिपीडियांच्या किती आवृत्तींमध्ये उपलब्ध आहेत, याचे सुद्धा माहिती लेखात दिलेली आहे.

 

Historical Popularity Index (HPI) मध्ये संबंधित व्यक्तीच्या इंटरनेटवरील लोकप्रियतेचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये व्यक्तीचा विकिपीडिया चरित्रलेख किती विकिपीडिया भाषांमध्ये लिहिला गेला आहे, त्या चरित्रलेखाला किती वाचकसंख्या (views) आहे, सदर व्यक्ती किती प्राचीन अथवा आधुनिक काळातील आहे, नॉन-इंग्लिश विकिपीडियांवर व्यक्तीची लोकप्रियता किती आहे, यासारख्या बाबी विचारात घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक ठरवला जातो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटायला नको की भारतात सर्वात जास्त ऐतिहासिक लोकप्रिय निर्देशांक हा एका बौद्ध व्यक्तीचा आहे. अर्थात भारतीय इतिहासातील सर्वच मानवांमध्ये (महिला आणि पुरुष) पहिले सर्वाधिक प्रसिद्ध आणि महानतम व्यक्ती म्हणजे तथागत ‘बुद्ध’ होत.

 

भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध व महान बौद्ध – India’s 30 most famous and greatest Buddhists

 

भारतातील 30 प्रसिद्ध व महान बौद्ध – Famous Buddhists in India

#31. महेंद्र (HPI – 54.11)

54.11 च्या हिस्टॉरिकल पॉप्युलरिटी इंडेक्ससह (HPI), महेंद्र हे 31 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध आहेत.

महेंद्र किंवा महिंद हे इ.स.पू. तिसऱ्या शतकातील (उज्जैन, मध्य प्रदेश) भारतीय बौद्ध भिक्खू होते. ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केले जाते. ते मौर्य चक्रवर्ती सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.

 

#30. संघमित्रा (HPI – 54.63)

54.63 च्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकांसह (HPI), संघमित्रा ही 30 व्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय भारतीय बौद्ध आहे.

संघमित्रा (इ.स.पू. 281 – इ.स.पू. 292) ह्या सम्राट अशोक आणि त्यांची बौद्ध धर्मीय राणी देवी यांची मुलगी व एक अर्हत पद प्राप्त भिक्खुणी होत्या. महेंद्र या आपल्या भावासोबतच त्यांनीही मठवासी बौद्ध भिक्खुणींचे अनुयायीत्व पत्करले, आणि पुढे बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे श्रीलंकेत गेली, आणि तेथे बौद्ध धर्म रुजवला. आजही श्रीलंकेत बौद्ध धर्म हा देशाचा सर्वात मोठा धर्म आहे.

 

#29. राहुल सांकृत्यायन (HPI – 54.72)

54.72 च्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकांसह (HPI), राहुल सांकृत्यायन हे 29 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध आहेत.

महापंडित राहुल सांकृत्यायन (9 एप्रिल 1893 – 14 एप्रिल 1963) हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक, पंडित, बौद्ध भिक्खू व तत्त्वज्ञानी होते. बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने ते सन्मानित झालेले आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन होते.

 

#28. खेमा (HPI – 55.25)

खेमा ही 28 व्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून तिचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 55.25 आहे.

खेमा ही बुद्धकालीन बौद्ध भिक्खुणी होती, जी बुद्धांच्या उच्च महिला शिष्यांपैकी एक होती. प्राचीन भारतीय मगध राज्याचा राजा बिंबिसार याची ती पत्नी होती. बुद्धांनी तिला आपली सर्वात हुशार शिष्या घोषित केले.

 

* आर्यदेव (HPI – 56.48)

आर्यदेव यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 56.48 आहे.

आर्यदेव हे तिसऱ्या शतकात झालेले नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखक होते. त्यांना चान बौद्ध धर्मातील 15 व्या कुलपतीची मान्यता देत ‘काणदेव’ असेही म्हटले जाते. ते श्रीलंकेत “बोधिसत्त्व देव” म्हणून ओळखले जातात. ते सिंहली होते त्यामुळे अनेकदा त्यांचा संबंध श्रीलंकेशी जोडला जातो.

 

#27. शांतरक्षित (HPI – 56.90)

शांतरक्षित हे 27 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 56.90 आहे.

शांतरक्षित (725 – 788) हे विशेषत: तिबेटी बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली भारतीय बौद्ध तत्त्वज्ञ होते. ते माध्यमक पंथाचे तत्त्वज्ञानी होते, ज्यांनी ज्ञानगर्भाच्या अंतर्गत नालंदा मठात शिक्षण घेतले आणि तिबेटमधील पहिले बौद्ध मठ साम्येचे संस्थापक बनले. ते प्रसिद्ध व महान बौद्ध होते.

 

#26. दिग्नाग (HPI – 57.10)

दिग्नाग हे भारतातील 26 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 57.10 आहे.

दिग्नाग किंवा दिङ्नाग (480 – 540) हे भारतीय बौद्ध विद्वान आणि भारतीय तर्कशास्त्र (हेतु विद्या) च्या बौद्ध संस्थापकांपैकी एक होते. दिग्नागाच्या कार्याने भारतातील तर्कशास्त्राच्या विकासासाठी पाया घातला आणि बौद्ध तर्कशास्त्र आणि ज्ञानशास्त्र (प्रमाण) ची पहिली प्रणाली तयार केली. दिङ्नाग दोनच प्रमाण स्वीकारत होते – प्रत्यक्ष आणि अनुमान. ते संस्कृतचे महान कवी होते.

 

#25. शांतीदेव (HPI – 59.42)

शांतीदेव हे 25 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 59.42 आहे.

शांतीदेव हे 8 व्या शतकातील भारतीय तत्त्वज्ञ, बौद्ध भिक्खू, कवी आणि नालंदाच्या महाविहारातील विद्वान होते. ते नागार्जुनाच्या माध्यमक तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते. शांतीदेव यांना 84 महासिद्धांपैकी एक मानले जाते. ते प्रसिद्ध व महान बौद्ध होते.

 

#24. बुद्धघोष (HPI – 60.40)

बुद्धघोष हे 24 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 60.40 आहे.

बुद्धघोष हे 5 व्या शतकातील भारतीय थेरवाद टिकाकार, अभ्यासक आणि विद्वान होते. त्यांचे सर्वश्रेष्ठ काम विशुद्धीमार्ग आहे, जे बुद्धांच्या मुक्तीच्या मार्गावर थेरवादाच्या ज्ञानाचा व्यापक सारांश व विश्लेषण आहे. त्यांना सामान्यतः थेरवादाचे सर्वात महत्त्वाचे टीकाकार म्हणून मान्यता प्राप्त आहे.

 

#23. मौद्गल्यायन (HPI – 62.90)

मौद्गल्यायन हे 23 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 62.90 आहे.

मौद्गल्यायन (महामौद्गल्यायन, किंवा मोग्गलाना) हे बुद्धांच्या सर्वात जवळच्या शिष्यांपैकी एक होते. ते बुद्धकालीन होते, तसेच सुभूती, श्रीपुत्र आणि महाकाश्यप यांसारख्या शिष्यांचे समकालीन म्हणून वर्णन केलेले, ते श्रीपुत्रासह बुद्धांच्या दोन प्रमुख पुरुष शिष्यांपैकी दुसरे मानले जातात.

 

#22. अतिष – (HPI – 63.28)

अतिष हे 22 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 63.28 आहे.

अतिष दिपकर श्रीज्ञान (982–1054) हे बौद्ध धर्मगुरू आणि विद्वान होते. त्यांनी बिहारमधील विक्रमशिला मठात काम केले आहे. ते 11व्या शतकातील महायान आणि वज्रयान बौद्ध धर्माच्या आशियातील प्रसारातील प्रमुख व्यक्तींपैकी एक होते आणि त्यांनी तिबेटपासून सुमात्रापर्यंत बौद्ध विचारांना प्रेरित केले. मध्ययुगीन बौद्ध धर्मातील एक महान व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

 

#21. महाकश्यप (HPI – 63.35)

महाकश्यप हे 21 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 63.35 आहे.

महाकश्यप हे बुद्धकालीन अर्हत (ज्ञानी शिष्य), तपस्वी व अभ्यासात अग्रणी होते. ते गौतम बुद्धांचे एक प्रमुख शिष्य होते. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर महाकश्यप यांनी भिक्खू संघाचे नेतृत्व स्वीकारले. सुरुवातीच्या बौद्ध शाखांमधील ते पहिले कुलपुरूष मानले जाते आणि चान आणि झेन बौद्ध परंपरेत कुलगुरू म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम राहिली आहे. ते प्रसिद्ध व महान बौद्ध होते.

 

20. महाप्रजापती गौतमी (HPI – 63.46)

ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (HPI) नुसार, महाप्रजापती गौतमी ह्या सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्धांमध्यै 20व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक (HPI) 63.46 आहे. तिचे चरित्र विकिपीडियावर 28 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. महाप्रजापती गौतमी ह्या सर्वकाळीन सर्वात प्रसिद्ध भारतीय महिलांमध्ये 13 व्या क्रमांकावर आहेत.

महाप्रजापती गौतमी ही बुद्धाची पालक-माता, सावत्र आई आणि मावशी (आईची बहीण) होती. बौद्ध परंपरेत, महिलांसाठी नियुक्ती शोधणारी ती पहिली महिला होती, जी तिने थेट गौतम बुद्धांकडून केली आणि ती पहिली भिक्खुनी (बौद्ध नन) बनली.

 

#19. असंग (HPI – 63.65)

असंग हे भारतातील 19 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 63.65 आहे.

असंग हे चौथ्या शतकातील महायान बौद्ध धर्मातील एक “सर्वात महत्त्वाची आध्यात्मिक व्यक्ती” आणि “योगाचार शाखेचे संस्थापक” होते. आपला सावत्र भाऊ वसुंबंधु यांना बोधिसत्त्व मार्गावरील महायान अभिधर्म, विजयनवाद (जागरूकता) विचार आणि महायान शिकवण देणारे भारतीय शास्त्रीय संस्कृत प्रमुख म्हणून अभंग यांना ओळखले जाते.

 

18. अजातशत्रू (HPI – 64.45)

अजातशत्रू हा 18 व्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्याचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 64.45 आहे.

अजातशत्रू (इ.स.पू. 493 – इ.स.पू. 461) हा मगध वंशीय सम्राट आणि राजा बिंबिसार यांचा पुत्र होता. तो भगवान महावीर आणि भगवान बुद्धांच्या समकालीन राजा होता. ह्याच्या राजवटीची इ.स.पू. 554 – 527 किंवा इ.स.पू. 493 – 462 अशी कालमर्यादा सांगितली जाते. बौद्ध साहित्यात आणि जैन साहित्यात कूणिक, कूणिय अशा नावांनीही अजातशत्रूचा उल्लेख आढळतो.

 

#17. वसुबंधू (HPI – 64.47)

वसुबंधू हे 17 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 64.47 आहे.

वसुबंधू हे चौथ्या शतकातील गांधारचे (सध्याचे पाकिस्तान) एक प्रभावी बौद्ध भिक्खू, तत्त्ववेत्ते आणि विद्वान होते. त्यांनी सर्वत्ववाद आणि सौत्रिक शाखांच्या दृष्टीकोनातून अभिधम्मपिटकावर भाष्य लिहिले होते. महायान बौद्ध धर्मात त्यांनी धर्मांतर केल्यानंतर, त्यांचा सावत्र भाऊ असंग (#19) यांसह, त्यांना योगाकार शाखेचा मुख्य संस्थापक देखील मानले जाऊ लागले.

 

#16. कनिष्क (HPI – 64.83)

कनिष्क हा 16 व्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्याचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 64.83 आहे.

सम्राट कनिष्क हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. 127 ते इ.स. 151 दरम्यान सत्तेवर होता. कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. तो एक बौद्ध धर्मीय सम्राट होता. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजांनी केली. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा होत्या. कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमधल्या कुंडलवनात भरवण्यात आली. कनिष्काच्या काळात अश्वघोष (#15) हा कवी होऊन गेला.

 

#15. अश्वघोष (HPI – 65.75)

अश्वघोष हे भारतातील 15 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 65.75 आहे.

अश्वघोष (80 – 150) हा प्राचीन भारतातील बौद्ध विद्वान व संस्कृत भाषेतील नाटककार, कवी होता. हा कालिदासापूर्वीच्या काळातील अग्रणी भारतीय नाटककार मानला जातो. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत.

 

#14. बिंबिसार (HPI – 66.67)

राजा बिंबिसार हा 14 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्याचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 66.67 आहे.

सम्राट बिंबिसार (इ.स.पू. 544 – इ.स.पू. 491) हा मगध साम्राज्याचा संस्थापक व अजातशत्रूचा पिता होता. इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू, पांचाल, गांधार, अवंती, मगध अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली. त्याने मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. बिबिसार वयाच्या 15 वर्षी इ.स.पूर्व 543 मध्ये मगधच्या गादीवर आला. तो हुशार, मुत्सद्दी, धोरणी व पराक्रमी होता. तो बुद्धांचा समकालीन आणि बौद्ध धर्माचा अनुयायी होता.

 

#13. शुद्धोधन (HPI – 66.69)

शुद्धोधन हे 13 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 66.69 आहे.

शुद्धोधन हे इ.स.पू. 6 व्या शतकातील शाक्य वंशाचे राजे होते. ते गौतम बुद्धांचे वडील होते. शाक्यांचा एक नेता असलेले शुद्धोदन सध्याच्या नेपाळमधील एका कुलीन प्रजासत्ताकात राहत होते, त्यांची राजधानी कपिलवस्तु येथे होती.

 

#12. हर्षवर्धन (HPI – 67.46)

हर्ष हे 12 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 67.46 आहे.

सम्राट हर्षवर्धन किंवा हर्ष (इ.स. 590 – इ.स. 647) हे उत्तर भारतातील एक प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धननंतर इ.स. 606 मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. त्यांच्यासंबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहिती मिळते. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपुरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधीन केले. तो बुद्धांची उपासना करी. ते प्रसिद्ध व महान बौद्ध होते.

 

#11. यशोधरा (HPI – 68.11)

यशोधरा ह्या 11 व्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 68.11 आहे.

राजकुमारी यशोधरा ह्या गौतम बुद्धांच्या पत्नी आणि एक महान बौद्ध भिक्खुणी होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध) याच्यांशी झाला. पती गृहत्याग करून संन्यासी झाल्यानंतर यशोधरा यांनीही मूल्यवान वस्त्रे, अलंकार त्यागले आणि त्या साधारण आणि संतासारखे आयुष्य जगू लागल्या. त्यांचा मुलगा राहुलने बुद्धांच्या भिक्खू संघात प्रवेश केला. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधरानेही बुद्धांकडून धम्मदीक्षा ग्रहण करत त्या एक पहिल्या महिला भिक्खुणी बनल्या, आणि अर्हत या अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचल्या.

 

#10. सारिपुत्र (HPI – 68.12)

सारिपुत्र हे भारतातील 18 व्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 68.12 आहे.

सारिपुत्त किंवा सारिपुत्र हे बुद्धकालीन अर्हत प्राप्त भिक्खू होते. ते त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जातात. बुद्धांच्या दोन प्रमुख शिष्यांपैकी सारिपुत्र एक होते. मौद्गल्यायन हे त्यांचे मित्र होते. ते दोघे एकाच दिवशी घराबाहेर पडले आणि नंतर ते दोघेही बुद्धांचे अनुयायी बनले. बुद्धांनी ‘धम्म सेनापती’ ही पदवी दिली. बौद्ध धर्माच्या प्रज्ञापारमिताहृदयसुत्रामध्ये सारिपुत्त आणि अवलोकितेश्वर बोधिसत्त्व यांच्यात झालेली चर्चा आहे. बुद्धांपूर्वी सारिपुत्रांचा मृत्यू झाला. बौद्ध परंपरेनुसार, बुद्धांनी सारीपुत्राला आपला सर्वात हुशार शिष्य घोषित केल्याचे मानले जाते.

 

#9. राहुल (HPI – 68.57)

राहुल हे 9 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 68.57 आहे.

राहुल (इसपू 563 – इसपू 483) हा एक बौद्ध भिक्खू होता. तो गौतम बुद्ध व यशोधरा यांचा एकुलता एक मुलगा होता. गौतम बुद्धांच्या गृहत्यागापूर्वी राहुल जन्मला होता. बालवयातच बुद्धांनी त्यांना आपल्या भिक्खू संघात सहभागी करून घेतले व राहुल पुढे ते स्थवीर भिक्खू बनले.

 

* महामाया (HPI – 69.19)

महामाया यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 69.19 आहे.

मायादेवी, माया किंवा महामाया या बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या आई होत्या. त्या शाक्य वंशाच्या महाराणी आणि राजा शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या. त्यांनी लुंबिनी येथे गौतम बुद्धांना जन्म दिला आणि त्याच्या काही दिवसानंतर त्यांचे निधन झाले. गौतम बुद्धांनी नियुक्त केलेली पहिली भिक्खुनी महाप्रजापती गौतमी ही महामायाची बहीण होती.

 

#8. डॉ. अमर्त्य सेन (HPI – 69.78)

अमर्त्य सेन हे 8 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 69.78 आहे. ते आधुनिक भारतातील दुसरे सर्वात लोकप्रिय बौद्ध आहेत.

डॉ. अमर्त्य कुमार सेन (1933 – ) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, लेखक व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी 1998 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे ते अध्यक्ष होते. डॉ अमर्त्य सेन हे बौद्ध धर्मीय आहेत. डॉ. सुरज एंगडे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सेन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाला अत्यंत तर्कशुद्ध निर्णय म्हटले आणि ते स्वतः देखील बौद्ध धर्मीय असल्याचा खुलासा केला.

 

#7. पद्मसंभव (HPI – 69.92)

पद्मसंभव हे सातव्या क्रमांकाचे भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 76.80 आहे.

पद्मसंभव यांना गुरू रिनपोचे (अमूल्य गुरु) म्हणूनही ओळखले जाते. ते भारतातील एक तांत्रिक बौद्ध वज्र गुरु होते ज्यांनी तिबेटमध्ये वज्रयान शिकवले असावे (सुमारे 8 व्या – 9व्या शतकात). बा टेस्टामेंट सारख्या काही सुरुवातीच्या तिबेटी स्त्रोतांनुसार, ते 8 व्या शतकात तिबेटमध्ये आले आणि तिबेटमधील पहिला बौद्ध मठ, साम्य मठ बांधण्यास मदत केली. तथापि, वज्रयान आणि भारतीय बौद्ध धर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधांव्यतिरिक्त वास्तविक ऐतिहासिक व्यक्तीबद्दल फारसे माहिती नाही. तिबेटमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारात पद्मसंभव हे नंतर एक मध्यवर्ती व्यक्तिमत्व म्हणून पाहिले गेले

 

#6. बोधिधर्म (HPI – 72.92)

बोधिधर्म हे 6 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 72.92 आहे.

बोधिधर्म हे एक भारतीय बौद्ध भिक्खू होते, जे इसवी सन 5 व्या ते 6 व्या शतकात होऊन गेले. त्यांच्याच नेतृत्वातून चीनमध्ये शाओलिन कंग फू या युद्धप्रकाराचा उदय झाला. त्यांना झेन (चान) बौद्ध संप्रदायाचे जनक मानले जाते तसेच त्यांना ‘दुसरे बुद्ध’ असेही म्हटले जाते. औषधशास्त्राचेही त्यांना अतिशय सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या विद्येचा मोठया प्रमाणात प्रसार केला. जापान, चीन व कोरिया मधील बौद्ध अनुयायी त्यांना बुद्धांपर्यंतचा दर्जा देतात.

 

#5. आनंद (HPI – 73.88)

आनंद हे 5 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 73.88 आहे.

आनंद हा गौतम बुद्धांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आणि बुद्धांचा निकटचा सेवक होता. बुद्धांच्या अनेक शिष्यांमध्ये आनंदची स्मरणशक्ती अत्यंत चांगली होती आणि सुत्त पिटकामध्ये असलेली बहुतांश सुत्ते पहिल्या बौद्ध परिषदेदरम्यान बुद्धांने दिलेल्या उपदेशाच्या आनंदला झालेल्या स्मरणावर बेतलेली आहेत. या कारणासाठी आनंदला ‘धर्मरक्षक’ मानले जाते. आनंद सुद्धा एक राजपुत्र होता, त्याचे वडील राजा होते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वीस वर्षानंतर आनंद चे निर्वाण झाले. बुद्धांच्या संघामध्ये महिलांचा समावेश करण्यामध्ये आनंदची महत्त्वाची भूमिका होती.

 

#4. नागार्जुन (HPI – 75.31)

नागार्जुन हे 4 व्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 75.31 आहे.

नागार्जुन (150 – 250) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते. ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते. ते प्रख्यात बौद्धाचार्य व बोधिसत्त्व सुद्धा होते. त्यांनी महायान बौद्ध धर्माचा मध्यमक संप्रदाय स्थापन केला. पौर्वात्य जगातील त्यांचा प्रभाव ऐतिहासिक स्वरूपाचा होता. त्यांना इतिहासातील महान तत्त्वज्ञ मानले जाते. आध्यात्मिकता, तार्किक कुशाग्रता आणि आत्मिक मर्मदृष्टी या बाबींमध्ये आद्य शंकराचार्याचा अपवाद वगळता भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवंत झाला नाही. ते प्रसिद्ध व महान बौद्ध होते.

 

#3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (HPI – 75.72)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 75.72 आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक काळातील पहिले सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956) हे भारतीय बहुआयामी विद्वान – कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी आधुनिक बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, आणि भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारतामध्ये सर्वाधिक कार्य बाबासाहेबांनी केलेले आहे.

 

#. 14वे दलाई लामा (HPI – 79.98) 

dalai lama is a famous people frem india
चौदावे दलाई लामा हे भारतामधील सर्वात लोकप्रिय जीवित व्यक्ती आहेत (Photo by LOBSANG WANGYAL/AFP via Getty Images)

14वे दलाई लामा यांचा Historical Popularity Index (HPI) हा 79.98 असून ते भारतातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये 6 व्या क्रमांकावर येतात. तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय बौद्ध व्यक्तींमध्ये ते तिसऱ्या स्थानावर येतात. त्यांचे चरित्र विकिपीडियाच्या 116 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

चौदावे दलाई लामा (जन्म 6 जुलै 1935) हे 14वे व विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. त्यांचे धार्मिक नाव तेंझिन ग्यात्सो आहे. 17 नोव्हेंबर 1950 रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. दलाई लामा हे तिबेट या भूतपूर्व देशाचे राष्ट्रप्रमुख होते. चीन देशाने तिबेटवर कब्जा केल्यानंतर 1959 मध्ये दलाई लामांनी भारतात शरण घेतली आणि आजपर्यंत ते भारतामधील धर्मशाला या ठिकाणी राहत आहेत. दलाई लामा स्वतःला ‘भारताचा आध्यात्मिक पुत्र‘ मानतात. दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून 1989 साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी सुद्धा झालेली आहे.

 

#2. अशोक (HPI – 82.44)

सम्राट अशोक हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 82.44 आहे. तसेच, आजवरच्या सर्वात लोकप्रिय भारतीय व्यक्तींमध्ये त्यांचे तिसरे स्थान आहे. तथापि, अनेकांद्वारे ‘गौतम बुद्धांनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय सम्राट अशोक’ यांना मानले जाते. Ashoka is the greatest Indian after the Buddha.

चक्रवर्ती सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. 272 – इ.स.पू. 232 दरम्यान राज्य केले. सम्राट अशोक हे भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचे लोककल्याणकारी राजे ज्यांनी अखंड भारतावर राज्यसत्ता प्रस्थापित केली होती. आपल्या सुमारे 40 वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. आपल्या कल्याणकारी नीती व्यतिरिक्त त्यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ओळखले जाते. इतिहासातील महान बौद्ध व्यक्तिमत्त्वांमध्ये सम्राट अशोकाचे स्थान गौतम बुद्धांच्या खालोखाल मानले जाते.

 

#1. गौतम बुद्ध (HPI – 90.82)

बुद्ध हे पहिल्या क्रमांकाचे सर्वात प्रसिद्ध भारतीय बौद्ध असून त्यांचा ‘ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक’ (HPI) 90.82 आहे. आजवरच्या भारतीय व्यक्तींमध्ये बुद्धांचा ‘हिस्टॉरिकल पोप्युलारिटी इंडेक्स’ सर्वोच्च आहे.

गौतम बुद्ध (इ.स.पू. 623/ 563 – इ.स.पू. 543/ 483) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. ते बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्त केल्यानंतर ते बुद्ध बनले. त्यांची पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल हे होत. बुद्धांनी पंचशील, अष्टांगमार्ग, चार आर्यसत्ये यासारख्या शिकवणी त्यांच्या शिष्यांना दिल्या. बुद्धांना जगातील सर्वात प्रभावशाली धर्म संस्थापक मानले जाते. ते भारतीय इतिहासातील आजवरचे सर्वश्रेष्ठ मानव आहेत. The Buddha is India’s greatest person ever.


* आर्यदेव (HPI – 56.48) यांना श्रीलंकन बौद्ध मानले जातात, आणि महामाया (HPI – 59.19) या बौद्ध धर्मीय नाहीत. त्यामुळे या दोन व्यक्तींना यादीत समाविष्ट केले असले तरीही त्यांना रँक दिली गेलेली नाही.

 

या यादीमध्ये 12 बुद्धकालीन अथवा बुद्धांच्या समकालीन बौद्ध धर्मीय व्यक्ती आहेत, ज्या सामान्यपणे इसवी सन पूर्व तिसऱ्या ते इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये झालेल्या आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – खेमा, मोगलायन, महाकश्यप, अजातशत्रू, बिंबिसार, शुद्धोधन, महाप्रजापती गौतमी, यशोधरा, सारिपुत्र, राहुल, आनंद आणि गौतम बुद्ध.

वरील बुद्धकालीन व्यक्तींव्यतिरिक्त अन्य तीन व्यक्ती सुद्धा इसवी सनाच्या पूर्वी झालेल्या आहेत. सम्राट अशोक आणि त्यांची मुले – महिंद्र आणि संघमित्रा या तीन बौद्ध व्यक्ती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या आहेत. अर्थात भारताच्या 30 सर्वाधिक लोकप्रिय बौद्धांमध्ये इसवी सनाच्या पूर्वी 14 व्यक्ती झालेल्या आहेत.

उर्वरित 16 बौद्ध व्यक्ती ह्या इसवी सनाच्या मधील आहेत. “अश्वघोष” हे पहिल्या व दुसऱ्या शतकात होऊन गेले. “कनिष्क” हा दुसरा शतकातील राजा होता. “नागार्जुन” हे दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील विद्वान होते.

“वसुबंधू” आणि “असंग” हे चौथ्या शतकातील व्यक्ती होते, तर “बुद्धघोष” हे पाचव्या शतकात होऊन गेले. “बोधिधर्म” आणि “दिग्नाग” हे दोघेही पाचव्या व सहाव्या शतकात होते. यानंतरच्या सातव्या शतकामध्ये “सम्राट हर्षवर्धन” होऊन गेले.

“शांतीदेव” आणि “शांतरक्षित” हे दोघे आठव्या शतकातील बौद्ध होते. तर “पद्मसंभव” हे आठव्या व नवव्या शतकात होऊन गेले. “अतिष” हे दहाव्या आणि अकराव्या शतकातील होते.

यानंतरची सुमारे नऊ शतके (अकरावे शतक ते एकोणिसाव्या शतक) भारतात कोणताही खूप थोर असा बौद्ध व्यक्ती निर्माण झाला नाही. मात्र विसाव्या शतकामध्ये तीन प्रसिद्ध व थोर बौद्ध व्यक्ती भारताने निर्मिले — डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राहुल सांकृतायन, आणि डॉ. अमर्त्य सेन. डॉ. आंबेडकर आणि सांकृतायन हे दोघेही 19 व्या शतकात जन्माला आले असले तरी त्यांची कारकीर्द विसाव्या शतकातील आहे. डॉ सेन हे विसाव्या शतकात जन्माला आले आणि याच शतकात त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली तथापि ते सध्याच्या 21 व्या शतकातही कार्यरत आहेत.

 

लोकप्रिय बौद्ध व्यक्तींच्या या यादीमध्ये केवळ चार महिला (29, 27, 20, 11) आहेत. तर अमर्त्य सेन (8) हे या सूचित समाविष्ट असलेले एकमेव जीवित व्यक्ती आहेत.

अनेक विद्वानांद्वारे, बुद्धानंतर सर्वात महान भारतीय म्हणून सम्राट अशोक यांच्याकडे पाहिले जाते. तथापि, या 2022 च्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकानुसार, जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीयांमध्ये बुद्ध पहिले, महात्मा गांधी दुसरे, आणि या दोघांनंतर तिसरे सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती सम्राट अशोक असल्याचे दिसते.

जर आपण हिस्टॉरिकल पॉप्युलोटी इंडेक्सनुसार भारतातील आजपर्यंतच्या 30 सर्वात लोकप्रिय भारतीय व्यक्तींची यादी पाहिली तर त्यामध्ये या 30 लोकप्रिय बौद्धांपैकी पहिल्या 7 (बुद्ध ते बोधिधर्म) बौद्ध धर्मीयांचा समावेश होतो.

 

सारांश

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स किंवा ई-मेलच्या माध्यमातून लिहून कळवा, ही विनंती.

याप्रमाणे अजून कोणत्या विषयांवरील टॉप व्यक्तींची यादी तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *