मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)

इ.स. 2016-2020 मधील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या 20 चरित्र लेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. – famous personalities of Maharashtra

famous personalities of Maharashtra and India

1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2020 या 5 वर्षांच्या कालावधी मधील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या 20 चरित्रलेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींचा समावेश या यादीत झाला आहे.

सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वी वर्षनिहाय 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मधील top 20 लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत.

वेगवेगळ्या 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे, त्यापैकीच एक मराठी विकिपीडिया आहे. मराठी विकिपीडियावर केवळ प्रसिद्ध मराठी व्यक्तींबद्दल वाचले जात नाही तर महाराष्ट्रेतर व्यक्तींबद्दलही वाचले जाते.

महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती झालेल्या आहेत, त्यापैकी कोणकोणत्या 20 व्यक्ती ह्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2020 या 5 वर्षांच्या कालावधी दरम्यान टॉप 20 मध्ये समाविष्ट झाल्या आहेत, याविषयीची तुलनात्मक आकडेवारी येथे तुम्हाला बघायला मिळेल.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 लोकप्रिय व्यक्ती – पहिला व दुसरा क्रमांक बघून आपण अचंबित व्हाल!

Top 20 Most Popular Persons on Marathi Wikipedia in 2016

 

famous personalities of Maharashtra – 2016-2020 मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक views असलेल्या Top – 20 व्यक्ती

लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येनुसार (व्ह्यूज नुसार) त्याची rank ठरली आहे. प्रत्येक फोटोखाली हिरव्या रंगात कोणत्या चरित्रलेखाला वर्षभरात किती वेळा पहिले गेले (म्हणजे किती views मिळाले) ते दिलेले आहे.

Top 20 most viewed people on Marathi Wikipedia in 2016-2020

 

20. नामदेव – 4.55 लाख

top 20 most famous people in maharashtra

  • 4,54,916 वेळा वाचले गेले

संत नामदेव (1270 – 1350) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायातील संत आणि कवी होते. त्यांनी व्रज भाषेतही काव्ये रचली. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते आद्यप्रचारक होते. संत नामदेव हे एक लोकप्रिय मराठी संत आहेत. तसेच ते यावर्षीचे “सर्वात लोकप्रिय जुनी व्यक्ती” ठरले आहेत (त्यांच्या आधीच्या कालखंडातील एकही व्यक्ती या सूचीत समाविष्ट नाही).

त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी 2017, 2018, व 2019 या तीन वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. मात्र तरी सुद्धा ते 2016-2020 या 5 वर्षातील top 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये शेवटच्या स्थानी समाविष्ट झालेले आहेत.

थोर मराठी व्यक्ती

 

19. शाहू महाराज – 4.65 लाख

famous marathi people

  • 4,64,926 वेळा वाचले गेले

राजर्षी शाहू महाराज (1874 – 1922) हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारवंत, समाज सुधारक व शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तिमत्व होते. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. 1884 – 1922 दरम्यान) होते. त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्रातील जनता शाहू महाराज यांच्याबद्दल मराठी विकिपीडियावर माहिती वाचत असते. मात्र त्यांचा लेख केवळ 2016, 2018 आणि 2020 या वर्षांमध्येच टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झाला असला तरी ते 2016-2020 या 5 वर्षातील top 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

 

18. एकनाथ – 4.78 लाख

famous sant

  • 4,77,672 वेळा वाचले गेले

संत एकनाथ (1533 – 1599) हे एक भारतीय हिंदू संत, तत्ववेत्ता आणि कवी होते. ते कृष्णाचे भक्त होते आणि वारकरी परंपरेतील प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. प्रख्यात मराठी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून एकनाथांना अनेकदा पाहिले जाते.

संत एकनाथ हे सुद्धा महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध असे संत आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांचा चरित्रलेख मोठ्या प्रमाणावर वाचला जातो. यामुळेच ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. गतवर्ष 2016 मध्ये त्यांचा समावेश टॉप-20 मध्ये नव्हता, तथापि या वर्षाच्या तुलनेत पुढील वर्ष 2018 मध्ये त्यांची रँक 3ने वृद्धिंगत होत 17व्या स्थानावर आली होती.

Who are the famous personalities of Maharashtra?

थोर व्यक्तींची माहिती

 

17. जवाहरलाल नेहरू – 4.87 लाख

famous people in marathi wiki
Getty Images
  • 4,86,822 वेळा वाचले गेले

जवाहरलाल मोतीलाल नेहरू (1889 – 1964) हे भारताचे पहिले पंतप्रधान (1974 – 1964) व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. ते पंडित नेहरूचाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात. नेहरू हे भारताच्या राजकारणातील एक सर्वात प्रभावशाली व लोकप्रिय नाव आहे, आणि मराठी वाचक त्यांची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचत असतो.

ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी केवळ तीन वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. 2018 आणि 2016 या दोन्हींमध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट नव्हते.

थोर व्यक्तींची माहिती

 

16. भगतसिंग – 5.04 लाख

most famous people in maharashtra
भगतसिंग (Photo Credits: hindi.newsclick)
  • 5,04,491 वेळा वाचले गेले

भगतसिंग (1907 – 1931) एक भारतीय क्रांतिकारक व प्रखर बुद्धिवादी होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

मराठी व्यक्ती नसलेले भगतसिंग हे महाराष्ट्रात देखील खूप प्रसिद्ध आहेत. मराठी भाषक लोक त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात. यामुळे ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी 4 वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत, केवळ 2020 मधील टॉप-20 मध्ये ते समाविष्ट नव्हते.

 

15. जिजाबाई शहाजी भोसले – 5.25 लाख

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात

  • 5,25,448 वेळा वाचले गेले

जिजाबाई (1598 – 1674) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झालेला आहे. राजमाता जिजाबाई ह्या सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध महिला आहेत.

2016 व 2017 वर्षांतील टॉप-20 व्यक्तींमध्ये यांचा समावेश नव्हता, मात्र त्यानंतरच्या पुढील तीनही वर्षांमध्ये त्यांचा समावेश आहे. भोसले घराण्यातील चार सदस्य (19#, #15, #6, #1) टॉप-20 व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

महाराष्ट्रातील थोर महिला

Famous Maharashtrian female personalities

 

14. अण्णा भाऊ साठे – 5.98 लाख

top 20 most famous people in maharashtra
bhaskarhindi.com
  • 5,97,912 वेळा वाचले गेले

अण्णा भाऊ साठे (1920 — 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते.

साठे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. दर वर्षी मोठ्या संख्येने त्यांना मराठी विकिपीडियावर वाचले जाते. ते 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

थोर मराठी साहित्यिक

famous personalities of Maharashtra

 

13. स्वामी विवेकानंद – 6.59 लाख

most famous person in maharashtra
स्वामी विवेकानंद (Photo Credits: Get Bengal)
  • 6,58,822 वेळा वाचले गेले

स्वामी विवेकानंद (१८६३ – १९०२) हे भारतीय विचारवंत व हिंदू संन्यासी होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले.

ते एक बंगाली व्यक्ती होते, तथापि मराठी लोक मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात. त्यामुळेच स्वामींचा लेख प्रत्येक वर्षीच्या (2016, 2017, 2018, 2019, व 2020) मध्ये टॉप 20 लोकप्रिय चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे.

थोर नेत्यांची माहिती

famous personalities of Maharashtra

 

12. विराट कोहली – 7.36 लाख

top 20 most famous people in maharashtra
india.com
  • 7,35,664 वेळा वाचले गेले

विराट कोहली (जन्म: 1988) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि 2013 पासून भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो.

कोहली हा अमराठी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. तो मराठी विकिपीडियाच्या 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे.

Famous Sports personalities of Maharashtra

 

11. ज्ञानेश्वर – 8.13 लाख

top 20 most famous people in maharashtra

  • 8,12,814 वेळा वाचले गेले

संत ज्ञानेश्वर (1275 – 1296) हे मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला.

संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी व्यक्ती आहेत, तसेच ते महाराष्ट्रातील दुसरे “सर्वात लोकप्रिय संत” संत आहेत.

त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. ते सुद्धा 2016 ते 2020 या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

थोर व्यक्तींची नावे

10. सचिन तेंडुलकर – 9.06 लाख

top 20 most famous people in maharashtra
File image of Sachin Tendulkar©BCCI
  • 9,06,229 वेळा वाचले गेले

सचिन तेंडुलकर (जन्म: 1973) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2009 मध्ये त्याने कारकीर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक मराठी व्यक्ती आहे.

त्याच्याबद्दल मराठी विकिपीडियावर मोठ्या संख्येने माहिती वाचली जाते. तो मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय हयात व्यक्ती” म्हणून मान्यता पावलेला आहे. मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे.

Famous Sports personalities of Maharashtra

famous personalities of Maharashtra

 

9. संत तुकाराम – 9.68 लाख

top 20 most famous people in maharashtra
English Wikipedia
  • 9,68,269 वेळा वाचले गेले

संत तुकाराम (1608 – 1650) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.

संत तुकाराम हे एक शिवकालीन मराठी संत असून, ते आजही महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडिया वरील ‘सर्वाधिक लोकप्रिय संत‘ ठरले आहेत. त्यांच्या पेक्षा अधिक वाचकसंख्या कोणत्याही संताच्या लेखाला मिळालेली नाही.

2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान नेहमी 10व्या रँकच्या आतमधेच राहिले आहे.

most powerful person in maharashtra

 

8. महात्मा फुले – 9.79 लाख

top 20 most famous people in maharashtra

  • 9,78,642 वेळा वाचले गेले

महात्मा जोतीराव फुले (1827 – 1890) हे मराठी लेखक, शिक्षक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.

फुले हे सुद्धा एक लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात येते. सर्व वर्षांमध्ये (2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले हे एकमेव असे दांपत्य आहे की, या दोघांचाही समावेश मराठी विकिपीडियाच्या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय लेखांमध्ये झालेला आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती

 

7. लोकमान्य टिळक – 10.60 लाख

BG Tilak famous Marathi people
sahisamay.com
  • 10,60,476 वेळा वाचले गेले

बाळ गंगाधर टिळक (1856 – 1920) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य टिळक असाही त्यांचा उल्लेख केला जातो. टिळक हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय असून मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे. मराठी विकीपीडियावरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे.

freedom fighters of maharashtra

 

6. संभाजी भोसले – 11.67 लाख

famous marathi people

  • 11,66,614 वेळा वाचले गेले

छत्रपती संभाजी महाराज (1657 – 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत.

मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे. वर्ष 2016 वगळता अन्य सर्व वर्षांमध्ये (2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे. वर्ष 2016 मध्ये त्यांचा लेख 13व्या स्थानावर आला होता.

Famous Personalities of Maharashtra

 

5. ए.पी.जे. अब्दुल कलाम – 12.52 लाख

most famous person in maharashtra
Getty Images
  • 12,52,105 वेळा वाचले गेले

ए.पी.जे अब्दुल कलाम (1931 – 2015) भारताचे 11वे राष्ट्रपती व एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते.

डॉ. अब्दुल कलाम हे एक तमिळ व्यक्ती, मात्र ते मराठी लोकांमध्येही खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते अलीकडील काळातील व्यक्ती होते. त्यांचा मराठी विकिपीडियाच्या प्रत्येक वर्षीच्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समावेश झाला होता. त्यातही ते सदैव पहिल्या दहा मध्येच राहिले.

डॉ. कलाम हे महाराष्ट्रातील दुसरे “सर्वात लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरले आहेत.

Great personalities of Maharashtra

famous personalities of Maharashtra

 

4. सावित्रीबाई फुले – 14.06 लाख

famous people in marathi wiki

  • 14,05,972 वेळा वाचले गेले

सावित्रीबाई जोतीराव फुले (1831 – 1897) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला.

सावित्रीबाई फुले या मराठी विकिपीडियावरील आतापर्यंतच्या “सर्वात लोकप्रिय महिला” ठरल्या आहेत. त्यांच्या पेक्षा जास्त व्ह्यूज कोणत्याही स्त्रीला मिळालेले नाहीत. दरवर्षी प्रचंड संख्येने वाचकवर्ग त्यांच्या बद्दलची माहिती मराठी विकिपीडियावर वाचत असतो. वाचकसंख्येच्या दृष्टीने लोकप्रियतेचा विचार केला तर त्या आपले पती महात्मा फुले यांनाही मागे टाकतात.

त्या दर वर्षी टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये सामील होतात, एवढेच नाही तर 2016 वगळता पुढील सर्वच वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची रँक पहिल्या पाच मध्ये आलेली आहे. वर्ष 2016 मध्ये त्यांची रँक 10व्या स्थानावर आली होती. एक महिला म्हणून तर त्या अव्वल आहेच, परंतु त्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लोकप्रिय मराठी व्यक्ती सुद्धा आहेत.

थोर समाजसेविका मराठी

great women of maharashtra

3. महात्मा गांधी – 15.53 लाख

File:Gandhi writing Aug1942.jpg

  • 15,52,649 वेळा वाचले गेले

मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

महात्मा गांधी हे मराठी किंवा महाराष्ट्रीय व्यक्ती नाहीत, तर ते एक गुजराती आहेत. मात्र तरीही ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरलेले आहेत. 2016 ते 2020 या सर्व वर्षांमध्ये ते मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-20 लेखांमध्ये कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत.

त्यांची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज वगळता अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा ते जास्त लोकप्रिय आहेत, इतके जास्त वेळा गांधींना मराठी विकिवर वाचले गेले आहे.

Famous Personalities of Maharashtra

थोर समाज सुधारक मराठी

 

2. बाबासाहेब आंबेडकर – 19.99 लाख

B.R. Ambedkar is Most Famous people in Marathi wiki

  • 19,99,119 वेळा वाचले गेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. ते एक मराठी म्हणून अन्य भाषिक विकिपीडियांवरही त्यांची सर्वात जास्त लोकप्रियता आहे. 2016 ते 2020 या वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान कधी दुसरे तर कधी पहिलेच राहिले आहे. 2017 मध्ये ते शिवाजी महाराजांना मागे टाकत प्रथम स्थानावर आले होते.

मराठी विकिपीडियावरील दुसरे सर्वात जास्त लोकप्रिय ठरले आहेत. तसेच ते “सर्वाधिक लोकप्रिय समाजसुधारक“, “सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी” व विसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती सुद्धा ठरले आहेत.

Who is hero of Maharashtra?

most searched politician in maharashtra

 

1. शिवाजी महाराज – 24.58 लाख

most famous marathi people from maharashtra
Forword Press
  • 24,57,861 वेळा वाचले गेले

छत्रपती शिवाजी महाराज (1630 – 1680) हे एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून आपले स्वराज्य स्थापन केले. त्यांनी वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांचा चरित्रलेख हासुद्धा 2016 ते 2020 या वर्षांमध्ये कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर होता. त्यांची लोकप्रियता अफाट असून ते 5 पैकी 4 वर्षांमध्ये प्रथम स्थानावर होते. 2017 मध्ये ते द्वितीय स्थानी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम स्थानी राहिले होते. सतराव्या शतकातील हा शासक एकविसाव्या शतकामध्ये ही अव्वल ठरला आहे.

Who are the famous personalities of Maharashtra?

great leaders of maharashtra

वर्गीकरण

या 20 प्रसिद्ध व्यक्तींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

  • 5 अमराठी व्यक्ती (#3, #5, #13, #16 व #17) आहेत, तर अन्य 15 महाराष्ट्रातील आहेत.
  • 2 महिला (#4 व #15)
  • 4 संत व 1 संन्यासी – (#9, #11, #13, #18, #20)
  • 5 समाजसुधारक (#2, #3, #4, #8, #19)
  • 6 राजकारणी आणि क्रांतिकारक (#2, #3, #5, #7, #16, #17)
  • 4 शासक (#1, #6, #15, #19)
  • 2 खेळाडू (#10, #12)

 

हेही वाचलंत का?

 

 


(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

One thought on “मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)

Comments are closed.