बा भीमा कॉमिक बुक असं मिळवा घरपोच…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनावर आधारित बा भीमा कॉमिक बुकची (Ba Bhima comic book) निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना बाबासाहेबांचं आयुष्य सोप्या पद्धतीनं समजणार आहे.

बी भीमा बुक कसं आहे आणि ते घरपोच आपल्याला कसं मिळवायचं, याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

बा भीमा कॉमिक बुक - Ba Bhima comic book
बा भीमा कॉमिक बुक – Ba Bhima comic book

दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक पुस्तके प्रकाशित असतात. मात्र यंदाच्या त्यांच्या 132 जयंतीच्या निमित्ताने पुण्याच्या ऊरूवेला प्रकाशनाने बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित बा भीमा कॉमिक बुकची निर्मिती केली आहे.

16 एप्रिल 2023 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बा भीमा कॉमिक बुकचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये बाबासाहेबांच्या नातू प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी झाले होते.

या पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांना बाबासाहेबांचा जीवन समजायला खूप सोपे जाईल.

 

कसं आहे बा भीमा कॉमिक बुक?

बा भीमा (Ba Bhima book) हे डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित हे पहिले मराठी कॉमिक बुक आहे.

यापूर्वी डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘Ambedkar: India’s Crusader for Human Rights’ नावाचे इंग्लिश कॉमिक बुक निघाले होते, ज्याचे मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले होते.

बा भीमा कॉमिक्स हे एकूण 12 अंकांचे किंवा भागांचे असणार आहे, आणि यातील हा पहिला अंक प्रकाशित झाला आहे.

या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांच्या जन्मापासून तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच्या ठळक घटना या मुख्य स्वरूपात दाखवण्यात आल्या आहेत.

अतिशय कल्पकतेने आणि प्रचंड रिस्क घेऊन बनवलेले हे बाबासाहेबांवरील कॉमिक बुक एक जबरदस्त व्हिज्युअल ट्रीट आहे.

बा भीमा हे युनिक सुद्धा आहे आणि प्रेरणादायी सुद्धा. याचं जितकं उत्कृष्ट स्टोरीबोर्डींग आहे तितकंच दर्जेदार पटकथालेखन व्हायला प्रचंड वाव आहे. संवाद पुस्तकी आहेत. त्यात ह्युमन टच अधिक वाढवावा लागेल.

लहान लेकरं गोष्टीवेल्हाळ असतात. गोष्ट सांगताना सोपी, सहज आणि तितकीच परिणामकारक होणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त चित्रं पाहून पानं पालटली जातात. कॉमिक बुक जर मुलांसाठी असेल तर गोष्टींतला भीमराव उभा करण्याचे फार मोठे आव्हान या टिमसमोर आहे.

उत्तम चित्रे आणि चांगल्या क्वालिटीचे पेपर कॉमिक बुकची शोभा वाढवतात.

 

बा भीमा बुक घरपोच कसं मिळवावं?

Ba Bhima book हे केवळ ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते पोस्टद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

कॉमिक बुकची किंमत 160 रुपये आहे, तर डिलिव्हरी चार्जेस 25 रुपये आहेत. अशाप्रकारे 185 रुपये तुम्हाला पाठवावे लागतील.

 

बा भीमा खरेदीच्या प्रक्रियेचे टप्पे :

1. ऑनलाइन बा भीमा खरेदीसाठी सर्वप्रथम +91 808 505 6868 या व्हाट्सअप नंबरवर त्यांना मेसेजवर संपर्क साधावा. उदा. Hi, hello किंवा Ba Bhima लिहून पाठवावे.

किंवा सदर व्हाट्सअप वर थेट जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे : https://wa.me/message/NQ7FIWYCXT3BA1

2. त्यानंतर तुम्हाला व्हाट्सअपवर खालीलप्रमाणे मेसेज प्राप्त होईल –

Thank you for your message.

You can book your copy by making payment of 185/- (including delivery for single copy) through Google Pay or PhonePe at 8484847781 (geeta bhosale) and share your address and payment details on whats app🙂

मराठी भाषांतर:आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद.

तुम्ही Google Pay किंवा PhonePe द्वारे 8484847781 (गीता भोसले) वर 185/- (एका प्रतीच्या डिलिव्हरी चार्जसह) पेमेंट करून तुमची प्रत बुक करू शकता आणि तुमचा पत्ता आणि पेमेंट तपशील whats app वर शेअर करू शकता🙂

3. आता तुम्हाला +91 808 505 6868 (geeta rohidas bhosale) याच क्रमांकावर PhonePe किंवा Google Pay द्वारे 185 रुपयांचे पेमेंट करायचे आहे.

4. पेमेंट केल्यानंतर पेमेंट हिस्ट्रीचा स्क्रीन शॉट काढून सदर व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा.

5. यानंतर त्या व्हाट्सअप क्रमांकावरच तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला खालील चार गोष्टी एकाखाली एक लिहून पाठवायच्या आहेत.

[संपूर्ण नाव], [संपूर्ण पत्ता], [पिन कोड] व [मोबाईल क्रमांक]

6. त्यानंतर पुस्तक पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल. एक-दोन दिवसांत तुमचे पुस्तक पाठवले जाईल. पुस्तक पाठवण्यापूर्वी तुम्हाला तुम्हाला व्हाट्सअप वर त्या विषयी सांगितले जाऊ शकते.

7. पुढील पाच ते सात दिवसांत Ba Bhima book पोस्टाने तुमच्यापर्यंत पोहोचेल.

 

पुस्तकातील त्रुटी वा उणिवा

बा भीमा पुस्तकातील काही त्रुटी/चुका वा उणिवा देखील आढळतात. अनेक ठिकाणी प्रिंट मिस्टेक आणि चुकीचे किंवा अशुद्ध लेखन झालेले आढळते.

बा भीमा या कॉमिक बुकची एकूण पृष्ठसंख्या 32 आहे. परंतु पुस्तकाच्या पानांवर पृष्ठ क्रमांक दिलेले नाहीत, ही एक त्रुटी आहे.

कॉमिक बुकमध्ये एका ठिकाणी बाबासाहेब स्वतःचे नाव ‘भिमराव रामजी आंबेडकर’ असे सांगतात, मात्र येथे ‘भिमराव’ ऐवजी ‘भीमराव’ हा शुद्ध शब्द असायला हवा होता.

हे जरा आश्चर्याचे आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव हे ‘आंबडवे’ आहे, आंबावडे (किंवा अंबावडे) नव्हे. या गावाचं नाव सुद्धा चुकीचे लिहिण्यात आले आहे.

 

पान क्रमांकानुसार पुस्तकातील अशुद्धलेखन खालीलप्रमाणे आहे 

पान क्रमांक 2 : प्रोफेसर यांचे नाव ‘सेलिंग्मन’ ऐवजी ‘सेलिग्मन’ असावे (अनुस्वार नसावा).

पान क्रमांक 2 : बाबासाहेब स्वतःची ओळख सांगताना “भिमराव रामजी आंबेडकर” असे लिहिले आहे, तेथे “भिमराव” एवजी “भीमराव” असावे.

पान क्रमांक 3 : “पुस्तकामध्ये रमलेला” ऐवजी “पुस्तकांमध्ये रमलेला” असावे (अनेकवचनात अनुस्वार असतो).

पान क्रमांक 4 : “आश्च्यर्याचा धक्का” ऐवजी “आश्चर्याचा धक्का” असावे. (श् + च् + य् ऐवजी श् + च्)

पान क्रमांक 8 : “आठवणींनीची गर्दी लागलेली” ऐवजी “आठवणींची गर्दी लागली” (‘नी’ अतिरिक्त झाले)

पान क्रमांक 9 : दोन वेळा “सेन्यात” शब्द आलाय, “सैन्यात” हवे.

पान क्रमांक 10 : ‘स्विकारली’ ऐवजी ‘स्वीकारली’ हवे.

पान क्रमांक 10 : ‘आंबावडेकर’ ऐवजी ‘आंबडवेकर’ आणि ‘आंबावडे‘ ऐवजी ‘आंबडवे‘ अशी योग्य नावे असावी. (बाबासाहेबांच्या मूळ गावाचे नाव शोधण्यासाठी या गावातील प्रवेशद्वारावरील नाव इंटरनेटवर शोधून तपासावे.)

पान क्रमांक 16 : ‘विषयासोबत’ ऐवजी ‘विषयांसोबत’ असावे (अनेकवचन).

पान क्रमांक 16 : “शाळेचा शिपाई अपृश्य” ऐवजी “… … अस्पृश्य” असावे.

पान क्रमांक 17 : “मोठ्या विद्यर्थ्यांना” ऐवजी “… विद्यार्थ्यांना” असावे.

पान क्रमांक 23 : “त्यांचं” ऐवजी “त्याचं” असावे

पान क्रमांक 25 : ‘र’ ऐवजी ‘भार’ हवा.

पान क्रमांक 27 : “सत्कार सरंभ” बॅनर झळकत आहे, “समरंभ” ऐवजी “समारंभ” लिहावे.

पान क्रमांक 30 : “क्षमतांव” ऐवजी “क्षमतांव” हवे.

पान क्रमांक 30 : “अमेरिकाला” ऐवजी “अमेरिकेला” हवे.

 

या काही गोष्टी सोडल्या तर हे कॉमिक पुस्तक फारच सुंदर आणि सर्वांनी वाचण्याजोग आहे. आपल्या पाल्यांना लहान मुलांना हे पुस्तक आवर्जून वाचायला द्यावे.

बाबासाहेब समजण्यासाठी हे पुस्तक केवळ आंबेडकरी कुटुंबातील मुलांमध्येच नव्हे तर सर्वच जाती-धर्मांतील मुलांमध्ये लोकप्रिय ठरेल.


सारांश

या लेखात आपण बा भीमा कॉमिक बुकची (Ba Bhima comic book) माहिती, आणि हे पुस्तक घरपोच मिळवण्याची प्रक्रिया सुद्धा समजून घेतली.

तुमच्या काही सूचना वजा प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *