‘डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार‘ आणि ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार‘ असे दोन पुरस्कार भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आहेत. मात्र गेल्या 21 वर्षांपासून (2000 पासून) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराची तर गेल्या 7 वर्षांपासून (2014 पासून) ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारा’ची कोणतीच घोषणा सरकारने केली नाही! – dr ambedkar award
या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येणाऱ्या या दोन्ही पुरस्कारांची सविस्तर आणि तुलनात्मक माहिती बघणार आहोत. सर्वच भारत सरकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कशाप्रकारे उदासीन राहीले, आणि त्यांचा सन्मान करण्यात यशस्वी झाले नाही, हे सुद्धा आपण जाणून घेऊ.
महात्मा गांधी, राजीव गांधी, पंडित नेहरू यांच्या नावाने भारत सरकार द्वारे दिले जाणारे पुरस्कार आणि बाबासाहेबांच्या नावाने दिले जाणारे हे दोन पुरस्कार यांची सुद्धा पण पूर्ण माहिती जाणून घेऊ. पुरस्काराचे वितरण, पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचा दर्जा, आंतरराष्ट्रीय स्वरूप अशा सर्वच बाबतीत इतर पुरस्कारांपेक्षा फारच कमी महत्त्व बाबासाहेबांच्या पुरस्कारांना दिले आहे आणि हा निव्वळ बाबासाहेबांचा अपमान आहे.
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांचा केंद्र शासनाला विसर; तब्बल 21 वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही!
‘डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार‘ (Dr. Ambedkar International Award) आणि ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार‘ (Dr. Ambedkar National Award) हे दोन्ही पुरस्कार भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या (Dr. Ambedkar Foundation) वतीने दिले जाणारे पुरस्कार आहेत.
मात्र गेल्या 21 वर्षांपासून (इ.स. 2000 सालापासून) ‘डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ या पुरस्काराची तर गेल्या 7 वर्षांपासून (इ.स. 2014 सालापासून) ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ या पुरस्काराची कोणतीच घोषणा केली गेली नाही!
आता आपण या दोन्ही पुरस्कारांविषयी विस्तृत माहिती बघू, ज्यातून तुम्हाला वास्तविक परिस्थितीची सहज कल्पना येईल. या पुरस्कारांची तुलना भारत सरकारच्या अन्य काही पुरस्कारांसोबत केल्यावर हे स्पष्ट होईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असणार्या या पुरस्कारांना जाणीवपूर्वक दुर्लक्षिले आहे. येथे तुम्हाला अधिकृतरीत्या पुरस्कारांची माहिती मिळेल.
Dr Ambedkar Award
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार – Dr. Ambedkar International Award
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची 1995 मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्थरावरील व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. 15 लाख आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
पुरस्कार विजेते निवड करणाऱ्या परीक्षकांमध्ये भारताचे उपराष्ट्रपती (अध्यक्ष), लोकसभेचे सभापती (उपाध्यक्ष), राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष (सदस्य), ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ (सदस्य), एक सामाजिक कार्यकर्ता (सदस्य) आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती (सदस्य) ज्यांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडीचे ज्ञान आहे, अशा व्यक्तींचा समावेश होतो.
आजपर्यंत फक्त दोनदाच हा पुरस्कार वितरीत करण्यात आलेला आहे !!
- इ.स. 1999 – बाबा आमटे (Baba Amte), भारत
- इ.स. 2000 – रेमी फर्नांड क्लॉर्ड सॅटोरी (Remy Fernand Claude Satorre), स्पेन
इ.स. 2000 पासून म्हणजेच गेल्या 21 वर्षांपासून हा पुरस्कार वितरीतच केला गेला नाही. 1995 ते 2021 या सव्वीस वर्षांच्या कालावधीत केवळ दोन वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेला.
हे खरंच दुर्दैव आहे, ज्या महामानवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विश्वमानव‘ म्हणतात, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या तोडीचा आंतरराष्ट्रीय किर्तीचा उद्धारकर्ता मानतात, त्या व्यक्तीच्या नावे दिला जाणारा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही सरकारकडून वितरित केला जात नाही आहे!
या पुरस्काराचे वितरण दरवर्षी झाले पाहिजे आणि भारताखेरीज जगातील अन्य देशांतील लायक व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला गेला पाहिजे. हा बाबासाहेबांचा सुद्धा उचित गौरव ठरेल.
dr ambedkar award
2) डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार – Dr. Ambedkar National Award
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा सुद्धा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्ष 1992 मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.
हा पुरस्कार समाजात सामाजिक सदभाव निर्माण करण्यासाठी तसेच शोषित, पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपुर्व योगदान देण्यासाठी प्रदान केला जातो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येतो.
पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामाकंन त्यांनी केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते. मागसवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले ही पुरस्कारर्थी निवडीमधील महत्त्वाची बाब आहेत. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रूपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.
dr ambedkar award
पुरस्कार विजेते
हा पुरस्कार इ.स. 1993, 1994, 1996 व 1998 मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर 20 वर्षांनी इ.स. 2011, 2012 व 2014 चे पुरस्कार 26 मे इ.स. 2017 रोजी एकत्रीतपणे वितरीत करण्यात आले.
वर्ष
पुरस्कार प्राप्त व्यक्ती/ संस्था
स्थान
1993
नॅशनल इंस्टिट्युट ऑफ सोशल वर्क ॲंड सोशल सायन्स
भुवनेश्वर, ओडीसा
1994
रयत शिक्षण संस्था
सातारा, महाराष्ट्र
1996
रामकृष्ण मिशन आश्रम
बास्तर, मध्य प्रदेश
1998
कस्तुरबा गांधी कन्या गुरुकुल
वेदारन्यम, तमिळनाडू
2011
सुखदेव थोरात
महाराष्ट्र
2012
समता सैनिक दल
महाराष्ट्र
2014
-
बाबू लाल निर्मल
-
अमर सेवा संगम
-
राजस्थान
-
तमिळनाडू
वर्ष | विजेत्या व्यक्ती/संस्था | स्थान |
---|---|---|
१९९३ | नॅशनल इंस्टिट्युट ऑफ सोशल वर्क ॲंड सोशल सायन्स | भुवनेश्वर, ओडीसा |
१९९४ | रयत शिक्षण संस्था | सातारा, महाराष्ट्र |
१९९६ | रामकृष्ण मिशन आश्रम | बास्तर (जिल्हा), मध्य प्रदेश |
१९९८ | कस्तुरबा गांधी कन्या गुरुकुल | वेदारन्यम, तमिळनाडू |
२०११ | सुखदेव थोरात | महाराष्ट्र |
२०१२ | समता सैनिक दल | महाराष्ट्र |
२०१४ | बाबू लाल निर्मल अमर सेवा संगम |
राजस्थान तमिळनाडू |
इ.स. 2014 पासून म्हणजेच गेल्या 7 वर्षांपासून हा पुरस्काराची वितरीतच केला गेला नाही. 1993 ते 2021 या 28 वर्षांच्या कालावधीत केवळ सातच वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेला.
ज्या महामानवाला देशाला संविधान दिले, भारतात समानता रुजवली, भारताला गणराज्य भारत केले, देशातील शोषित पिडीत लोकांचे शोषण थांबवले, अशा व्यक्तीच्या नावे दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा वितरित केला जात नाही!
या पुरस्काराचेही वितरण दरवर्षी झाले पाहिजे आणि भारतातील सामाजिक कार्य व मानवता क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला गेला पाहिजे.
आपण आता भारत सरकारच्या काही पुरस्कारांची तुलना बघू, त्यावरून बाबासाहेबांच्या नावांच्या या पुरस्कारांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे की काय ही शंका येते.
पुरस्कारांचे नाव | स्थापना | पुरस्कार विजेते | वितरण झाले नाही (2021 पर्यंत) | राशी | प्रकार |
Dr. Ambedkar National Award | 1992 | 7 | 24 वर्षे (1995, 1997, 1999-2010, 2013, 2015, 2015-2021) | 10 लाख | राष्ट्रीय |
Dr. Ambedkar International Award | 1995 | 2 | 25 वर्षे (1996-1998, 2001-2021) | 15 लाख | आंतरराष्ट्रीय |
Rajiv Gandhi Khel Ratna | 1991–1992 | 43 | 2 वर्षे (2008, 2014) | 25 लाख | राष्ट्रीय |
Gandhi Peace Prize | 1995 | 19 | 7 वर्षे (2006-2012 | 1 कोटी | आंतरराष्ट्रीय |
Jawaharlal Nehru Award | 1965 | 36 | 23 वर्षे (1986, 1995-2003, 2008, 2010-2021 | 25 लाख | आंतरराष्ट्रीय |
वरील पुरस्कारांचा तुलनात्मक विचार केल्यास असे कळते की बाबासाहेबांच्या पुरस्कार सर्वांपेक्षा खूप कमी वेळा वितरित झालेला आहे, शिवाय त्याची राशी सुद्धा इतरांच्या तुलनेत खूप कमी आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधी, महात्मा गांधी, व पंडित नेहरू यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार प्रत्येक बाबतीत बाबासाहेबांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारापेक्षा उच्च दर्जाचे दिसत आहेत.
भारत सरकारने 1995 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल अवार्ड’ अर्थात ‘डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ सुरू केला होता आणि हा पुरस्कार आतापर्यंत केवळ दोन व्यक्तींनाच देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराची रक्कम केवळ 15 लाख रुपये इतकी आहे. दुसरीकडे याच वर्षी (1995 मध्ये) भारत सरकारचा महात्मा गांधी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ‘गांधी पीस प्राइज’ अर्थात ‘गांधी शांती पुरस्कार’ हासुद्धा सुरू झाला आहे. हा पुरस्कार आतापर्यंत एकूण 19 जणांना देण्यात आलेला आहे (बाबासाहेबांचा पुरस्कार दोघांनाच), तसेच या पुरस्काराची रक्कम तब्बल एक कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम बाबासाहेबांच्या डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या 7 पटीने अधिक आहे. (बाबासाहेबांच्या पुरस्काराची रक्कम 15 लाख)
भारत सरकारचे एकाच वर्षात सुरू झाले ‘डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल अवार्ड’ आणि ‘गांधी पीस अवार्ड’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींना देण्यात येतात. या दोन पुरस्कारांमध्ये प्रचंड अंतर आहे, प्रचंड तफावत आहे. ही तफावत पाहून तुम्हाला याची जाणीव होऊन जाईल की बाबासाहेबांवर भारत सरकारने (दोन्ही – काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार) केवळ अन्याय केलेला आहे. बाबासाहेबांचा पुरस्कार 2000 मध्ये वितरित केला होता, तर गांधींचा पुरस्कार अलीकडे 2020 मध्ये वितरित केला होता. दोघांच्या पुरस्कारच्या वितरणामधील अंतर तब्बल 20 वर्षे इतके आहे! सरकार बाबासाहेबांना प्रति इतके उदासीन का आहे?
जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर 1965 मध्ये त्यांच्या नावाने जवाहरलाल नेहरू पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये इतकी आहे, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही पुरस्कारांच्या एकूण रकमे एवढी आहे. याशिवाय नेहरूंच्या पुरस्कार विजेत्यांची संख्या (36) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही पुरस्कार विजेत्यांच्या (2+7) एकूण संख्येच्या 4 पट अधिक आहे.
dr ambedkar award
भारत सरकारने दोनही डॉ. आंबेडकर पुरस्कारांच्या संदर्भात हे बदल करणे अपेक्षित आहे :
1. दोन्ही पुरस्कार हे दरवर्षीच वितरीत केले गेले पाहिजे. पहिला पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींसाठी तर दुसरा हा राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींसाठी असावा.
2. पुरस्कारांची रक्कम वाढवायला हवी. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 125व्या जन्म दिवसानिमित्त भारत सरकारने सुरू केलेला गांधी पीस प्राइज Gandhi Peace Prize हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि त्याची रक्कम तब्बल एक कोटी आहे आणि हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींना दिला जातो. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांची योग्यता खूप मोठी आहे, त्यामुळे असा विधायक बदल सरकारने या बाबासाहेबांच्या पुरस्कारांच्या बाबतीतही करायला हवा.
3. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार यांची नावे बदलून ती “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार” आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार” अशी करायला हवी. ज्याप्रमाणे मोहनदास करमचंद गांधी यांना आदराने महात्मा गांधी म्हटले जाते त्याच प्रमाणे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना आदराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले जाते, यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा आदरयुक्त वापर भारत सरकारने करायला हवा.
Dr. Ambedkar Foundation चे अधिकृत संकेतस्थळ – http://ambedkarfoundation.nic.in/awards.html
Important information
Important information
thank you