भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव (75वा) यानिमित्त प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित राज्यस्तरीय भारतीय संविधान गौरव ऑनलाईन महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली आहे. सदर पोस्टद्वारे या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, तसेच नियम व अटी जाणून घ्या आणि आजच परीक्षेसाठी नाव नोंदणी करा.
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित राज्यस्तरीय भारतीय संविधान गौरव ऑनलाईन महापरीक्षा 2024
जागर भारतीय संविधानाचा
जागर भारतीयत्वाचा
जागर तुझ्या सन्मानाचा आणि अस्तित्वाचा !
भारतीय नागरिकांच्या न्याय हक्कांचे रक्षण करणाऱ्या आणि त्यांचे वर्तमान व भविष्यकाळ सुजलाम सुफलाम करणाऱ्या भारतीय संविधानाविषयीची माहिती समस्त भारतीयांना असायला हवी.
सद्यस्थितीत याची अत्यंत गरज देखील भासत आहे. भारतीय संविधान गौरव परीक्षेच्या अनुषंगाने नागरिकांना राज्यघटनेचे महत्त्व आणि त्यांच्या हक्कांचा जाहीरनामा अभ्यासण्यासाठी प्रबुद्ध टीव्ही प्रयत्न करीत आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान विषयक दृष्टिकोन समजून घेतल्यास असे लक्षात येईल की, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तावेज नसून ते सामाजिक न्याय, समता व लोकशाही मूल्यांचा आधारस्तंभ आहे.
संविधान दिनाच्या निमित्ताने घेतली जाणारी ही परीक्षा भारतीय संविधानाच्या गाभ्याशी नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करते, आणि त्यांना त्यांच्या अधिकारांच्या आणि कर्तव्यांच्या मार्गदर्शनास सहाय्य करू पाहते.
आणि एकूणच 75वा संविधान दिवस अर्थात संविधान दिनाचा अमृत महोत्सव अभ्यासात्मक दृष्टिकोनातून व त्यातूनच संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा या हेतूने प्रबुद्ध टिव्हीने यावर्षी या राज्यस्तरीय संविधान गौरव परीक्षा – 2024 चे आयोजन केले आहे.
बक्षिसे आणि पारितोषिके
- प्रथम पारितोषिक
₹20,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
- द्वितीय पारितोषिक
₹15,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
- तृतीय पारितोषिक
₹10,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
(10 ते 15 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)
- चतुर्थ पारितोषिक
₹5,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
- तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
विशेष – एकूण पारितोषिकासाठीच्या रकमेच्या 60 टक्के रोख रकमेच्या स्वरुपात देण्यात येतील, तर उर्वरित 40 टक्के रकमेची आंबेडकरी आणि बौद्ध साहित्य दिले जाईल.
परीक्षेचे स्वरूप
● सराव परीक्षा : 25 नोव्हेंबर 2024 (ऑनलाईन)
● मुख्य परीक्षा : 26 नोव्हेंबर 2024 (ऑनलाईन)
• मुख्य परीक्षेत बहुपर्यायी स्वरुपाचे एकूण 40 प्रश्न (200 गुणांसाठी) विचारले जातील आणि परीक्षेचा कालावधी 50 मिनिटे असेल.
• सराव परीक्षेत बहुपर्यायी स्वरुपाचे एकूण 15 प्रश्न (75 गुणांसाठी) विचारले जातील, तर याचा कालावधी 20 मिनिटे असेल.
• सराव परीक्षा ही मुख्य परीक्षेचे केवळ सादरीकरण (Demonstration) असून यात गुण मिळवणे महत्त्वाचे नसेल.
• परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती (निगेटिव्ह मार्किंग) असणार नाही.
• परीक्षेत सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल.
• परीक्षेची भाषा ही मराठी असेल.
परीक्षेचा अभ्यासक्रम
भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा संविधान गौरव परीक्षेचा अभ्यासक्रम आहे.
अभ्यासक्रमाचे वर्गीकरण
● भारतीय संविधान : मूलभूत संकल्पना, प्रस्तावना आणि संविधानाचे भाग 3, 4 आणि 16 (प्रश्न 12)
● 11वी चे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक (महाराष्ट्र राज्य) (प्रश्न – 5)
● राज्यसभा टिव्ही द्वारा निर्मित “संविधान मालिका” (एकूण 10 भाग) (प्रश्न – 10)
● ABP माझा द्वारा निर्मित ‘सर्वव्यापी आंबेडकर‘ या मालिकेतील “घटनाकार आंबेडकर” हा भाग (प्रश्न – 3)
● धम्म भारत या संकेतस्थळावरील 10 निवडक लेख (प्रश्न – 6)
● मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर‘ लेख (प्रश्न – 4)
एकूण 40 प्रश्न व एकूण 200 गुणांची परीक्षा
विशेष – वरील अभ्यासाचे सर्व साहित्य डिजिटल (सॉफ्ट कॉपी) स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
- नाव नोंदणी अंतिम दिनांक : 25 नोव्हेंबर 2024
- मुख्य परीक्षा दिनांक : 26 नोव्हेंबर 2024 (दुपारी 2:30 ते 3.20 दरम्यान)
• स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण प्रातिनिधिक स्वरुपात दिनांक 6 डिसेंबर 2024 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस) रोजी सायंकाळी 7:00 वा. ऑनलाईन जाहीर केला जाईल.
टीप – वरील तारखा बदलण्याची शक्यता असल्याने या तारखा अंतिम समजू नये.
नियम व अटी
• संविधान गौरव परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीची असल्याने स्पर्धक स्वतःच्या मोबाईल फोनद्वारे आपल्या घरामध्ये बसून किंवा उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून ही परीक्षा देवू शकतात.
• स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाचे किमान वय 10 वर्षे असावे, तर जास्तीत जास्त कितीही वयाची व्यक्ती सहभाग घेऊ शकते. (कमाल वयोमर्यादा नाही.)
• परीक्षेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे 10 ते 15 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव असेल. नियम व अटी लागू.
• परीक्षा लिंक (प्रश्नपत्रिका) तुमच्या रजिस्टर्ड WhatsApp नंबरवर पाठविल्या जाईल. परीक्षा लिंक प्राप्त करण्यासाठी 7447755627 हा व्हॉट्सॲप क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणे सर्व सहभागी स्पर्धकांसाठी अनिवार्य आहे. नसल्यास त्यांना परीक्षा लिंक मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.
• ही परीक्षा राज्यस्तरीय असल्याने केवळ ‘महाराष्ट्रीय’ – महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पात्र असतील.
• मुख्य परीक्षा ही एकूण 200 गुणांची असून यामध्ये 40 प्रश्न असतील. (प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी) तसेच परीक्षेचा निर्धारित कालावधी हा 50 मिनिटे असेल.
• मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 4 स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल.
• स्पर्धेचा निकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात 6 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता प्रबुद्ध टीव्ही युट्युब चॅनेलवर आणि धम्म भारत वेबपोर्टलवर जाहीर केला जाईल.
• या स्पर्धेचा वरीलपैकी कुठलाही नियम किंवा महत्त्वाच्या तारीखा बदलण्याचा तसेच नवीन नियम बनविण्याचा अधिकार आयोजकास राहील व तो सर्वांना बंधनकारक असेल.
परीक्षा नोंदणी
- परीक्षा नोंदणी शुल्क : फक्त ₹100 (शंभर रुपये)
- परीक्षेसाठी नाव नोंदणी करा.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 7447755627 या आयोजकांच्या WhatsApp क्रमांकावर Registration Link असा मेसेज करावा.
प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित इतर परीक्षा
गेल्या अडीच वर्षांपासून प्रबुद्ध टीव्ही बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होण्यासाठी ऑनलाईन परीक्षांचे नियमित आयोजन करीत आले आहे.
प्रबुद्ध टीव्हीने यापूर्वी आयोजित केलेल्या 4 ऑनलाईन परीक्षांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहेत :
● प्रबुद्ध परिवर्तन राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2022-23
प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित पहिली परीक्षा म्हणजे प्रबुद्ध परिवर्तन राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2022-23.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन-कार्यावर आधारित असलेल्या या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून ज.गो. संत द्वारे संपादित माझी आत्मकथा पुस्तक ठेवण्यात आले होते.
ही परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाली होती. यामध्ये एकूण 1,273 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
● राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त, राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये 2,145 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, ती 23 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली.
धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, ज.गो. संत द्वारे संपादित बाबासाहेबांचे माझी आत्मकथा पुस्तक, मराठी विकिपीडिया वरील बाबासाहेब आंबेडकर लेख आणि धम्म भारत वरील बाबासाहेबांशी संबंधित लेख असे चार स्रोत परीक्षेसाठी अभ्यासक्रम म्हणून ठेवण्यात आले होते.
● राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने, राज्यस्तरीय धम्मजान ऑनलाईन महापरीक्षा 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
ही परीक्षा 29 ऑक्टोबर 2023 संपन्न झाली होती. यामध्ये 2,087 स्पर्धक सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ आणि धम्म भारत वेबसाईटवरील बौद्ध धर्मावरील निवडक 30 लेख असा या परीक्षेचा अभ्यासक्रम होता.
- धम्मज्ञान महापरीक्षेचा निकाल पहा
- धम्मज्ञान परीक्षेची उत्तरपत्रिका बघा
- अभ्यासक्रम : धम्मभारत वरील 30 लेख
● राज्यस्तरीय भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा – 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा आयोजित केली होती.
या परीक्षेत एकूण सहभागी स्पर्धकांपैकी 56 टक्के महिला तर 44 टक्के पुरुष होते. याव्यतिरिक्त एक तृतीयलिंगी व्यक्ती देखील स्पर्धेत सहभागी झाली होती.
ही परीक्षा 19 मे व 9 जून 2024 रोजी (दोन टप्प्यात) घेण्यात आली होती. परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून तीन घटक निर्धारित करण्यात आले होते.
ज. गो. संत द्वारे संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘माझी आत्मकथा’ पुस्तक, ‘धम्म भारत’ वेबसाईटवरील निवडक 40 लेख आणि ‘मराठी विकिपीडिया’वरील बाबासाहेब आंबेडकर लेख.
- भीमस्मरण परीक्षेचा निकाल पाहा
- भीमस्मरण परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहा
- अभ्यासक्रम : धम्मभारत वरील 40 लेख
आयोजक व संयोजक
- आयोजक : प्रबुद्ध टीव्ही युट्यूब चॅनल (संचालक – प्रवीण दीपक जामनिक)
- संयोजक : प्रबुद्ध टीव्हीचे सर्व प्रतिनिधी; धम्म भारत वेबसाईट; युवा फाऊंडेशन अकोला; वंडर किड्स स्कूल, कापशी, अकोला; मा. आशिषभाऊ शिरसाठ विचारमंच; सार्थक वक्तृत्व अकॅडमी, अकोला; संदीप मेश्राम
स्पर्धा परीक्षा अभ्यास समूह; साप्ताहिक शांतिसूर्य; धम्मिक मॅट्रोमनी ॲप; आणि संबोधी टूर्स.
WhatsApp चॅनल्स फॉलो करा
परीक्षेसंबंधी सूचना आणि अपडेट मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या आणि धम्म भारतच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा.
- प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनलची लिंक क्लिक करा
- धम्म भारतच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक क्लिक करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |